जागतो आहे रात्र रात्र
आठवणी्च्या दुनियेत
न राहिलो मी माझा
फक्त तुझ्यामुळेच
का नाही कळ्ले तुला
काय आहे माझ्या मनी
बुड्लो आहे आकंठ
पोहणे माहीती असुनी
पायातील पैजंणात तुझ्या
कैद केलेस तु मला
सुटका नाही मज आता
टाक सरळ चिरडुन मला
होते समजत तुला तर
का नाही बोललीस
आग लागण्याआधीच
राख का नाही चोळ्लीस
प्रतिक्रिया
21 May 2016 - 6:47 am | प्रचेतस
वाहव्वा..!
छान
21 May 2016 - 8:07 am | चांदणे संदीप
क क क का लि लो दे जा
Sandy
21 May 2016 - 11:42 am | नाखु
छोटेखानी आणि समर्पक