चालवायचंच म्हटलं तर...

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
21 May 2016 - 9:56 pm

चालवायचंच म्हटलं तर
अगदी काहीही चालतं
चालून बिघडोस्तोर
सगळंच चालवलं जातं

चालून चालून
बिघडल्यावर मात्र
चालण्यासारखं
काहीच नसतं

बिघडवायला काय हो
अगदी काहीही चालतं
बिघडून पुन्हा चालनं मात्र
चालण्यासारखं नसतं

मुक्तक

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

21 May 2016 - 10:20 pm | कानडाऊ योगेशु

चालायचच भाऊ! ;)

कविता१९७८'s picture

21 May 2016 - 10:37 pm | कविता१९७८

चालुद्या

चांदणे संदीप's picture

22 May 2016 - 5:33 am | चांदणे संदीप

चालवून घेतलं तर काहीही चालतं
मात्र काहीही चालवून घ्यायच नसत

जव्हेरभाऊ लिखते रहो!

Sandy

उगा काहितरीच's picture

22 May 2016 - 9:09 am | उगा काहितरीच

अरे , काय चाल्लय काय ? ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2016 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालवायचंच म्हटलं तर
अगदी काहीही चालतं
चालून बिघडोस्तोर ;)

-दिलीप बिरुटे