मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉकटेल..

अभिज्ञ · · काथ्याकूट
नमस्कार मित्रहो. मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता मला इथे "कॉकटेल" हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटते. आतापर्यंत ह्या विषयावर मिपावर कुठलाच धागा सापडला नाहि परंतु सिंगल माल्ट ते द्राक्षासवा पर्यंत बर्‍याच पेयांचा उल्लेख इथे आढळतो. प्रत्यक्षात आम्हि हि कॉकटेल्स रेस्तॉरंट मध्ये बसून फक्त चाखलेली आहेत. परंतु हिच जर का घरी बनवायची असली तर काय काय तयारी करावी लागते.साहित्य काय हवे? कुठली कॉकटेल्स सहजपणे घरी बनवता येतील? विविध पेयांचे प्रमाण किती असावे,ग्लासांचे विविध प्रकार,देशागणिक मिळणारी वेगवेगळि कॉकटेल्स.... वगैरे वगैरे....... ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्र करता यावी हा या धाग्या मागचा उद्देश आहे. मिसळपाव वरील जाणकार व्यक्तींनी ह्यात हातभार लावावा हि विनंती. सात्विक लोकांनी/लोकांकरिता मॉकटेल्स ची रेसिपी दिलीत तरी चालेल. अभिज्ञ.

वाचन 4533 प्रतिक्रिया 11