(अशी कबुतरे येती)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
18 Feb 2016 - 9:53 pm

अशी कबुतरे येती;
आणिक घाण ठेवुनी जाती
दोन घरांची पुण्यकमाई
दहा घरांच्या खाती

कपोत आला, पहिला वहिला
खिड़कीमागे उभा राहिला
तया मागे, येई साजणी
गूटर्गूच्या साथी...

दुरून येती थवे देखिले
मी ग्याल्रीचे दार लोटिले
धड़क मारती तरी निरंतर
गंधित झाल्या भिंती

पंख दोन ते हळु फ़डफ़डले
खोलीभर मायेने फिरले
हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि
लागेना मज हाती

'पुण्यवान' तो येता गाठी
शिव्या पाच मोहरल्या ओठी
त्या तुटल्या दातांची गाथा
क्रूर कबुतरे गाती

-- स्वामी कपोतगावकर

करुणजीवनमान

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2016 - 9:59 pm | टवाळ कार्टा

लोलवा

एस's picture

18 Feb 2016 - 10:40 pm | एस

हाहाहा!! बाडिस!

पैसा's picture

18 Feb 2016 - 11:06 pm | पैसा

=)) आमच्या रत्नागिरीच्या घराच्या दोन खिडक्या म्हणजे कबुतरांचे संडास झालेत. गेले की दर वेळी त्यांना आणि त्यांना खायला दाणे घालणार्‍यांना शिव्या देत साफ करते. खिडक्या एरवी बंद असतात म्हणून आत येऊन घाण करत नाहीत इतकेच.

कबुतरे राहतात तिथून चिमण्या नाहीशा होतात असे मधे कुठेतरी वाचले त्यानंतर कबुतरांचा जास्तच तिरस्कार वाटायला लागला.

टिवटिव's picture

18 Feb 2016 - 11:58 pm | टिवटिव

लोल...

प्रीत-मोहर's picture

19 Feb 2016 - 12:00 am | प्रीत-मोहर

अतिशय घाणेरडी असतात कबुतरे

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2016 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))