न मागताही तो सर्वांना भरभरुन देतो,
मिळवल्याचे श्रेय मात्र मी स्वतःकडे घेतो!
तहानलेल्या धरतीला पहिला पाऊस सुखावतो,
पण त्याआधी नभांना गारवा कोण देतो,
अथांग त्याची कृपा, प्रत्येकाला आपला वाटा ठरवून देतो,
जसे समुद्र स्वतःतले बाष्प, नभांसाठी आधीच राखून ठेवतो.