जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे
मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे
ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे
कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे
न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी
कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे
बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा
एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे
होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर
हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे
(कुणी अनुवाद केला तर उत्तम)
प्रतिक्रिया
16 May 2016 - 12:14 pm | वेल्लाभट
अनुवाद नाही; पण तसंच काहीसं सुचलं.
जिथे जात असू तेच गंतव्य आहे
मातीत मातीस भवितव्य आहे
हवेच्या सवे वाहणे हीच नीती
इथे हेलकाव्यात कर्तव्य आहे
न प्यारा परार्थ न स्वार्थाशी सख्य
भटकणेच याच्याहुनी भव्य आहे
न जातील अश्रू असे व्यर्थ माझे
बहर आणणारेच ते द्रव्य आहे
शहाणे कधी जाणले ना बिचारे
वेडात जे दिव्य माधव्य आहे
- अपूर्व ओक
16 May 2016 - 12:22 pm | पथिक
सुंदर! भावलं…
16 May 2016 - 4:20 pm | महासंग्राम
मस्त जमलीये पण थोडे उर्दू शब्द असल्यास अजून जास्त मजा आली असती
9 Jun 2016 - 2:17 pm | ज्ञानराम
खूपच सुंदर , गजल आणि खाली प्रतीक्रीयेतली कविता सुद्धा !!
1 Jul 2016 - 5:43 pm | पथिक
धन्यवाद!