व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in अन्न हे पूर्णब्रह्म
9 May 2016 - 7:12 pm

व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया)

यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा.

मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे.

दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ?
.
.
.
.
आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न

* वैद्यकीय आणि आहारशास्त्र

१.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात.

१.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे.

१.२.१) गाईचे दूध घेणार्‍यांनी किती सेवन करावे

१.२.२) म्हशीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे

१.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे

१.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे

१.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे.

१.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ?

२) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते

३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे.

४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे)

५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ?

६) बर्‍याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्‍यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ?

७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ?
८) रक्तस्त्राव होणार्‍या/ रक्तदान करणार्‍या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ?
९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा
१०) या दुसर्‍या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे.
११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते?
.
.
.
.
*जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न

बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे.

१) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ?
२) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ?
३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते
४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ?
५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे.
.
.
.
.
.

सुचतील तसे अजून प्रश्न अ‍ॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे.
.
.
.
अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार.

* बी १२ इतर मिपा धागे

* कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

* https://www.misalpav.com/node/18374

*

प्रतिक्रिया

सप्तरंगी's picture

22 May 2016 - 8:20 pm | सप्तरंगी

चर्चेला फार फाटे फुटले आहेत. असो.
मी आहारतज्ञ नाही. कशातून किती-काय मिळेल याचा इतका कधी विचार केला नाही. नॉन-व्हेज पण अतिशय कमी खाल्ले जाते. पण ढोबळ असे सांगु शकते. आणि साधारणता खालील फोल्लो करते :
२५० ml skimmed मिल्क = १.२ microgm b12
२ boiled eggs = १.६० microgm of b12
१.२ + १.६ = २.८ microgm of b12
whereas daily requiremnet is around २.४
दुध, दही , ताक , केफिर , अंडी यातून ब१२ मिळेल veg लोकांना !

सप्तरंगी's picture

22 May 2016 - 8:30 pm | सप्तरंगी

अर्थात कॉलेस्त्रोल चा विचार करावा लागेल , रोज २ अंडी खाताना. यावर सुबोध खरे / इतर डॉक्टर्स guide करू शकतील

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 May 2016 - 10:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

कारण बलकातच पुर्ण ब १२ जीवनसत्व असत अन त्यात कोलेस्टेरॉलही. २ उकडलेल्या अंड्यात गरजेच्या १३०% कोलेस्टेरॉल असते. शक्यतो अंड्यांसोबत हिरव्या भाज्या वाढवल्यात तर फरक पडू शकेल.

कोलेस्टेरॉलवाल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा कारभार करावा.

त्रिवेणी's picture

22 May 2016 - 9:03 pm | त्रिवेणी

injection
सध्या मी बी २९ हे इंजेक्शन घेतेय.

दूधा पासूनच्या ऊपपदार्थांतील बी १२ च्या प्रमाणा बद्दल शंका होती. एक कॅनडीयन रिसर्च पेपर मध्ये काही उल्लेख आढळले त्यानुसार ( अशा रिसर्च पेपेअर मधील उल्लेखांवर अवलंबून रहाण्यापुर्वी दुजोरा सुद्धा असावा मगच विसंबावे असे व्यक्तिगत मत आहे म्हणून तज्ञांच्या मतांची प्रतिक्षा असेल.

१)दुधाब्वरील प्रक्रीयांचा दुधातील बी १२ च्या प्रमाण कमी अधिक होण्याशी संबंध असू शकतो.

२) ७५ डिग्री च्या १६ सेकंदात केलेल्या पाश्चरायजेह्शनला बी १२ व्यवस्थित तोंड देते आणि अशा दुधात घरगुती फ्रईज मध्ये ९ दिवस तग धरू शकते.

३) ९५ डिग्री तपमानावर ५ मिनीट पर्यंत तापवले तरी बी १२ प्रमाण टिकून राहू शकते.

४) पण तेच मयक्रोवेव्हला ५ मिनीट पेक्षा अधिक वेळ गरम केले तर बी १२ ची ३० ते ४० टक्के घट होते (या बाबत अधिक स्पष्टता हवी असे वाटते)

५) किंवा शेगडीवर अर्धा तासाच्या वर उकळले तरी बी १२ त ३० ते ४० टक्क्यांची घट होते (म्हणजे पहिल्यांदा तापवलेले दुध आणि अनेक वेळा तापवलेले दुध यातील बी १२ मध्ये तफावत येते किंवा बासुंदी सारख्या पदार्थात ३० ते ४० टक्के बी १२ कमी होईल हा माझा अंदाज चुभूदेघे) म्हणजे थोडक्यात बी १२ दुधातऊन योग्य प्रमाणात हवे असल्यास ९५ डिग्रीवर ५ मिनीटे गरम केल्यानंतर बी १२ साठी वापरून घ्यावे दूधास उगाच उकळया काढून बी १२ पुरेसे मिळते आहे असे समजू नये कारण आपल्या पैकी फारच कमी जण तसे ही अर्धा लिटर पिऊ शकतील. चहात सुद्धा चहा सोबत दुध उकळण्या पेक्षा गरम दुध वरून टाकणे रास्त म्हणता येईल का ?

६) बी १२ पाण्यात विरघळणारा घटक आहे ज्याज्या प्रक्रीयेत दुधातील पाणी कमी होईल त्या त्यात बी १२ प्रमाण कमी होईल

७) canned evaporated milk (म्हणजे मिल्क पावडर का ?) यात ६५ टक्के पर्यंत बी १२ प्रमाणात घट होते असे म्हटले आहे ( खव्या बद्दल वेगळा उल्लेख आढळला नाही पण तशीच शक्यता प्रथमदर्शनी वाटते..

८) दिवसाच्या सर्वसाधारण उजेडाचा बी १२ च्या प्रमाणावर परिणाम होत नसला तरी प्रखर प्रकाशाच्या काही प्रकाराचा बि १२ प्रमाण कमी होत असण्याची संभावना असावी.

९) दही बनवले जाताना त्यातील दही लावण्यापुर्वी दूधाला गरम केले जाण्याच्या प्रक्रीयेत बी १२ चे प्रमाण कमी होऊ होतेच शिवाय विरजण आणि विरजण्याच्या प्रक्रीयेत (किंवा इतर आंबवण्याच्या इतर प्रक्रीयेत) २५ ते २६ टक्क्या पर्यंत बी १२ त घट येऊ शकते आणि हि घट प्रक्रीया कमी तापमानावर साठवलेल्या दह्यात सुद्धा होत रहाते ( जे मार्केट मधून विकतचे दही वापरतात त्यांनी या मुद्द्याकडेही लक्ष द्यावे असे वाटते)

१०) पाणी निघून गेल्यामुळे चीज मध्येही (पनीर खव्या प्रमाणेच) दूधा पेक्षा बी १२त घट येते (- भारतातिल बहुसंख्य चीज भारतीय व्हेजेटरीयन चीज मध्ये मोडत असावे चुभूदेघे)

घट आल्या नंतर भारतेतर युरोपीय स्वीस टाईप चीज मध्ये इतर चीजच्या तुलनेत प्रक्रिया पद्धतीमुळे बी १२ प्रमाण जरा अधिक वाढते - चीज बनवण्यातील काही प्रक्रीयात गाय विषयक काही साधनांबद्दल प्राणि प्रेमींच्या आक्षेपांनतर भारतात अशा 'स्वीस चीजच्या आयातीवर मर्यादा आणल्या गेल्या होत्या असे दिसते.

https://academic.oup.com/af/article/4/2/32/4638653 या पेपर मध्ये नैसर्गीक पदार्थातील बी १२ चे ऑबसॉर्ब्शन आणि कृत्रीम बी १२ अशी काही वैज्ञानीक तुलना दिसते आहे जी माझ्या डोक्यावरून गेली . कदाचित इतर तज्ञ मंडळींना कळल्यास उलगडून द्यावी

सुबोध खरे's picture

26 Apr 2019 - 12:27 pm | सुबोध खरे

नैसर्गीक पदार्थातील बी १२ चे ऑबसॉर्ब्शन आणि कृत्रीम बी १२

दूध किंवा इतर नैसर्गिक पदार्थातील ब १२ जीवनसत्व हे ऍडेनोसील कोबालमिन (ब १२) या स्वरूपात असते त्यामुळे ते जास्त चांगले शोषले जाते.

कृत्रिम ( गोळीत) असलेले बी १२ सायनो कोबालमिन या स्वरूपात असते. शरीरात या "सायनो" गटाचे विघटन होणे आवश्यक आहे आणि ते कमी मात्रेत सायनोकोबालमिन घेतले असताना व्यवस्थित होत नाही. यामुळे गोळी द्वारे कमी प्रमाणात घेतलेले बी १२ (सायनिकोबालमिन) नीट शोषले जात नाही.

याउलट दुधात असलेल्या केसीन या प्रथिनामुळे दुधातील बी १२ जास्त चांगल्या प्रमाणात शोषले जाते. यामुळे जर आपण ब १२ जीवनसत्त्वाची गोळी दुधाबरोबर घेतली तर त्यातील जीवनसत्त्व जात चांगले शोषले जाते.

जालिम लोशन's picture

26 Apr 2019 - 3:30 pm | जालिम लोशन

असल्यामुळै त्या क्षणाला जेव्हैडे जरुरी असेल तेव्हडेच वापरले जाते बाकीचे शरिराबाहेर टाकले जाते. नैसर्गीक biota त्याच्या ऊपल्ब्धेतेची पुर्ण काळजी घेतो. वयोमानानुसार त्याचे शरीरात शोषण होते. त्यामुळे जो पर्यंत त्याचे रोगात रुपांतर होत नाही तो पर्यंत त्याची काळजी करु नये व वैद्यांचे व औषध कंपन्यानचे खिसे भरु नये.

सुबोध खरे's picture

27 Apr 2019 - 10:06 am | सुबोध खरे

बी १२ हे जीवनसत्त्व जरी पाण्यात विद्राव्य असलं तरीही ते काही प्रथिनांबरोबर संयुग करून आपल्या यकृतात साठवून ठेवलं जातं. बी १२ ची रोजची गरज १ मायक्रो ग्रॅम असते आणि यकृतात असे १००० मायक्रोग्रॅम पर्यंत साठवून ठेवले जाते. त्यामुळे अगदीच दूध न पिणारा शाकाहारी किंवा मांसाहारी असेल तर त्याला या जीवनसत्त्वाची कमतरता भासते. आणि जसे वय होत जाते तास आहार कमी होतो आणि शोषणही कमी होते यामुळे याची कमतरता भासते.

यात एक दुसरा घटक म्हणजे दारू पिणे यामुळे आपल्या यकृताची हानी होते आणि त्यातील जीवनसत्त्व नष्ट होते. अशा लोकांना सुद्धा नंतर ब १२ जीवनसत्त्वाची कमतरता भासू लागते. ( यात यकृताची हानी किती आणि एकंदर आहाराचा असमतोल किती हे सांगणे कठीण आहे).

हीच स्थिती कावीळ झाल्याने यकृताची हानी झाल्यास होऊ शकते. म्हणून काविळीतून बरे झाल्यावर समतोल चौरस आहार घ्यावा( तो तसाही असावाच) हे जास्त संयुक्तिक आहे.

अमचा डॅाक्टर नेहमी सांगतो की अर्धे केळे आणि अर्धा कप दुध दोनवेळा असे आठदहा दिवस घ्या. गोळ्या दोन दिवसांच्याच देतो.

मला तर त्याच्या दवाखान्यात बसल्याबसल्या बरे वाटायला लागते. हे मी त्याला सांगतो. साधारण पस्तिशिचा आहे, मुलुंडहून येतो डोंबिवलीला सकाळसंध्याकाळ.

निरसे दूध शहरात सर्वांनाच मिळणार नाही पण प्यायला हवे. वाळक्या गवतातून गाइम्हशी कायकाय सकस बनवतात!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Apr 2019 - 8:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

भाज्या फळे इंजेक्शन देउन पिकवतात,
दुधात युरियाआणि शँपु घालुन फेस आणतात,
कोंबड्या मानेत ईंजेक्शन मारुन दोन आठवड्यात पिल्लाची मोठी करतात,
आणि अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात.
शहरात आपल्याला ऑर्गॅनिक नावाखाली महागाने जे विकतात ते पण भरवशाचे नसते.
कोवळ्या उन्हात फिरायला जावे तर सर्वांचे शरीर पाहिजे तेव्ह्ढी व्हिटामिन तयार करेलच असे नाहि.
मग कॅप्सुल घेतल्या तर काय बिघडले?

सुबोध खरे's picture

27 Apr 2019 - 9:54 am | सुबोध खरे

कॅप्सूल घेतल्या तर बिघडले काहीच नाही. फायदा तर होईलच.

परंतु आता पर्यंत आपल्याला सर्वच जीवनसत्त्वांचा शोध लागला आहे हे गृहीतक १०० % बरोबर म्हणता येणार नाही.

म्हणजेच अजूनही अशी अनेक सूक्ष्म द्रव्ये असतील ज्यांचा आपल्याला शोध लागलेला नाही.

त्यामुळे कॅप्सूल हा चौरस आहाराचा / अन्नाचा सोपा पर्याय असू नये.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Apr 2019 - 12:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

चौरस आहाराला पर्याय अशा अर्थाने नाही म्हणालो मी, पण निदान जे पाकिटावर लिहिलेय तेव्ह्ढे तरी कॅप्सुलमध्ये मिळेल अशा अर्थाने म्हणालो

आजकाल पैसे घ्या पण निदान चांगली वस्तु तरी द्या अशी विनंती करायचे दिवस आलेत.

कंजूस's picture

26 Apr 2019 - 8:25 pm | कंजूस

हे लक्षातच नै आलं.

यकृत मेंदुपेक्षा पावरफुल आणि महत्त्वाचं. छोटीशी कट्ट्यार इथेच काम करते.

असंका's picture

27 Apr 2019 - 10:56 pm | असंका

. अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात

रच्याकने, यात कृत्रिम काय आहे?

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Apr 2019 - 12:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

माणसात ज्याला आय. व्ही. एफ म्हणतात

सुबोध खरे's picture

30 Apr 2019 - 9:52 am | सुबोध खरे

अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात.

अंडी घालणे हा कोंबडीचा नैसर्गिक गुणधर्म आहे. फलन झाले तरच (कोंबड्याबरोबर संबंध आला) त्यातून गर्भ धारणा होते अन्यथा अंडं खराब होऊ जातं.
उत्क्रांतीप्रमाणे-- फलनाची हि प्रक्रिया माशां( जलचरां) मध्ये पाण्यात होते. मादी पाण्यात हजारो ते लाखो अंडी देते आणि नर तेथे आपले शुक्राणू सोडतो. आणि फलित अंड्यापासून पिल्लू (मासा) तयार होतो. यात बरीचशीं अंडी खाल्ली जातात/ फुकट जातात.
पक्षांमध्ये हि प्रक्रिया मादीच्या शरीरात होते पण अंडं शरीराबाहेर दिलं जातं आणि तेथे उबवून त्यातून पिल्लू बाहेर पडतं. यात तुलनेत कमी अंडी फुकट जातात किंवा परभक्षकाकडून खाल्ली जातात. कोंबडी दर महिन्यास २० ते २५ अंडी देते.
बहुतांशी सस्तन प्राण्यात अंडी शरीरातच राहतात तेथेच फलन होते गर्भ मादीच्याच शरीरात राहतो आणि गर्भधारणेच्या काळानंतर संपूर्ण असा जवळ जवळ स्वावलंबी जीव जन्माला येतो या प्रक्रियेत अंडी फुकट जाण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. म्हणूनच मानवी शरीरात एका महिन्यात एकच अंडे तयार होते आणि त्याचे फलन झाल्यास एकच गर्भ राहतो.
उत्क्रांतीमध्ये जसे सजीव वरच्या पायरीवर जातात तसे अंडी फुकट जाण्याचे प्रमाण कमी होत जाते पण पालकत्वाचा काळ आणि पालकत्वाची जबाबदारी वाढत जाते.

Rajesh188's picture

28 Apr 2019 - 9:34 am | Rajesh188

बाजारात निरनिराळी जीवनसत्त्वे औषधे म्हणून विकली जातात. केवळ शक्तिदायक म्हणून त्यांचा उपयोग करणे अयोग्य आहे. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उर्त्सजित होत असल्यामुळे शरीरात साचून राहत नाहीत व म्हणून विषारी ठरत नाहीत. याउलट अ आणि ड जीवनसत्त्वे अतिसेवनामुळे विषारी ठरू शकतात. ध्रुव-संशोधन मोहिमेस गेलेल्या प्रौढ माणसांच्या आहारात प्रत्येकी ३०० ते ५०० ग्रॅ. अस्वलाचे यकृत खाण्यात आल्यामुळे जोराचा आजार उत्पन्न होई (त्या प्राण्यांच्या यकृतात अ जीवनसत्त्व फार मोठ्या प्रमाणात असते). डोकेदुखी, उलट्या, अतिसार, चक्कर येणे ही लक्षणे ताबडतोब सुरू होत. काही दिवसांनंतर मात्र केस गळून पडणे व कातडीवर परिणाम होणे ही लक्षणे दिसू लागत. ड जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने उलटी व अतिसार ही लक्षणे प्रथम दिसू लागतात भूक मंदावणे, वजनात फार मोठ्या प्रमाणात घट होणे व वृक्क (मूत्रपिंड) अकार्यक्षम बनणे यांमुळे मृत्यूही ओढवतो

हा धागा काढून आदमासे आठ वर्षे होत आली आहेत. या विषयातील भारतीय गरजांच्या दृश्टीने सखोल संशोधन आणि विश्वासार्ह माहितीची पोकळी, चुकीच्या माहितीची भेसळ अधून मधून जाणवत राहिलेली आहे.

असो. बिझ्नेस स्टँडर्ड हे वृत्त व्यावसायिक दृष्टीकोनातून असल्याची मर्यादा लक्षात घेऊनही त्यातील दर ४ पैकी १ भारतीयास ब१२ ची कमतरता असण्याची शक्यता ते ब१२सप्लीमेंट मार्केटची वार्षीक ७ टक्केची वाढ होत ४००० कोटी वार्षीकला पोहोचलेले मार्केट बद्दलचे वृत्ताची दखल घेण्यास हरकत नसावी.