लघुपाककृतीस्पर्धा

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
17 Sep 2008 - 7:46 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना नमस्कार,
अनोख्या पाककृती ज्यांना करता येतात त्यांच्यासाठी ही लघुपाककृती स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे
१) पाककृती जास्तीत जास्त २० मिनिटांत करता येण्याजोगी हवी.
२) घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा.
३)खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको :H )
४)मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता तयार करता येण्याजोगा हवा (ओव्हन टोस्टर चालेल)
५) हिरवी मिरची आणि लिंबु न वापरता करता येण्याजोग्या पदार्थांना प्राधान्य मिळेल (अर्थात हिरवी मिरची आणि लिंबु प्रतिबंधीत नाही)

आपापल्या पाककृती पाठवण्याची अंतीम मुदत २५ सप्टेंबर आहे. निकाल २७ सप्टेंबरला जाहीर केला जाईल.
स्पर्धा जिंकणार्‍याचे/जिंकणारीचे नाव इथे मोठ्या अक्षरांत प्रसिद्ध करण्यात येईल आणि आम्ही भारतात परतल्यावर जिंकणार्‍याला/जिंकणारीला एक मस्त पार्टी देउ.

स्पर्धा परी़क्षक म्हणुन आम्ही स्वतः आणि आमचे मित्र फटुसाहेब काम पहातील.

अवांतरः घरापासुन लांब रहात असल्याने बरेच दिवस काही चटपटीत खाल्लेल्ले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवेशिका पाठेवुन आम्हाला सहकार्य करावे.

-गणा मास्तर
(भोकरवाडी बुद्रुक)

*सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत

प्रतिक्रिया

सामग्री :
१. चांगल्या प्रकारच्या ब्रेडचे तुकडे (स्लाइसेस) - वाटेल तितके. अजून सँडविच ब्रेड, किंवा असा कुठलातरी गिच्चगोळा पांढरा पाव खात असाल तर तुमची मुले कॉलेजात निघून गेल्यावर हा पदार्थ करावा.
२. लालभडक आंबट टोमाटो : ब्रेडवर चकत्या ठेवण्यापुरते aपाश्चिमात्त्य (थंड) देशात राहात असाल तर फक्त उन्हाळ्यात पदार्थ करावा. भारतात कधीही
३. चीझ : जिथे मिळते तिथे ताजे मोत्सारेल्ला प्रकरचे, नाहीतर वाटेल ते. चीझमध्ये मिठाचे काय प्रमाण आहे, हे ओळखून असावे.
४. तुमचा आवडता सुवासिक पाला : भारतात अर्थात ताजी कोथिंबीर. आवडत असल्यास पांढर्‍या तुळशीची कोवळी पाने. नाहीतर इटालियन तुळशीची (बेसिल) पाने. नाहीतर थाई तुळशीची पाने. (कुठलातरी एकच प्रकार घ्यावा)
५. मिरी ताजी कुटून मिरपूड
६. मीठ

कृती
१. टोमाटोच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात
२. चीझच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात
३. सुवासिक पाला बारीक चिरून घ्यावा (श्रेड)
टोस्टर ओव्हन असल्यास :
४अ. ब्रेडच्या चकतीवर एक थर टोमाटोच्या चकत्यांचा द्यावा, त्यावर बारीक चिरलेला सुवसिक पाला घालावा. त्यावर चीझच्या चकत्यांचा थर लावावा.
५अ. टोस्टर ओव्हनमध्ये चीझ वितळेपर्यंत, वरून थोडे खरपूस होईपर्यंत टोस्ट करावे.
६अ. ताटलीत वाढावे, ताजी मिरपूड आणि मीठ भुरभुरावे.
(टोस्टर ओव्हन नसल्यास - ओपन फेस ऐवजी क्लोझ फेस पानीनि सँडविच करावे)
४आ. ब्रेडच्या चकतीवर एक चीझच्या चकत्यांचा, एक थर टोमाटोच्या चकत्यांचा द्यावा, त्यावर बारीक चिरलेला सुवसिक पाला घालावा. ताजी मिरपूड आणि मीठ भुरभुरावे. त्यावर चीझच्या चकत्यांचा आणखी एक थर लावावा. ब्रेडची दुसरी चकती त्याच्यावर ठेवावी.
५आ. तव्यावर खूप थोड्या तेलावर (किंवा बटरवर) आधी एका बाजूने, मग दुसर्‍या बाजूने सँडविच भाजावे. चीझचे दोन्ही थर वितळले पाहिजेत.
६आ. ताटलीत खण्यास घ्यावे

सामग्री एकत्र करण्यास १० मिनिटे. टोस्ट करण्यास ५ मिनिटे (तव्यावर भाजल्यास १० मिनिटे)
१५-२० मिनिटे.

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 8:29 am | विसोबा खेचर

अरे वा!

अलिकडे मिपावर निरनिराळ्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत याचा आनंद वाटतो. मिपा चहुबाजूंनी समृद्ध होत आहे असेच म्हणावे लागेल..!

आपणहून पुढाकार घेऊन अतिलघुकथास्पर्धा आणि लघुपाककृतीस्पर्धा आयोजित करण्याबद्दल अनुक्रमे सर्किट व गणामास्तरांचे मनापासून आभार व सर्व स्पर्धकांना मन:पूर्वक शुभेच्छा! ..:)

आपला,
(आनंदीत) तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 8:35 am | सखाराम_गटणे™

मक्याचे(जास्त निबर नसावेत) दाणे काढुन तव्यात तेल तिखट मीठ टाकुन परतावेत.
मस्त लागतात. सगळे कच्चा माल तयार भेटतो.

विजुभाऊ's picture

17 Sep 2008 - 9:21 am | विजुभाऊ

गटणेमामा
तुम्ही सैपाकघरात केवळ अन्नग्रहणासाठी जाता बहुतेक (ह घ्या) मक्याचे दाणे परतुन घेणे.....दात पडुन जातील. ते अगोदर उकडुन घ्यायचे असतात. किमान ७ ते ८ मिनीटे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 9:23 am | सखाराम_गटणे™

>>मक्याचे दाणे परतुन घेणे

कोवळ्या मक्याचे दाणे घेणे, वाळवलेले नाही.

हर्षद आनंदी's picture

17 Sep 2008 - 8:50 am | हर्षद आनंदी

साहित्य : रवा, लसुण, कांदा (आवड्त अल्ल्यास, सक्ती नाही), तिखट (सोसवेल एवढे), मीठ (चवीप्रमाणे), तेल ३ चमचे

कॄती : प्रथम तेल गरम करून, मोहरी व लसुण ठेचुन परतुन घ्यावी, त्यात रवा घालुन चांगला भाजावा, तिखट, मीठ, थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजवावा. वरुन खोबरे-कोथींबीर घालुन गरम गरम ओरपावा...

४ माणसांसाठी १० मिनीटात तयार ...तिखट-मीठ बरोबर असल्यास भाव खाऊन जाल

मटार \ मका \ कांदा \ टोमॅटो यांचा वापर प्रत्येक वेळी वेगळ्या चवी साठी करायला उत्तम..

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 9:08 am | शैलेन्द्र

रवीवारी सकाळी, ५ मिनीट बायकोच्या पाककलेची स्तुति करावी, आणि संध्याकाळी खरेदिला कुठेतरी जावूया(कुठेतरी=तुळ्शीबागेचे गावोगावचे अवतार) असे म्हणावे,

पुढिल १० मिनटात एक छान पदार्थ तयार होवुन येतो...

(बायको असणे आनि तिला स्वयंपाक येत असणे ग्रुहित धरले आहे.)

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 9:16 am | गणा मास्तर

शैलेन्द्र , बायको असती तर.......
-(अविवाहीत) गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 9:26 am | शैलेन्द्र

हा हा, टुक टुक... (याचि स्मायली कशी आहे?)

(सदर स्पर्धा पाकक्रुतिन्चि असल्याणे बॅचलर लाइफ्चे इतर फायदे सांगु नये.)

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 9:26 am | सखाराम_गटणे™

शैलेन्द्र , बायको असती तर.......
येथे भलताच विनोद तयार झालाय (ह. घ्या.)

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 9:25 am | सखाराम_गटणे™

शैलेन्द्र , बायको असती तर.......
येथे भलताच विनोद तयार झालाय (ह. घ्या.)

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 9:28 am | शैलेन्द्र

विनोद तर झालाच, पण तो फक्त पाककृतीबद्द्ल होता का, याचि शन्का आहे..

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 9:30 am | सखाराम_गटणे™

>>पण तो फक्त पाककृतीबद्द्ल होता का, याचि शन्का आहे..
आजकाल कशाची पण पाकक्रुती असते :))

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 9:47 am | शैलेन्द्र

सखाराम, रेसिपी आणि प्रोटोकॉल यात फरक आहे हो..(ह. घ्या.)

चटोरी वैशू's picture

17 Sep 2008 - 9:50 am | चटोरी वैशू

स्वीट कॉर्न चाट...

साहित्य :
२-३ स्वीट कॉर्न , १ मोठा कांदा बारिक चिरलेला, १ टोमाटो बारिक चिरलेला, मीठ, मिर्चि पावडर, कोथिंबिर बारिक चिरलेली, १ टि.स्पून साखर, चाट मसाला इ.
कृती :
प्रथम स्वीट कॉर्न मीठ टाकुन कुकरच्या ३-४ शिट्यांमधे शिजवून घ्यावे, मग त्यांचे दाणे काढावे, त्या दान्यांमधे चिरलेला कांदा, चिरलेला टोमाटो, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिर्चि पावडर, चिरलेली कोथिंबिर, चाट मसाला सगळे मस्त पैकी मिक्स करावे.... झाला चटपटीत नास्ता तयार...

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 10:20 am | गणा मास्तर

प्रतिबंधित घटक पदार्थांमध्ये कोथिंबिर लिहायला विसरलो होतो.
असो तुमची पाककृती विचारात घेतली जाइल
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 10:12 am | आनंदयात्री

१. दुधाची पिशवी आणावी.
२. ती फोडावी.
३. हवा अंमळ उकाड्याची असल्यास दुध डायरेक्ट तसेच प्यावे.
४. हवा अंमळ थंड असल्यास ते चवीनुसार गरम करुन ऐपतीप्रमाणे साखर घालुन प्यावे.

(टिपः दुधाची पिशवी आपला आहार पाहुन आणावी .. )
(तळटिपः ही पाककृती भारतात पावशेराच्या अर्धा शेराच्या पिशव्या मिळतात म्हणुन करावी .. इंग्लडात पिंटात दुध मिळते का पिंपात त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> (तळटिपः ही पाककृती भारतात पावशेराच्या अर्धा शेराच्या पिशव्या मिळतात म्हणुन करावी .. इंग्लडात पिंटात दुध मिळते का पिंपात त्याच्याशी
>> आम्हाला काही घेणेदेणे नाही.)

पिंट नाही हो आणंदबाबा, पाईंट! आणि ते पिशवीत नाही मिळत, कॅनमधे मिळतं. आणि युरोपात आणि अमेरिकेत टेट्रापॅकमधे!

(बारा गावचं पाणी प्यालेली) अदिती

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 10:26 am | आनंदयात्री

तुम्ही जिथ रहात होत्या तिथुन पुढच्या १० कोसांवर पॉइंटला पिंट म्हणत होते.

(तुमच्या १० कोसातले एक एक संभाषण--
अ: आज पायपर वाचला का ?
बः नाही हो आज सुट्टी मुनी नव्हती पाकिटात !)

-
आपलाच

तर्कतीर्थ आंद्या खडखडकर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> तुम्ही जिथ रहात होत्या तिथुन पुढच्या १० कोसांवर पॉइंटला पिंट म्हणत होते.
एक मिनीट! आसकुस मी हो भौ!!
आमी कुटे र्‍हायचो तुमाला काय मैत? आणि आमच्या इथे पॉईंट नाही पाईंट म्हणायचे. तुम्हाला माजा प्वॉईंट कल्ला का?

आणि आमच्या बरोबर युकेतल्या समद्या भागात फिरून आलेले शिकल्याले लोक होते, ते सर्वे पाईंटच म्हणायचे.
आजूबाजूला काही डोक्यानी अंमळ स्थूल आणि मेदमयी लोक होते, ते काय वाट्टेल ते बोलायचे हो, कुठेही खडखडाट करायचे! आता बोलणाय्राचं तोंड थोडीच धरता येतं?

(शिकलेली) अदिती

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 12:12 pm | आनंदयात्री

=))
व्यक्तिगत टिका हे संयम सुटल्याचे अन मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> व्यक्तिगत टिका हे संयम सुटल्याचे अन मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे !

कोणावर व्यक्तिगत टीका? आपण डोक्याने अंमळ स्थूल आहात काय? :-D
आणि तुमी कितीही खडखडाट करा हो, बोलणाय्राचं तोंड थोडीच धरता येतं?

(अगोचर) अदिती

(स्वगतः आता पळा, तो आंद्या नारळानी झोडणार आहे)

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 12:26 pm | आनंदयात्री

थोड्या आंतरजालिय विश्रामाची आवश्यकता आहे. होशिल बरी. काळजी नको करुस.
आणी हो नुसते प्रतिसादाच खदाखदा हसणारे स्माईली टाकुन वस्तुस्थिती बदलता येत नसते हे लक्षात ठेव बरं बाळे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> थोड्या आंतरजालिय विश्रामाची आवश्यकता आहे. होशिल बरी. काळजी नको करुस.

अरे हो, आज मी माझ्या एलियनायटीसेलियाचं औषध घेतलंच नाही! ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2008 - 12:25 pm | llपुण्याचे पेशवेll

आमच्याहीकडे तर दॉध पिलॅष्टीकच्या कॅनमधेच मिळायचे. १ ग्यालणचा म्होटा कॅन आन् अर्धा ग्यालनचा छोटा कॅन. टेट्राप्याकमधे ते ट्रॉपिकानाचे ज्यूस मिळायचे..
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्याहीकडे तर दॉध पिलॅष्टीकच्या कॅनमधेच मिळायचे. १ ग्यालणचा म्होटा कॅन आन् अर्धा ग्यालनचा छोटा कॅन. टेट्राप्याकमधे ते ट्रॉपिकानाचे ज्यूस मिळायचे..

पुन्हा एकदा ऐकीव आणि वेबकॅममधली "बघीव" माहिती!

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2008 - 1:50 pm | llपुण्याचे पेशवेll

नाय हो आमच्या नवयार्कात क्यानातच दूध मिळते आणि ट्याट्राप्याकधे ट्रॉपिकानाचा जूस मिळतो.
पुण्याचे पेशवे

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 12:28 pm | आनंदयात्री

अहो त्यांची आख्ख्या जगात दुध एजन्सी आहे अन तुम्ही काय शिकवता त्यांना ! त्या म्हणाल्या मडक्यात दुध मिलत होते तर आपण हाव म्हणायच??!! ..काय ... ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो त्यांची आख्ख्या जगात दुध एजन्सी आहे अन तुम्ही काय शिकवता त्यांना ! त्या म्हणाल्या मडक्यात दुध मिलत होते तर आपण हाव म्हणायच??!! ..काय ... ??

हे बाकी भारीच! =))
आख्ख्या जगात?? विश्वात म्हणायचं असेल तुम्हाला! ;-)

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 12:38 pm | आनंदयात्री

एलियनासिनसिनाटी (काय अवघड नाव आहे बॉ) .. मधल्या एलियन इस्ट इंडीया कंपनीचा व्यवसाय तर पक्का झाले .. वैश्विक दुग्ध पुरवठा केंद्र ...
(दुधाला दुग्ध म्हटल्यावर उगाच वजन येते .. जसे दुर्बिणीला टेलेस्कोप म्हटल्यावर येते तसे)

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 10:40 am | गणा मास्तर

ही तर माझी आवडती हाये. फक्त भोकरवाडीला म्हशीच निरस दुध प्येतो आम्ही कधीमधी
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

अंतु बर्वा's picture

17 Sep 2008 - 10:23 am | अंतु बर्वा

आनंदयात्री.... ह.ह.पु.वा.....

पुणेरी पुणेकर's picture

17 Sep 2008 - 10:33 am | पुणेरी पुणेकर

काय राव ??
जरा चमचचमीत पाककृती येऊ द्या की .....

मृगनयनी's picture

17 Sep 2008 - 11:32 am | मृगनयनी

पोटॅटो चीप्स विथ ओन्यन:

कृती : प्रथम मध्यम आकाराचे ५-६ बटाटे स्वच्छ पाण्यात धुवुन घ्यावेत. साले न काढता त्याचे पातळ मोठे काप करावेत. मायक्रो मध्ये एका प्लॅस्टिक डीश मध्ये / काचेच्या पसरट डीश मध्ये हे काप ठेवुन १० मिनिटे "ग्रील " ला ठेवावेत. मस्त कुरकुरीत होतात.

ते ग्रील्ड होईपर्यंत कांदा उभा पातळ चिरावा. (१ किंवा २ कांदे). त्याच्यावर मीठ भुरभुरुन चतकोर लिंबु पूर्णपणे पिळावा. बटाटे मायक्रो च्या बाहेर काढुन त्यावर थोडासा तेलाचा हात लावावा. व वरुन तिखट किंवा चाट मसाला भुरभुरावा.

" ६बटाटे : २ कांदे " या प्रमाणाला अनुसरुन बटाट्याच्या प्रत्येक चीप वर कापलेला कांदा ठेवुन सर्व करावा. आवडत असल्यास वरुन सॉस घेतला तर हा पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.

या पाककृतीला १५-२० मिनिटे लागतात.

:)

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 11:38 am | सखाराम_गटणे™

शेंगदाण्याचा कुट आणि साखर मिसळुन खावी.
गुळ-पाणी खावे

जैनाचं कार्ट's picture

17 Sep 2008 - 11:39 am | जैनाचं कार्ट (not verified)

छान दुवा आहे आवडला !!!

पण मी येथे पाककृती देत नाही आहे कारण, माझ्या पाक क्रिये मुळे देशाची लोकसंख्या कमी होईल अशी आशंका आहे ;)
पण तुमच्या पाकक्रुत्या मी जपून ठेवेन कधी काळी उपयोगी येतीलच :)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:42 am | सर्किट (not verified)

२ वाट्या जाड पोहे (पातळ पोहे घेतल्यास गिचका होतो.)
४ चमचे दही.
पोहे आणि दही एकत्र करावे.
त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावे.
२ चमचे तूप एका भांड्यात घालून गरम करावे.
त्यात १ चमचा जिर्‍याची फोडणी करावी.
थोडा हिंग, आणि बरेचसे तिखट टाकावे.
ही फोडणी दही पोह्यांवर टाकावी.

एकून ३ मिनिटे लागतात ह्या पाककृतीसाठी.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 11:47 am | गणा मास्तर

आयला हे सर्कीटचे पोहे मस्त वाटत आहेत, करुन पाह्यला पाहिजे
पण हिंग प्रतिबंधित आहे सर्कीटराव
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:49 am | सर्किट (not verified)

हिंग नाही टाकला तरी चालेल. (तिखट जास्त टाका, इतर कुठलीही चव लागू नये, ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल :-)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 11:45 am | गणा मास्तर

आयला हे सर्कीटचे पोहे मस्त वाटत आहेत, करुन पाह्यला पाहिजे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 11:47 am | आनंदयात्री

सर्किट म्हणजे सुदामा तर तात्या म्हणजे कृष्ण का ??
=))

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:50 am | सर्किट (not verified)

तो पेन्द्या. बोलविता कृष्ण वेगळाच !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 11:52 am | आनंदयात्री

=))

घाटावरचे भट's picture

17 Sep 2008 - 3:01 pm | घाटावरचे भट

यात वरुन थोडीशी साखरही टाकल्यास चव अजून बरी लागते. अर्थात हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण खरोखर ३ मिनिटांत होणारी पाककृती. शिवाय हीच पाककृती पोह्यांऐवजी भाताबरोबरही होते (फक्त भात ताजा नको. सकाळचा संध्याकाळी अथवा संध्याकाळचा सकाळी असल्यास उत्तम. भातात दही कालवण्यास २ मिनिटे जास्त लागतात एवढंच...)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

कुरमुरे भिजवून बाकी सगळं तसंच करून पहा.
लेज वेफर्स चुरा करून वर भुरभुरीत टाकावे.
करायला आणि खायला ३ मिनीटं लागतात.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

भाग्यश्री's picture

17 Sep 2008 - 9:51 pm | भाग्यश्री

वा.. कालच केले होते हे दही पोहे मी! :)
मस्त लागतात..

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:59 am | सर्किट (not verified)

कितीही प्रमाणात, पातळ पोहे, चुरमुरे, डाळं, शेंगदाणे, चिरलेला कांदा, (असल्यास कैरी बरीक चिरून), हिरव्या मिरच्या चिरून, कच्चे तेल, चवीप्रमाणे मीठ, आणि बरेच तिखट एकत्र करावे.

लागणारा वेळः ५ मिनिटे.

(यासोबत घ्यायचे जे पेय असते त्यात सी२एच्५ओएच चे प्रमाण जितके अधीक, तितके जास्त तिखट टाकावे.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मनस्वी's picture

17 Sep 2008 - 12:13 pm | मनस्वी

कॉर्न उपमा

पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि.

साहित्य :
२०० ग्रॅ कोवळे मक्याचे दाणे (वाळवलेले नव्हेत)
४ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा जिरे
१ चमचा तेल
१/२ चमचा हळद
अर्धे लिंबू
मीठ

कृती :
१. मक्याचे दाणे मिक्सरमधून ओबडधोबड फिरवून घ्यावेत.
२. मिरची आणि जिरे मिक्सरमधून काढावे.
३. १ चमचा तेल तापले की त्यात जिरे - मिरचीची पेस्ट आणि हळद घालावी.
४. मक्याचे दाणे टाकावेत.
५. चवीप्रमाणे मीठ घालावे.
६. वरून थोडेसे पाणी शिंपडून ५ मि झाकून वाफ काढावी.
७. लिंबू पिळून गरम गरम खावे.

==================================================
बटाट्याचा कीस

पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि.

साहित्य :
४ बटाटे (बटाट्याऐवजी रताळी पण घेउ शकतो)
मीठ
२ च दाण्याचा कूट
२ च तूप
१ च जिरे
लिंबू

कृती :
१. बटाट्याच्या साली काढून किसून घ्यावा.
२. तूप तापले की त्यात जिरे टाकावे.
३. किसलेला बटाटा टाकून मिश्रण सारखे करावे.
४. दाण्याचा कूट, मीठ टाकून एक वाफ आणावी.
५. वरून लिंबू पिळून खावे.

==================================================
दही आलू

पाककृतीला लागणारा वेळ : २० मि.

साहित्य :
२०० ग्रॅ दम आलूचे बटाटे (नसल्यास मोठ्या बटाट्याचे ४ तुकडे करावेत)
मीठ
तेल
पाव कि दही
चाट मसाला
जिरे पूड
तिखट
साखर

कृती :
१. बटाट्याच्या साली काढून टूथपिकने / काटा चमच्याने त्याला टोचे द्यावेत.
२. ५ मि साठी ते मीठाच्या पाण्यात भिजवावेत.
३. तेल तापवून त्यात बटाटे सोडून तपकिरी करावेत आणि तळून झाल्यावर टिशू पेपरवर टाकावेत.
४. दह्यात २ च साखर, अर्धा च तिखट, अर्धा च जिरेपूड, अर्धा च मीठ टाकून फेटून घ्यावे.
५. त्यात हे बटाटे सोडावेत.
६. वरून चाट मसाला घालावा. ब्रेड / पराठा / नुसते पण खाउ शकतो.

==================================================
राईस शेवई

पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि.

साहित्य :
राईस शेवईचे पाकिट विकत मिळते.
तेल
मीठ
४ मिरच्या
१/२ च मोहरी
साखर
लिंबू

कॄती :
१. ४ ग्लास पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळले की त्यात शेवई टाकून २ मि नी गॅस बंद करावा. पाणी पूर्ण काढून टाकावे.
२. तेल तापले की त्यात मोहरी आणि चिरलेल्या मिरच्या टाकाव्यात.
३. त्यात शेवई टाकून हलवावे.
४. वरून मीठ टाकावे. लिंबू पिळावे.

==================================================
फ्रूट सॅलड

पाककृतीला लागणारा वेळ : १० मि.

साहित्य :
उपलब्ध असतील तेवढी फळे (सफरचंद / केळी / पेरू / डाळींब / अननस / मोसंबी / चिकू)
पाव लिटर दूध
साखर चवीप्रमाणे
२ च कस्टर्ड पावडर

कृती :
१. फळे बारीक कापावीत.
२. दूधात कस्टर्ड पावडर आणि साखर घालून मिश्रण सारखे करावे.
३. वरून कापलेली फळे घालून मिश्रण सारखे करावे.

==================================================
उत्तप्पा

पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि.

साहि त्यः
MTR डोसा मिक्स आणि चटणी पावडर बाजारात विकत मिळते.
तेल
चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची

कृती :
१. डोसा मिक्समध्ये आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावे.
२. तव्यावर तेल लावून, तवा तापला की हे मिश्रण तव्यावर जाडसर टाकावे.
३. वरून चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची टाकावी.
४. उत्तप्पा खरपूस भाजावा.
५. चटणी पावडरबरोबर खावा.

==================================================
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 12:15 pm | आनंदयात्री

बापरे बाप !! आपल्या पाककौशल्याला सलाम !

टारझन's picture

17 Sep 2008 - 12:55 pm | टारझन

ए मने .... अफ्रिकेत मेस चालू कर ना ग तु ...
आयला तु पाकृक्विन च आहेस .. वा वा वा ... प्लिज तेवढं मेस च मनावर घे ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 1:03 pm | गणा मास्तर

भरपुर पाककृती लिहिल्या तुम्ही तर..... हा खास तुमचाच प्रांत दिसतो.
मिक्सर वापरायला बंदी असल्याने कॉर्न उपमा बाद
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मनस्वी's picture

17 Sep 2008 - 1:06 pm | मनस्वी

तुम्ही पाटा-वरवंटा वापरू शकता.
आणि त्याला बंदी नाहीये!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 1:14 pm | गणा मास्तर

तुम्ही पाटा-वरवंटा वापरू शकता.
आणि त्याला बंदी नाहीये

टेक्निकल चुक पकडलीस अगदी.
खरे तर खरडा भरडायची तकतक नको कारण ती सोय नाही माझ्याकडे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर

४)मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता तयार करता येण्याजोगा हवा

म्हणजे त्याला बंदी आहे.

मनस्वी's picture

17 Sep 2008 - 5:05 pm | मनस्वी

>पाटा वरवंटा
काका.. ते त्यांनी नंतर अद्ययावत केलंय.

माझ्याकडे अजून १ पर्याय आहे -----> मक्याचे दाणे खलबत्त्यात ५ मि कुटून घ्यावेत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर

मक्याचे दाणे पोळपाटावर चेपूनही घेता येतील. (मी माझ्या पाककृतीत दिल्या प्रमाणे)

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 1:08 pm | विसोबा खेचर

परिक्षकांचे मत माहीत नाही, परंतु आम्ही मनस्वीला पयला नंबर देत आहोत... :)

तात्या.

ऋचा's picture

17 Sep 2008 - 12:27 pm | ऋचा

जिरा शीरा
वेळ १० मिनिटे.
१ वाटी बारीक रवा,
दिड वाटी पाणी,
तिखट्,मीठ्,साखर.
रवा खमंग भाजुन घ्यावा (३-४ मिनिटात होतो भाजुन)
पाणी उकळत ठेवावे एकीकडे
फोडणी करावी त्यात मोहोरी न घालता जीरे घालावेत.
त्यात भाजलेला रवा घालावा व एकत्र करुन घ्यावा त्यात उकळलेले पाणी घाला मीठ्,तिखट्,साखर घाला.
२ मिनीटे वाफ आणा.
झाला जीरा शीरा तयार!!

तांदुळाचे घावन
वेळ ५ मिनिटे.
तांदुळाचे पीठ १ वाटी,मीठ
तांदुळाचे पीठ पाण्यात जाडसर भिजवावे त्यात चिमुटभर मीठ घालावे.
तव्यावर पातळ पसरावे. दोन्हीकडुन रंग बदलल्यावर तव्यावरुन काढावे.
(ह्यात हवे असल्यास मीरचीचे बारीक तुकडे घालावेत)
सॉस,लिंबाच्या लोणच्या बरोबर खावे.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आरती's picture

17 Sep 2008 - 12:30 pm | आरती

मुग डाळीचे कबाब

साहित्य :
१ कप मुगाची डाळ, कप उकडलेला बटाटा (मळून), थोडा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे मिर्चि पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा आल-लसूण पैस्ट, १ चमचा चाट मसाला, २ चमचे कोथिंबीर, चवीपूरता मीठ.

कॄती :
निवडून, धूऊन मुगाची डाळ ऊकडून घ्यावी. त्यात उरलेले बाकीचे साहीत्य नीट मिसळून घ्यावे. मग त्याचे लहान लहान गोळे करावे. मग सळीला लावून मायक्रोवेव्ह मध्ये ३ ते ४ मिनीटे बेक करणे.

गरमागरम कबाब तय्यार......... हिरव्या चटणी बरोबर गरम गरम खावेत.

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 1:06 pm | गणा मास्तर

वाचुनच तोंडाला पाणी सुटले....
पण कोथिंबिर प्रतिबंधित आहे :H ......बघा जमल्यास काही बदल करता येतो का ते :W
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आरती's picture

17 Sep 2008 - 2:00 pm | आरती

कोथिंबिर नको असल्यास पूदिना वापरला तरी वेगळीच चव येते.

वल्लरी's picture

17 Sep 2008 - 1:09 pm | वल्लरी

दुध-पोहे
वेळ ५ मिनिटे

साहि त्यः
१.दुध
२.जाड पोहे
३.वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर
४.साखर
५.चवीनुसार मीठ

कॄती :
एका बाऊल मध्ये १ कप जाड पोहे घेउन त्यात दुध गरम करुन टाकावे (पोहे दुधात भिजेपर्यत).वरुन वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर आणी साखर जेतके गोड हवे असेल तितकि,चवीनुसार मीठ टाकावे.
दुध-पोहे तयार ........

===============================================================
मक्याच्या दाण्याचा चाट
वेळ १० मिनिटे

साहि त्यः
१.उकड्लेले मक्याचे दाणे
२.बटर
३.मिरपुड
४.लाल तिखट
५.चवीनुसार मीठ

कॄती :
एका बाऊल मध्ये उकड्लेले मक्याचे दाणे,थोडे बटर,मिरपुड,थोडे लाल तिखट,आणी चवीनुसार मीठ घालुन छान मिक्स करणे.
मक्याच्या दाण्याचा चाट तयार.........

विजुभाऊ's picture

17 Sep 2008 - 1:21 pm | विजुभाऊ

कच्चे पातळ पोहे. दीड वाटी त्यात अर्धा चमचा काळा मसाला मीठ चवी पुरते , एक चमचा गोडे तेल , भाजके किंवा कच्चे शेंगदाणे , टाकुन हलवुन घ्यावे.
खाताना असेच किंवा दही / ताक टाकुन खावे

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरली आहे

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 3:06 pm | शैलेन्द्र

कोळीनिकडुन ताजा हलवा किंवा पापलेट आणावा,

चाकुने खवले साफ करुन स्वछ्ह धुवावा (२ मिन.)

ऊभ्या आड्व्या चिरा पाडुन आत चाट मसाला/ मिरचि/ मीठ हे मिश्रन भरावे.

वरुन थोड दही चोळाव ( ३ मिन.)

केळिच्या पानात गुंडाळुन १० मिन. तव्यावर झाकुन ठेवावि(अधुन मधुन ऊलटावी), किंवा, २ मिन माय्क्रो आनि ७-८ मि. ग्रील करावी...

(पदार्थाची चव कोळीन आणि हलवा यानुसार बदलते.)

अजुन एक..

राजगीर्‍याच्या लाडुवर गरम दुध टाकाव, आव्श्यक्ता वाट्ल्यास थोडा गुळ/खजुर वरुन घ्यावा. आनि चमचाने खावे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर

तवा चिझ सँडवीच.

साहित्यः

ब्रेड स्लाईस - २
छेडर चिझ स्लाईस - १
बटर - २ टेबल स्पून

कृती:

प्रत्येक स्लाईसला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यावे.
दोन्ही स्लाईस तापलेल्या तव्यावर ठेवावेत.
खालून चरचरीत लाल झाल्यावर एक स्लाईस उलटून त्यावर चिझचा स्लाईस ठेवावा आणि त्यावर दुसरा स्लाईस न उलटता ठेवावा. (म्हणजे भाजलेली लाल चरचरीत बाजू चिझवर येईल अशा पद्धतीने).
आता हे सँडवीच दोन्ही बाजूंनी भाजून लाल चरचरीत करून घ्यावे. तसे झाले की तव्यावरून उतरवून तिरपे (डायगोनली) कापून खावेत.

ऑन्यन (कांदा) सँडवीच.

साहित्यः
ब्रेड स्लाईस - २
बटर २ टेबलस्पून
मेयॉनिझ १ टेबलस्पून
कांदा अर्धा (छोटासाच)
भरडसर काळीमिरी पूड

प्रत्येक स्लाईसला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यावे.
दोन्ही स्लाईस तापलेल्या तव्यावर ठेवावेत.
खालून चरचरीत लाल झाल्यावर दोन्ही स्लाईस उलटून दुसर्‍या बाजूनेही तसेच भाजून घ्यावेत. तव्यावरून खाली उतरावावेत.
कांदा पातळ, लांब चिरून घ्यावा.
एका स्लाईसला मेयॉनिझ लावून घ्यावे. त्यावर पातळ लांब चिरलेला कांदा पसरवावा. त्यावर दूसरा स्लाईस ठेवून तिरपे (डायगोनली) कापून खावेत.

धिरडे.

साहित्य:
१ वाटी तांदूळाचे पीठ
१/२ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन)
१/४ टीस्पून हळद
१/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
२" आलं
३-४ लसूण पाकळ्या
१ टीस्पून जीरं
मीठ चवी नुसार.
तेल परतण्यासाठी.
कृती:
आलं लसूण वाटून घ्यावे. (बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
(तेल वगळता) सर्व साहित्य एकत्र मिसळावे आणि पाणी घालून सरसरीत भिजवावे. (ताका इतके पात्तळ नाही. जरा जाड ठेवावे)
फ्राय पॅन मध्ये तेल तापवून त्यावर एक डाव वरील मिश्रण ओतून, पॅन गोलाकार फिरवून, सगळीकडे नीट पसरावे.
झाकण ठेवून मध्यम आंचेवर शिजवावे.
शिजल्यावर सर्व बाजूने बारीक तेल सोडून धिरडे उलटावे. दुसर्‍या बाजूनेही झाले की दह्या बरोबर खावे. (दह्यावर लाल तिखट भुरबुरावे.)

गार्लीक ब्रेड

साहित्यः
बटर २-३ टेबलस्पून
गार्लीक पेस्ट स्वादानुसार.
फ्रेंच ब्रेड किंवा नॉर्मल ब्रेड स्लाईस.
मॉझरेला चिझ आवडी नुसार.
लाल तिखट चवीनुसार.

बटर मध्ये आपल्या आवडीनुसार गार्लीक पेस्ट मिसळून 'गार्लीक बटर' तयार करावे.
फ्रेंच ब्रेड घेतला तर त्याचे १ इंच जाडीचे तिरपे स्लाईस कापून घ्यावेत अन्यथा साधे ब्रेड स्लाईसही चालतील.
ब्रेडला एकाच बाजूने 'गार्लीक बटर' लावून घ्यावे. त्यावर मॉझरेला चिझ किसून घालावे. (आवडीनुसार) वरून लाल तिखट भुरभुरावे.
हे स्लाईस ओव्हन मध्ये ७ मिनिटे ग्रील करून घ्यावेत.
गरम-गरम खावेत, थंड करू नयेत.

जॅम अँड घी सँडवीच.

साहित्यः
कुठलाही आवडता जॅम.
खमंग साजूक तूप.
ब्रेड स्लाईस.

जॅम आणि तूप एकत्र करून घ्या. तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठरवावे.
हे मिश्रण स्लाईसला लावून त्यावर दूसरा स्लाईस ठेवा आणि कडा काढून तिरपे कापा. मस्त मजेत खा.

ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे.

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 4:42 pm | विसोबा खेचर

परिक्षकांचं मत मला माहीत नाही परंतु पेठकराशेठनाही मी पयला नंबर देईन..:)

त्यांच्या सर्व पाकृ छानच आहेत...

ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे.

या मुद्द्याशी मी सहमत आहे...

आपला,
(स्वैपाकी) तात्या.

मनस्वी's picture

17 Sep 2008 - 5:03 pm | मनस्वी

आलं लसूण वाटून घ्यावे. (बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

:D

काका, तवा चिझ सँडवीच आणि जॅम अँड घी सँडवीच पाकृ आवडल्या!
अशी धिरडी पण अधेमधे करते मी.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

गणा मास्तर's picture

18 Sep 2008 - 6:08 am | गणा मास्तर

>>ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे.
स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद बघता सर्व पाककृती करणे शक्य होणार नाही, त्यामुळे पाककृती वाचुनच निर्णय देण्यात येईल.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2008 - 11:07 am | प्रभाकर पेठकर

निराशा झाली.

गणा मास्तर's picture

19 Sep 2008 - 11:20 am | गणा मास्तर

समजु शकतो .
पण स्पर्धा संपल्यावर इथल्या पाककृती निवांत करुन पाहीन
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

झानटामाटिक नुडल्स.

साहित्य.
१.मॅगि -२

मध्यम आकाराचे
२. १ कांदा
३. १ बटाटा
४. १ सिमला मिर्ची
५. १ टोमॅटो.

६. तेल,मीठ,मोहरी,जिरे, तिखट, हळद (चवी नुसार व एका फोडणी साठि)
७.आले लसुण पेस्ट
८. बटर (२ मोठे चमचे)
९ .टोमॅटो सॉस (चवीनुसार)

कृती :

भाग १.
एका जाड बुडाच्या पातेल्यात २.२५ ग्लास पाणि घालून उकळी फुटल्यावर त्यात मॅगी चे दोन तुकडे घाला
व शिजवून घ्या.३ मिनीटे झाल्यावर एका ग्लासात हे पाणि गाळणिने वेगळे काढून घ्या व शिजलेली मॅगि एक वेगळ्या ताटलीत काढून घ्या.

भाग २.
प्रथम सर्व भाज्या धुवुन व चिरुन घ्या. कांदा व टोमॅटो बारिक चिरावेत.
एका पॅन मध्ये २ च. तेल सोडा व त्यात मीठ,मोहरी,जिरे,तिखट्,हळद घालुन फोडणी करून घ्या.
त्यात बारिक चिरलेला कांदा २-३ मि. परतुन घ्या.
मग ह्यात आले लसुण पेस्ट घालावी व पुन्हा एकदा परतून घ्यावे.
त्यातच बारिक चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ येउ द्या.
बटाटा व सिमला मिर्ची घालून थोडे परतवा.
ग्लासातील पाण्यात मॅगी बरोबर आलेला नुडल्स मसाला (फक्त एकच पाकिट) घालून ते मिश्रण ह्या भा़जीत ओता.
पाणि गरजेनुसार कमी जास्त करावे.
व पॅनवर झाकण ठेवून बटाटा बर्‍यापैकी शिजे पर्यंत वाट पहावी.
मग त्यात ताटात काढलेली मॅगी घालून मिश्रण नीट मिक्स करून हे २ मिनीटे शिजवून घ्यावे.
शिजतानाच त्यात बटर व टोमॅटो सॉस घालावा.

जेमतेम पाणी शिल्लक राहिल असे पहावे.
हे सर्व झाल्यावर ह्या नुडल्स ताटलीत घेउन गिळाव्यात

ह्या नुडल्स एकदम झानटामाटीक लागतात. (झानटामाटिक = लै भारी ?)

अभिज्ञ.

यशोधरा's picture

17 Sep 2008 - 10:11 pm | यशोधरा

एकसे एक पाकृ आहेत!! मस्त!!

चिकन पकोडा
बोनलेस चिकन चे तुकडे करून घ्यावेत. साधारण दीड दोन इंच लांब.
१ कप बेसन, २ चमचे लाल मिरची पावडर (तिखट), पावचमचा हळद, असल्यास १ चमचा आले लसूण पेस्ट आणि १ चमचा गरम मसाला पावडर , चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून थोडे पाणी घालून भज्याच्या पिठासारखे पीठ बनवून घ्यावे. पीठ खूप पातळ ही नको आणि अतिघट्ट ही नको.
कढईत तेल गरम करावे. चिकनचे तुकडे पीठात बुडवून लालसर रंगावर तळावेत. टोमॅटो केचप बरोबर गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घ्यावा. अगदी झटपट होणारी पाककृती आणि तितकीच स्वादिष्ट.

(बोनलेस चिकन पाव ते अर्धा किलो घ्यावे. पीठ कमी पडल्यास लगेचच पटकन परत तयार करता येते. )

पनीर बुर्जी
२५० ग्रॅम पनीर चे अगदी बारिक तुकडे करून घ्यावे. १ छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. १ टोमॅटो बारिक चिरून घ्यावा.
पातेलीत २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात कांदा परतून घ्यावा. चविनुसार मीठ घाला. ( कांदा परतानाच मीठ घातले तर कांदा पटकन शिजला जातो कारण मीठाने कांद्याला पाणी सुटते आणि विस्तवामुळे पाण्याची वाफ होऊन कांद्यातील पाणी पटकन उडून जाते.). त्यात टोमॅटो घालून तो पण परतून घ्यावा. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर , चिमूट्भर हिंग घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करा. पनीर चे तुकडे घाला . चांगले हलवून घ्या. मंद गॅस वर अर्धा एक मिनिट ठेवा. मधून मधून हलवत रहा म्हणजे भांड्याला चिकटणार नाही.
गरम असतानाच ब्रेड बरोबर आस्वाद घ्या.

(अमेरिकेत असाल तर भारतीय दुकानात फ्रोजन सेक्शन मध्ये पनीर मिळेल.)

ईश्वरी

शिवा जमदाडे's picture

19 Sep 2008 - 3:43 pm | शिवा जमदाडे

चिकन पकोडा सकाळी ८ वाजता?
हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत....

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

ईश्वरी's picture

24 Sep 2008 - 8:07 am | ईश्वरी

>>चिकन पकोडा सकाळी ८ वाजता?
हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत....

खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको ) असे म्हटले आहे. नाष्टा जसा सकाळचा तसा संध्याकाळचा ही असू शकतो...थोडक्यात मधल्या वेळचे खाणे. स्नॅक्स म्हणा हवंतर. खाद्यपदार्थ 'सकाळच्याच' नाष्ट्यासाठीचा हवा असे म्हटलेले नाही.

ईश्वरी

अंतु बर्वा's picture

18 Sep 2008 - 4:59 am | अंतु बर्वा

लई भारी दोस्त लोक.... आम्हाला तर वाटल होत अमेरीकेतुन परत जाईपर्यंत काहि चांगल चुन्गल खायलाच मिलनार नाहि....
पण या सगल्या पाकक्रुति बघुन थोड बर वाट्तय....

स्नेहश्री's picture

18 Sep 2008 - 9:51 am | स्नेहश्री

टोस्ट पोटॅटो
ब्रेड ला बटर लावुन घेणे. व थोडे तव्यावर टोस्ट करुन घेणे
उकडलेला बटाटा सोलुन व किसुन घेणे. त्यात चवी नुसार तिखट्,मीठ आअमचुर व गरम मसाला पावडर ,बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे व ब्रेड ला लावुन घेणे. मग त्यावर चीझ किसुन घालणे व २ मि. Microwave करणे.
एकदम चटकमटक लागते हे...!!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

गणा मास्तर's picture

18 Sep 2008 - 9:55 am | गणा मास्तर

कोथिंबीर :H
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

स्नेहश्री's picture

18 Sep 2008 - 12:55 pm | स्नेहश्री

काय????
समजल नाही मला???? :B
घालु नका कोथिंबीर्....हा हा हा सोप्प आहे.....!!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

बेधुन्द मनाची लहर's picture

18 Sep 2008 - 2:11 pm | बेधुन्द मनाची लहर

साहित्य :-2 वाटी बारीक़ चिरलेले टमाटर

२ वाटी बेसन

१ चमच हिरवी मिर्ची, आले , लसून पेस्ट (दुकनातुन तयार घ्या)

२ चमच ओवा

मीठ चवीपुरते

हळद

कृति :

वरील सर्वे साहित्य एकत्र करा व भज्याच्या पीठ सारखे पीठ भिजवा .आता तव्यावर तेल घालून त्यावर चमच्याने पीठ सोडा व पसरून घ्या ,दोन्ही बाजूने खरपूस परतवून घ्या व गरम गरम आमलेट सौसे /लोणचे बरोबर सर्वे करा .
लागनारा वेळ - १५ मि.

पुनम....

बेधुन्द मनाची लहर's picture

18 Sep 2008 - 2:16 pm | बेधुन्द मनाची लहर

साहित्य:पालक (बारीक़ चिरलेला ) १ वाटी,कांदा (बारीक़ चिरलेला ) १
बेसन 2 वाटी,हिरवी मिर्ची २,मीठ,ओवा १ चामच
कृति:
पालक धुवून बारीक़ चिरून घ्या ,तयार बेसन ,बारीक़ चिरलेला कांदा,हिरवी मिर्ची,मीठ ,ओवा,मिक्स करा थोड़े पानी घालून भज्याचे पीठ भिजवा.
आता कढईमधे तेल तापवून त्यात लहान लहान भजी सोडा व दोनही बाजुनी छान खरपूस तळुन घ्या ।

शितल's picture

18 Sep 2008 - 6:39 pm | शितल

मस्त मस्त पाककृती येत आहेत.
:)

शिवा जमदाडे's picture

19 Sep 2008 - 3:45 pm | शिवा जमदाडे
  1. कालच्या पोळ्यांचा कुस्करा करा.
  2. पॅन मध्ये मस्त साजुक तुप टाका, आणि पोळ्यांचा कुस्करा टाकून परता.
  3. त्यात किसलेला गुळ टाकून एकत्र करा.
  4. झकास गोड गोड कुस्करा स्वतः खा आणि बच्चे कंपनी ला द्या.

टीपः तुप, कुस्करा आणि गुळ यातील कोण कोणाच्या नंतर टाकायचे, किती प्रमाणात टाकायचे हे काही आम्हाला माहीत नाही बुवा. ती माहिती आमच्या अन्नपुर्णेला विचारून सांगता येईल.....

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

गणा मास्तर's picture

21 Sep 2008 - 9:58 pm | गणा मास्तर

आवडली
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

साक्षी's picture

19 Sep 2008 - 11:44 pm | साक्षी

•रवा पाव वाटी
•आंबट ताक एक वाटी
•गाजर , ढब्बू मिरची प्रत्येकी एक, कोबीची चार पाच पाने
•एखादी मिरची बारीक चिरुन, थोडं आलं किसून, चवीपुरते मीठ
•पावाचे स्लाइस पाच सहा
•अमूल बटर / लोणी, चीज

रवा ताकात १५ मिनिटे भिजवून ठेवावा. सर्व भाज्या बारीक चिरून त्या भिजवलेल्या रव्यात एकत्र कराव्या. आलं, मिरची, मीठ घालून मिश्रण परत नीट एकत्र करून घ्यावे.

पावाच्या एका बाजूला अमूल बटर किंवा लोणी व दुसऱ्या बाजूला ह्या मिश्रणाचा जाड थर द्यावा. ५ मिनिटे स्लाइस तसेच ठेवून द्यावेत.

तवा मध्यम आचेवर ठेवावा. तवा तापल्यावर पावाची अमूल लावलेली बाजू आधी भाजून घ्यावी व नंतर दुसरी बाजू भाजून घ्यावी.

ताटलीत ठेवून वरून चीज किसून घालावे. गरम गरम वाढावे

रेवती's picture

20 Sep 2008 - 12:00 am | रेवती

ज्वारीच्या पाण्यात धूवून त्यात दही, मीठ, साखर व थोडं कैरीचं लोणचं घालावं. थोडावेळ भिजू द्यावं (दोन मिनिटं). घट्ट वाटल्यास थोडं दूध घाला.

रेवती

पाटलीणबाई's picture

20 Sep 2008 - 1:01 am | पाटलीणबाई

हिरवे मुग चमचाभर मीठ टाकुन कुकर मधे शिजवुन घ्यावेत. साधरण ३-४ शिट्या पुरेश्या होतात.
मुग एका मोठ्या वटित काढुन त्यात दही, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमाटे, गरजे पुरते लाल तिखट टाकुन एकत्र करावे व वरुन शेव टाकावी.
गरम-गरम मुग चाट तयार.

परीसा's picture

23 Sep 2008 - 5:33 pm | परीसा

साहित्य :
चांगल्या प्रकारच्या ब्रेडचे तुकडे (स्लाइसेस), लाल टोमॅटो, बटर, चिझ, मिरी पावडर, मीठ.

कृती :
१. टोमाटोच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात
२.ब्रेडचे कडा काढुन टाकावित.
३. चीझचे बारीक पातळ पिस करावेत किंवा किसुन घ्यावा.
४. ब्रेडला बटर लावावे. त्यावर मिरी पावडर टाकावी. मिठ टाकावे.
५. टोमाटोचे स्लाईस त्यावर ठेवावे. त्यावर चिझ चा किस टाकावा.
६. वरुन परत थोडी मिरी पावडर भुरभुरावी.
७. वरती दुसरा ब्रेड स्लाईस बटर लावुन त्यावर ठेवावा.
टोमॅटो चिझ सँडविच तयार. टोमॅटो सॉस बरोबर नाही खाल्लेत तरी चालेल. असेही छान लागते.

परीसा

गणा मास्तर's picture

23 Sep 2008 - 8:14 pm | गणा मास्तर

सदर पाककृती धनंजयच्या ओपन फेस टोस्टेड सँडविच (किंवा क्लोज फेस पानीनि)सारखीच आहे. सबब एकच पाककृती दोन स्पर्धकांकडुन स्वीकारता येत नसल्यामेळे आपली प्रवेशिका बाद करण्यात येत आहे. :H
स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. नवीन पाककृती पाठवल्यास नक्की विचार करण्यात येईल.
*सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

बिन्धास्त बबनी's picture

24 Sep 2008 - 11:59 am | बिन्धास्त बबनी

नाचणीचे पीठ २चमचे घेऊन त्यात २ वाट्या पाणी घालून शिजवावे. नंतर त्यात २चमचे दही,चिमूटभर मीठ,थोडे जिरे टाकावे.साधारण १ बाऊल भरून मिश्रण होईल.हा अत्यंत पौष्टिक नाश्ता लहानापासून थोरापर्यंत उपयोगी आहे.'रागी पावडर'म्हणून सर्व देशांत,सर्व मॉल्समध्ये मिळ्ते तेच आपली नाचणी पीठ.दररोज घेतल्यास कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही.