तर्राट झालं जी...

सायकलस्वार's picture
सायकलस्वार in जे न देखे रवी...
20 May 2016 - 3:37 am

खुळखुळ वाजं खिशातऽऽ
भलतंच खुललंया आज...
बायकुचं चुकवून ड्वाळं…
सुमडीत गाठलंया बार

अन् झनानलंऽऽऽ
बाटल्यामंदीऽऽऽ
अन ग्लासातनं व्हटात गेलं जी

तर्राट झालं जीऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ....

झिंगून गेलंया सारंऽऽ
त्वंडाचं सुटलंया घाण
अल्लद झेपावल्यालंऽऽ
आभाळामंदी विमान..

ग्यलं व्हटातनं..
या प्वटा मंदी
अन प्वटातून भेजामंदी जीऽऽ

तर्राट झालं जीऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ....

तंगडं कोंबड्याचं
बकाणं चिवड्याचं...
चखणं फुटान्याचं चरलं….

चरलंऽऽऽ..........

कळ आलं प्वटामंदी
कोसळलं ताटामंदी
बकाबका तिकडंच वकलं…

रंगलंऽऽऽ रं आंगंचं कापडं रंगलं
पडलंऽऽऽ रं कंबरंत लात पडलं
फ्यकलंऽऽऽ रं उचलून भाईर फ्यकलं..
भिनलंऽऽऽ द्येशीचं ईष जारी भिनलं

मग बागाडलं…
सार्‍या गावामंदी..
अन् घराकडं गात आलं जी..

तर्राट झालं जीऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽ...
तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ....

अक्रीत घडलंया
बायकुनं धरलंया..
कानपाट फडाफडा फोडलं…

फोडलंऽऽऽऽ........

सात जन्माचं राग…
साचलंया काळजात…
तुला रं गुरागत झोडलं..

रंगलंऽऽऽ ह्ये रगतानं थोबडं रंगलं
भिजलंऽऽऽ आंग घामानं चिंब भिजलं…
तुटलंऽऽऽ ह्ये सदर्‍याचं गुंडी तुटलं
सुटलंऽऽऽ ह्ये ल्यंग्याचं नाडं सुटलं

होऽऽऽऽ.. कडाडलं..
गालफडामंदी…
अन हाडं खिळखिळं झालं जीऽऽऽ...............

**************************
Cheers!!!

dive aagarआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीबालसाहित्यमार्गदर्शनश्लोकसंस्कृती

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

20 May 2016 - 6:31 am | चांदणे संदीप

लईच तर्राट झालंय... त्येचा वकार युनूस झाला नस्ता तर बायकुनी हाण्ला नस्ता. पण लै माज केला पियाचा की बसा मंग बोंबलत...!
वंगाळ झालं जीऽ
वंगाळ झालं जीऽऽ
वंगाळ झालं जीऽऽऽ

लिव्हलंय तर भन्नाटच... आता येकदा चालीत म्हणून बघतो!

Sandy

साहेब..'s picture

20 May 2016 - 9:25 am | साहेब..

भन्नाट लिव्हलंय

सतिश गावडे's picture

20 May 2016 - 9:27 am | सतिश गावडे

=))

स्पा's picture

20 May 2016 - 9:36 am | स्पा

ख्याक
वारल्या गेले आहे

=))

ब्येकार

अभ्या..'s picture

20 May 2016 - 9:50 am | अभ्या..

ए पिंट्या, रिप्पीट.

बोका-ए-आझम's picture

20 May 2016 - 10:19 am | बोका-ए-आझम

अदुगर ती गाडीची चावी काढूनशान द्या की!

संजय पाटिल's picture

20 May 2016 - 11:14 am | संजय पाटिल

अय.. चावीला हात लावायचं काम नाय.. सांगून ठिवतु..

रघुनाथ.केरकर's picture

20 May 2016 - 10:39 am | रघुनाथ.केरकर

हाहाहा
मस्त जमलय

वेल्लाभट's picture

20 May 2016 - 11:08 am | वेल्लाभट

सही जमलंय...

आमच्या व्हर्जनकडेही लक्ष वेधू इच्छितो
http://www.misalpav.com/comment/839137#comment-839137
http://www.apurvaoka.com/2016/05/sairaat-vidamban-song-tarraat.html?m=1

सायकलस्वार's picture

20 May 2016 - 6:23 pm | सायकलस्वार

LOL भारी आहे तुमचं वर्जन पण!

रातराणी's picture

20 May 2016 - 11:19 pm | रातराणी

+१ सहीच आहे!

रातराणी's picture

20 May 2016 - 11:43 am | रातराणी

हा हा मस्त जमलंय!

सूड's picture

20 May 2016 - 8:19 pm | सूड

लैच!!

बाजीगर's picture

23 May 2016 - 12:08 am | बाजीगर

हा हा हा एकदम जबरी जमलय राव.
बैहद खूष झालो.मानलंं तुम्हाला. मस्त.