व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in अन्न हे पूर्णब्रह्म
9 May 2016 - 7:12 pm

व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया)

यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा.

मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे.

दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ?
.
.
.
.
आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न

* वैद्यकीय आणि आहारशास्त्र

१.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात.

१.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे.

१.२.१) गाईचे दूध घेणार्‍यांनी किती सेवन करावे

१.२.२) म्हशीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे

१.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे

१.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे

१.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे

१.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ?

१.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे.

१.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ?

२) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते

३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे.

४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे)

५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ?

६) बर्‍याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्‍यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ?

७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ?
८) रक्तस्त्राव होणार्‍या/ रक्तदान करणार्‍या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ?
९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा
१०) या दुसर्‍या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे.
११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते?
.
.
.
.
*जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न

बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे.

१) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ?
२) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ?
३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते
४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ?
५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे.
.
.
.
.
.

सुचतील तसे अजून प्रश्न अ‍ॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे.
.
.
.
अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार.

* बी १२ इतर मिपा धागे

* कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

* https://www.misalpav.com/node/18374

*

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:07 pm | आनंदी गोपाळ

माहितगार साहेब,
कम ऑन.
तुम्हाला जामोप्या यांच्या डिग्रीबद्दल माहिती नाही, असे म्हणवत नाही. अशी माहिती तुम्हास नाही, असे शपथपूर्वक नमूद करता का?

माहितगार's picture

16 May 2016 - 9:39 am | माहितगार

तुम्हाला जामोप्या यांच्या डिग्रीबद्दल माहिती नाही, असे म्हणवत नाही.

१)
या आपल्या व्यक्तिगत कल्पना आहेत. मला आणि माझ्या प्रमाणे असंख्य सदस्य आणि अनामिक वाचकांना जामोप्या कोण ? अमुक कोण आणि तमुक कोण याची माहिती असेलच असे नाही. हे लक्षात घेऊन धागा लेखक म्हणून 'एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण विषयातले तज्ञ अथवा जाणकार आहोत अथवा नाही हे विशेष /आग्रही सल्ला/मत देताना, होता होईतो नमुद केले जावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लक्षात यावे, अशी सदर धागा लेखकाची अपेक्षा आहे.' हि अत्यंत किमान स्वरुपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या किमान अपेक्षेचा आपण अनादर का करु इच्छिता हे अनाकलनीय आहे.

२)

अशी माहिती तुम्हास नाही, असे शपथपूर्वक नमूद करता का?

हि व्यक्तिगत साठमारीची भाषा धागा लेख आणि उपरोक्त विनंतीशी सतर्क्य न जोडता येणारे अवांतर आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष करतो.

३) जे कुणि तज्ञ/ जाणकार आहेत त्यांनी माहिती देताना आपण जाणकार अथवा तद्न्य असल्याचे सुस्पष्ट लक्षात येईल हे पाहिल्यास सर्वसामान्य अनामिक वाचकांचा घोटाळा होणार नाही, व्यक्तिगत मतभेदांपेक्षा धागा विषयावर स्वतंत्रपणे आपल्याकडे असलेली माहिती जाणकार आणि तज्ञांनी दिल्यास, उपकृत राहू.

आपल्या मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.

सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. तुम्हाला काही प्रोब्लेम ?

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:05 pm | आनंदी गोपाळ

विचारण्याची लायकी आहे कींवा कसे, हे कसे ठरवायचे?

रुस्तम's picture

16 May 2016 - 7:41 pm | रुस्तम

नाही ठरवता येत मग शांत बसा. इकडे तिकडे नाक खुपसू नका..

सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. तुम्हाला काही प्रोब्लेम ?

सामान्य वाचक's picture

13 May 2016 - 1:06 pm | सामान्य वाचक

दुर्लक्ष करा असे म्हणेन
वेळ , श्रम आणि दिलेले ज्ञान वाया जाईल, बाकी काही होणार नाही

सुचिता१'s picture

12 Jul 2018 - 7:29 pm | सुचिता१

+१००

anilchembur's picture

14 May 2016 - 7:33 pm | anilchembur

छाण माहिति मिलाले

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 4:28 pm | आनंदी गोपाळ

मोगा"खान" इ. उल्लेख आवडले नाहीत. तुमचा बायस प्रूव्ह होतो.

जंत इन्व्हेस्टिगेट करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट गोळ्या खाऊ घालीन, असे सल्ले तुम्ही स्वतः मिपावर इतरत्र टाईप केलेले आहेत.

या धाग्यावरील तुमची अ‍ॅटिट्यूड चुकीची वाटली, हे नोंदवितो.

सुबोध खरे's picture

15 May 2016 - 6:39 pm | सुबोध खरे

गोपाळ राव
मोगा खान म्हणण्यामागे शिव्या देणे येते असे नाही कारण याच व्यक्तीने आपल्याला मुसलमानि तत्वे पटतात असे बर्याच धाग्यांवर जाहीर पणे लिहिलेले आहे. "खान" हि शिवी नाही.
बाकी या माणसाच्या एकंदर वागणुकीबाबत माझा पूर्वग्रह आहे असे आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. कारण हि व्यक्ती बर्याचशा टोपण नावानी येथे वावरत असून बर्याच धाग्यांवर पिंका टाकत असते त्यामुळे यांच्या बर्याच आय डी संपादक मंडळाने बंद केल्या आहेत. याचा अर्थ या व्यक्तीचे प्रतिसाद आक्षेपार्ह आहेतअसे संपादक मंडळाला वाटते हेही सत्य आहे . अशा माणसाबाबत मला पूर्वग्रह असल्याबद्दल यत्किंचीतही वाईट वाटत नाही.
याच व्यक्तीने इतरत्र माझ्या शिक्षणाबद्दल माझ्या विचारसरणी बद्दल आणि मी शिकवत असलेल्या महाविद्यालय याबद्दल हीन पातळीचे प्रतिसाद दिले होते तरीही मी त्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडलो नाही.
"जंत इन्व्हेस्टिगेट करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट गोळ्या खाऊ घालीन, असे सल्ले तुम्ही स्वतः मिपावर इतरत्र टाईप केलेले आहेत."
मी मिपावर किंवा कुठेही बोलतो किंवा लिहितो यामागे माझी काही ठाम विचार सरणी असते आणि बहुसंख्य वेळेस त्यामागे शास्त्रीय बैठक असते. वर लिहिण्याचे कारण जागतिक आरोग्य संघटना सुद्धा जेथे जंत (endemic) आहेत तेथे दरवर्षी शौच तपासणी न करता जंताचे औषध द्यावे अशी शिफारस केलेली आहे.
WHO recommends periodic treatment with anthelminthic (deworming) medicines, without previous individual diagnosis to all at-risk people living in endemic areas. पहा
http://www.who.int/elena/titles/deworming/en/
जंत हे बाह्य आक्रमण आहे तर ब १२ हे सदा सर्वकाळ लागणारे आहारातील जीवन सत्त्व आहे आणि विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता भासते म्हणून हा दुध किंवा दही किंवा ताक पिण्याचा सल्ला दिला आहे. अमुलचे ताक रुपये ८ मध्ये ५०० मिली उपलब्ध आहे. जीवन सत्त्व हे आहाराच्या घटकातुंच शक्यतो मिळवले पाहिजे असा संकेत आहे याचे कारण अन्न पदार्थात आपल्याला अजूनही माहित नसलेले सूक्ष्म घटक आहेत/ असू शकतात (हे मी वर लिहीलेलेच आहे) यास्तव गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक अन्नघटक घ्यावेत असेच जागतिक संघटनाच्या शिफारशी असतात.
जीवन सत्त्वाच्या गोळ्यांबद्दल असा सल्ला कोणत्याही आरोग्य संघटनेने दिला असल्याचे मी अजून तरी वाचलेले नाही. (तसा सल्ला दिला असेल/ कोणी दाखवला तर मी आपले मत बदलेन. )
या धाग्यावरील तुमची अ‍ॅटिट्यूड चुकीची वाटली, हे नोंदवितो. आपल्याला माझा अ‍ॅटिट्यूड चुकीचा वाटला हे आपले मत आहे. त्याचा मी आदर करतो
असो.

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:12 pm | आनंदी गोपाळ

या माणसाच्या एकंदर वागणुकीबाबत माझा पूर्वग्रह आहे असे आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे.

धन्यवाद!

जंतांव्यतिरिक्तही इतर गोळ्यांबद्दलही आपण जे म्हटलात ते योग्य परिप्रेक्ष्यात घेतले गेलेले आहे. आपण या संस्थळावर प्रतिष्ठा राखून आहात. त्याचा फायदा उचलत, कितींदाही आयडी उडालेल्या व्यक्तीबद्दल व्यक्तीगत आकसाने लिहिणे, व क जीवनसत्वाच्या गोळ्या सर्वात स्वस्त सोर्स आहेत, या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवादावरून त्यास झोडपणे, तुम्हास पटले असेलच, असे नाही, असे वाटते. :)

तरीही, मानवी स्वभावानुसार, आपण त्यांनी केले तेच करीत आहात, हेही नोंदवितो.

धन्यवाद! (पुनः एकदा)

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:36 pm | आनंदी गोपाळ

http://www.misalpav.com/comment/791049#comment-791049

बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता. उदा ऑस्टो कॅलशियम,कॅलशियम संडोझ ई.

http://www.misalpav.com/comment/791106#comment-791106

I WOULD RATHER BE A
सुबोध खरे - Mon, 11/01/2016 - 23:28

I WOULD RATHER BE A PRAGMATIST THAN PURIST.
हजार रुपयाची B १२ ची चाचणी करण्यापेक्षा मी २५ रुपयाची न्युरोबायोन ची तीन इंजेक्शने देणे श्रेयस्कर समजतो. कारण कमतरता असेल तर उपाय हाच आहे तुमचे यकृत तीन वर्षे पुरेल एवढा साठा ठेवू शकते आणी B १२ हे पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्व असल्याने त्यचा ओव्हर डोस होऊन अपाय होण्याची शक्यता नाही,
आजता गायत मी कोणत्याच रुग्णाला B १२ ची चाचणी करण्यास सांगितलेले नाही.
आमच्या वडिलांची B १२ ची चाचणी केली त्यात त्यंची पातळी ४००० आढळली. साधारण हि ५०० च्या आसपास असते. हा त्यांना दिलेल्या न्युरोबायोन चा परिणाम होता यानंतर मी त्यांची चाचणी परत केली नाही.
हीच गोष्ट D ३ ची आहे . जर रुग्णाला त्याची कमतरता आहे असे वाटले तर मी सरळ २५ रुपयांची एक गोळी ६०,००० युनिट आठवड्याला एक अशा आठ गोळ्या देतो त्यानंतर रोज दोन कॅलशियम संडोझ च्या गोळ्या वर्षभर घेण्यास सांगतो. चाचणी करून ५०० रुपये फुकट घालवण्यात फायदा नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
वर लिहिल्याप्रमाणे अति डोस काही कुणाचा इतका सहज दिसून येत नाही

एभाप्र. कोणत्याही तपासण्याविना, इथे गोळ्या घेण्यास सांगितलेले चालते का?

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:46 pm | आनंदी गोपाळ

त्याच धाग्यावरून

वर लिहिल्या प्रमाणे जंतांचे औषध १० रुपयाला घेणे हे २०० रुपये देऊन शौचाची तपासणी करण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. किंवा जीवनसत्त्वाची रक्त तपासणी करण्यापेक्षा ती औषधातून घेणे हे जास्त स्वस्त आणि मस्त आहे.
त्यातून तुम्हाला कुणी विचारले कि अशी जीवनसत्त्वे कशी घेता? सरळ माझे नाव सांगा. डॉक्टर खरे एम डी यांनी सुचविले आहे म्हणून घेतो.

डॉक्टर खरे एम डी (रेडिऑलॉजी) यांनी सुचविले आहे म्हणून घेतो

:)

९अवांतरः कंसातलं, पिवळं लिहू नये असे फार मनापासून वाटत होते..

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:07 am | सुबोध खरे

गोपाळराव
आपल्या माहिती साठी सांगतो
लष्करात प्रत्येक डॉक्टर ला कोणत्याही विषयाचा तज्ञ असो पाळीपाळीने बाह्य रुग्ण विभागात बसून रोजचे साधे रुग्ण पाहावेच लागतात. शिवाय दर पाचव्या दिवशी रात्रपाळी करावी लागते.कुटुंब कल्याण केंद्रातील सिव्हिलियन डॉक्टर नि दांडी मारली कि तेथे जाऊन ६०-७० रुग्ण पाहावे लागत. असे आपली वीस वर्षे नोकरी होई पर्यंत सर्वाना करावे लागते. मला स्त्रीरोग शास्त्रात कोणताही रस नसताना मला प्रसुतीला हजार राहायला लागलेले आहे. गोव्यात असताना १३ सर्प दंशाचे रुग्ण पाहावे लागलेले आहेत. पुण्यात असताना नगरच्या आर्मर्ड रेजिमेंटच्या रणगाड्याची तोफ फुटल्यामुळे एकाच वेळेस भाजेलेले आणि स्फोटात जख्मी झालेल्या ५२ रुंग्नाना पहायची पाळी आली होती. यामुळे लष्करातील रेडियोलोजीस्टच काय पी एस एम किंवा रुग्णालय व्यवस्थापन विषयातील लोकांनाहि मुलभूत वैद्यकशास्त्राचा वापर २० वर्षे नोकरी होईपर्यंत करावाच लागतो.
यात आपण म्हणालात त्या पिवळ्या अक्षरातील रेडीयोलोजीचा भाग नसून मुलभूत वैद्यकशास्राचा भाग येतो. माझ्याबरोबर ओपीडी मध्ये हृदय शल्य क्रिया तज्ञ किंवा लहान मुलांच्या मुत्रपिंडाचा( pediatric nephrologist)च्या तज्ञ यानीपण असे साधे रुग्ण पाहिले आहेत आणि आजही पाहत आहेत. लष्करात तुम्हाला मुलभूत वैद्यक शास्त्र "आलेच पाहिजे" हा दंडक आहे. लष्करात फक्त उजव्या डोळ्याचा तज्ञ किंवा डाव्या कानाचा तज्ञ नसतो.आपण बाहेर पाहता तसे चालत नाही.
असो.

आनंदी गोपाळ's picture

16 May 2016 - 12:24 am | आनंदी गोपाळ

ससून व एएफएमसीच्या पीजी परिक्षा एकत्र होत असत. मी ससूनला शिकलेलो आहे, हे तुम्हास ज्ञात आहेच, So I know exactly how an AFMC person gets his quali. AND what are the shortcomings of that.
A blast injury gets treated by civilian surgeons too. So, once again don't flaunt your "military" background. Talk medicine.
तेव्हा, मला तुमच्या ट्रेनिंगबद्दल पूर्ण ठाऊक आहे.
इतरही पीजी लोकांना यूजीचे पूर्ण ज्ञान असावेच लागते हे वेगळे साका?च का?

मे आय सजेस्ट, प्लीज डोंट फ्लाँट युअर एमडी, (रेडिऑलॉजी)(मिलिटरी) अँड बिलिटिल हिज एमबीबीएस.(सिव्हिलियन) त्या व्हिटॅमिनच्या ठिकाणी तुम्ही दोघे एकाच लेव्हलवर बोलत आहात.

लष्करात तुम्हाला मुलभूत वैद्यक शास्त्र "आलेच पाहिजे" हा दंडक आहे.

Sir, Your MD, does NOT stand in court of law, for prescribing ANY medications, even if you keep better knowledge in any other specialty of medicine. And you know that.
.
In one go you are advocating vitamin tablets, and on other thread bashing another qualified Doctor. You had to say 'चुकल' @ his catching you on that response regarding cup sizes.

तुम्हाला दुखावू नये असे वाटत होते, पण नाईलाज झाला.

माझ्याकडून पूर्णविरां.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:44 am | सुबोध खरे

Sir, Your MD, does NOT stand in court of law, for prescribing ANY medications
respected sir
I have the honour to submit you the following for your kind attention please I bring to your attention taht I have MBBS degree which gives me all teh licence to prescribe routine medications and issue death certificate and I have the honour to bring to your attention that I can issue death certificates also. I have issued the same for civilians while treating them in PUNE.
If you are not aware, yours and mine MD degree is additional qualification to be registerd with MMC and our basic qualification remains MBBS by IMC act 1957. You may get it confirmed from MMC if you wish.

मला माझे रजिस्ट्रेशन नुतानिकरणासाठी दर वर्षी ६ गुण जमा करावे लागतात ते रेडियोलोजी "चेच" असावेत असे नसून वैद्यकशास्त्राच्या मुल्भूत शाखेचे चालतात कारण नुतनीकरण हे अतिरिक्त योग्यतेचे(additional qualification) नसून मुलभूत एम बी बी एस चे आहे हेही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
आपला अहं दुखावला गेला आहे त्यामुळे आपण वितंडवादावर उतरत आहात आणि बेफाट आरोप करीत आहात हे स्पष्ट आहे. आपण आपली माहिती तपासून पाहाल तर बरे होईल असे वाटते.
असो
मी जे लिहिले आहे याबद्दल माझी १००% खात्री आहे यात मला माझा मुद्दा सिद्ध करण्याची गरज भासत नाही त्यामुळे हा वाद मी येथेच थांबवितो.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:51 am | सुबोध खरे

गोपाळराव
ठीक आहे
माझा समज भारतीय कप बद्दल झाला होता जो १५० मिली होता. चूक झाली.
पण २. मायक्रो ग्राम ब १२ साठी ३०० मिली ऐवजी शाकाहारी माणसाला ५०० मिली दुध/ दही / ताक प्यायला लागेल. जे फारसे अवघड नाही.
उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का?
त्यासाठी एवढे फालतू प्रतिसाद टाकून आपण काय सिद्ध केलेत.
एकही चूक मान्य न करता उगाच सारवत बसण्यापेक्षा व्यवस्थित प्रतिसाद देत चला. जिथे तिथे थुकून स्वताचे हसे करण्यापेक्षा हे बरे.

चूक झाली हे मी मान्य केलेलंच आहे. आपल्या दर्शनासाठी प्रतिसाद परत अख्खा उद्धृत करीत आहे. चूक झाली तर मला लाज वाटत नाही.
बालादपि सुभाषितम ग्राह्यं. ते न पाहता तुम्ही प्रच्छन्न आरोप करता याचेच आश्चर्य वाटते.

महोदय, आपलं बोलून झालं का?

१.
जर आपण एमबीबीएस क्वालीफिकेशनवर व्हिटॅमिन प्रिस्क्राइब करीत आहात, तर त्या ठिकाणी एमडीचा उल्लेख कुठून आला?
(पक्षी: "यांनी सांगितलं म्हणून घेतो म्हणून सांगा". कशाला कुणी विचारणारे तू व्हिटॅमिन का खातोस म्हणून?)

२,
आपण ज्या प्रकारे व्हिटॅमिन घ्या हे सांगितलेत त्याच प्रकारे त्यांनीही सांगितले. त्यानंतर "घाण करून सारवणे" इ. मृदू शब्दप्रयोग आपण वापरलेले वाचनात आले. ते का?

*

जोपर्यंत आपण मेडिसीन बोलत होता, तोपर्यंत मी इथे लिहिले नाही.

मला तुमचे पॉलिटिक्स आवडत नाही, याचा अर्थ असा नव्हे की मी तुमचे वैद्यकीय ज्ञान हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न करावा. मी तो केलेलाही नाही. तुम्ही जे इतरत्र सांगत होता, तेच तेही साम्गत आहेत, पण त्यानंतर तुम्ही व त्यांचे पॉलिटिकल मत न आवडणारे धागाकर्तेही त्यांच्यावर धावुन गेलेले दिसले.

अपुन को नही पट्या.

हे का घडले? हे घडले म्हणून तुमच्याच स्टाईलने लिहून दाखवले. त्याबद्दल क्षमस्व.

दोघेही एकच बाब (वेगवेगळ्या ठिकाणी) सांगत असूनही, उगंच दोन मेडिकल डॉक्टरांतही एकमत नाही हे सामान्यांचे मत पुष्ट करायला तुम्ही हातभार लावत आहात असे तुम्हास वाटत नाही काय?

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 1:22 am | सुबोध खरे

गोपाळ राव
माझ्या एट्टीट्युड बद्दल शंका घेतलीत
बायस(पूर्वग्रह दुषित पण) बद्दल टिप्पणी केलीत.
आपण माझ्या मुलभूत ज्ञाना बद्दल शंका घेतलीत
माझ्या औषध प्रिस्क्राइब करण्याच्या हक्काबद्दल शंका घेतलीत
मी जेंव्हा त्याचे उत्तर म्हणून लिहिले कि मला पण २० वर्षे औषध देण्याचा अनुभव आहे तर त्यावरहि तुमचे मी "टेंभा" मिरवतो म्हणून म्हणणे आहे.
माझ्या वैद्यकीय महाविद्यालयातील ( जे भारतात दुसर्या क्रमांकाचे म्हणून गणले जाते) पदवी कशी मिळते आणि त्यात काय कमतरता आहेत हेही आपले सांगून झाले. माझ्या प्रशिक्षणाबद्दल सुद्धा तिरकस शेरा मारून झाला
माझी एम डी पदवी न्यायालयात टिकणार नाही हेही आपले म्हणून झाले.
"चूक झाली" हे प्रतिसादात स्पष्ट लिहिले असताना ते न वाचता तुम्ही चूक कबुल करायला हवी होती हेही सांगून झाले.
आपल्याला माझ्या बद्दल अजूनही काही म्हणायचे असेल तर तेही म्हणून टाका म्हणजे मनात काही राहायला नको.
आपण जसे माझ्या जुन्या प्रतिसादातील आपल्याला पाहिजेत तशा गोष्टी उकरून काढल्यात
तशा मी मोगा साहेबांनी माझ्याबद्दल "पूर्वी लिहिलेल्या गोष्टी" उकरून काढल्या नाहीत. मला त्यात रस नाही.
भूतकाळाचे ओझे डोक्यावर ठेवून स्वतःला त्रास करण्याची मला गरज वाटत नाही.
त्या तुम्हाला वेळ आणि उत्साह असेल तर उकरून काढा आणि मग पहा माझे मत असे का झाले ते.
मी आपल्यावर कोणताही वैयक्तिक आरोप केलेला नाही.
यावर मी "आपल्या दोन मेडिकल डॉक्टरांतही एकमत नाही हे सामान्यांचे मत पुष्ट करायला तुम्ही हातभार लावत आहात" हे आपले म्हणणे मान्य करून वाद इथेच थांबवत आहे.
क लो अ

शलभ's picture

16 May 2016 - 12:44 am | शलभ

another qualified Doctor

:D

सुचिता१'s picture

12 Jul 2018 - 7:49 pm | सुचिता१

डॉ. साहेब , धागा कोणताही असला तरीही तुमचे प्रतीसाद मी अगदी मन लाउन वाचते , कारण अत्यंत माहीतीपू र्ण। असतात . तुमची कळकळ। ज्न्याना चा आवाका नवीन वाचका पर्यंत ही सहज पोहोचतो . उगीच वाद घालणार्या ना अनुल्लेखाने मारु शकता . बाकी तुमच्या प्रतीसादां साठी शतश: धन्यवाद !

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:23 am | सुबोध खरे

गोपाळराव
कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता.
कॅल्शियम संडोझ या गोळ्या डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय का मिळतात(OTC over the counter) यात याचे उत्तर आहे.
ब १२ चे इंजेक्शन मी रुग्णाला प्रत्यक्ष पाहून इंजेक्शनने देतो. कारण ब १२ जीवन्सात्त्वासाठी १२००/- रुपयाची रक्ताची चाचणी करण्यात मला "रस" नाही. किंवा २०० रुपये देऊन जंताची अंडी शौचाच्या तपसणी पाहण्यात ही मला "रस" नाही.
एवढेच म्हणेन.
अशी चाचणी "न" करताच जंताचे औषध देण्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस मी या धाग्यात दाखव्लेलीच आहे. मग हा मुद्दा उकरून काढण्यात आपला वैयक्तिक आकस असावा असे वाटते.
असो. माझा आपल्याला दुखावण्याचा कोणताही हेतू नाही/ नव्हता. अनवधानाने झाले असेल तर त्याबद्दल क्षमा असावी.

सुबोध खरे's picture

15 May 2016 - 6:46 pm | सुबोध खरे

अमूल ताकाची किंमत वाढली असून १० रुपये झाली आहे अर्ध्या लिटर साठी. मुंबईतही १० रुपयातच उपलब्ध आहे.
क्षमस्व
http://deshgujarat.com/2016/04/01/amul-launches-pouch-milk-in-gandhinagar/

मार्मिक गोडसे's picture

15 May 2016 - 8:17 pm | मार्मिक गोडसे

डॉ.खरे
मी वर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, उत्तर न मिळल्याने पुन्हा विचारतो.
पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या पद्धतीमुळे शरीराला व्हिटॅमीन्स मिळत नाही?

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:13 pm | आनंदी गोपाळ

बॉडी फॅट इंडेक्स प्रमाणेच, अशा प्रश्नांना डॉ.साहेब उत्तरे देत नाहीत. ;)

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 9:59 am | सुबोध खरे

गोपाळराव
आपण गृहपाठ न करता वाटेल तसे आरोप करता
मी स्पष्टपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. आपण उपस्थित केलेला "बॉडी फॅट इंडेक्स" हा बॉडी मास इंडेक्स पेक्षा चांगला आढळून आलेला नाही असे मी दुव्यासकट स्पष्ट केले होते. यामुळे आपला "अहं" दुखावला गेल्याचे दिसते. तेथे उगाच दोन डॉक्टर मध्ये मतभेद नकोत म्हणून मी पुढे टिप्पणी टाळली होती तरीही तुम्ही असे प्रच्छन्न आरोप करता याचे आश्चर्य वाटते.
बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body
सुबोध खरे - Sun, 03/01/2016 - 20:08
बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body adiposity index) : https://en.wikipedia.org/wiki/Body_adiposity_index
हे सकृतदर्शनी उत्तम असे परिमाण वाटले होते परंतु एक तर तो मोजणे हे फार कटकटी चे आहे आणी BMI इतके सोपे आणी सहज परत परत वापरण्यासारखे नाही.
शिवाय A detailed study published in 2012 concluded that estimates of body fat percentage based on BAI were not more accurate than those based on BMI, waist circumference, or hip circumference.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/22484365
यास्तव आणखी जास्त गुंतागुंत न करण्यासाठी मी ते यात उधृत करणे टाळले आहे.

हा माझा प्रतिसाद आपल्या अवलोकनासाठी जसाच्या तसा दिला आहे.

सुबोध खरे's picture

15 May 2016 - 11:52 pm | सुबोध खरे

गोडसे साहेब
ब १२ बद्दल वाचताना मी जे अनेक दुवे वाचले होते त्यापैकी एका दुव्यात ते वाचले होते.
आपला प्रश्न मी पहिला होता परंतु तो दुवा मला सापडला कि मी जरूर याचे उत्तर देईन.

सामान्यतः दुवे नव्हे, टेक्स्टबुक्स वाचायचा प्रघात आहे.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:10 am | सुबोध खरे

पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या पद्धतीमुळे शरीराला ब १२ मिळत नाही हे
कोणत्या टेक्स्टबुक्स मध्ये ते आहे हे मला सांगाल काय ? मी एकच टेक्स्टबुक्स वाचतो (harrison). त्यातले १ टक्का ज्ञान जरी मला आले तरी मी उत्तम डॉक्टर बनू शकेन असा मला विश्वास आहे.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 12:57 am | सुबोध खरे

गोडसे साहेब
हा एक दुवा आहे.
पण याहूनही स्पष्टपणे लिहिलेले होते तो दुवा सापडला कि देईन
It is commonly theorized that in the nonindustrialized world, bacterial contamination from soil or feces brings traces of B12 to plant foods in sufficient amounts to prevent B12 deficiency in humans who do not consume animal products, or in areas where animal foods do not make up a significant portion of the diet; but that in the industrial world, modern food sanitation practices combined with heavy mineral depletion of soils from pesticides and crop monoculture have eliminated this source of vitamin B12, just as indoor living has largely eliminated sunlight as our natural source of vitamin D.
http://freefromharm.org/health-nutrition/b12-magic-pill-veganisms-achill...

आनंदी गोपाळ's picture

16 May 2016 - 1:02 am | आनंदी गोपाळ

पेपर प्रेझेंटेशन -> पियर रिव्ह्यूड जर्नल्स पब्लिकेशन्स -> टेक्स्टबुक्स.

दुवा करो महाराज!

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 1:03 am | सुबोध खरे

Increased hygiene in the food supply is probably the cause of B12 depletion from plant-based diets.[145][n 13] Neither plants nor animals make B12; it is produced by microorganisms, such as bacteria, fungi and algae. Plants not washed properly may contain B12 from bacteria in the soil, often from faeces, and drinking water may be similarly contaminated, particularly in the developing world. Animals obtain it by eating contaminated plants, other animals, or their own faeces, and become sources of B12 if eaten themselves
https://en.wikipedia.org/wiki/Veganism#cite_ref-157

मार्मिक गोडसे's picture

16 May 2016 - 12:05 pm | मार्मिक गोडसे

धन्यवाद डॉ.खरे.

एकंदरीत शरीराला vitamin B12 मिळण्यासाठी ठरावीक bacteria ची आवश्यकता असते. मातीत व पाण्यातून आपल्याला ह्या bacteria मिळू शकतात. ह्याचा अर्थ आपण पाणी उकळले वा RO ने शुद्ध केल्यास पाण्यातील उपयुक्त bacteria नष्ट होतात. आपल्याला मिळणारे पाणी अगोदरच क्लोरिनेशन व अजुन काही पद्धतीने शुद्ध केलेले असल्यामुळे त्यातही आपल्याला आवश्यक असणार्‍या bacteria नष्ट झालेल्या असणार. म्हणजे आपल्याला पाणी हा स्रोत अशा bacteria मिळण्याच्या दृष्टीने बाद होतो. भाज्या स्वच्छ न करता खाल्ल्या तरी शिजवल्यामूळे त्यातील bacteria नष्ट होणार. मग शरीराला ह्या bacteria कोठून मिळणार?

एक शंका. मातीतील ह्या bacteria प्रयोगशाळेत वाढवता (कल्चर) येतात का? लॅक्टोबॅसिलस कॅपसूलप्रमाणे घेता येतील का?

नाईकांचा बहिर्जी's picture

16 May 2016 - 1:21 pm | नाईकांचा बहिर्जी

ह्याला जोडून एक प्रश्न

जर आपण गोडसे साहेब म्हणाले तसे चांगल्या बॅक्टेरिया (probiotic)चा सोर्स ला मुकत आहोत तर आपण बाजारात उपलब्ध असलेले प्रोबायोटिक ड्रिंक्स प्यायले तर चालण्यासारखे आहे का? (याकुल्ट वगैरे) छोट्या छोट्या डब्या मिळतात त्याच्या बहुतेक, कधी प्यायलो नाहीये पण जाहिरातीतुन प्रचार कायम बघतो

जव्हेरगंज's picture

15 May 2016 - 9:41 pm | जव्हेरगंज

व्हिटॅमीन बी-१२ च्या कमतरतेने आरोग्यास कोणते अपाय होऊ शकतात?

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 10:26 am | सुबोध खरे

आहारात अजून असे अनेक सूक्ष्म घटक असतील/आहेत जे आपल्याला( शास्त्राला) अजून माहित नाहीत पण जे शरीराला अत्यावश्यक आहेत.
हीच परिस्थिती एके काळी ब १२ जीवनसत्त्वाची होती. पंडुरोग (pernicious anemia) झालेल्या काही रुग्णांना फोलिक असिड ( जीवनसत्त्व) देऊनही त्यांची प्रकृती सुधारत नसे. त्यांना यकृताचा अर्क दिल्यावर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होते हे लक्षात आल्यावर अजून संशोधन झाले तेंव्हा अजून एक जीवनसत्त्व आवश्यक आहे असे लक्षात आले हेच ब १२ जीवनसत्त्व होते.
जिज्ञासूनी खालील सन १९४७ चा दुवा वाचून घ्यावा.
http://www.bloodjournal.org/content/2/1/50?sso-checked=true
याच साठी मी केवळ "गोळी घेण्या"ऐवजी आहारात सुधारणा सुचवली आहे. त्यावर एवढा वादंग झाला.
असो या धाग्यावर आता माझी लेखनसीमा.

श्रीगुरुजी's picture

16 May 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

डॉक्टर खरे साहेब,

खूपच उपयुक्त माहिती सोप्या शब्दात दिलीत. त्याबद्दल धन्यवाद!

तुमच्या संयमालाही सलाम. इथल्या काही महाभागांनी तुमची लायकी काढण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या पदवीबद्दल, ज्ञानाबद्दल शंका घेतली गेली. तुम्हाला मूर्खात काढायचाही प्रयत्न झाला. परंतु तुम्ही ज्या संयमाने प्रतिवाद केलात ते कौतुकास्पद आहे.

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

काही लोकांना आपण डाॅक्टर झालो, म्हणजे आभाळाला हात टेकले आणि कुणाचाही अपमान करायचा अधिकार आपल्याला मिळाला असं वाटतं. अशांना तुमच्यासारख्यांचे sterilized प्रतिसादच उपयुक्त ठरतील.

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

काही लोकांना आपण डाॅक्टर झालो, म्हणजे आभाळाला हात टेकले आणि कुणाचाही अपमान करायचा अधिकार आपल्याला मिळाला असं वाटतं. अशांना तुमच्यासारख्यांचे sterilized प्रतिसादच उपयुक्त ठरतील.

अहो ते मुगधा यांच्या डिग्री बद्दल विचारलं होत हो.

सतीश कुडतरकर's picture

16 May 2016 - 11:59 am | सतीश कुडतरकर

mast pakadalay. baakiche gayab

पिलीयन रायडर's picture

16 May 2016 - 1:38 pm | पिलीयन रायडर

सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे काकांचेच म्हणणे जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. आहारातुन ब जीवनसत्व मिळावे ह्यासाठी त्यांनी जे उपाय सांगितले आहेत ते अगदी करण्याजोगे असताना गोळ्या का खायच्या? असा अतिसामान्य फालतु माणुस म्हणुन प्रश्न पडतो. (जिथे खर्‍यांसारख्या सदस्याच्या एम.डी ची लायकी निघते तिथे आम्ही तर निव्वळ छाटछुट..!)

माझाही व्यक्तिशः जामोप्या किंवा जो कोणता त्यांचा सध्याचा आयडी असेल, त्यांच्यावर विश्वास नाही. आणि गोपाळराव हुषार डॉक असतील असं वाटत असुनही ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक वाटतात (त्यांना त्याने काडीचाही फरक पडणार नाही.. ठाऊक आहे..). खरे काका संदर्भ देऊन बोलतात आणि समजेल अशा भाषेत नीट सांगतात. अक्कल काढत नाहीत. म्हणुन त्यांचे म्हणणे विश्वासार्ह्य वाटते. अत्यंत बायस्ड असले तरी हेच मत झाले आहे बुवा..!

फक्त खरे काकांना सपोर्ट करण्यासाठीच हा प्रतिसाद लिहीलेला आहे. ह्या धाग्यावर लोक फुकट त्यांना टारगेट करु शकतात तर मी किमान सपोर्ट तरी दाखवु शकतेच.

प्रचेतस's picture

16 May 2016 - 2:14 pm | प्रचेतस

प्रतिसादाशी सहमत.

शलभ's picture

16 May 2016 - 2:40 pm | शलभ

लाख वेळा सहमत.

पैलवान's picture

16 May 2016 - 3:03 pm | पैलवान

डॉ खरे यांच्या केवल वैद्यकीयच नव्हे तर इतर आयुष्याच्या अनुभवातून आलेल्या टीपण्ण्या सुद्धा प्रबोधक असतात. (उदा पूर्वेचा समुद्र, प्रसाद भागवतांच्या व इतर लेखांतील अर्थविषयक प्रतिसाद इत्यादी)

मोदक's picture

16 May 2016 - 3:05 pm | मोदक

+११

श्रीगुरुजी's picture

16 May 2016 - 3:06 pm | श्रीगुरुजी

सहमत.

डॉक्टर खरे यांनी खोडसाळ आरोपांना प्रतिसाद देण्याऐवजी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारायला हवे होते.

सामान्य वाचक's picture

16 May 2016 - 4:03 pm | सामान्य वाचक

डॉक्टर तुम्ही अशांकडे कृपया दुर्लक्ष करा
आम्ही तुमच्या वैद्यकीय आणि अवैद्यकीय दोन्ही लिखाणाचे फॅन आहोत

सुचिता१'s picture

12 Jul 2018 - 7:57 pm | सुचिता१

१००% सहमत !!

पिलीयन रायडर - उत्तम प्रतिसाद.
पुर्ण सहमत
डॉ. खरे यांचा अनुभव, लेख, प्रतिसाद (वैद्यकीय आणि इतर साधेसुधे प्रतिसाद) वाचुन त्यांच्याबद्दल जे मत तयार झाले आहे ते अशा काही फुटकळ वाकड्या प्रतिसादांमुळे कदापि बदलणार नाही.

रुस्तम's picture

17 May 2016 - 10:21 am | रुस्तम

अतिशय सहमत "गोपाळराव हुषार डॉक असतील असं वाटत असुनही ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक वाटतात"

अप्पा जोगळेकर's picture

17 May 2016 - 11:28 am | अप्पा जोगळेकर

ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक.........
बाकी प्रतिसद्दाशी बाडिस. हुशार शब्द जरा विचित्र वाटला.

अत्रन्गि पाउस's picture

23 May 2016 - 3:39 am | अत्रन्गि पाउस

एक फटकळ पणा असावा

पिलीयन रायडर's picture

23 May 2016 - 3:52 pm | पिलीयन रायडर

असतात ना हो काही लोकं.. जी बुद्धिमान असतात.. आपल्या क्षेत्रात अगदी निष्णात म्हणावे असे.. पण बोलायला मात्र फटकळ.. म्हणजे ते बोलतात ते चुक नसतं, पण सांगण्याच्या पद्धतीने आणि समोरच्याला निव्वळ बेवकुफच समजण्याच्या वृत्तीने त्यांचे काही पटतही नाही. (हे जनरल लोकांबद्दल आहे.. गोपाळरावांबद्दलच असे नाही.. इथल्या प्रतिसादांचा टोन तसा असतो असे म्हणणे आहे.. बाकी काही नाही..)

anilchembur's picture

16 May 2016 - 6:09 pm | anilchembur

बी १२ इंजेक्शनने द्या असे म्हणणार्‍याना गोळीचे मात्र वावडे आहे , हे वाचुन धक्का बसला.

व्हिट्यामिन ए देखील आहारातुन मिळू शकते . पण लहान्मुलाना त्याचे डोस डब्ल्यु एच ओ च्याच रिकमांडेशन. णुसार देतात ना ?

प्रेग्नन्सीतही अयर्न कॅल्शियम सप्लिमेंट देतात. अ‍ॅनिमिया नसेल तर १०० गोळ्या , असेल तर किमान २०० गोळ्या असा साधा डोस शेड्युल डब्लु एच ओ नेच दिला आहे ना ? ते आhaaraatun मिळत णाही का ?

माहितगार's picture

16 May 2016 - 6:23 pm | माहितगार

'ठिक आहे' आता पर्यंतच्या चर्चेवरुन एका गटाचे आग्रही मत 'इंजेक्शने आणि गोळ्या घेणे श्रेष्ठ' असे वाचक म्हणून वाचकांनी नोंद घेतली आहे. आता इंजेक्शन गोळ्यांचे दळण संपवून, धागा लेखाचा परिघ मुख्यत्वे इंजेक्शने आणि गोळ्या सोडूनचा आहार असे अभिप्रेत आहे त्या मुख्य विषयावर धागा लेखात बरेच प्रश्न दिले आहेत एखाद दोन प्रश्नांची उत्तरे सोडून बाकी प्रश्न चर्चेसाठी बाकी आहेत त्या आहार मुल्यांच्या चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन आहे.

मी पण तोच विचार करतोय कि तुम्ही स्पष्टपणे आहारातून ब१२ कसे मिळेल असं लिहीलं असताना मोगा वेड्यासारखा गोळ्या अन् इंजेक्शन च्या मागे का लागलाय.
BTW मोगा नवीन आयडी. :) मुग्धा ला कुठे सोडलस.

anilchembur's picture

16 May 2016 - 11:08 pm | anilchembur

इंजेक्शन द्या , हे डॉ. खरेंचे मत आहे. नीट वाचा. उगाच दुसर्‍यावर ढकलू नका.

सुबोध खरे's picture

17 May 2016 - 12:12 am | सुबोध खरे

मोगा खान
जिथे तिथे अर्धवट अर्थ लावून तिरकस प्रतिसाद दिलाच पाहिजे का?
"साधारण पन्नाशी साठी नंतर आपल्या जठराचा थोडा र्हास/झीज झाल्याने जठरातील जीवनसत्व पकडून धरणारा घटक कमी प्रमाणात तयार (intrinsic factor) होतो त्यामुळे आपण खाल्लेले ब १२ जीवनसत्वाचे पूर्ण शोषण होत नाही." हे पहिल्या प्रतिसादात लिहिलं आहे.
अशा लोकांनाच मी ब १२ ची चाचणी करण्यात १२०० रुपये खर्च करायला लावण्यापेक्षा इंजेक्शन घ्यावे असे सुचवले आहे.
कारण अशा लोकांना गोळी दिली तरीही त्याचे शोषण व्यवस्थित होत नाही

"व्हिट्यामिन ए देखील आहारातुन मिळू शकते . पण लहान्मुलाना त्याचे डोस डब्ल्यु एच ओ च्याच रिकमांडेशन. णुसार देतात ना ?"
Vitamin A deficiency alone is responsible for almost 6% of child deaths under the age of 5 years in Africa and 8% in South-East Asia
Vitamin A supplementation in children 6–59 months of age living in developing countries is associated with a reduced risk of all-cause mortality and a reduced incidence of diarrhoea Hence, the use of a megadose of vitamin A for children aged between 6 and 59 months in areas at risk of vitamin A deficiency is one of the "main short-term interventions" for combating this deficiency in the field of public health. The use of vitamin A supplements in this areas helps to reduce mortality in children aged under five years by 30% and can diminish the severity of diarrheal diseases हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
http://apps.who.int/iris/bitstream/10665/44664/1/9789241501767_eng.pdf?u...
हे तात्कालिक आणि ताबडतोबीचे कारण आहे. उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढून आपले म्हणणे कशाही तर्हेने समर्थन करू नका.
प्रेग्नन्सीतही अयर्न कॅल्शियम सप्लिमेंट देतात. अ‍ॅनिमिया नसेल तर १०० गोळ्या , असेल तर किमान २०० गोळ्या असा साधा डोस शेड्युल डब्लु एच ओ नेच दिला आहे ना ? ते आhaaraatun मिळत णाही का ?
हीच स्थिती गरोदरपणात लोहाच्या गोळ्या देण्याबद्दल आहे. आहारातून लोह मिळवून स्त्रीचे हिमोग्लोबीन वाढेपर्यंत गर्भ काही वाढायचा थांबलेला नसतो आणि गर्भाच्या अवयवांचा विकास पहिल्या तीन महिन्यात पूर्ण होतो. या काळात गर्भाला रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी लवकरात लवकर हिमोग्लोबिन वाढणे आवश्यक असते. या सर्व तात्कालिक ( शोर्ट टर्म) उपाययोजना आहेत.
आपले म्हणणे केवळ सिद्ध करण्यासाठी तुम्ही बोलणे कसेही फिरवू पाहता याबद्दल तुमचा निषेध.
जागतिक आरोग्य संघटना तुमच्या सारख्या धड धाकट "पुरुषांना" लोहाच्या किंवा कॅलशियमच्या गोळ्या द्या किंवा अ जीवनसत्त्व मेगा डोस मध्ये पाजा किंवा ब १२ चे इंजेक्शन ठोका असे का सांगत नाही? याच कारण कळू शकेल का .

anilchembur's picture

17 May 2016 - 6:26 am | anilchembur

लवकरात लवकर हिमोग्लोबिन वाढायला गोळ्या घेतात.

बर्र्र ..... चालु द्या !

मोगा..आम्ही नीट वाचतोय म्हणून तुमची असंबद्ध बडबड कळतेय इथली पण आणि इतर धाग्यावरची पण.

पिलीयन रायडर's picture

16 May 2016 - 7:31 pm | पिलीयन रायडर

लहानपणी किंवा गरोदरपणा सोडता सर्वसाधारण माणसाने आहाराच्या ऐवजी गोळ्या खा असं कुणी सांगितलं असेल तर तो ही दुवा द्या. विषय काय..चर्चा काय..

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 9:14 pm | सुबोध खरे

गोपाळराव
या मोगा खान यांच्या तिरकस प्रतिसादाला आपण उत्तर देणार काय?
नाही तर नंतर आपण परत म्हणणार कि माझे प्रतिसाद पुर्वग्रह दुषित आहेत

मंदार दिलीप जोशी's picture

24 May 2016 - 1:39 pm | मंदार दिलीप जोशी

खिक्

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 9:12 pm | सुबोध खरे

मोगा खान
असे सरळ उत्तर देण्याऐवजी तुम्ही तिरकेच प्रतिसाद का देत राहता ते समजत नाही
Health Canada advises adults over
50 years to consume foods fortified with vitamin B12 or a supplement containing vitamin B12.
याचा सरळ अर्थ काय आहे कि ५० च्या आतल्या माणसाला "गोळी/ इंजेक्शनने" ब १२ देण्याची गरज नाही.

झेन's picture

16 May 2016 - 9:31 pm | झेन

डॉक्टर खरें चे लेखन, प्रतिक्रिया नेहमीच उपयुक्त, सकारात्मक असतात. उगाच 'पोलीटीकली करेक्ट' असल्याचा आव आणत नाहीत. त्या मुळे इथे त्यांना आदर मिळतो, कदाचीत काही जणांना मत्सर वाटू शकतो तो त्यांचा प्रश्न आहे. तूम्ही अशांना इग्नोर मारा डॉक्टर.

सस्नेह's picture

17 May 2016 - 7:05 am | सस्नेह

कृपया इग्नोर करा डाॅ खरे.

रुस्तम's picture

17 May 2016 - 10:22 am | रुस्तम

बाडीस

मंदार दिलीप जोशी's picture

24 May 2016 - 1:40 pm | मंदार दिलीप जोशी

सहमत

anilchembur's picture

17 May 2016 - 6:35 am | anilchembur

जर आठ की दहा रुपयाच्या ताकातून बी १२ मिळू शकते , तर बी १२ फोर्टिफाइड फूड बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?

माहितगार's picture

17 May 2016 - 7:16 am | माहितगार

एखाद्या पदार्थातून उदा. जसे की ताकातून किती बी-१२ मिळते हा प्रयोगशाळेतून आलेल्या माहितीवरील ससंदर्भ कळणे अधिक प्रशस्त असू शकेल आणि त्याच दृष्टीने अशा प्रयोगशाळा भारतात / महाराष्ट्रात कुठे आहेत असा प्रश्न धागा लेखात विचारलेला आहे.

...तर बी १२ फोर्टिफाइड फूड बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?

हे तार्कीक उणीवेचे आहे : 'दूधातून पोषण होत असेल तर, दूधाची पावडर अथवा बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?'

बाकी मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.

anilchembur's picture

17 May 2016 - 8:19 am | anilchembur

दुधाची पावडर याच्यामागे ' काही परिस्थितीत पावडर वापरणे सोयीचे ' हे कारण आहे. यामागे आहार अन्नघटक यांचे कारण नाही.

मिठात आयोडीन घालणे , दुधात व्हिट्यामिन अ घालणे , बी १२ युक्त सिरियल्स हे फोर्टिफाइड फूड आहेत.

फोर्टिफिकेशन सोयीचे असते , पण ते तितकेच महागही असते.

सुबोध खरे's picture

17 May 2016 - 9:35 am | सुबोध खरे

बी १२ फोर्टिफाइड फूड भारतात कुठलं उपलब्ध आहे जरा सांगता का ?

सुबोध खरे's picture

17 May 2016 - 9:36 am | सुबोध खरे

म्हणजे ताक स्वस्त कि बी १२ फोर्टिफाइड फूड स्वस्त याची तुलना करून रुग्णाला तसा सांगायला बरं.

कंजूस's picture

16 May 2016 - 9:18 pm | कंजूस

शाकाहारी लोकांना काही जीवनसत्त्वे मिळणारच नाहीत हे सहावीतन कळलं आणि तो विषय परीक्षेर मार्कापुरताच पाठ केला.

सुबोध खरे's picture

16 May 2016 - 9:26 pm | सुबोध खरे

कंजूस साहेब
शाकाहारी भारतीय व्याख्येत दुध आणी दुग्धजन्य पदार्थ घेणारे आहेत त्यामुळे भारतीय संदर्भात शाकाहारी लोकांना अशी जीवनसत्त्वाची कमतरता येत नाही. अमेरिकेतील "व्हेगन" लोकांचा तो प्रश्न आहे.
हा मुद्दा परत परत सांगण्याचा माझा हेतू हा आहे कि अनेक लोक स्वतः मांसाहारी असले तरी बर्याच लोकांचे आई वडील, जवळचे नातेवाईक हे शाकाहारी आहेत. त्यांच्या डोक्यात आपल्या वडिलांना झालेले विस्मरण/ किंवा तत्सम आजार हे वयानुसार आहे कि शाकाहारी असल्याने जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आहे याचा गोंधळ होतो. आणी आपल्या आई वडिलांच्या/ वडीलधार्यांच्या प्रकृतीची आपल्या कडून हेळसांड होऊ नये अशीच सर्वांची इच्छा असते यास्तव लोकांचा मानसिक गोंधळ दूर करावा या हेतूने मी एवढा नेटाने प्रतिसाद देतो आहे.

बरोबर.आहारात विविधता ठेवणे आणि रोज काही गोष्टी न शिजवलेल्या खाणे हे सर्वोत्तम.खाण्यातला एकसुरीपणा घातक ठरतो.

सूड's picture

16 May 2016 - 11:03 pm | सूड

रोचक चर्चा!!

भेसळ ही अन्नातूनही होऊ शकते, पण तो वेगळ्या सामाजिक आणि कायदे विषयक समस्येचा भाग आहे. एखाद्या विशीष्ट कमतरतेमुळे एकदा का माणूस आजारी पडला की आजारी माणसाला दिली जाणारी इंजेक्शन आणि गोळ्या इत्यादींचा अपेक्षीत परीणाम होतो आहे अथवा नाही -भेसळ युक्त औषधी आजारी व्यक्ती पर्यंत पोहोचणार नाहीत- याचे निरीक्षण करुन सुयोग्य निर्णय करुन पेशंटला सुयोग्य मार्गदर्शन करणे औषधींचा परिणाम अभ्यासण्यासाठी आवश्यकते नुसार टेस्ट करणे अथवा न करणे हा प्रत्यक्ष भेटीत डॉक्टर ने घ्यावयाचे निर्णय असावेत. या बाबत आंतरजालीय चर्चेस मर्यादा येतात कारण प्रत्येक पेशंट वेगळा असतो जो डॉक्टरने प्रत्यक्षात अभ्यासावयाचा असतो. असे वाटून हा विषय या धागा चर्चेसाठी गौण ठरवून "जिवनसत्व बी-१२ साठी आहारातून मिळणारी पोषणमुल्ये हा विषय धागा लेखासाठी मुख्य विषय म्हणून निवडला" यात धागा लेखकाचे काही चुकले काय ?

या धागा लेखाच्या नशिबाने सर्व सामान्य वाचक हा विषय जाणून घेण्यास इच्छूक दिसतात, इतर चर्चा धागे भरकटतात ते ठीक इथे आरोग्य विषयक चर्चा विवादात न भरकटता सर्व सामान्य वाचकांना धागा लेखाच्या परिघात राहून मार्गदर्शनावर चर्चेवर भर दिल्यास आभारी राहू.

बोका-ए-आझम's picture

17 May 2016 - 8:09 am | बोका-ए-आझम

तुमचं इतर प्रतिसादकांनी काय आणि कसे प्रतिसाद द्यावे यावर नियंत्रण नाहीये. हे थोडंसं रस्त्यावर बाईक चालवण्याप्रमाणे आहे. तुम्ही भले नियम पाळून चालवाल पण तुमच्या बाजूने बाईक चालवणारा कसा चालवतोय यावर तुमचं काहीही नियंत्रण नसतं. अशा वेळी संपादकांनी त्यांचे अधिकार वापरावेत अशी अपेक्षा असते.

सकाळी सकाळी भारी विनोद करता की...!!

एक चपखल ग्राम्य म्हण आहे, व्यनी करतो.

बरीच अवांतर चर्चा सुरु आहे असे दिसते.

@माहितगार शक्य झाल्यास चर्चा संपल्यावर नवीन धागा काढून त्यात प्रश्नांची मिळालेली उत्तरे सांगावीत.

माहितगार's picture

18 May 2016 - 8:39 am | माहितगार

चांगली सूचना आहे, खरेतर हे स़ंक्षीप्त आढावा घेणे बर्‍याच धागा चर्चांच्या बाबतीत व्हावयास हवे. धन्यवाद

कंजूस's picture

21 May 2016 - 8:48 am | कंजूस

quora dot com वर कोणत्याही मराठी प्रश्नोत्तरांची कोणी लिंक द्याल काय? जीवनसत्त्वे मिळवण्यासाठी शाकाहारींनी काय खावे हा प्रश्न आजच तिकडे मराठीत विचारला आहे परंतू " your question needs editing" हे नोटिफिकेशन आलंय..माझा उद्देश quora वर मराठी सुरू करे आहे.वाचकवर्ग आणखी व्यापक मिळेल असं वाटतं.विकीवर माहितगार कार्यरत आहेतच.क्वोरावरही प्रसार करू.

स्पा's picture

17 May 2016 - 11:20 am | स्पा

काय ठरले म शेवटी ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 May 2016 - 11:21 am | अनिरुद्ध.वैद्य

आंतरजालीय चर्चांवर ;)

anilchembur's picture

17 May 2016 - 10:40 pm | anilchembur

रोज ग्ळी पाण्याबरोबर घेतो.

आजपासून ताकाबरोबर गोळी घेणार.

वाद समाप्त.

सुबोध खरे's picture

17 May 2016 - 10:56 pm | सुबोध खरे

का पन्नाशी झाली वाटतं?