आधी सोसायचे ,मग हासायचे
आधी रुजायचे, मग फुलायचे
स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे
अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे
खेळ मांडायचे, जरी मोडायचे
मांडणे-मोडणे, एक मानायचे
तारे माळायचे, नभ नेसायचे
आपलेच रूप, मग बघायचे
वाट चालायचे, तुला शोधायचे
स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे
प्रतिक्रिया
6 May 2016 - 12:13 pm | कानडाऊ योगेशु
कातिल कल्पना! जियो सर!
10 May 2016 - 5:29 pm | पथिक
धन्यवाद!