बडबड गीत - पंखा मेरा दोस्त

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
26 Mar 2016 - 1:24 pm

आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नहीं.

फिरू फिरू करतो
घुमू घुमू करतो
घूं घूं करूत तो
नुसताच फिरतो.

हातवारे करते किती
स्माईली-स्माईली देते
गाढव लेकाला पण
काही कळतच नाही.
मला पाहून तो
हसतच नाही.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नाही.

बालगीत

प्रतिक्रिया

रातराणी's picture

27 Mar 2016 - 7:17 am | रातराणी

गोड :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2016 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार

तिला पाळण्यावर लटकवायच चावीने फिरणारे चक्र आणुन द्या बघा कशी मस्त खेळते ते आणि तिच्या कडे बघताना तुमचाही खुप टाइमपास होईल
x
असले काहीतरी
(चित्र अंजावरुन साभार )

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

27 Mar 2016 - 10:32 am | चांदणे संदीप

छानच!

पटाईत काका, ते हिंदीतल बडबडगीत माहीत असेल ना तुम्हाला...

उपर पंखा चलता है
नीचे बेबी सोती है...

त्यावरूनच...

वरती पंखा फिरतो
खाली बाळ झोपतो
अस काही करता येईल...मजेदार आहे ते पण!

Sandy