तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे.
२)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार.
३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व .
४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व.
५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी.
७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे.
८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले.
९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव.
१०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व.
सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
प्रतिक्रिया
20 Feb 2016 - 10:59 am | श्रीरंग_जोशी
चलू दे तुमचे निरर्थक अत्मकुजन. =))
20 Feb 2016 - 11:01 am | नाखु
तुमचा भ्रम आहे हे ही चिटकवा त्यात..
20 Feb 2016 - 11:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते चालु ते तुमचं निरर्थक अत्मकुंथन असं आहे रंगाण्णा.
असो. चालु द्या तुमचं निरर्थक भ्रमयुक्तअत्मकुंथन रंगाण्णा.
20 Feb 2016 - 11:23 am | प्रचेतस
रंगाण्णांनी कुंथन असा असांसदीय शब्द वापरण्याऐवजी कुजन असा सांसदीय शब्द वापरला.
20 Feb 2016 - 11:27 am | नाखु
नक्की सांसदीय शब्द आहे का ? असल्यास पुरावा द्या.
इथे प्रेमीकांना कुजन करण्यास मनाई आहे असा फलक वाचला नसावा तुम्ही कुठल्याही लेण्यात !!
20 Feb 2016 - 11:28 am | यशोधरा
कुजनाचे डीग्रेडेशन केले म्हणा की =))
19 Feb 2016 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी
धाग्याची संकल्पना खूपच आवडली. प्रतिसादांनी चार चंद्र लावले आहेत.
पण शीर्षकात मिपकर असा उल्लेख आहे मिपाकर नाही ;-) .
20 Feb 2016 - 3:17 pm | होबासराव
हि लिहिलेलि मालिका आज हि मिपावर आपला हिना आणि कस्तुरि चा सुगंध पसरवत आहे.
20 Feb 2016 - 4:16 pm | अभ्या..
होबासराव
आता बासराव.
बुवा आपल्याला पत्ते शोधून हाणतील. ;)
20 Feb 2016 - 4:29 pm | गवि
बुवांना पत्त्यांचाही नाद आहे असं म्हणताय?
20 Feb 2016 - 4:35 pm | अभ्या..
छे छे , तसले काही नाही,
उगी आपले चार दोस्त भेटले तर.........
.
.
बाकी लडका हिरा है हिरा
(अभ्याबच्चन, ठाकूरकी हवेलीके सामने वाली कोठीका ऑर्गन बजाने के लिये बनाया पोर्च, मु. पो. रामगढ.)
20 Feb 2016 - 4:38 pm | अभ्या..
मिपाकर.............................
व्हाटस योर प्रोफेशन?????
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
20 Feb 2016 - 4:50 pm | प्रचेतस
आहूऊऊऊऊऊऊऊऊ वरून आठवले, बुवाही ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ करत असतात.
20 Feb 2016 - 4:53 pm | अभ्या..
देशी ३००.
20 Feb 2016 - 5:07 pm | चेक आणि मेट
अरे व्वा
तुमचा फोटो का???
21 Feb 2016 - 10:32 pm | सतिश गावडे
तलवारीच्या पातीला अजिबात धार नाय काय? जल्ला नाय तं श्टाईल मारताना बुवांचा हात कापून रगात आला आस्ता.
22 Feb 2016 - 5:24 pm | होबासराव
स्वारि बुवा...तुम्हाला तरवारबाजि चे सुद्धा ज्ञान आहे हे विसरलो होतो ;)
21 Feb 2016 - 11:38 am | माहितगार
आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.)
* दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून)
* चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही.
* आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :)
आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.
20 Feb 2016 - 5:11 pm | तुषार काळभोर
ही व्यक्ती मध्यम बांधा, मध्यम उंची (५.६ - ५.१०) , गव्हाळ वर्ण, टीशर्ट-जीन्स
20 Feb 2016 - 5:12 pm | तुषार काळभोर
जव्हेरभौ, हघ्या हो.
20 Feb 2016 - 5:37 pm | एस
बादवे, किती मिपापुरुष हे दाढीधारी असावेत?
21 Feb 2016 - 10:29 pm | सूड
मी आहे!! =))
21 Feb 2016 - 11:54 pm | आदूबाळ
मी पण!
21 Feb 2016 - 11:58 pm | अभ्या..
हमका भूल गये का? अभी २० दिनकी है.
22 Feb 2016 - 10:23 am | तुषार काळभोर
किती पुरुष मिपाकर परमनंट दाढीधारी/सध्या दाढीधारी/परमनंट मिशीधारी/सध्या मिशीधारी/खुंटधारी इ आहेत?
22 Feb 2016 - 2:12 pm | सूड
आम्ही कायम खुंटधारीच असतो, आताशा फिलिप्सचा ग्रूमिंग कीट नीट वापरता येऊ लागल्याने दाढीचे वेगवेगळे प्रयोग करत असतो.
22 Feb 2016 - 2:13 pm | सूड
दाढीधारी पुर्षांचा विदा गोळा करण्यामागचे कारण कळले नाही.
22 Feb 2016 - 2:16 pm | नाखु
गेलाबाजार वर्षाभरातील घेतलेल्या विदा/कौलाचा पुढे काय "उजेड्/दिवा-बत्ती" पडला ते कळलं नाहीच त्यात आणखी एक भर !!
22 Feb 2016 - 2:19 pm | पैसा
मग कोणाचा करणार? दाढीधारी बायका काय मी तरी पाह्यल्या नाहीत! माईसाहेब असल्या तर नकळे!
22 Feb 2016 - 5:54 pm | सूड
दाढीशिवायच्या बायका-पुर्षांचा पण विचारु शकतात की!! गरीब बिचार्या दाढीधार्यांनी काय घोडं मारलंय? =))
22 Feb 2016 - 12:12 pm | बॅटमॅन
मी दाढीधारी आणि दाढीप्रेमी आहे! निव्वळ दाढी पाहून म्लेच्छ ठरवणारे लोक्स आसपास असले तरी दाढी आपल्याला प्रिय आहे. स्वयमेव महाराज, रामदास आणि गुरू नानक वगैरे लोकांनी केलेली स्टाईल ज्यांना हिंदू फ्रेंडली वगैरे वाटत नाही त्यांचेबद्दल अता काय बोलावे ब्रे.
21 Feb 2016 - 10:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
धाग्याचे ३०० झाल्याबद्दल प्रमोद देर्देकरांना समस्तं मिपाकरांचा गृप फोटो देउन सत्कार करण्यात येत आहे. ह्या व्यतिरिक्त्त मिपाचे सेलेब्रिटी मोगाखान, नानामाई, हितेश ह्यांची शेप्रेट ऑईल पोस्टर्स देण्यात येत आहेत.
-अखिल मिपा मापंकाढेसमिती जेपीसंचालित चिमणहटेला पुस्करुत-
22 Feb 2016 - 1:06 pm | अबोली२१५
आमच्या बद्दल काहीच नाही बुआ :{
-एक शांत मिपाकर
22 Feb 2016 - 6:01 pm | ए ए वाघमारे
आप्ली ओळख आपणच करून देत असतो बॉ!
तर आमच्याबद्द्ल सांगायचं तर...जब मिलोगे तो खुद जान जाओगे!:) बाकी स्वस्तुती करणं आम्हाला आवडत नाही.
-एक सायलेंट ऑब्झर्वर
16 Jun 2016 - 12:12 pm | मिनेश
20 Jun 2016 - 5:50 pm | अजय देशपांडे
अतिशय छान व्यक्तिमत्व ..... अभ्यासू योग्य सव्वाद साधणारा
माझी आणि त्यांची भेट होता होता राहिली
बोलणे झाले ते फोनवरच
25 Jan 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा
मुवि साहेब, तुम्ही म्हणता तसेच आहेत. पाच मिनिटांत आपलेसे करुन टाकतात. पाच वर्षांपुर्वी प्राधिकरण कट्टा इथे त्यांना भेटलो होतो.
कट्ट्याला उपस्थित राहून केलेली धमाल या संबंधी आमची कमेंट इथे वाचा
नंतर फारसे कट्टे झाल्याचं आठवत नाही
25 Jan 2021 - 5:58 pm | कपिलमुनी
व्हाट्सएप आल्यावर सार्वजनिक कट्टे कमी होऊन खासगी गुप्त कट्टे वाढले आहेत
29 Jan 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा
खरंय !
२०१५-१६ फेसबुक, व्हॉटसप्पने सर्वदुर पोहचत क्रान्ती केली अन आंजा वरील कट्ट्यांची संख्या रोडवत गेली !
25 Jan 2021 - 7:43 pm | बाप्पू
माझे काही अंदाज.
मुवि.. अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व.
माझी आणि त्यांची ओळख फार थोडी आहे. प्रत्यक्ष भेट नाही झाली पण फोन वर गपा झालेत. पण अत्यंत मनमोकळे मदत करणारे. शेतीतील बरीचशी माहिती आवड आणि अनुभवी आहेत.
दिलीप बिरुटे - 50 च्या आसपास. सडपातळ आणि चौकनी फ्रेम असणारा चष्मा. कडक आणि शिस्तबद्ध आणि आपलेच खरे म्हणणारे प्राध्यापक. विद्यार्थी यांना टरकून असणार.
सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि किंचित उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी.
थोडेसे पोट पुढे आलेलं. पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा. बोलायला लागल्यावर थांबवणे अवघड ( डिबेट च्या बाबतीत ).. पण सहसा शांत दिसणारे. लोकं पाहिल्यावर शांत म्हणतात पण जवळच्या लोकांना माहिती की अंगात किती किडे आहेत.. क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात.
कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर..
कुमार 1 =
35-40 च्या आसपास वय. एकदम शहरी आणि सॉफ्ट स्पिकिंग. घरी पुस्तकांचा ढीग असावा. क्लासिकल गाणी, आणि शास्त्रीय संगीत ऐकणारे. हॉस्पिटल मध्ये ही केबीन मध्ये कदाचित मंद आवाजात गाणी सुरु ठेवणारे. प्रत्येक गोष्टीची माहिती शोधून काढून मगच बोलणार. कुठेही अंदाज किंवा गृहीतक मांडणार नाहीत. कदाचित बऱ्यचश्या पेशंट नी डॉक्टर खूप टेस्ट करायला लावतात असा गैरसमज करून घेतला असणार..
सहना =
40-45 वय.. पण एकदम फिट. अत्यंत हट्टी आणि आपल्या मुद्दा लावून धरणाऱ्या. यांची चंद्र रास सिंह असावी असा एक अंदाज. घरीही सर्वांवर लक्ष ठेवून जिथे कोणी चूक किंवा मनाविरुद्ध वागले तर तिथल्या तिथे बोलून दाखवणाऱ्यां. कुठलीही वस्तु फुकट कोणाला न देणाऱ्या..
मोगा / काळी मांजर / आणि त्यांचे इतर बरेच उडवलेले ID -
झब्बा टाईप पायजमा घातलेला व्यक्ती. अंदाजे 40
चेहऱ्यावर हनुवटी खाली अमिताभ बच्चन स्टाईल दाढी. मिश्या बारीक ट्रिम केलेल्या. वाचनाची आवड. किंचित मजेशीर किंवा मित्रांसोबत चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती. हसत खेळत निवांत राहणारा आणि उद्याची जास्त चिंता न करणारा.
दुर्गविहारी =
30-35 वय. तब्येत जेमतेम पण चपळ. नेहमी फिरतीवर असणारा.. सायकलिंग आणि बाईक रायडींग आवडणारा व्यक्ती. कायम थ्री फोर्थ आणि T शर्ट
. घरच्यांनी पोरग वाया गेलं असं म्हणून टेंशन घेणं सोडून दिलेले असावे. मुलींच्यामध्ये इंटरेस्ट नाही ( वेगळा अर्थ काढू नका !!! ) आणि मुलीसुद्धा भाव देत नसाव्यात. कॅट eye फ्रेम चष्मा आणि वाचनाची जबरदस्त आवड.
अजुन बऱ्याच ID बद्दल मनात एक विशिष्ट इमेज आहे. नंतर कधीतरी लिहीन.
26 Jan 2021 - 12:38 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी ओ बाप्पू !
28 Jan 2021 - 8:06 pm | सुबोध खरे
सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि किंचित उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी.
थोडेसे पोट पुढे आलेलं. पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा. बोलायला लागल्यावर थांबवणे अवघड ( डिबेट च्या बाबतीत ).. पण सहसा शांत दिसणारे. लोकं पाहिल्यावर शांत म्हणतात पण जवळच्या लोकांना माहिती की अंगात किती किडे आहेत.. क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात.
कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर..
वय ५५ - बरोबर
उंची ५' १०"
भारदस्त -- नाही. ( १९९२ सालच्या लग्नाचा सूट अजूनही फिट येतो )
पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा.-- केस विरळ झाले आहेत पण अजून काळे आहेत. चष्मा (फक्त वाचायचा) आहे (जवळचा --१०० रुपयात मिळणारा)
बाकी इतरांनी सांगावं. मी काय सांगणार?
28 Jan 2021 - 8:12 pm | सौंदाळा
क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात.
सहमत, कोणत्याही कट्ट्याचे फोटो काढून बघा
हजरजबाबीपणा साठी डॉक्टरांचे प्रतिसाद बघा
कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर..
हे मात्र स्वतः डॉक्टरच सांगू शकतील, डॉक एक लेख होऊन जाऊ दे यावर
26 Jan 2021 - 7:55 am | कुमार१
बाप्पू,
तुमच्या वरील 'अंदाज'पत्रकात माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद !
मात्र दोन गोष्टी वगळता तुमचे बाकी अंदाज चुकलेले आहेत हे नमूद करतो .
बाकी तुमच्या लेखनाने खरोखरीच तरुण झालो बुवा 😀 😀 😀
त्याबद्दल धन्यवाद
26 Jan 2021 - 9:31 am | कुमार१
पोच म्हणून बाप्पू यांच्याबद्दल लिहितो.
वय तीस ते पस्तीस. तडफदार व्यक्तिमत्व - नावाप्रमाणेच लढ बाप्पू !
नोकरीत असल्यास तिथल्या संघटनेचे पुढारी असावेत. यासंबंधीच्या कायदेकानूनची बारीक-सारीक माहिती असावी.
फारसे कोणाचे काही ऐकून घेत नसावेत.
तत्वनिष्ठ.
आत्ता जरी नोकरीत असले तरी कधीतरी तिचा त्याग करून व्यवसायात प्रवेश करायची खुमखुमी असावी........
26 Jan 2021 - 10:13 pm | बाप्पू
@कुमार 1 सर..
खूप क्लोज गेस..
पण मी संघटनेचा पुढारी वगैरे नाही.. माझ्या टीम चा पुढारी मात्र आहे.
26 Jan 2021 - 11:38 am | शशिकांत ओक
मित्रांनो,
मी हा असा...
पासपोर्टवरील फोटोत जितका भुक्कड दिसतो तितका नाही.
आणि रेमंड्सच्या जाहिरातीत दिसतात इतका रुबाबदारही नाही!
26 Jan 2021 - 1:02 pm | सतिश गावडे
काका, तुमची प्रकाशचित्रे साठवणी केंद्रास आवडली नाहीत बहुतेक :)
26 Jan 2021 - 10:22 pm | बाप्पू
O m g.
शशिकांत ओक..
खरं सांगायचं तर ते तुमची अफजलखान आणि प्रतापगडची लेखमाला आणि इतर बरेच डिफेन्स संबंधित लेख वाचून तुम्ही एकदम कुडमुडे, पिळदार मिशीवाले आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेले शास्त्रज्ञ टाईप व्यक्ती असताल असे वाटले होते.
पण तुम्ही भलतेच स्मार्ट निघालात राव.. दुसरा फोटो जबरदस्त.
पाहिला फोटो पोलिस स्टेशन मधल्या रेकॉर्ड वरचा असल्यासारखा वाटतो. हाहाहा.
28 Jan 2021 - 11:46 am | शशिकांत ओक
पासपोर्टवरचा भामटा प्रत्यक्षात असा असू शकणार नाही म्हणून म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही!
अपेक्षाभंगाचे सूख काही विरळाच असते!
माझ्याकडे पाहून ते आपल्याला मिळाले असेल तर मलाही आवडेल.
26 Jan 2021 - 1:44 pm | शशिकांत ओक
काम झाले म्हणून...
तुला आवडतील कि नाही माहित नाही!
पण पुन्हा लोड करून पाहतो.
26 Jan 2021 - 6:09 pm | शशिकांत ओक
काम झाले म्हणून...
तुला आवडतील कि नाही माहित नाही
रुबाबदार
भुक्कड
26 Jan 2021 - 11:35 pm | भंकस बाबा
डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे , पण थोडेसे सडपातळ!
राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर सारखेच दिसत असणार
मुक्तविहारी: ओमप्रकाशसारखे
प्रा बिरुटे : थोडेसे जीवनसारखे पण धष्टपुष्ट
27 Jan 2021 - 11:36 pm | चौथा कोनाडा
😂
28 Jan 2021 - 12:01 pm | Rajesh188
तेव्हा प्रकाश आंबेडकर सारखा दिसू शकेल मी.
उंची थोडी कमी करावी लागेल,केसांची विराळता वाढवावी लागेल.
डोळे थोडे बिघडवून चष्मा घातल्या शिवाय दिसणार च नाही असा बदल करावा लागेल.
रंग थोडा बदलावा लागेल.
खूप मेहनत घ्यावी लागेल.
28 Jan 2021 - 5:08 pm | चौथा कोनाडा
हा ... हा.... हा .....
28 Jan 2021 - 11:55 pm | भंकस बाबा
बाकी जाऊद्या, पण आततायीपणाच्या बाबतीत तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या वरचढ असाल!
हलकेच घ्या
28 Jan 2021 - 8:09 pm | सुबोध खरे
डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे , पण थोडेसे सडपातळ!
थोडेसे नव्हे बऱ्यापैकी सडपातळ
उंची ५' १०" वजन ७० किलो
अजूनही ६व्या मजल्यावर धावत चढतो
29 Jan 2021 - 10:54 am | शशिकांत ओक
शब्द चित्र सांगण्यापेक्षा फोटो सादर केलेत तर पाहून मजले चढता हे नक्की होईल!
29 Jan 2021 - 6:17 pm | Rajesh188
फिट तर असणारच.पण सहा माळे धावत का चढता.
तुम्हाला अशी कोणती घाई असते.
31 Jan 2021 - 3:03 pm | शशिकांत ओक
बाकी हे मात्र खरे ...
1 Feb 2021 - 4:28 pm | चौथा कोनाडा
तुम्हाला सुबोध खरे साहेब खालील धाग्यावर बघायला मिळतील :
चौदहवी कि रात