पांढरपेशी विडंबने

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
28 Nov 2007 - 11:42 am

आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम कविता पांढरपेशी कविता

अवळेचिंचा कुरतडताना तिला पाहुनी कच्च्या
समजू नका हो झाला आहे भलता सलता लोच्च्या

किरकिरणारा बाप तिचा हा जागा चोवीस तास
खिडकीमधूनी गेलोतरी ही त्यास लागतो वास

गंध मारतो किती तुझ्या रे ह्या कपड्यांना साल्या
तुमान बुरसट, सदरा कळकट धू कधीतर मेल्या

डेलिकसीच्या नावाखाली समोर झुरळे आली
खारवलेल्या मिळती इथल्या हॉटेलातुनी पाली

चादर ओढून आता पडतो लोळत घोरत गादी
(तशी जराशी गारच होती तुरुंगातली लादी)

शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा
कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा

अंगावरचे ठसे सांगती गतकाळाचे काही
मार लपावा इतकी ही अमुची पुण्याई नाही!

दर्प सांगती अभिमानाने मदिरेच्या ह्या जाती
स्वच्छ सुसंस्कृत शुद्ध अमुची इथे गटारी होती

हलकट मेला घाला याला चार शिव्यां अन लाथा
पांढरपेशी विडंबने तव पुरे "केशवा" आता!

-केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

28 Nov 2007 - 11:45 am | आजानुकर्ण

मस्त. :)

- आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

28 Nov 2007 - 11:46 am | विसोबा खेचर

सही विडंबन...

लगे रहो केशवभाई! :)

गंध मारतो किती तुझ्या रे ह्या कपड्यांना साल्या
तुमान बुरसट, सदरा कळकट धू कधीतर मेल्या

ह्या ओळी बाकी सहीच...

तात्या.

धोंडोपंत's picture

30 Nov 2007 - 10:22 am | धोंडोपंत

वा वा केशवा,

झकास विडंबन.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त's picture

30 Nov 2007 - 10:52 pm | देवदत्त

शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा
कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा..

हे खरेच... तिथे भरपूर सुचते. :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Nov 2007 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमार विडंबन आवडले. अशात जरा विडंबने कमी येऊ लागली, असे वाटते.

शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा
कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा

हे मात्र खरंय !!! तिथे मात्र प्रतिभा बहरुन येते.

माधवास मुक्त पत्र नावाचा लेख दिसत नाही. संपादक मंडळ खूलासा करतील काय ?

कोलबेर's picture

1 Dec 2007 - 8:32 am | कोलबेर

माधवास मुक्त पत्र नावाचा लेख दिसत नाही. संपादक मंडळ खूलासा करतील काय ?

लेखकाने नकाराधिकार वापरून नाहिसा केला.

केशवसुमार's picture

1 Dec 2007 - 5:11 pm | केशवसुमार

http://www.misalpav.com/node/180 मधे सहजशेठने आमचा जो फोटो दिला होता त्यावरून
शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा
कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा

ह्या ओळी सुचल्या... ;)