कॉकटेल..

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
18 Sep 2008 - 5:51 pm
गाभा: 

नमस्कार मित्रहो.
मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता मला इथे "कॉकटेल" हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटते.
आतापर्यंत ह्या विषयावर मिपावर कुठलाच धागा सापडला नाहि परंतु सिंगल माल्ट ते द्राक्षासवा पर्यंत बर्‍याच पेयांचा उल्लेख इथे आढळतो.
प्रत्यक्षात आम्हि हि कॉकटेल्स रेस्तॉरंट मध्ये बसून फक्त चाखलेली आहेत.
परंतु हिच जर का घरी बनवायची असली तर काय काय तयारी करावी लागते.साहित्य काय हवे? कुठली कॉकटेल्स सहजपणे घरी बनवता येतील? विविध पेयांचे प्रमाण किती असावे,ग्लासांचे विविध प्रकार,देशागणिक मिळणारी वेगवेगळि कॉकटेल्स.... वगैरे वगैरे....... ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्र करता यावी हा या धाग्या मागचा उद्देश आहे.
मिसळपाव वरील जाणकार व्यक्तींनी ह्यात हातभार लावावा हि विनंती.
सात्विक लोकांनी/लोकांकरिता मॉकटेल्स ची रेसिपी दिलीत तरी चालेल.

अभिज्ञ.

प्रतिक्रिया

मनिष's picture

18 Sep 2008 - 6:03 pm | मनिष

व्हर्जिन पिनाकोलाडा
माझे अतिशय आवडते मॉकटेल, करायला सोपे आणि चवीला..........यम, यम!!!!

५०० मि.ली. पाइनॅपल ज्यूस (ताजा घेऊ नये, टेट्रापॅकमधला घ्यावा)
५०० मि.ली. व्हॅनिला आईस्क्रीम
२००-२५० मि.ली. नारळाचे दूध (डाबरचे टेट्रापॅक) हे चवीप्रमाणे कमी-जास्त घालावे,

आधी पाइनॅपल ज्यूस आणि व्हॅनिला आइस्क्रीम एकत्र करून ते एकजीव करून घ्यावे, ह्यात नारळाचे दूध टाकून मिश्रण छान घुसळून घ्यावे, थंडगार सर्व करावे. जास्ती हवे असल्या हेच प्रमाण वाढवावे (जसे ज्यूस १ लि, आईस्क्रीम ७५० मि.ली. आणि नारळाचे दूध ४०० मि.ली. असे) कितीही जास्त झाले तरी काळजी करू नका - ह्यातील एक थेंबही दुसर्‍या दिवशी उरत नाही हा माझा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे! ;)

भाग्यश्री's picture

19 Sep 2008 - 12:07 am | भाग्यश्री

हे माझंही अतिशय आवडतं पेय! :)
असात्विक करायचे असल्यास त्यात व्हाईट रम मिसळणे..

अभिज्ञ's picture

18 Sep 2008 - 6:27 pm | अभिज्ञ

काका,
लिंक्स बद्दल धन्यवाद.
परंतु काय होते ना कि ह्यात दिलेल्या रेसिपीतले बरेचसे पदार्थ झेपत नाहित. त्यांना भारतीय पर्याय काय असावा, ह्यातले कुठले पदार्थ भारतात मिळु शकतात वगैरे....काहि कळत नाहि.
एकाच ठिकाणी जर चर्चा करून काहि माहिती गोळा करता आली तर बरे असा ह्या धाग्यामागचा उद्देश आहे. अन जी मंडळि स्वतः घरी कॉकटेल्स बनवून पितात त्यांचे अनुभव शेअरिंग व्हावेत असे वाटते.

अभिज्ञ.

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2008 - 6:26 pm | भडकमकर मास्तर

पेठकरकाका,
एक रिक्वेष्ट
मी आधी खूप संस्थळांवर कॉकटेल्स्चा अभ्यास केला पण त्यात काय काय अवघड अवघड पदार्थ असतात...त्या बर्‍याचशा वस्तू समजतच नाहीत....
इथल्या साध्या लोकांसाठी भारतात उपलब्ध वस्तूंमधून सोपी सोपी कॉकटेल्स सांगा आधी...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2008 - 10:31 pm | प्रभाकर पेठकर

माझी आवडती कॉकटेल व्हिस्की वुईथ बिअर आहे. (हाय कॅलरी कंटेन्ट मुळे हल्ली हे काँबिनेशन करत नाही.)

एक लार्ज पेग आवडत्या व्हिस्कीचा घेऊन तो चिल्ड बिअरने फुल्ल करायचा. एक पेग व्हिस्की आणि एक कॅन बिअर. सुरुवातीला आख्खी बिअर मावत नाही ग्लासात पण जसजसे ग्लासातील द्रव्य कमी होत जाईल तस तसे उरलेली बिअर त्यात ओतत जायची. सगळी बिअर संपली आणि ग्लासही रिकामा झाला की पुन्हा एक पेग व्हिस्की आणि एक चिल्ड बिअर घ्यायची. असे झेपेल तितक्या वेळा करावे.

सवधगिरीची सुचना: चव खूप छान लागते पण २ पेग व्हिस्की आणि २ चिल्ड बिअर आख्खी बिल्डींग हलवायला पुरेशी होते.

चंबा मुतनाळ's picture

18 Sep 2008 - 10:08 pm | चंबा मुतनाळ

मला ह्याचे नाव आठवत नाही, पण पनामा, होंडुरास मधे बार्समधे शहाळ्यांमधे डार्क रम घालून सर्व्ह करतात, लय बेश लागते. पण काळी रमच पाहिजे, बकार्डी वगैरेनी काय मजा नाय!
- म्हातार्‍या साधूचा भक्त चंब्या

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 10:37 pm | विसोबा खेचर

मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता

धन्यवाद, परंतु येथील काही सदस्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की मिपा हे एक उथळ संकेतस्थळ आहे! :)

असो,

विषयांतराबद्दल क्षमस्व! बाकी चर्चा चालू द्या....

आपला,
(सिंगलमाल्ट प्रेमी) तात्या.

धनंजय's picture

18 Sep 2008 - 11:15 pm | धनंजय

हे वर्णन "आंबट"कॉक्टेलना लागू आहे.

१. कुठलीतरी डिस्टिल दारू (रम, जिन, वोदका, वगैरे)
२. आंबट द्रव (लिंबाचा किंवा संत्र्याचा रस)
३. गोड पाणी (साधारणपणे साखरेचा कच्चा पाक वेगवेगळ्या नावांनी)
(४. बर्फ)

दारूचे हवे तितके प्रमाण बर्फावर घ्यायचे, त्यात आंबट रस "चांगला आंबट होईल" इतपत घालायचा, साखरेचा पाक दारूचा कडवटपणा झाकेल इतका कमीतकमी घालायचा. खसाखसा मिसळायचे - झाले.

हे गणित झाले - त्यात थोडा-थोडा फरक करून बहार आणणे ही कला!

स्रोत : http://www.nytimes.com/2008/06/25/dining/25mini.html?_r=1&oref=slogin

GIMLET
(१) Gin (traditionally) or vodka (more recently),
(२, ३) with sugar and lime (or Rose’s Lime Juice).

TOM COLLINS
(१) Gin with
(२) lemon instead of lime,
(३) sugar and club soda.
There are also bourbon, rum, or vodka collinses.

अशाच प्रकारे पुढील कृती वाचाव्यात.

SLOE GIN FIZZ Tom Collins with sloe gin.

DAIQUIRI Gimlet with rum, more or less.

MARGARITA Gimlet with tequila, with triple sec instead of sugar.

KAMIKAZE Margarita with vodka.

COSMO Kamikaze with a splash of cranberry juice.

SIDECAR Margarita with cognac and lemon instead of lime.

येथे कंपनीच्या विविध इमारतींमधील कॉन्फरन्स रूम्सना एका समान 'थीम्'ला अनुसरुन नावे देतात. आमच्या हापिसातील कॉन्फरन्स् रूम्स साठीची थीम् ही कॉ/मॉक् टेल्स् किंवा इतर मदिरा अशी आहे. कामिकाझे, मार्गारिटा, लाँग आयलन्ड्, सन् राइज्, मिमोसा, व्हाइट् रशियन्, ऍलबामा स्लॅमर् अशा नावांच्या विविध कॉन्फरन्स रूम्स् आहेत :)
कंपनीच्या भारतातील एका इमारतीतील कॉन्फरन्स् रूम्स् ना शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्यात आली आहेत, असे कळाले. जसे गंधार, भैरव, यमन, मालकंस इ. :)
(माहीतगार)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 12:58 am | भडकमकर मास्तर

वावा..
बेला काय सुंदर नशीली नावं आहेत बुवा...
मजा आली...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/