ओ पी नय्यर शैली - एक सांगितिक स्मरण

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
28 Jan 2016 - 7:46 am

प्रास्तविक-
१९६२ साल . राजकपूरचा "जिस देशमे .." थेटरात लागला आहे . मी इयत्ता दुसरीत . बाहेर लाउडस्पीकर्स वर "आ अब लौट चले, मेरा नाम राजु , ओ बसन्ती पवन पागल " ई गीतांची चलती ." हम राही, हरियाली और रास्ता" इइ सिनेमाची गीतेही कानावर. मी अन माझा भाउ शंकर जय च्या प्रेमात. एस जे माझं फिल्म संगीतातील पहिलं प्रेम. मग १९६५ चा सुमार "गोरी चल न हन्सकी चाल, बहारो फूल बरसाओ, ओ सनम तेरे हो गये" हम कानावर येत रहातात मी एस जे च्या प्रेमात काठोकाठ बुडालेला. मग मी १४ वर्षाचा होतो ,अन "मेरे सनम" येतो. काही कारणाने गोनिदा ( थोर मराठी लेखक ) त्यांच्या घरी बोलावतात. फोनोवर " ये है रेशमी ..." ऐकवतात. अन माझी अवस्था संगम मधील राधासारखी. तिला सुन्दर की गोपाल हा प्रश्न, मला एस जे की ओ पी हा प्रश्न. मुसाफिर एक हसीना,"मेरे सनम, ये रात फिर ना आयेगी, एक कशमीरकी कली , कहीं दिन कहीं रात, फिर वही दिल लाया हुं , सावनकी घटा, हमसाया" माझे कान व्यापून टाकतात. नय्यरचा जादू पोरवयात जो चालू झाला तो आज तागायत कायम. मग ओपी साहेबाना भेटणे, आशीर्वाद घेणे " तुम्हारी आत्मा पवित्र है " असे त्यानी म्हणणे झाले. काही गप्पा झाल्या .काही मुद्दे राहिले ते कायमचेच. आजही माझे पहिले प्रेम ( एस जे ) मी विसरलेलो नाही. अनेकाप्रमाणे मी ओ पी नय्यर या व्यक्तीच्या प्रेमात मात्र काही पडलो नाही. त्याना संगीतातील पितामहाचे स्थान दिले, गुरू मानले पण आन्धळी भक्ती कधीच केली नाही. कारण माझे प्रेम नय्यर या हस्ती वर नसून त्यांच्या शैलीला आहे. म्हणूनच आज ते नाहीत तरीही शैलीवर प्रेम कायम आहे. आज २८ जानेवारी या नय्यर स्कूल ओफ मौसिकी च्या आदिपुरूषाचा स्मरण दिन. त्या निमिताने ऐकून, वाजवून, वाचून त्यांच्या अत्यन्त अनोख्या शैली विषयी मिपावरील या स्टाईलच्या चाहत्यासाठी.

आज आपण ओपी नय्यर एक व्यक्ती म्हणून क्से अहंकारी, हट्टी, दिलदार, लेडीकिलर होते किंवा नव्हते याचे चर्वण काही करणार नाही. तर १९५३ते १९७५ या कालावधीत करियरचे चढ उतार सहन करून सुरेल गीतांचा नजराणा कायम सोडून गेलेल्या एका ध्रूव तार्‍याच्या प्रतिभाविलासाचा मागोवा घेणार आहोत. काय आहे ही शैली. एक स्पष्ट आहे की त्या काळातील बहुतेक सर्व संगीतकार हे मेलडीची जाण असणारे होतेच .सलीलदा मदनमोहनचे सिम्फनी शैलीचे संगीत, शन्कर जय॑ चा भव्य वाद्यव्रुन्द नौशादची काही वेगळीच धाटणी अशातून नय्यर असे एकच संगीतकार मला दिसतात ज्याना फिल्म॑ संगीतातील मधले "मोस्ट गिफ्टेड" चे स्थान दिले पाहिजे. नय्यर हे अनेक गोष्टीचे बादशहा मानता येतात, स्वरान्चे, लगावाचे, युगलगीतां , रोमान्सचे, हरकती मुरक्यांचे मीण्डकामाचे , तालाचे, मुख्यत: तालातील फ्युजनचे व स्वरातील आकृतिबन्धाचे. वास्तविक स्वरांचा एक आकृतिबन्ध निर्माण करणे व त्यात स्वरबदल करून तो पुनरावृती करून वापरणे हे संगीत संयोजनातील एक सामान्य तत्व आहे. पण त्यात नय्यर यानी जे काम केले आहे ते अचाट आहे. ज्याना ओपीची इन्ट्रो , इन्टरल्युडस , व पोस्टल्युड तोडपाठ आहेत वा ज्यानी ती वाजवून पाहिली आहेत. त्याना याचा प्रत्यय सामान्य शौकिनापेक्षा जास्त आलेला असेल. असे बन्ध कधी सितारवर कधी पियानोवर ,कधी क्लेरिनेटवर कधी सॅक्स तर कधी माउथ ऑर्गनवर त्यानी तयार केलेले दिसतात. हे तर खरे लेखात समजावून देणे कठीण आहे. जरा त्यांचे " आओ हुजूर तुमको "मधील पियानो ऐका, "यारोंकी तमन्ना है "मधील सेकण्ड इन्टरल्युड मधील पहिले मेन्डोलिन ऐका त्यानंतर येणारे क्लॅरिनेट ऐका मी काय सुचवितो आहे याची प्रचिती येईल.
वाटचाल
नय्यर यान्च्या कारकीर्दीचे तीन टप्पे आहेत. त्यात शैली शोधत असलेले नय्यर. १९५३ ते १९६०. शैली पूर्णता: सापडलेले नय्यर १९६१ ते १९७३ व शैली चा ठसा आहे पण सम्थिंग मिसिंग असलेले नय्यर १९७३ ते नन्तर.

पाहिल्या टप्प्यात. त्यांच्यावर असलेला पूर्वसुरींचा प्रभाव, उदा न्यु थिएटर्स, पंकज मलिक तिमिर बरन. लाहोरला लहानपणी ऐकलेले संगीत. पन्जाबी लोकसंगीत ( रुक रुक रुक कहां चली दिवानी ) ई. त्यात काही वेळा तिर्यक धुनीचा वृन्द व क्लरिनेटच्या ठोस व जलद ( स्टकॅटो) नोट्स चा वापर.( ये लो मै हारी पिया, बेइइमान बालमा , बुझ मेरा क्या नाम ) याच काळात काही क्लब गीतांचा प्रभाव. उदा अरे तौबा ( १२ ओ क्लॉक) किंवा " री री क्का राक्का ( दो उस्ताद ) ".
दुसर्या टप्प्यात खरे नय्यर साहेब. पहाडी पिलू किरवाणी,सारंग , यमन, ई राग, सन्तुर, सरोद, सितार सारंगी, ई भारतीय साजाबरोबर मेन्डोलिन, हारमोनियम, माउथ ओर्गन ,गिटार, डबलबेस, चेलो ही फिरंगी फौज व साईड रिदम॑ मधे घुन्गरू व कॅस्टानेट.

तिसर्‍या टप्प्यात भट्टी काहीशी न जमलेले, आशा रफी जोडीला नसलेले. अरेन्जर साठी जी एस कोहली नसलेले नय्यर उदा टॅक्सी ड्रायव्हर , बिन माके बच्चे, खून का बदला खून्॑ सबूत, निस्चय ई चित्रपट. एका बाजूला लोकांची आवड बदललेली व दुसर्या बाजूला ओ पी ची प्रतिभा आटत चाललेली. तिसर्या बाजूला पुष्पा पागदरे, कृष्णा कल्ल्ले. अनुराधा पौडवाल, महमद अझीझ,अमितकुमार , दिलराज कौर या गायकाना बरोबर घेण्याची त्यांची व्यर्थ धडपड. नाही म्हणायला त्यानी रूना लैला बरोबर केलेली खाजगी गाणी मस्त झाली होती. अर्थात या कालातही मेलडी च्या बाबतील ते समकालीनापेक्षा वरचढ होतेच.
वेगळेपण
इतर संगीतकार व ओपी नय्यर याच्यात फरक शोधू गेले असता असे दिसते की नय्यर याना मोठे इन्ट्रो वेगवेगळ्या चालीचे अन्तरे , दोन वेगवेगळी इन्टरल्युडस करण्याची हौस असलेलली दिसते. असे वेगवेगळ्या चालीचे पण मुळातील चालीला पूरक असे अन्तरे बनविण्याचे कसब मराठीत सुधीर फडके (पराधीन आहे जगती उदाहरण म्हणून) श्रीनिवास खळे( पहिलीच भेट झाली )याना आहे. तसे ते हिन्दीत सी रामचन्द्र ( भूल जाये सारे गम, ये जिदगी उसीकी है , मलमली तारुण्य माझे ) याना आहे. हे एक अधिक सांगितिक सामर्थ्य असल्याचे लक्षण आहे. तसे नय्यर हे गीत सम्पल्यानंतरचे पोस्ट ल्युड करण्यायातही पटाईत होते. ( पुकारता चला हू मै , युं तो हमने लाख हन्सी देखे है , सरपर टोपी लाल हाथमे , मेरी जान बल्ली बल्ले ई उदाहरणे.) नय्यर यांच्या गीतात बर्याच वेळा दोन मोठे अन्तरे असतात.( आज कोई प्यारसे दिल की बाते कह गया ) समजा अशा अन्तर्‍यात फक्त केरवा हाच ताल आहे तर त्यातही केरव्याची निरनिराळी वजने सामील असतात. ओपी च्या गीतात ढोलक हे वाद्य असे वाजते की यंव. त्यामुळे एका संगीतकार द्वयीला भाण्डी वाजवणारे असे म्हटले जायचे याची आठवण येते. साज व आवाज यांचा संवाद हे ओपी स्टाईलचे खास बलस्थान. कधी आशा व सॅक्स कधी आशा व बासरी ( चैन से हमक्को कभी ) कधी आशा व माउथ ओर्गन ( वो हंसके मिले हमसे ) अशी जुगलबन्दी तर कधी रफी व सरोद ( ऑचलमे सजा ले ना कलिया) रफी व सॅक्स ( हौ दुनिया उसीकी) कधी रफी व पियानो ( मेरा दिल मचल गया ) ही उदाहरणे. अत्यंत त कमीतकमी वाद्य वापरणे तरीही अजरामर असे गीत उभे करणे हे ओपीच जांणोत "मै सोया अखिया मिचे,( फक्त आशा भोसले हे वाद्य चैनसे हमको भी फक्त बासरी हे वाद्य जुल्फ की छावमे फक्त सन्तुर हे वाद्य . यात वाद्यान्चा वापर अगदी कमी दिसेल आपल्याला . " जाने तमना क्या कर डाला या केदार रागावर अधारित गीतात तर वाद्यच नाही चशा व महेन्द्र कपूर यान्चे आलापच वाद्याचा रोल करतात.
गीतप्रकार
ओपीच्या गीतप्रकारात गजल टाईप ( हमपे इल्जाम है, मेरा दिल मचल गया ) मार्च रिदम टाईप( जाये जहां मेरी नजर, होटोम्पे हसी ) भांगडा टाईप ( तुम सबसे हसी हो , सरपे टोपी लाथ हाथमे , मेरी जान बले बले ) दीपचंदी पन्जाबी ( चोरी चोरी एक इशारा हो गया है , इशारो इशारोमे ) केरवा प॑न्जाबी ( कुछ तो ऐसी बात कर जालिम , एक परदेसी मेरा दिल ले गया ) फ्युजन पन्जाबी ( रूक रुक रोक कहा चली , मुझको दिवाना ना बन ) सिम्पल दादरा( दिलकी आवाज भी सुन , जुलफकी छावमे ) वाल्टझ ( मेरी नीन्दोमे तुम , तुम जो हुवे मेरे हम सफर ) रॉक एन रोल ( मेरा नाम चिन चिनचू , अरे तोबा ये तेरी अदा ) , मुजरा ( जिन्हे है प्यार वे सनम , खुदा हुजूर को मेरी भी जिदगी दे दे ) क्लब डान्स ( री री का राका , वन टू थी बेबी या या ) शास्त्रीय संगीत ( तू मेरा प्रेम देवता, मै खुद हू चन्द्र मुखी, ) फास्ट केरवा ( तेरे दिलका मकान. लेके पहला पहला प्यार ) स्विंग रिदम टाईप ( जवानी आयी मस्त मस्त बिन पिये , उफ ये बेकरार दिल कहा लुटा न पूछिये ) थीमॅटिक गीत ( आन है तो आ राहमे , चल अकेला चल अकेला ) ई विविधता दिसून येते.
स्वरांची निवड
स्वराच्या निवडीचा विचार करता नय्यर याना हिन्दी तील लोकप्रिय शिवरन्जनी व भैरवी या रागान्चा मोह पडल्याचे दिसत नाही नाही म्हणायला सरपे टोपी लाल हाथमे व बडे खूबसूरत बडे ही हसीन या गीतांवर भैरवीची छाया दिसते. पन्जाबी लोकगीतात भैरवी रागाचे एक महत्व आहे विशेषता: हीर या गीत प्रकारात. पण नय्यरना जलद पंजाबी लोकसन्गीताचे जास्त आकर्षण उदा भांगडा असल्याने सारंग ( दोन्ही निषाद ) रागातील पन्जाबी छाप दिसते ( उदा ये दिल लेकर नजराना ). बाकी त्याना पिलू रागाचे ( त्याना माहित नाही पिलू म्हणजे काय ) इतके आकर्षण की तब्बल ५० गीते त्यानी पिलू स्केल मधे केली आहेत. किरवाणी या रागाची त्याना मस्त जाण आहेसे दिसते. (पुकारताचला हू मै , मै प्यारका राही हु ई ) बाकी कधी जोनपुरी कधी देस कधी ललत अशी त्यांची निवड दिसते. मुख्यत; पाया म्हणून शुद्ध स्वरांचे स्केल घ्यायचे व त्यात हाफ नोटचा भन्नाट वापर सर्रास पण॑ कल्पकतेने करायचा असा त्यांचा सांगितिक हट्ट असावा.
रागदारीचा प्रभाव
पिलू खेरीज पहाडी हा नय्यर यान्च्या संगीताचा आत्मा आहेसे दिसते. हे दोन्ही राग धुन उगम असून त्यात बाराही स्वरांपैकी कोणत्याही स्वराचा कल्पकतेने वापर करता येतो. याचा फायदा प्रतिभावान संगीतकाराला मिळतोच मिळतो. "फिर ठेस लगी दिलको , हमपे इल्जाम है, मेरी जान तुमपे सद के" अशी एकसो एक गीते पिलू वापरून करताना, "न जाने क्यु , आज कोई प्यारसे , तारीफ करू क्या उसकी," ही गीते पाहाडी रागात झाली आहेत . बाकी भीमपलासी ( तुम्हारा चाहने वाला, छम छम घुन्गरू बोले) केदार ( आप युं ही अगर हमसे मिलते रहे, जाने तमन्ना क्या कर डाला) भूप वा शूद्ध कल्याण ( कितना हंसी है ये जहां , बडी ही तू नमकीन है मेरी बुलबुल लैला ) यमन ( फिर मिलोगी कभी , सवेरेका का सूरज , मेरा दिल मचल गाया ) भैरव /जोगिया ( रात भर का मेहमा अन्धेरा ) असे ही अभिजात संगीत दिसते.

बर्‍याच वेळा नय्यर यांचा गीताची सुरूवात रिदम नसलेल्या दोन चार ओळीनी सुरूवात होते . शायरीत या ओळीना कता असे म्हणतात. जमानेकी ऑखोने देखा हि यारो " या गीतातील ही कता पहा

नफरतसे जिन्हे तुम देखते हो
तुम मारतो हो ठोकर जिनको
क्या उनपे गुजरती है देखो
एक बार कभी घायल होकर
किंवा हमपे दिल आया तो बोलो क्या करोगे या गीतातील ही कता

खयालोंपर मेरे छाए हुवे मालूम होते हो ( रफी )
नही आये मगर आये हुवे मालूम होते हो ( शमशाद )

बडे खूबसूरत बडे ही हंसी लुटा जिसपे दिल तुम वहीं तो नही या गीताची ही कता

अनोखे वजाह हे सारे जमानेमे निराले है
ये आशिक कोन सी बस्तीके या रब रहने वाले है
फला फूला रहे या रब चमन मेरी उमीदोन्का
जिगर खून देकर मैने ये बूटे पाले है

उपसंहार -
खरे तर संगीत हा लेखनाचा विषय कसा होउ शकतो. एका बाजूला हारमोनियम वा कीबोर्ड घेऊन स्वरांच्या लहरींवर स्वार व्हायचा हा विषय. तरीही हा प्रयत्न केला आहे. ६० ते ७० वर्शात अनेक संगीतकारानी इथे आपली प्रतिभा दाखविली आहे. प्रत्येकाला शास्त्रीय संगीत, पाश्चात्य संगीत, अरेबिक संगीत, आफ्रीकी संगीत तसे भारतीय लोकगीत याच्या श्रवणाचा सृजनासाठी मोठा उपयोग झालेला आहेच. त्यामुळे तुम्हाला नोटेशन येते की नाही असले प्रश्न प्रतिभेपुढे निष्फळ ठरतात. रस्त्यावर जुनी पेटी घेऊन येणारा व वाजविणारा एक गरीब याचक कलाकार मला भेटला व शन्कर जय ला देखील सुचणार नाहीत अशा जागा त्याने मला "याद किया दिलने कहां हो तुम "या गीतातून ऐकवल्या. काय कप्पाळाचे संगीत शिक्षण त्याने घेतले असेल ? ओपी हे असेच कलाकार ! हे सगळे बहारदार काम त्यानी केले कसे यावर "मालिक की देन जो है" असेच उत्तर त्यानी देऊन ठेवले आहे. ओपी गेले त्यावेळी लताबाईनीच त्यांचे फ्युजन हे वैशिष्ट्य आपल्या श्राद्धान्जलीत अधोरेखित केले होते. त्यांचे संगीत बर्‍याच काळा पर्यत टिकून राहिल अशीही पुस्ती लताबाईनी जोडली.यात या दोन्ही महान कलाकारान्चा मोठेपणा दिसून येतो. आज ते नाहीत पण फिर वही दिल लाया हूं हे गीत लागले की मनात शरीरात डबल बेस घुमायला लागतो. पाय आपोआप ताल धरतात व मन म्हणते नय्यर जी , "बहोत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिन्दगीमे हुजूर आप आये " एक अनोखी अदा लेकर !

संगीत

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2016 - 8:12 am | अत्रुप्त आत्मा

लेख सावकाशच वाचावा लागणार आहे.. सध्या ही पोहोच. :)

आदूबाळ's picture

28 Jan 2016 - 12:25 pm | आदूबाळ

+१

कंसातली गाणी ऐकत ऐकत निवांत लेख परत वाचणार आहे.

प्रचेतस's picture

28 Jan 2016 - 9:38 am | प्रचेतस

सुरेख लेख.

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 9:53 am | संदीप डांगे

एक नंबर लेख. चौराकाका, धन्यवाद!

ओपीच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा उत्तम आढावा!
सगळीच गाणी अविस्मरणीय.
वा खू साठवली आहेच.

उगा काहितरीच's picture

28 Jan 2016 - 11:16 am | उगा काहितरीच

छान लेख. त्या काळात साधनांची कमतरता असूनही अजरामर संगीत निर्माण करणाऱ्याला सलाम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2016 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

खूप दिवसांनी लिहिलंय चौराजी, पण काय लिहिलंय !!!

सिनेमा एक भागात बसवल्याबद्दल निषेढ.

आता पहिली गोष्ट : झक्कास जमलेला लेख आणि निवांत वाचावा लागेल असा काही गाणे शोधावी लागतील (करंटेपणा आमचा दुसरं काय?). नक्की याचीच प्रिंट घेऊन ठेवणार आहे उगा नंतर रुख्रुख नको.

फक्त कानसेन नाखु
संगीतसमज (निशाणी)डावा अंगठा

विवेक ठाकूर's picture

28 Jan 2016 - 3:04 pm | विवेक ठाकूर

सलाम!

ओपी माझं दैवत आहेतच पण आज तुम्ही ज्या प्रकारे त्यांची ओळख करुन दिलीत त्याबद्दल लाख धन्यवाद! तुमची ही काँट्रीब्यूशन मला आयुष्यभर पुरेल.

मराठी कथालेखक's picture

28 Jan 2016 - 3:12 pm | मराठी कथालेखक

ओपींची गाणी मलाही आवडतात पण तरी कोणतही गाण जास्त वेळा ऐकल की मग जरा कंटाळा येतो. (एस डी आणि एस जे बाबत हे सहसा होत नाही. एखादे गाणे आवडते किंवा नाही आवडत, पण एकदा आवडलेल्या गाण्याचा नंतर कंटाळा येत नाही ).
ओपींच्या गाण्यात "मै प्यार का राही हू" आणि "कभी आर कभी पार" , "बाबूजी धीरे चलना" ही गाणी मला जास्त आवडतात.

मारवा's picture

28 Jan 2016 - 7:41 pm | मारवा

राजे !
दंडवत स्वीकारावा
अस सुंदर काही वाचलं की मिपावरची चक्कर वसुल होते.
खरच राजे तुम्ही ह

कुमार१'s picture

9 Nov 2019 - 12:30 pm | कुमार१

छान लेख.

त्यांचे "चल अकेला.. ," हे गाणे बंगाली गीतावरून घेतले आहे का ?

महामाया's picture

9 Nov 2019 - 6:46 pm | महामाया

सुंदर लेख...ओपीच्या संगीत दुनियेची मस्त सफर घडवल्याबद्दल धन्यवाद...

जॉनविक्क's picture

10 Nov 2019 - 9:05 am | जॉनविक्क

फास्ट स्क्रोल करता करता ओ पी नय्यर शैली - एक सांगितिक मरण असे टायटल वाचले अन छातीत धस्स झाले ना...

सुधीर कांदळकर's picture

11 Nov 2019 - 6:43 pm | सुधीर कांदळकर


आज आपण ओपी नय्यर एक व्यक्ती म्हणून क्से अहंकारी, हट्टी, दिलदार, लेडीकिलर होते किंवा नव्हते याचे चर्वण काही करणार नाही

.

छान. आवडले.


सलीलदा मदनमोहनचे सिम्फनी शैलीचे संगीत,

पार्‍यासारखी शब्दात पकडता न येणारी गोष्ट - शैली मस्त शब्दबद्ध केली आहे.


नय्यर हे अनेक गोष्टीचे बादशहा मानता येतात, स्वरान्चे, लगावाचे, युगलगीतां , रोमान्सचे, हरकती मुरक्यांचे मीण्डकामाचे , तालाचे, मुख्यत: तालातील फ्युजनचे व स्वरातील आकृतिबन्धाचे. वास्तविक स्वरांचा एक आकृतिबन्ध निर्माण करणे व त्यात स्वरबदल करून तो पुनरावृती करून वापरणे हे संगीत संयोजनातील एक सामान्य तत्व आहे. पण त्यात नय्यर यानी जे काम केले आहे ते अचाट आहे.

अहाहा! शब्दातीत गोष्ट कशी शब्दबद्ध करावी याचा सुरेख नमुना.


बर्‍याच वेळा नय्यर यांचा गीताची सुरूवात रिदम नसलेल्या दोन चार ओळीनी सुरूवात होते . शायरीत या ओळीना कता असे म्हणतात. जमानेकी ऑखोने देखा हि यारो " या गीतातील ही कता पहा

वा ठाऊक नसलेली गोष्ट तुमच्यामुळे कळली.

आपला व्यासंग जबरदस्त आहे. ओपींचे नाव वाचल्यावर आठवले ते ते त्यांच्या जीवघेणी ओढ लावणार्‍या अफलातून मेलडीज आणि पंजाबी, दीपचंदी आणि केरव्यातले घाटदार ठेके. या मेलडीज जीवघेण्या का वाटतात त्याचे नेमके शब्दांकन ही जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आपण केलेली आहे. लक्ष लक्ष सलाम आणि तितकेच धन्यवाद.

चौकटराजा's picture

12 Nov 2019 - 1:23 pm | चौकटराजा

"शुभ्र काही जीवघेणे " या नावाचे अंबरीश मिश्र यांचे एक पुस्तक आहे त्यात " ओ पी " वर एक लेख आहे !

सुधीर कांदळकर's picture

11 Nov 2019 - 6:45 pm | सुधीर कांदळकर


आज आपण ओपी नय्यर एक व्यक्ती म्हणून क्से अहंकारी, हट्टी, दिलदार, लेडीकिलर होते किंवा नव्हते याचे चर्वण काही करणार नाही

.

छान. आवडले.


सलीलदा मदनमोहनचे सिम्फनी शैलीचे संगीत,

पार्‍यासारखी शब्दात पकडता न येणारी गोष्ट - शैली मस्त शब्दबद्ध केली आहे.


नय्यर हे अनेक गोष्टीचे बादशहा मानता येतात, स्वरान्चे, लगावाचे, युगलगीतां , रोमान्सचे, हरकती मुरक्यांचे मीण्डकामाचे , तालाचे, मुख्यत: तालातील फ्युजनचे व स्वरातील आकृतिबन्धाचे. वास्तविक स्वरांचा एक आकृतिबन्ध निर्माण करणे व त्यात स्वरबदल करून तो पुनरावृती करून वापरणे हे संगीत संयोजनातील एक सामान्य तत्व आहे. पण त्यात नय्यर यानी जे काम केले आहे ते अचाट आहे.

अहाहा! शब्दातीत गोष्ट कशी शब्दबद्ध करावी याचा सुरेख नमुना.


बर्‍याच वेळा नय्यर यांचा गीताची सुरूवात रिदम नसलेल्या दोन चार ओळीनी सुरूवात होते . शायरीत या ओळीना कता असे म्हणतात. जमानेकी ऑखोने देखा हि यारो " या गीतातील ही कता पहा

वा ठाऊक नसलेली गोष्ट तुमच्यामुळे कळली.

आपला व्यासंग जबरदस्त आहे. ओपींचे नाव वाचल्यावर आठवले ते ते त्यांच्या जीवघेणी ओढ लावणार्‍या अफलातून मेलडीज आणि पंजाबी, दीपचंदी आणि केरव्यातले घाटदार ठेके. या मेलडीज जीवघेण्या का वाटतात त्याचे नेमके शब्दांकन ही जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आपण केलेली आहे. लक्ष लक्ष सलाम आणि तितकेच धन्यवाद.

चौकटराजा's picture

12 Nov 2019 - 1:29 pm | चौकटराजा

रिदम चालू होण्याच्या अगोदरच्या काव्यपंक्ती या केवळ नैय्यर यांनीच वापरल्या असे नाही तर इतरांनीही वापरल्या उदा. नौशाद यांचे .." ओ दूरके मुसाफिर " हे उडन खटोला तील गीत किंवा त्यांचेच " जिंदाबाद जिंदाबात से मुहब्बत जिदाबाद हे कोहिनूर मधील गीत ऐका ! या ओळींना कता म्हणतात ही माहिती मला मात्र तुषार भाटिया ( ए लो जी सनम हम आ गाये फेम ) यांनी पुरविली होती.

शशिकांत ओक's picture

11 Nov 2019 - 11:37 pm | शशिकांत ओक

रंगलेल्या ओपींनी संबंध मधे एक वेगळाच बाज सादर केला होता. पण कदाचित पडता काळ, घसरती लोकप्रियता कडक आवड निवड यामुळे त्यांना आणखी प्रयोग करायला वाव मिळाला नसावा.

यशोधरा's picture

12 Nov 2019 - 1:30 pm | यशोधरा

लिखाण आवडलं. सज्जाद हुसैन ह्यांच्याबद्दल लिहिता?