िशख ध्रम की पंथ

sश्रिकान्त's picture
sश्रिकान्त in जनातलं, मनातलं
18 Apr 2016 - 4:35 pm

िशख ध्रम की पंथ? कारण िशख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी िहंदु देवतांची पुजा करतात . िमपाकर जरा या बदंदल कोणी प्रकाश टाकेल का?

धर्म

प्रतिक्रिया

ऑं...अजुन अक्षर सुधारल नाय!!
किती चुका शुद्धलेखनात..
असो मिपाकर प्रकाश टाकतीलच.!

नाना स्कॉच's picture

18 Apr 2016 - 5:05 pm | नाना स्कॉच

कारण िशख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी िहंदु देवतांची पुजा करतात .

बहुतेक तुमचा पंजाबी अन शीख धर्मीय ह्या दोन कॉन्सेप्ट मधे गोंधळ उडाला असावा असे वाटते आहे

मुख्य मुद्द्याबद्दल बोलता, शीख हा धर्म आहे पंथ वगैरे नाही.

विजय पुरोहित's picture

18 Apr 2016 - 5:15 pm | विजय पुरोहित

पंजाबी अन शीख धर्मीय ह्या दोन कॉन्सेप्ट मधे गोंधळ उडाला असावा असे वाटते आहे असे काही नाही नाना! शीख लोक पण उत्साहाने श्री गणपती बसवताना, तसेच आपल्या दुकानात लक्ष्मीमातेच्या फोटोला श्रद्धेने उदबत्ती करताना वगैरे पाहिले आहेत.

राही's picture

18 Apr 2016 - 5:37 pm | राही

गणपती बसवला आणि लक्ष्मीमातेला उदबत्ती दाखवली म्हणून त्यांचा धर्म हिंदू होतो का? उद्या मी बायबल वाचले आणि चर्चमध्ये प्रवचन ऐकले तर मी क्रिस्टिअन? किंवा गुरुद्वारे में लंगर खाया, तो क्या सीख बनेंगे?

विजय पुरोहित's picture

18 Apr 2016 - 5:42 pm | विजय पुरोहित

ऑ? मी कुठे त्यांना हिंदू म्हटलेले आहे? मी पण बायबल अनेक वेळा वाचलेले आहे आणि अजूनही वाचतो. कधी वेळ मिळाला तर गुरुद्वा-यात देखील जाईन. अशाने धर्म बदलतो असे मी तर मानत नाही. राहता राहिला माझा प्रतिसाद. मी फक्त धागाकर्त्याने मांडलेल्या "शीख लोक देखील हिंदू देवतांची पूजा कंचीत" या कथनाला एक मर्यादित दुजोरा दिलेला आहे.

राही's picture

18 Apr 2016 - 6:16 pm | राही

ओके ठीक. माझा गैरसमज झाला. मला वाटले की शीख हा हिंदूंमधला एक पंथ आहे असे तुम्हांला म्हणायचे होते. सॉरी.

नाना स्कॉच's picture

18 Apr 2016 - 5:37 pm | नाना स्कॉच

ही माहीती तसे नसल्याचे स्पष्ट सांगते आहे.

तसेच

ही देखील माहीती वेगळे सांगते आहे

उरता उरला गणेशपूजन अन लक्ष्मी पूजन बद्दल प्रश्न तर ते अपवाद असावेत, परदेशस्थ हिंदु बांधव सुद्धा हॅलोवीन , थॅंक्सगिविंग डिनर , थीम पार्टीज अटेंड करतात म्हणून त्यांना कोणी क्रिस्चियन धर्मीय नाही म्हणत किंवा हिंदु धर्माला क्रिश्चियनिटीचा भाग नाहीत मानत, असे वाटते मला तरी, तुम्ही दिलेली उदाहरणे ही मिळून मिसळून राहण्याची उदाहरणे आहेत एकच धर्माचे असल्याची नाही !

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 5:42 pm | तर्राट जोकर

धर्म आणि संस्कृती मधे फार गल्लत करतात बा लोक. ;)

यासाठी खुशवंत सिंगाचे "दि हिस्ट्री ओफ सिखिझम" भाग १ आणि २ वाचा.नावाजलेले ग्रंथ आणि यामुळे लेखक म्हणून खुशवंत सिंग माहीत झाले.

बोका-ए-आझम's picture

18 Apr 2016 - 7:27 pm | बोका-ए-आझम

आपल्या देशात धार्मिक अल्पसंख्यांक किंवा Religious Minority असं ज्यांना म्हटलं जातं त्यांच्यात मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध आणि शीख यांचा समावेश होतो. माझी कंपनी (मी काम करत असलेली) केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये प्रशिक्षण सहयोगी आहे आणि आम्हाला सरकारने ज्या guidelines दिलेल्या आहेत त्यानुसार शीख हा धर्म समजला जातो, पंथ नव्हे. महाराष्ट्रात शिखांना religious minority म्हणून आणि पंजाबीभाषिक लोकांना Linguistic Minority म्हणून मान्यता आहे. उदाहरणार्थ लाला लाजपतराय महाविद्यालय ही पंजाब्यांची संस्था आहे. तिथे पंजाबी भाषा बोलणारा कोणीही - मग धर्म काही का असेना, हा minority quota मध्ये प्रवेश घेऊ शकतो. पण खालसा काॅलेजमध्ये minority quota मध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्ही शीख पाहिजे, मग तुम्हाला पंजाबी भाषा येत नसली तरी चालेल.

भाते's picture

18 Apr 2016 - 8:50 pm | भाते

माझी शंका. खरंतर मी सुध्दा असाच दोनोळी धागा काढणार होतो. हल्ली मिपावर असल्या दोनोळी धाग्यांची खुप चलती आहे. पण अनायासे हा धागा आल्यामुळे नविन धागा न काढता इथेच विचारतो.
"अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरात प्रवेश करताना डोक्याचा वरचा भाग झाकुन जायची प्रथा नक्की कधीपासुन सुरु झाली? जर बोडक्या डोक्याने (डोके न झाकता) सुवर्णमंदिरात प्रवेश केला तर काय धार्मिक/ राजकिय/ इतर काय परिणाम होतात?"

पण कळत्या वयातला माणूस असेल तर डोकं झाकावंच लागतं. तिथले सेवेकरी ताबडतोब तुमच्या लक्षात आणून देतात. कुठल्याही गुरुद्वाराच्या प्रांगणात रुमालांनी भरलेली एक बादली/पिंप वगैरे असतं. तुम्हाला ते बांधून किंवा डोकं झाकूनच आत जावं लागतं. बाकी ही प्रथा कधीपासून सुरु झाली ते माहित नाही. पण डोकं झाकावंच लागतं. नाही झाकलं तर काय होईल ते कसं सांगणार? साधारणपणे आपल्या मंदिरात चपला घालून आत गेल्यावर जे होईल तेच होत असावं.

विवेकपटाईत's picture

18 Apr 2016 - 9:05 pm | विवेकपटाईत

माणसाचा एकच धर्म आहे, बाकी सर्व देवाला पुजण्याचे विभिन्न प्रकार आहेत.

माझा चारोळी धागा एकदा उडवला गेला होता. त्याची आठवण झाली... असो.

धर्मराजमुटके's picture

18 Apr 2016 - 10:19 pm | धर्मराजमुटके

तुमच्या चारोळी धाग्याचे शुद्धलेखन एवढ्या हाय क्वालीटीचे नसेल त्यामुळे तो धागा उडविला गेला असेल.

sश्रिकान्त's picture

18 Apr 2016 - 10:44 pm | sश्रिकान्त

मला एवढेच म्हणाचे आहे की तो ध्रम (िशख) िहंदु ध्रमापासुन बनला आहे. कारण िशख हे पहीले िहंदु ध्रम रक्षक होते. खरयं का?

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 11:07 pm | तर्राट जोकर

हिंदू धर्मापासून शिख धर्म बनण्याची गरजच काय आधी ते शोधा. तसेच मला मुसलमान करण्यात यशस्वी झालात तर सर्व हिंदुस्थान बिनशर्त इस्लाम स्विकारेल असे म्हणून गेलेले जे गुरु आहेत त्यांना हिंद की चद्दर म्हटले जाते, हिंदुधर्म की चद्दर असे नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Apr 2016 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शिख ध्र्म अह्गे. ह्दिउ द्र्मच्या ख्पुशा च्लालिरिती आणि त्याण्च्या प्दध्ती स्राख्या अहेत.

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2016 - 11:46 pm | आनंदी गोपाळ

कॉलिंग सर्दार मेंब्र्स ऑफ मिपा टू अन्सर.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 2:13 pm | माहितगार

शिख ध्रम की पंथ? कारण शिख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी हिंदु देवतांची पुजा करतात . मिपाकर जरा या बदंदल कोणी प्रकाश टाकेल का?

आपापला धर्म-पंथ उदात्त म्हणवून घ्यायचा आणि व्यवहारात संकुचितता ठेवायची हि बहुतांश धर्म-पंथावलंबींची परंपरा असावी किंवा कसे ? पंथ आणि धर्म यांची एक अशी व्याख्या नाही तुम्ही संकुचित व्याख्या घेतल्या तर प्रत्येक जण वेगवेगळा दिसेल, उदात्त व्याख्या घेतल्या तर सर्वजण एकच भासतील का.

माहितगार's picture

20 Apr 2016 - 7:17 pm | माहितगार

दोन्ही बाजूनी उदात्त व्याख्यांचा विचार होत असेल तर तत्वज्ञानाच्या दृष्टीने शिख पंथ हिंदू धर्माचा सहसंबंध कसा जवळचा आहे याचे मुद्याच्या बर्‍याच बाजुंचा सांगोपांग विचार करणारे एक बर्‍यापैकी विश्लेषण 'आर सिख्स हिंदुज' या कोएनराड एल्स्ट ह्यांच्या लेखात मिळते. लेख बराच मोठा आहे पण या मुद्याच्या जिज्ञासुंसाठी वर्थ रिडिंग