आली पहा ती रम्य पहाट
पक्षी करिती किलबिलाट
कोकिळ घाले मधुर साद;
केशर रंगी रविकिरणे
शीतलता ही प्रसन्न करे
पर्णांना सोनेरी वर्ख चढे;
दावुनी अपुली किमया ही
काय सांगू पाहते ती?
“हार नका मानू कधी!”
“तम हा सरला, उठा सारे,
चैतन्याचा प्रकाश पसरे,
कर्तृत्वाचे रचा मनोरे!”
– उल्का कडले
प्रतिक्रिया
30 Apr 2016 - 8:34 pm | विजय पुरोहित
छान आहे...
1 May 2016 - 2:17 pm | उल्का
धन्यवाद!
1 May 2016 - 8:57 pm | सुरवंट
वर्ख म्हणजे काय?
तम म्हणजे काय?
1 May 2016 - 9:06 pm | एस
मुलामा. मिठाईला चंदेरी थर दिलेला असतो त्याला वर्ख म्हणतात.
तम म्हणजे अंधार.