माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in कलादालन
19 Sep 2008 - 4:46 pm

मी काय सकाळी लवकर उठणार्‍या मंडळींपैकी नाही... पण त्या १९ मार्चला ग्रहण दिसणार आणि सूर्य उगवतानाच ग्रहण लागलेले असणार असे काहीसे आदल्या दिवशी वाचलेले होते... लवकर जाग आली आणि खिडकीपुढे जाऊन उभा होतो, सूर्य उगवायचा होता अजून ... आता परत झोपावे की काय अशा विचारात थोडा वेळ आकाशाकडे दुर्लक्ष झालं आणि वर बघतो तो असा तुकडा चावलेला सूर्य दिसला... मला अंदाजच नव्हता की इतका छान आणि ( शीतल..थोडा वेळ का होईना) दिसणार आहे सूर्य ... काही सेकंद डोळे भरून ते दृष्य पाहिलं आणि कॅमेरा आणायला धावलो...
हा पहिला फोटो... ( थोडा काय , एक्साईटमेंटमध्ये भरपूर हललाय, पण टायमिंग बेष्ट आहे, पुन्हा किती कष्ट केले तरी असा फोटो मिळेल की नाही शंकाच आहे) कॅमेरा साधा निकॉन कूलपिक्स पी २ ...

हा जरा बरा आहे...

हे एक मजेदार समीपचित्र

सूर्य जसा जसा भराभर वर यायला लागला तसा फोटो काढणं अवघड व्हायला लागलं..

मग खिडकीच्या काळ्या काचा सरकवून त्यातून एक शेवटचा फोटो काढला...

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

सुनील's picture

19 Sep 2008 - 4:50 pm | सुनील

सुर्याची कोर दिसतेय छान. खरं म्हणजे फोटोतले काही कळत नाही. जाणकार यथायोग्य टीप्पणी करतीलच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निशा's picture

19 Sep 2008 - 4:52 pm | निशा

सर्वच चित्रे छान आहेत.
खुप आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 4:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चोक्कस मास्तर .... मस्त फोटो!

पुढच्या वर्षी २२ जुलैला आपल्याकडून खग्रास दिसणार आहे, अगदी मुंबई-पुण्यातून नाही, पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!) वगैरे त्या बाजूनी, म.प्र., बिहार वगैरे तिकडून!

टारझन's picture

19 Sep 2008 - 5:36 pm | टारझन

पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!)
आग्गो बाई ..... पुन्हा प्रांतिय वाद सुरू करतेस काय ? नंदुरबार (चांदणी बार ) म्हाराष्ट्रातच हाय ....

असो .. मास्तुरे फोटू क्लास आहेत ... २र्‍या चित्रातली ती मोडलेली बिल्डींग पाहिल्यासारखी वाटते पण आठवत नाही नक्की .. प्रकाश टाका जरा

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 5:41 pm | भडकमकर मास्तर

२र्‍या चित्रातली ती मोडलेली बिल्डींग पाहिल्यासारखी
जगप्रसिद्ध मोरया शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे ते... एमएस एस हायस्कूल उर्फ माटेशाळा ,चिंचवड, पुणे
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

19 Sep 2008 - 4:58 pm | सखाराम_गटणे™

मस्त आहेत प्रकाश चित्रे

* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *

मध्यमवर्गीय's picture

19 Sep 2008 - 4:59 pm | मध्यमवर्गीय

खूपच छान आली आहेत सगळि छायाचित्रे...

स्वाती दिनेश's picture

19 Sep 2008 - 5:01 pm | स्वाती दिनेश

मास्तर, चित्रं आवडली. सूर्याची केशरी,पिवळी कोर छान दिसते आहे!
स्वाती

नंदन's picture

19 Sep 2008 - 10:05 pm | नंदन

आहे, सुरेख फोटोज.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आंबोळी's picture

19 Sep 2008 - 5:08 pm | आंबोळी

वा मास्तर फोटो उत्तम आलेत.

पुढच्या वर्षी २२ जुलैला आपल्याकडून खग्रास दिसणार आहे, अगदी मुंबई-पुण्यातून नाही, पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!) वगैरे त्या बाजूनी, म.प्र., बिहार वगैरे तिकडून!

पुढच्या वर्षी मास्तर बिहारला खास खग्रास सुर्यग्रहणाचे फोटो काढायला गेलेत. तिथले लोक 'हमार गांव से आया है' (मुंबई आणि पुणे हे त्यांच्यासाठी आता "गांव"च आहे) असे म्हणत मास्तरांची सरबराई करतायत. आणि मास्तर त्याना फोटो काढता काढता मनसे चे आंदोलन समजावून सांगतायत असे दृश्य डोळ्यासमोर आले. अहाहा...

आंबोळी

विनायक प्रभू's picture

19 Sep 2008 - 5:13 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
खरच अहाहाहाहाहा. हा माणुस काय काय करणार आहे देवास ठाउक.
वि.प्र.

शितल's picture

19 Sep 2008 - 5:19 pm | शितल

ग्रहणाचे फोटो मस्त.
आकाशातील रंगाच्या छ्टा ही प्रत्येक फोटोत खुप छान आहेत. :)
मास्तर,
मस्त पैकी ग्रहणाचे फोटो दाखविल्या बद्दल धन्यवाद !

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 5:30 pm | भडकमकर मास्तर

अवांतर :
आणि त्याच वेळी मला मित्राचा मेसेज आला की बॉब वूल्मर सस्पिशसली डाईड इन वेस्ट इन्डीज ...
वर्ल्ड कपला ही असेच ग्रहण लगले तेव्हा
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मानस's picture

19 Sep 2008 - 7:00 pm | मानस

सगळी छायाचित्रे सुंदर आहेत, एक सुचना करावीशी वाटते,

अशा चांगल्या छायाचित्रात दिनांक/तारीख शोभत नाही, शक्य असेल तर ती सुविधा "डिसेबल" करावी. अर्थात हे माझं मत झालं, पण एक व्यावसायिक छायाचित्रकार हे नक्कीच मान्य करतील.

क्रमांक १ व ४ मस्त ..........

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 7:03 pm | विसोबा खेचर

मास्तर,

सुंदर फोटू...! :)

तात्या.

सर्वसाक्षी's picture

19 Sep 2008 - 8:02 pm | सर्वसाक्षी

टिपले आहे ग्रहणाचे दृश्य!

शेखस्पिअर's picture

19 Sep 2008 - 9:06 pm | शेखस्पिअर

हे.. ग्रहणाचे फोटो ,सुर्याचे आहेत की आमच्या शाळेचे तेच कळत नाही..
कालाय तस्मै नमः |

प्रियाली's picture

19 Sep 2008 - 9:08 pm | प्रियाली

सूर्यकोर आकाशात झळाळते आहे. :)

धनंजय's picture

19 Sep 2008 - 9:18 pm | धनंजय

सुंदर दिसते आहे.

अभिज्ञ's picture

19 Sep 2008 - 9:30 pm | अभिज्ञ

मास्तर,
चित्रे लै भारि आलित.

अभिज्ञ.

अवांतरः सिंहगड कुठे दिसत नाहि तो. :)

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 11:09 pm | भडकमकर मास्तर

अवांतरः सिंहगड कुठे दिसत नाहि तो.

सिंहगड आमच्या घराच्या आणि एकूणच पुण्याच्या दक्षिणेला असून सूर्य आमच्या घराच्या आणि एकूणच दुनियेच्या पूर्वेकडून उगवत असल्याने या फोटोत सिंहगड दिसत नाहीये ... :)

स्वगत : पूर्व झाली, दक्षिण झाली आता फक्त दोनच दिशा उरल्या उत्तर आणि पश्चिम....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिज्ञ's picture

20 Sep 2008 - 10:03 am | अभिज्ञ

सिंहगड आमच्या घराच्या आणि एकूणच पुण्याच्या दक्षिणेला असून सूर्य आमच्या घराच्या आणि एकूणच दुनियेच्या पूर्वेकडून उगवत असल्याने या फोटोत सिंहगड दिसत नाहीये ... /u>

हम्म्..खरे आहे.
पण आपणा फोटोशॉप वाल्यांना ते पण काय अवघड नसावे. ;)

अभिज्ञ.

अतिअवांतर : अतिशय ह्.घ्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 11:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो मग, आपण असं ग्रहणच लावूया की, सिंहगडच कशाला?

अतिअत्यवांतरः तो अंडरलाईनचा टॅग विझवावासा वाटला, म्हणून हा प्रतिसाद.

अभिज्ञ's picture

20 Sep 2008 - 11:44 am | अभिज्ञ

मास्तरांनी हे फोटो फोटोशॉपवरच तयार केले नसतील कशावरुन?
मास्तर कुछ भी कर सकते है फोटोशॉप में. ;)

(अनाधोरेखित) अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मास्तरांनी हे फोटो फोटोशॉपवरच तयार केले नसतील कशावरुन?
:SS अहो जरा जपून! ऐकलं आहे की ते दंतवैद्य आहेत, आणि हे वाचून त्यांना फार राग आला, त्यांनी तो तुमच्या दातांवर काढला तर मग काय कराल? नाहीतर तुमच्यावरच लिहितील एक फर्मास फार्स!

घाटावरचे भट's picture

19 Sep 2008 - 10:12 pm | घाटावरचे भट

बेष्ट!!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

ईश्वरी's picture

19 Sep 2008 - 11:29 pm | ईश्वरी

फारच सुंदर.
सूर्यकोर कधी पाहिली नव्हती .
सर्वच फोटो मस्त. त्यातल्यात्यात ३ आणि ४ सर्वात जास्त आवडले.
ईश्वरी

प्राजु's picture

19 Sep 2008 - 10:58 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकी शिरपूरकर's picture

19 Sep 2008 - 11:35 pm | विकी शिरपूरकर
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 11:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा ग्रहणाचा दुष्परीणाम का हो?

(तसल्याच एका ग्रहणाच्या दुष्परीणाम होऊन तार्‍यांकडे बघणारी) अदिती

चतुरंग's picture

20 Sep 2008 - 1:40 am | चतुरंग

पहिला एकदम छान! तिसर्‍यात कोर अगदी सुंदर झगझगीत दिसते आहे.

चतुरंग

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 10:39 am | देवदत्त

सुंदर चित्रे...

मागील वर्षीचे जमले नाही पहायला. ह्या आधीचे बहुधा ९८/९९ मध्ये पाहिले होते.

मदनबाण's picture

20 Sep 2008 - 1:25 pm | मदनबाण

झकास !!

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda