कविता

आ युष्कामी's picture
आ युष्कामी in जे न देखे रवी...
12 Jun 2016 - 12:48 pm

कविता करणे माझा छंद आहे
आपणही काहीतरी करतो इतरांपेक्षा वेगळं
साहजिकच झुंडीपेक्षा वेगळा मी
भलताच देऊन जातो आत्मसन्मान
शब्दाला शब्द अन यमकांचा खेळ

लहानपणी वाचलेलं सुभाषित
लख्ख आठवतं
काव्य, शास्त्र , विनोद यांत रस
नसलेला माणूस शेपूट, शिंग
नसलेला पशु आहे
मीही सरसावतो घेऊन पेन ,
ओढून पुढ्यात
कागद वगैरे फर्रकन

मीही गलबलतो शेतकरयांचे, कष्टकरयांचे
दु:ख ऐकून , पाहून
कधी कधी विषण्ण सुद्धा होतो
drawingroom मधल्या खुर्चीत
सैलावत माझेही अश्रू ओघळतात
महागड्या कार्पेटवर
हिंदकळतो हातातला ग्लास

मीही शोक व्यक्त करतो
बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर
अन् विचार करतो
आज interview ला आलेली
पोरगी एकदम मस्त होती
try करायला पाहिजे

डोळे जडावतात आणि पापण्या
दिवसभराच्या श्रमाने विसावतात
पडदे ओढून घेतल्यावर काळ्याकुटट
भिंतीवर चित्रे उमटू लागतात
माझ्यातला मर्द, interview आलेली
पोरगी, बाजूच्या डेस्कवरची hot बेब
काहीसा नवा , काहीसा जुना खेळ
मीही करतो कविता कधी मधी

कविता