तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे.
२)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार.
३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व .
४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व.
५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी.
७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे.
८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले.
९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव.
१०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व.
सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 5:23 pm | अभ्या..
चालेल चालेल. फक्त स्थळ आणू नका लगेच, आपला डाव फिक्स है. :)
17 Feb 2016 - 5:25 pm | प्रचेतस
म्हणजे तुला णाखुन अंकल लगेच स्थळ आणतेत का असे म्हणायचे आहे काय?
17 Feb 2016 - 5:37 pm | अभ्या..
मग नाहीतर काय. त्यांची जलयुक्त शिवाराची योजना चालूच असते. कुठे दुष्काळ, कुठे बांध याचे अडाखे चुकत नाहीत त्यांचे कधी. खरं जग अनुभवलेला मानूस त्यो.
नमस्कार करतो हं नाखुकाका. ;)
17 Feb 2016 - 8:34 pm | बोका-ए-आझम
आँ! कोणती व्हॅलेंटिना भेटली भौ?
17 Feb 2016 - 5:25 pm | कपिलमुनी
सोलापुराचा अजय देवगण =))
17 Feb 2016 - 5:39 pm | अभ्या..
ध्नयवाद कम्म्या.
तू बी जरा फॅट कमी केला तर बुलेट शोभेल राव तुला. सध्या हार्लेडेव्हिडसन गेलाबाजार ट्रायम्फ घ्यावीस ही नम्र विनंती.
.
.
ए क्सलं भारी नं. तू मला अजून भारी म्हण मीपण अजून काय काय सांगीन हं.
.
18 Feb 2016 - 9:13 am | रेवती
नका हो बिचारीला आयटीत ढकलू..............
18 Feb 2016 - 12:17 pm | बबन ताम्बे
"सेम अॅज खेडूत" लिहीलेत मग वय का २० ने वजा केले? ते नसते तर तुमचा अंदाज माझ्याबाबतीत अगदी अचूक आला असता. नुसते "सेम अॅज खेडूत" लिहीले असते तरी चालले असते. फक्त मिशी बारीक नाहीय. टिळक्/आगरकर छाप आहे :-)
18 Feb 2016 - 1:59 pm | तुषार काळभोर
..
18 Feb 2016 - 2:19 pm | खेडूत
नै ओ पैलवान..पन्नाशीला लै टाईम्ब हाय अजून.
आन त्यो चष्मा बी नाय लागला.
18 Feb 2016 - 2:39 pm | बबन ताम्बे
खेडूत (वय ३०) - चष्मा सोडून बाकी सेम अॅज बबन तांबे ?
17 Feb 2016 - 3:44 pm | मीता
हसून पुरेवाट झाली ..
17 Feb 2016 - 3:51 pm | सनईचौघडा
अजुन थोडे आठवलेले लोक्स
गणपा:- वय ४० च्या आसपास. चेहर्यावर नेहमी त्रासिक भाव मलाच का बरे फोटु दिसत नाहीत म्हणुन.
पेहराव चाळीतले लोक घालतात तसा नाडीवाला लाईनीचा लेंगा आणि वर पांढरा सदरा , डोक्यावर बावर्ची टोपी.
मिसळलेला काव्य प्रेमी:- ३० ते ३२ वय बारिक चौकड्यांचा शर्ट , हातात पेन आणि कागदाचा तुकडा, खूंट वाढलेली दाढी, चेहर्यावर कधी शांत तर कधी रोमँटीक भाव .
पालखीचा खंडोबा:- हातात पेन आणि कागदाचा तुकडा , वय ४० च्या आसपास चेहर्यावर नेहमी उदास किंवा दु:खद भाव.
पियुशा:- अल्लड अवखळ २५ ची तरुणी. गहु वर्णी, स्मार्ट , जिन्स टी शर्ट पेहरावातली.
चिगो:- जबाबदारीची जाणीव असलेला माणुस , मध्यम बांधा, व्यवस्थित कडक इस्त्रीतले कपडे, वय साधारण ३५ च्या पुढे.
17 Feb 2016 - 3:56 pm | पिलीयन रायडर
अरे तो गणेशा.. गणपा नाही
17 Feb 2016 - 3:57 pm | खेडूत
ते गणेशा.
गणपा यकदम वेगळे हैत.
17 Feb 2016 - 4:29 pm | चिगो
चारातले तीन अंदाज चुकलेयत.. इस्त्रीतल्या कापडांबद्दल थोडंफार सहमत व्हावंं लागतंय, कारण की ऑफीसात भोकांचा टी-शर्ट घालून जाता येत नाही.. ;-)
असो.. धागा जबरा आहे तुमचा..
17 Feb 2016 - 3:55 pm | पियुशा
हे शाबास ! कुनाच काही का असेना माझ एकदम फर्फेच्त आहे ;) ;) ;)
17 Feb 2016 - 3:57 pm | स्पा
मिपावरचा सर्वात जुना आणि पोप्युलर डू आयडी
17 Feb 2016 - 4:05 pm | पियुशा
हो का रे माजोर्या मार्जार प्रेमी हिरवट डोल्याच्या स्पावड्या :प
17 Feb 2016 - 5:45 pm | अभ्या..
अरे आपन बायांचे नाव घेतलेल्या डूआयडीलाच पिवडी म्हणतो ते सांगू नकोस इतक्यात. ;)
17 Feb 2016 - 3:59 pm | कविता१९७८
पिवडे तु पाॅप्युलर हायस व्हय????
17 Feb 2016 - 4:05 pm | रमेश भिडे
काही मिपाकरांच्या ओळखी करुन दिल्याबद्दल सनईचौघडे वाजवून आभार मानावेसे वाटत आहेत.
-काही खरे काही खडे
आम्ही सगळेच रमेश भिडे
17 Feb 2016 - 5:43 pm | अस्वस्थामा
:D .. :D .. :D
17 Feb 2016 - 4:07 pm | इशा१२३
अह पोप्युलर डु आयडि म्हण :)
17 Feb 2016 - 4:08 pm | कविता१९७८
९७
17 Feb 2016 - 4:09 pm | कविता१९७८
98
17 Feb 2016 - 4:11 pm | कविता१९७८
१००
17 Feb 2016 - 4:12 pm | पियुशा
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर ;)
17 Feb 2016 - 4:12 pm | पियुशा
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर ;)
17 Feb 2016 - 4:16 pm | इशा१२३
झाले का शतक ? सत्कार करायला स्रुजाताइच हव्यात. बोलवा कुणीतरी....
17 Feb 2016 - 4:21 pm | विशाखा राऊत
कोणातरी जेष्ठ मिपाकरांना बोलवा बर सत्काराला. ;)
17 Feb 2016 - 4:23 pm | सनईचौघडा
तीन तासात शंभर झाले त्या बद्दल मिपाकरणींचे आभार. सर्व मिपाकरणीना पिरातै तर्फे पुढिल अनाहिता कट्यात एक एक आईस्क्रीम.
वेन्जॉय.
17 Feb 2016 - 5:33 pm | बोका-ए-आझम
मिपाचे बखरकार हेमंतभौ लाटकर यांनी निर्माण केलेला युगप्रवर्तक शब्द आहे तो. त्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना थँक्स अ लाट म्हणतो! ;)
17 Feb 2016 - 5:35 pm | होबासराव
:))
17 Feb 2016 - 4:24 pm | नाखु
शतका निमित्त
धागाकर्ता आणि हातभार सदस्याचाही पाचव्या कोनाड्यात अंकशास्त्रावरून भविष्य (तुमचा भाग्यांक काय सांगतो) ही पुस्तीका,एक हेल्मेट आणि बुवांकडून अत्मशांती साठी दणदणीत ३३% टक्के सवलतीचे कूपन देऊन करण्यात येत आहे.
हंगामी सचीव
जेपी संचालीत लगोलग सत्कार समिती.
अखिल मिपा सत्कार महा(न्)मंडळ अंकीत.
17 Feb 2016 - 4:26 pm | कपिलमुनी
यादीत माईसाहेब नाहीत !
अरेरे !
17 Feb 2016 - 4:55 pm | आदूबाळ
माईसाहेबः नऊवारी लुगडं, पण एका पायातून हळूच जीन्स डोकावते आहे. ;)
17 Feb 2016 - 5:39 pm | पैसा
तोंडावर झाकलेल्या पदराआडून मिशी डोकावतेय. ते विसरलास काय रे!
17 Feb 2016 - 5:45 pm | सूड
तोंड झाकलेलं कधी असतं म्हणे? मिशी अगदी उघडपणे कळत असते. आता काय काय समानतावादी बायकांना असते थोडीशी मिशी म्हणून लोक दुर्लक्ष करतात इतकंच!! =))
17 Feb 2016 - 5:56 pm | पैसा
समानतावादी बायकांचे तज्ञ इकडे आले तर आपल्याला पळता भुई थोडी होईल!
17 Feb 2016 - 4:28 pm | पियुशा
धाग्याच्या न स.चो. च्या फास्तेट शतक पुर्ती निमित्त स्रुजा काकी आनी रेवती आज्जी ह्यान्च्यातर्फे मी धाग्या कर्त्याचा एक
पुस्पगुछ देउन स्त्कार करत आहे हो ............
17 Feb 2016 - 4:46 pm | बोका-ए-आझम
.
17 Feb 2016 - 5:05 pm | पियुशा
ओ बोका साहेब त्ये आमच सुद्द लेखन असच असत , पुर्वापार चालत आलेल हाय ;)
17 Feb 2016 - 4:54 pm | विशाखा राऊत
एकदा का अजयाताईच्या मुलीचे लग्न झाले की ती तीर्थक्षेत्री जायला मोकळी. ;)
17 Feb 2016 - 4:57 pm | पिलीयन रायडर
कालच मी आणि स्रुज चारधामचं बुकिंग करुन आलोय.. रेवाक्का आणि अजया आल्या की जाऊ चार म्हातार्या फिरायला आता..
17 Feb 2016 - 4:56 pm | अजया
तीर्थक्षेत्री _/\_
17 Feb 2016 - 4:59 pm | त्रिवेणी
अग बै पिरा तै न सृजा तै इतक्या मोठ्या आहेत.
इथे मला न पिवडीला सगळ्यांना तेच म्हणावे लागते.
17 Feb 2016 - 5:02 pm | त्रिवेणी
प्रियांका तै ना भेटले आहे पण विशाखा तै तुम्ही इकडे येवून पण आमच्यासाठी वेळ काढत नाही सो तुम्ही ४० वर्षांच्या असाल असा अंदाज करते.
17 Feb 2016 - 5:07 pm | विशाखा राऊत
त्री वेण्या ;) नक्की विशाखा कोण..
17 Feb 2016 - 5:09 pm | पियुशा
टूमीच ओ काकु टूमीच ;)
17 Feb 2016 - 5:25 pm | विशाखा राऊत
काकू किसको बोली पियुडी... केजी का अभ्यास कर पेहेले
17 Feb 2016 - 5:04 pm | त्रिवेणी
स.चौ. तुम्ही मला विसरलात पण मीच देते ओळख करुन- मी त्रिवेणी(वय-२५ वर्ष) सध्या राहणार-पुणे.
17 Feb 2016 - 5:05 pm | इरसाल
वर प्रतिसादात आलेल्या यच्चयावत इस्त्री आयडीज ह्या फक्त आणि फक्त ५०+ इतुके वयवर्ष अस्लेल्या आहेत.........हुकुमावरुन ( मला हे माहित आहे खात्रीशीर रित्या)
17 Feb 2016 - 5:07 pm | पियुशा
त्रीवेणी न मी एकाच केजीत शिकलोय ;)
17 Feb 2016 - 5:08 pm | विशाखा राऊत
पियुडे तुम्ही अजुन केजीतच आहात की काय ;)
17 Feb 2016 - 5:10 pm | मीता
नाही ग विश.. ती आता दुशली ब ..
17 Feb 2016 - 5:26 pm | विशाखा राऊत
अय्यो पास झाल्या पण केजी ;)
17 Feb 2016 - 5:08 pm | मीता
@ इरसाल : चुकताय तुम्ही.. ६०++ असं पाहिजे आहे ते ...
17 Feb 2016 - 5:19 pm | इरसाल
आयाम भेरी भेरी सारी मिता तै !!!! ६०+ तर ६०+ काय जाते ???????
17 Feb 2016 - 5:16 pm | स्वामी संकेतानंद
काय ती हौस लोकांना अंदाज बांधण्याची!!
नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा
मेरी कमेंट ही मेरी पह्चान है, गर समझ आए
17 Feb 2016 - 5:20 pm | पिलीयन रायडर
तुम्ही...
उंच.. बारिक.. चष्मा.. रंग उजळ.. मिश्किल भाव असलेला चेहरा.. थोडा गबाळा अवतार.. केस वाढलेले (हिप्पी नाही, पण अगदी चापुन चोपुन टाईप पण नाही..)
17 Feb 2016 - 5:37 pm | स्वामी संकेतानंद
नशीब वयाचा अंदाज नाही मांडला!
21 Jun 2016 - 3:37 pm | प्रीत-मोहर
पिरे तु जवळ्जवळ खर वर्णन दिलय्स ;)
21 Jun 2016 - 3:27 pm | महासंग्राम
अंगावर भगवी कफनी,
बारीक केलेलं केस,
डोळ्यांवर बारीक गोल काड्यांचा चष्मा
एका हातात रुद्राक्षाची माळ , तर दुसर्या हातात अँड्रॉईड वर मिपा सुरू
17 Feb 2016 - 5:17 pm | बोका-ए-आझम
मिपाकरांपैकी एकही अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. अजया, अत्रंगी पाऊस, स्पार्टाकस, आनंद मोरे, प्रास, विमे, मृत्युंजय, मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे एवढ्या मिपाकरांना प्रत्यक्षात भेटलोय. फोनवर क्लिंटन (आता गॅरी ट्रूमन), विजुभाऊ, नाद खुळा, विशाल कुलकर्णी, मुक्त विहारी, सुबोध खरे, उमा@मिपा आणि विशाखा पाटील एवढ्यांशी बोललोय. रामदासना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही पण एका सेमिनारमध्ये प्रेक्षक म्हणून होतो.
फोटो ब-याच जणांचे पाहिलेत. अगदी शंभर टक्के अपेक्षेप्रमाणे असलेले म्हणजे बॅटमॅन आणि कॅप्टन जॅक स्पॅरो.
17 Feb 2016 - 9:57 pm | कविता१९७८
तुमचे वय ४०, कायदे पन्डीत असावेत असा अन्दाज
17 Feb 2016 - 11:13 pm | बोका-ए-आझम
वय बरोबर आहे, कायदेपंडित नाहीये पण.
18 Feb 2016 - 2:50 pm | Anand More
|||मिपाकरांपैकी एकही अपेक्षेप्रमाणे दिसत नाही.|||
अश्या अपेक्षा तरी काय आहेत तुमच्या ?
17 Feb 2016 - 5:24 pm | यशोधरा
सचौ, सद्ध्याच्या धुमाळीवाल्या धाग्यांमधून हा एक हसायला लावणारा धागा काढल्याबद्दल थ्यांक्यूच थ्यांकू!
17 Feb 2016 - 5:27 pm | अभ्या..
हा ना. मल्टीप्लेक्सातल्या नुसत्या एका बटनावर टनाटना उडणार्या पापकारणाची आठवन झाली.
आजकाल मज्जा येते ब्वा. एक बटन आणि टनाटना लाह्या, धागे भरुन खरडफळाभर पसरतात. ;)
17 Feb 2016 - 5:32 pm | यशोधरा
=)) काय त्या उपमा! भारीये!
17 Feb 2016 - 5:42 pm | भाते
दोन वर्षांपुर्वी पैसाताईने एका धाग्यावर प्रतिसादात सांगितले होते कि 'एक सोडून बाकी सगळ्या मिपा बायका तिशीच्या आतल्या आहेत.'
आता ती एक कोण ते विचारू नका. दोन वर्षांपुर्वी तीस म्हणजे आता… जाऊ दे.
खखोदेजा.
17 Feb 2016 - 5:49 pm | एस
म्हणजे 'मिपा बायका' हा शब्द दोन वर्षांपूर्वीच शोधला गेलाय? आणि तोही लाटकरांकडून नाही? काय सांगता काय? बुडाली बघा संस्कृती!
17 Feb 2016 - 6:09 pm | सूड
अशी कशी बुडते मेली सारखी, पोहायला शिकवा ना तिला!!
17 Feb 2016 - 5:53 pm | मदनबाण
सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन "वणवा" पेटवलेला आहे... ;)
का कुणास ठावुक हा आयडी कुठल्या कट्ट्यात भेटलाय का ? बाकी पिरा आरती मध्ये दंबुक शब्द वापरलेला पाहुन गडी पार मुरलेला वाचक आहे हे मात्र अगदी खात्रीने सांगु शकतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
17 Feb 2016 - 6:01 pm | पिलीयन रायडर
सचौ म्हणजे पम्या हो...
17 Feb 2016 - 6:08 pm | मदनबाण
सचौ म्हणजे पम्या हो...
अरे हो... च्यामारी हे आयडी बदलली मंडळी ओळखणे कठीण होत चाललयं हल्ली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
17 Feb 2016 - 6:02 pm | बॅटमॅन
महा लोल धागा =))
बाकी
ठ्ठो =)) =)) =)) अगदीच अॅक्युरेट बरं का =))
17 Feb 2016 - 6:06 pm | पिलीयन रायडर
हो हो.. तुला वाटणारच!!
पण मी तुझ्यापेक्षा सुद्धा लहान आहे ह्याचा लिखीत पुरावा आहे माझ्याकडे..!! ;)
17 Feb 2016 - 6:11 pm | बॅटमॅन
शारीरिक वय काही असो, माणशिक वय काकूबाईइतकेच आहे =))
17 Feb 2016 - 6:22 pm | पिलीयन रायडर
हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ तरुण हं..! अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, हसतमुख, मिश्किल, एझी गोईंग, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला तरूण...
जा खुश रहा.. ;)
17 Feb 2016 - 6:25 pm | बॅटमॅन
सत्य वर्णन केल्याबद्दल धन्यवाद!
17 Feb 2016 - 6:28 pm | पिलीयन रायडर
निरागस पण अॅडवा मग!
17 Feb 2016 - 9:14 pm | बॅटमॅन
अगदी अगदी....
17 Feb 2016 - 10:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट खोट्ट का होईना एकमत झालेलं पाहुन ड्वॉळे पाणावले, उर भरुन आला, नाक सुर्सु...असो.
17 Feb 2016 - 10:07 pm | स्रुजा
तुझं वय १२, काम : आईने दिलेला रुमाल घेऊन न जाणे आणि मग नाक सुंसुं करत बसणे ;)
17 Feb 2016 - 11:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
३८ वर्षांनी ल्हाने तुझ्यापेक्षा =))
दॅट काउंट्स =))
18 Feb 2016 - 12:00 pm | बॅटमॅन
तुम्ही टोर्टूगारिष्ट घ्या बघू कप्तानसाहेब.
17 Feb 2016 - 6:07 pm | एक एकटा एकटाच
सगळ्या मिपाकरांची ही आगळी वेगळी "अंदाज ओळख" आवडली.
इतरांचे वयाचे अंदाज काहीही असोत पण मनाने मात्र सगळे मिपाकर हे अजुनही अवखळ तारुण्यातच आहेत. ही गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी.
एका चटपटीत मिसळी प्रमाणेच
काहीसे
आंबट गोड तिखट झणझणीत सगळ्या मिपांकराना माझ्या शुभेच्छा
जियो मिपाकर
17 Feb 2016 - 6:37 pm | प्रीत-मोहर
Swara collegegirl
Swami ६५ cha mhatara
17 Feb 2016 - 6:43 pm | शान्तिप्रिय
अरेरे ....
या अवखळपणापासून वाचलो मी.
बरे झाले फोटो देउन टाकला दोन धाग्यात.
त्या फोटो देण्याच्या घट्नेमुळेच हे महाभारत घडले असावे असे मला वाटते.
17 Feb 2016 - 7:17 pm | शब्दबम्बाळ
अरे काय हे! एका दिवसात २०० कडे वाटचाल...
हल्ली डबल सेन्चुरी पण सहज होऊ लागलीये...
एक से एक फलंदाज फोर्म मध्ये आहेत! :)
17 Feb 2016 - 8:32 pm | sagarpdy
श्रीगुरुजी : ३५-४० वय, कपाळी केशरी टिळा, पांढरा शर्ट, खाकी पँट, दुचाकीवर स्वार आणि डोक्यावर हेल्मेट नाही.
17 Feb 2016 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
२०० झाले !
सनईचौघडा वाजवा रे वाजवा !
17 Feb 2016 - 8:51 pm | पिशी अबोली
हा हा हा..खूप भारी वर्णने. सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले..
सनईचौघडा हे डोक्यावर पांढरी टोपी घालून गाल फुगलेले काळ्या वर्णाचे दिसत असतील असं वाटून गेलं.. ;)
17 Feb 2016 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
आणि तोंडात बिडी... नाय, नाय, आपले ते... सनई, नै का ? ;)
17 Feb 2016 - 10:07 pm | खटपट्या
चांगलंय !!
अशीच मापं काढत फीरा पम्याभौ !!
17 Feb 2016 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेखात नाव नं टाकल्याबद्दल कचकुण णीषेध.
17 Feb 2016 - 11:17 pm | एस
आता डुआयडींची वर्णने करा!
18 Feb 2016 - 12:17 am | भंकस बाबा
सडपातळ, केस उडालेले, टिपिकल मध्यमवर्गीय , नेहमी फॉर्मलमधे,
अगदी डिट्टो दिलीप प्रभावळकरसारखे, पण हो रस्त्याने चालताना मागून कोणीतरी गचांडी धरील असा भाव तोंडावर बाळगणारे.४५ ते ५० वय
संदीप डांगे,
स्थूलपणाकडे झुकणारे, चश्मा तो पण चन्देरी किंवा सोनेरी काडयाच्या , हाफ शर्ट जीन्स पैन्ट, ३५ ते ४० वय
18 Feb 2016 - 7:30 am | मितान
:))
18 Feb 2016 - 8:49 am | रेवती
हैला, हा धागा असल्याचे माहितच नव्हते. सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत. महादंगा झालाय हितं.
सचौ, एकदाच भेटा! बघतेच आम्हालाला कोण पन्नाशीचं समजतय. अहो, आमची लग्नं विशीत झालियेत म्हणून संसाराची वर्षं जास्त वाटतात. शिवाय मिपा बायकांचं वय कायम सोळा असं एकदा दोनदा नव्हे तब्बल सव्वादोनवेळा सांगून झालय.
भारतीय पेहेरावाला दिवाळी आणि दसर्याशिवाय हात लागत नाही. भारतात येताना आपण अज्जून कित्ती कित्ती भार्तीय आहोत हे लोकान्ला कळावे म्हणून पेहराव भारतीय असतो. हामेरिकेत जीन्स, शर्ट हा राष्ट्रीय पेहराव आहे. ;)
चला, आता काशीला जाणे आले, पण त्याआधी उरलेले प्रतिसाद वाचून घेते.
तरीही धन्यवाद. माझं वय किती? कुठं रहात असेल? कशी दिसत असेल? पेहराव कोणता असेल? असा विचार कोणी करेल हे अज्याबात एक्सपेक्टेड नव्हते. अगदी अर्धा टक्काही नाही. तरीही उल्लेख केल्याबद्दल खुदकन हसू आले हे मान्य करते.
18 Feb 2016 - 10:46 am | टवाळ कार्टा
पिरा => कळकट्ट..मळकट्ट..कामाला बळकट्ट
=))
18 Feb 2016 - 12:01 pm | बॅटमॅन
अगागागा =)) =)) =))
18 Feb 2016 - 12:14 pm | पिलीयन रायडर
मी बोलेन.. पण मग आता एक माणुस चिडायला लागलय विषय काढला की!!!
18 Feb 2016 - 12:27 pm | पैसा
तो मिपावर येतानाच फ्रस्ट्रेटेड आहे हे लक्षात घेऊन जरातरी कनवाळुपणा दाखव! अगदीच बै हार्टलेस तुम्ही लोक!
18 Feb 2016 - 12:30 pm | पिलीयन रायडर
=))
लोक लई हळवे झालेत बै आजकाल..
18 Feb 2016 - 12:49 pm | टवाळ कार्टा
बोला की...ओपन च्यायलेंज दिलेले भिडायला...भीतो का काय
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
18 Feb 2016 - 1:14 pm | पिलीयन रायडर
हड हड हड....
18 Feb 2016 - 1:20 pm | टवाळ कार्टा
हडळ हडळ हडळ....
18 Feb 2016 - 1:13 pm | इशा१२३
जरा दया दाखव ग बाई ! आधीच हळव मन झालय.लग्गेच कोनाडा मागायचे गळा काढायला :)
18 Feb 2016 - 1:15 pm | पिलीयन रायडर
द्याच बै काय तो कोनाडा... खरंच बरं होईल!
18 Feb 2016 - 1:23 pm | पैसा
लहान पोरगं चिडून लाथा झाडायला लागलं की त्याला "अलेले शोन्या" म्हणतेस का "जा बस त्या कोपऱ्यात" म्हणतेस?
18 Feb 2016 - 1:28 pm | पिलीयन रायडर
बस कोपर्यात नाही.. हड हड म्हणतात आमच्यात.. फाजील लाड खपवुन घेतच नाही...
18 Feb 2016 - 12:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मरतयं आता.
18 Feb 2016 - 11:13 am | मूखदूर्बळ
मजेदार :)
18 Feb 2016 - 1:37 pm | स्मिता.
सगळे प्रतिसाद तर नाही वाचले पण अर्धे वाचताना 'आपण यांना पहिलंत का?' ची आठवण आली.
18 Feb 2016 - 1:39 pm | स्मिता.
माझा आधीचा प्रतिसाद २५०वा असल्याचं लक्षात आल्याने हा २५१वा खास माझ्या अभिनंदनाचा प्रतिसाद!
18 Feb 2016 - 2:33 pm | मिंटी
यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व.
=)) =)) =))
मैय्या आता तुमा निलम ताईच म्हणणार..... ;)
18 Feb 2016 - 2:53 pm | यशोधरा
फटके खाशील हां मिंटे =)) =))
18 Feb 2016 - 3:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खळ्ळं खट्याक!
18 Feb 2016 - 3:49 pm | मिंटी
=)) =)) =))
धम्या आणि दामुला पण सांगते ;)
18 Feb 2016 - 4:30 pm | तुषार काळभोर
२००९ नंतर पहिल्यांदा लेखन...
18 Feb 2016 - 4:48 pm | सूड
उल्लेख केलेली नावं बघता ताई जुन्या कंपूतल्या असाव्यात.
18 Feb 2016 - 5:06 pm | मिंटी
हो. २००९ नंतर मिपापासुन लांब होते...म्हणजे प्रतिसाद वगैरे देत नव्हते... फक्त वाचनमात्र होते... :)
19 Feb 2016 - 6:47 pm | विवेकपटाईत
आपण तर आपली ओळख स्वत: करून देतो, आमचे वय मानसिक अजूनही १०-१५ वर्षांचे आहे, आज हि वर्षातून एकदा तरी चिड़ियाघर बघायला जातो. (आत्ताच जाऊन आलो, उंदीर मांजरीची गोष्टीची प्रेरणा तिथलीच). टोम जेरी आणि शेरखान आपल्याला बुआ भारीच आवडतात.
19 Feb 2016 - 7:02 pm | प्रचेतस
बुआ इथे सर्वांनाच आवडतात हो.
19 Feb 2016 - 7:05 pm | होबासराव
;)
19 Feb 2016 - 7:05 pm | अभ्या..
बुवा भाजी पण खूप छान आणतात.
19 Feb 2016 - 7:11 pm | प्रचेतस
बुवा कविता पण खूप छान करतात, नव्हे बुवांना कविता खूप छान होतात.
19 Feb 2016 - 7:18 pm | सूड
बुआ यमकं पण फार छान जुळवतात. त्यांचं इसवीसनपूर्व दुसर्या शतकात सातारा येथे केलंलं एक यमक तर फारच प्रसिद्ध आहे.
19 Feb 2016 - 7:19 pm | अभ्या..
बुवांकडे कविलोकांसारखी एक शबनम पिशवी आहे.
एक लेदरची सॅक पण आहे. त्या सॅकचे बुवांना खूप कौतुक आहे.
बुवांकडे दोन दोन स्मार्ट फोन आहेत. एकातून ते फक्त स्मायल्या टाकतात.
बुवांची आल्टो ग्यासवर चालते.'
ते कधी कधी पंपावर पण जातात.
19 Feb 2016 - 7:29 pm | टवाळ कार्टा
क्काय बुवाबाजी लाव्लीये
19 Feb 2016 - 7:38 pm | अभ्या..
बरं झालं, तू आला, आता टकाबाजी.
टक्या कडे आधी एक अॅव्हेंजर होती.
19 Feb 2016 - 8:42 pm | सूड
त्याला टक्कूमक्कूशोनू असेही एक नाव होते..
19 Feb 2016 - 8:45 pm | अभ्या..
तो एका ग्यांगमध्ये डॉन बनायला गेला.
रेस्ट इज हिस्ट्री म्यान....................जस्स्स्स फर्गेटिट यार.
19 Feb 2016 - 8:05 pm | होबासराव
बुवांची आल्टो ग्यासवर चालते.'
ते कधी कधी पंपावर पण जातात.
बाकि वेळेस आल्टो कशावर चालते मग ;)
19 Feb 2016 - 8:07 pm | अभ्या..
ग्यासवर
19 Feb 2016 - 8:26 pm | प्रचेतस
बुवा त्यालाच सीएनजी खेचर असेही म्हणतात आणि ग्यासच्या लैनीतच त्यांना चारोळ्या पण सुचतात.
19 Feb 2016 - 8:38 pm | होबासराव
.
19 Feb 2016 - 8:41 pm | अभ्या..
योग्य अनुयायी न मिळाल्याने त्यांनी गुंडाळली ती चळवळ.
आता फुलपात्र चळवळ. बॅनर आलेत प्रिंटिंगला माझ्याकडे.
"डोन्ट बी मेष्पात्र, बी अ फुल्पात्र" अशी स्लोगन आहे.
20 Feb 2016 - 9:16 am | नाखु
फुल्पात्र" शब्द एकत्र लिहिणे कारण याचे विंग्लेश भाषांतर केलेले बॅनर सन होजे आणी ग्वाटे मारू येथे देणे आहेत.
शिवाय इतरांना (वारंवार) शिका येतात तश्या बुवांना यमक्या येतात हा मुलभूत फरक लक्श्यात घेणे.
काहींनी बुवांचाच तांब्याच पळवायचा प्रयत्न केल्याने बुवांची "पंचाईत" झाली म्हणून ती चळवळ बंद झाली अशीही जालीय वर्तुळात काही व्यक्ती आणी वल्लींच मत आहे. खखो बुवा आणी परम शिष्य जाणे.
19 Feb 2016 - 7:10 pm | होबासराव
:)
19 Feb 2016 - 7:14 pm | अभ्या..
बुवा आल्टो पण मांडी घालून चालवतात. फक्त लोकांना दिसत नै मांडी घातलेली.
19 Feb 2016 - 7:44 pm | आदूबाळ
आणि डोळ्यांनी क्लच दाबतात? (अखियों से गोली मारे टैप?)
19 Feb 2016 - 8:48 pm | सूड
कोणाच्या डोळ्यांनी?
20 Feb 2016 - 10:04 am | गवि
शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, पापभीरु, मनमिळाऊ, कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा बुवांचे अनेक दुष्टात्म्यांनी मार्केट स्टँड अप केलेले पाहून अगदी शेमच वाटली.
20 Feb 2016 - 10:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नक्की आपल्याचं बुवांबद्दलचं बोलताय ना तुम्ही? =))
20 Feb 2016 - 10:41 am | गवि
अता काय बरे बोलावे यावर..?!
20 Feb 2016 - 10:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अता ते मी कसे सांगणार ब्रे.