पुण्यात जरा ऊदासच वाटलं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
7 Feb 2016 - 10:05 am

पुण्यात जरा ऊदासच वाटलं
शुक्रवार पेठेत एक माकड मारलं
रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो
महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला
मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला
चालत चालत मिरजेला गेलो
वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला
सांगोल्याला मावशीच्या घरी
तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला
पंढरपुरात जेव्हा पोहोचलो
विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला
चंद्रभागेत बुडी मारुन
पुन्हा परतीचा रस्ता शोधला
पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं
_________________

(आधारीत )

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण पुण्यात उदास का वाटलं ?

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

7 Feb 2016 - 10:32 am | संदीप डांगे

कशावर आधारित? मस्त आहे पण.. ;-)

आदूबाळ's picture

7 Feb 2016 - 1:16 pm | आदूबाळ

यावर आधारित आहे:

मुंबईनं भिकेस लावलं
कल्याणला गूळ खाल्ला
ज्या गावाला नाव नव्हतं
पण एक धबधबा होता
तिथं एक ब्लँकेट विकलं
अन पोटभर पाणी प्यालो
पिंपळाची पानं चघळत
नाशकापर्यंत आलो
तिथं तुकाराम विकला
अन् वर खिमापाव खाल्ला
जेव्हा आग्रारोड सोडला
तेव्हा एक चप्पल तुटलं
न मागता मिळालेली
कांदाभाकर खाऊन ऊठलो
ढुंगणाखालची हॅवरसॅक
उचलून पाठीवर घेतली
मग दोन मैल विचार केला
अन परतायचं ठरवलं

- अरुण कोलटकर

संदीप डांगे's picture

7 Feb 2016 - 1:20 pm | संदीप डांगे

ह्यासाठी धन्यवाद! अर्थगर्भ आहे कविता.

प्राची अश्विनी's picture

7 Feb 2016 - 3:20 pm | प्राची अश्विनी

या कवितेसाठी धन्यवाद! खूप सुरेख आहे.

जव्हेरगंज's picture

7 Feb 2016 - 3:22 pm | जव्हेरगंज

हो ,
यावरच आधारित आहे
धन्यवाद :)

भक्त प्रल्हाद's picture

7 Feb 2016 - 3:37 pm | भक्त प्रल्हाद

मुंबईने भिकेस लावल्यावर पुण्याला आलात. मग उदास वाटणारच!
असो.
तुमची कविता समजली नव्हती. हि कविता दिल्यावर आता न समज्लेल्या दोन कविता झाल्या.

कशावर आधारित समजले नाही.पण कविता मस्तच आहे.

पण पुण्यात उदास का वाटलं ?

पुण्यात जरा काय...फुल्ल उदास असते हो. मी येतच नाही आजकाल. :(

पैसा's picture

7 Feb 2016 - 2:14 pm | पैसा

पुणे आवडलं नै तर हुंबैला चला. विचार करायला पण वेळ भेटणार नाय. अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार्‍या सर्वांना लांबूनच साष्टांग नमस्कार.

जव्हेरगंज's picture

7 Feb 2016 - 2:17 pm | जव्हेरगंज

पण पुण्यात उदास का वाटलं ? >>>>

कवितेतच ऊत्तर द्यायचा प्रयत्न केलाय .
बघा सापडले तर :)

कंजूस's picture

7 Feb 2016 - 2:27 pm | कंजूस

माकड मारल्याचं ( एका हुच्चभ्रूला सुनावलं) त्याचं प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावरसुद्धा शुक्रवारपेठेत स्वागतच झालं "या एकदा सवड काढून."

सिरुसेरि's picture

7 Feb 2016 - 2:48 pm | सिरुसेरि

कोल्हापुरचे सहकार मसाला दुध आणी मिरजेची शिवाप्पा हलवाइची लस्सी .

पूर्वीचे पुणे राहिले नाही.

सतिश गावडे's picture

7 Feb 2016 - 3:25 pm | सतिश गावडे

पुण्यात उदास वाटले तर बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे. तिथल्या स्वर्गिय वातावरणाने आणि जेवणाने उदासिनता कुठल्या कुठे पळून जाते. निदान तिथल्या बिलाने तरी नक्कीच जाईल.

कपिलमुनी's picture

7 Feb 2016 - 5:16 pm | कपिलमुनी

बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे, आल्यावर त्यावर धागे काढावेत मग आपला आणि बऱ्याच मिपाकरांचा उदासपणा नक्की जातो

नाखु's picture

8 Feb 2016 - 10:00 am | नाखु

सूज्ञ मिपाकर "उदास"(आडनाव नाही चित्तवृत्ती) झालेले लोकच बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जातात असा जावईअशोधाच्या धाग्याच्या प्रतीक्षेत रहावे लागेल आम्हाला !!!

नाखु वाटपहाणे

मलाही पुण्याला येऊन माकड मारायचे आहेच एकदा.

माकडाने काय घोड मारलाय !

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2016 - 3:53 pm | टवाळ कार्टा

काय हे....कोणी माकड मारायची भाषा करतयं...कोणी हत्ती मारायची भाषा करतयं.....

उगा काहितरीच's picture

7 Feb 2016 - 5:12 pm | उगा काहितरीच

जव्हेरभाऊ नाही आवडली.

जव्हेरगंज's picture

7 Feb 2016 - 6:12 pm | जव्हेरगंज

मै भाभीको बोला
क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ?
भड़क गयी साली
रहमान बोला गोली चलाऊँगा
मै बोला एक रंडीके वास्ते?
चलाव गोली गांडू.

- अरुण कोलटकर

मारवा's picture

8 Feb 2016 - 2:30 pm | मारवा

हे विडंबन वा अजुन जे काय तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते अजिबात आवडल नाही.
मुळ कविच्या वहीवर विनाकारण चिंखडण्यासारख वाटलं.
असो.

नीलमोहर's picture

8 Feb 2016 - 10:20 am | नीलमोहर

एकतर पुणं..
त्यात पेठ..
तीही..
असो.

पुण्यात सर्वाधिक माकडं स... आणि श... पेठेत आढळून येतात बहुधा.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2016 - 12:28 pm | टवाळ कार्टा

हे नियमांत बस्ते का?

नीलमोहर's picture

8 Feb 2016 - 2:08 pm | नीलमोहर

मी खर्‍र्रया - खुर्‍र्या शेपटीवाल्या प्राण्यांबद्दल (स्वतः पाहिलेले) लिहीले आहे.
आपण कशाबद्दल म्हणताय ;)

(पेठ निवासी)

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2016 - 2:20 pm | टवाळ कार्टा

=))

पेठेतली माकडं म्हणे आजकाल कोथ्रुडात ट्रान्स्फर झालीयेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2016 - 3:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

काहीतरी समजेल असे लिहा ना जव्हेरभौ!! उगीच डोक्याला शॉट

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2016 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

@

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

>> अस्स्सं!!!

खटासि खट's picture

8 Feb 2016 - 11:05 pm | खटासि खट

गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनेसवे गाणी

चाफा बोलेना, चाफा चालेना

अभिदेश's picture

9 Feb 2016 - 4:37 am | अभिदेश

ऊदास वाटल... काहिहि हा जव्हेरजी ...