संध्यासमयी पक्षी
डोंगरापार गेले
पिसे ठेवुनी
बोडकेच आले !
बोडके कोणी
नदीकाठी रडती
उष्ट्या पत्रावळी
कुत्री हुंगती !
ओलेती कोणी
नग्न प्रदक्षीणेत
ओला गर्भ
दर्भाच्या प्रतीक्षेत !
रांड बाजारात
रात्रीस दिवाळी
अंधाराचे झापड
दिवसाच्या भाळी !
जन्मास आला
झाला सोहळा
मरुनी सा-याना
करे मोकळा !
माती वा राख
मेल्यास काय ?
आयुष्य म्हणजे
विरजनातली साय !
विजयकुमार कणसे.........
२१ नोव्हेंबर २००९
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 5:00 pm | पैसा
कधी विरजण नीट लागून छान दही होते. कधी अदमुरं, कधी चोथापाणी तर कधी आंबटढाण.
4 Feb 2016 - 8:03 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
जन्मास आला
झाला सोहळा
मरुनी सा-याना
करे मोकळा!
वाह!