(महवांची गाळ फुले)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
16 Feb 2016 - 10:56 pm

कवी वा. रा. कांत ह्यांची क्षमा मागूनच >>

महवांची गाळ फुले अजुनि पिंपड्यात
चोरपावली पळशी काय तू वनात?

आले ते जोमात तीन शुंभ पोलिसाचे
ओल्या रानात खुले दार गाळपाचे
मनकवडा मग पळतो दूर डोंगरात

ती जागा, ती भट्टी नारळिच्या खाली
पूर्ण तोच लगबग मी मग करतो खाली
रिमझिमते अमृत 'तो' विकल मंडईत

हातांत लोहाचे बंध गुंफताना
सगळ्यांना स्वच्छ कळे
मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस
उमलुनी सळ्यात

तू गेलास सोडुनि तो माळ, सर्व अड्डे
तडफडणे 'स्वामींचे' फक्त उरे खड्डे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?

-- स्वामी संकेतानंद

रोमांचकारी.विडंबन

प्रतिक्रिया

साष्टांग _/\_ घ्यावा स्वामीजी!!!

चांदणे संदीप's picture

17 Feb 2016 - 10:30 am | चांदणे संदीप

+१ ____/\____

प्रीत-मोहर's picture

16 Feb 2016 - 11:34 pm | प्रीत-मोहर

चालीत म्हणुन पाहिल स्वामीजी!!!!
__/\__

पैसा's picture

17 Feb 2016 - 10:51 am | पैसा

काय सॉलिड विडंबन आहे!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2016 - 11:05 am | ज्ञानोबाचे पैजार

स्वालीड म्हणजे स्वालिडच माळ उडवली आहे बगळ्यांची
काय ते एकएक पहिल्या धारेचे शब्द,
एकदम कडक आणि पिव्वर माल चाखायला मिळाला बर्याच दिवसांनी

पैजारबुवा,

वडाप's picture

17 Feb 2016 - 1:25 pm | वडाप

हिकडं आनतो थोडी.