मी अधीर
मी बधीर
मी रुधिर
सबंध विश्वाचे
मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा
मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयूद्धाची
मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे
मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसर्याची
मी सौंदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण
गजेंद्र भोसले
आत्मशोध (काव्यसंग्रह)
प्रतिक्रिया
17 Apr 2016 - 12:07 pm | gsjendra
ओके
17 Apr 2016 - 12:09 pm | विजय पुरोहित
पण काय ओके?
17 Apr 2016 - 12:32 pm | अभ्या..
मी ओके ;)
18 Apr 2016 - 9:44 am | सतिश गावडे
18 Apr 2016 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार
मी केळं
मी शहाळ
मी रताळ
उपासाला सिताफळ
मी भेंडी
मी वांगी
मी पुंगी
लालचुटुक गाजराची
मी रिक्षा
मी एसटी
मी पी एम टी
काळ्या कळकट धुराची
मी म्हमद्या
मी म्हादु
मी साधू
चल करुया जादू
मी कावळा
मी सावळा
मी मावळा
सतरा इंच छातीचा
मी दगड
मी बोकड
मी मी माकड
नारळाच्या झाडावरचे
मी गाल
मी पाल
मी साल
पिकलेल्या फणसाचे
मी ओके
मी ओके
मी ओके
ओके ओके हा टाटाचा ओके
टाटाचा ओके धुण्याचा साबण
कपडे जादा धोने वाला
ओके जादा चलने वाला
ओके ओके हा टाटाचा ओके
टाटाचा ओके धुण्याचा साबण
टाटाचा ओके धुण्याचा साबण
टिंग टिंगटि डिंग
श्रोते हो आता ऐकुया काही ठळक बातम्या.........
पैजारबुवा,
18 Apr 2016 - 9:52 am | प्रचेतस
=))
18 Apr 2016 - 9:58 am | जेपी
=))
20 Apr 2016 - 10:31 am | नाखु
म्हणतात धो धो धुणे.....
एक डाव धोबीघाट पंखा नाखु
18 Apr 2016 - 10:08 am | विजय पुरोहित
धन्य धन्य माऊली...
कहरच अगदी...
18 Apr 2016 - 10:17 am | चांदणे संदीप
कहर!
=)) =))
18 Apr 2016 - 7:14 pm | जव्हेरगंज
हा हा हा !!!
18 Apr 2016 - 8:48 pm | पैसा
=))
20 Apr 2016 - 11:37 am | सस्नेह
चरणकमल कुठे आहेत पैजारदेवा ?
20 Apr 2016 - 11:30 am | वेल्लाभट
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
काय ओ हे!
20 Apr 2016 - 11:34 am | वेल्लाभट
मी प्लेट
मी वेट
मी सेट
शेक प्रोटीनचा
मी फसल
मी मसल
मी कसल
बेटकुळ्या फुगलेल्या
मी गजर
मी अधर
मी जबर
गाडा आयुष्याचा
मी शोध
मी बोध
मी क्रोध
हरवलेल्या वेळाचा
20 Apr 2016 - 11:43 am | संजय पाटिल
________/\________ दोघांना.
20 Apr 2016 - 2:10 pm | सनईचौघडा
आऽराऽरा पार बाजार उठवलाय की.. माझेही दोन पैसे...
मी ओटा
मी गोटा
मी काटा
पायात रुतणारा
मी भांग
मी रांग
मी बांग
मशिदीत दिली जाणारी
मी भक्ष
मी दक्ष
मी अक्ष
स्वतःभोवती फिरणारा
मी मंदी
मी कंदी
मी संधी
हातातुन निसटणारी
मी वेग
मी आवेग
मी वेध
भविष्याचा
सजेंद्र चौसले
अत्मबोध (स्वतःला स्वत:चा )
20 Apr 2016 - 4:49 pm | विजय पुरोहित
_/\_
देर्देकर काका दंडवत घ्या...
20 Apr 2016 - 5:00 pm | नाखु
मी मोठा
मी खोटा
मी सोटा
पाठीत बसणारा
मी अढी
मी गढी
मी दाढी
नको तेंव्हा वाढणारी
मी कडका
मी धडका
मी फडका
इथली धूळ तिकडे करणारा
मी खत्री
मी संत्री
मी मंत्री
काय्द्यातून(सलामत) निसटणारा
मी धागा
मी जागा
मी त्रागा
अवकाळी भूच्छत्रीचा.
खत्मशोध (कुणाला कशाचा )
21 Apr 2016 - 12:51 pm | पैसा
अरारा!
श्री कवी-धागाकर्ते, वाईट वाटून घेऊ नका. कविता लिहिण्यातली तुमची भावना पोचली. पण बाकी सगळ्या विडंबनकारांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही! =))
21 Apr 2016 - 1:05 pm | नीलमोहर
मूळ कवींसकट इतरही सर्वांना __/\__
(आत्ता वेळ नाही, नाहीतर आमीबी भर घातल्यावीण सोडलं नसतं ;)
24 Apr 2016 - 7:12 pm | gsjendra
कविता म्हणल्यावर असं चालायचंच
आपल्या माणसांनी असं खचकाटून बोलायचंच