फुले अशी उमलत असताना
मधुरसाच्या अपेक्षेने
जवळच होते भुंगे दबा धरून...
थेंब दवाचे झेलत अंगावर
चुरचुरणा-या थंडीत
आम्हीही होतो पलिकडेच डबा धरून
रेल्वे अशी धावत असताना
खिडकीच्या अपेक्षेने
जो तो धक्का देत आपापली जागा धरून...
आघात त्यांचे झेलत अंगावर
गुदमरणा-या गर्दीत
आम्ही होतो लोंबकळत डबा धरून
देश असा प्रगती करीत असताना
देणग्यांच्या अपेक्षेने
तिजो-या भरताहेत सर्वांच्या भरभरून...
उपहास नि उपेक्षा झेलत अंगावर
सत्कार्याच्या अपेक्षेने
अजुनही आम्ही आहोत डबा धरून
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 3:01 pm | अरुण मनोहर
दाद देण्याच्या भावनेने
आम्हीही आलो आहोत निबा पकडून
(निब.. निफ... इतीहासजमा झालेले लेखनयंत्र.)