इंग्रजीचा अभ्यास करा
पण मराठी कडे दुर्लक्ष नको.
उगीचच कोस्मोपोलिटन बनून
प्रादेशिक भाषा हिन्दी आणि इंग्रजीचा वापर मराठी समुहात बोलताना नको.
साध्या साध्या शब्दांसाठी इंग्रजीची लाचारी नको.
खूपच संस्कृतोद्भव शब्द मराठीत आणण्याचा अट्टाहास नको
मराठी पत्रकावर करू मराठीतूनच सही
द्या बघू ही महाराष्ट्राला ग्वाही !
महाराष्ट्रात बोला घरी मराठी , बाहेर मराठी
आपल्या मुंबईत तर बोला सगळीकडे फक्त मराठी , मराठी आणि मराठी !
समोरचा माणूस मराठी नसल्यास घ्या की हिंदी किंवा इंग्रजीच्या आधाराची काठी !
वापरु नका विनाकारण रोमन लिपी मराठीतून लिहिण्यासाठी.
तंत्रज्ञान आहे की देवनागरीतुन लिहिण्यासाठी.
मराठीचा भरपूर वापरच जरुरी आहे टिकवण्यासाठी मराठी
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या तमाम मराठी जनतेला असंख्य शुभेच्छा !
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 2:27 pm | निशांत_खाडे
पटले..
25 Feb 2016 - 3:47 pm | कंजूस
तेच करतो.