काय भारी होतं ना बालपण

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
20 Mar 2016 - 9:26 pm

काय भारी होतं ना बालपण

काही मिळत नसेल तर रडायचं
पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं
आपली बालिश बुद्धी आईला कळायची
आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची

आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही
आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही
आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते
पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ?

कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण
आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण

नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा
मिळालं कि एकदम , उर भरायचा
खेळत खेळत कधी , मधेच पडायचं
तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं

आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती
परत न मिळायला , ती थोडी खरी होती ?
मोठं झाल्यावर आता , मन तुटतं सारखं
जीवा भावाचं कोणी , क्षणात होतं परकं

विचारलं कोणी , तरी हेच म्हणतं मनपण
मोठं होण्यापेक्षा , काय भारी होतं ना बालपण

झोप मिळत होती , आईच्या त्या कुशीत
हसू दडलं होतं , बाबांच्या त्या मिशीत
साऱ्यांचे ते लाड , अगदी दररोज होत होते
सगळ्यांसोबत कसे , माझे जिव्हाळ्याचे नाते

आता तेच सारं , हरवल्यासारखं दिसतं
मोठं ते जग , अगदी खोटं नाटं भासतं
जिव्हाळ्याचे शब्द , गायबच झालेत
प्रेम करणारे सारे , कुठे दडून गेलेत ?

दिवस नवा आला , कि विसरतो मी कालपण
आठवतो मी मग , काय भारी होतं ना बालपण

मती होती लहान , तरी शिकत होतो सारं
रमत होतो जिथे , ते जगच होतं न्यारं
कट्टी बट्टी करत , जपत होतो नाती
निरागस भावाने , कधी खात होतो माती

माती खाणं आता , महागात फार जातं
मी पणा मध्ये , हरवून जातं नातं
नातं जपायला , आता कट्टी बट्टी नाही
कुठेतरी रमायला , इथे कधीच सुट्टी नाही

कसे होतो तेव्हा , आता कसे झालो आपण
आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण

- अभिषेक पांचाळ

कविता

प्रतिक्रिया

पियुशा's picture

21 Mar 2016 - 4:24 pm | पियुशा

मस्त !!