माझ्या या स्वगताला कविता
म्हणायचे धाडस करु नका
हे फ़क्त हुंकार आहेत !
एका अतृप्त आत्म्याचे
नाकारलेल्या जीवाचे
ज्याला शरीरच मिळाले नही..........
हे आक्रंदन आहे
तडफ़डणा-या मनाचे,
ज्याचे संचित संपले आहे!
याला कवितेचा दोष देऊ नका!
हा शाप मी शब्दानी भोगतोय!
अश्वत्थाम्याचे प्राक्तन घेऊन
स्वत:ला शोधतोय!
वसंतात फ़ुले फ़ुलतील
आषाढात मेघ बरसतील
हि नियती आहे!
माझे शब्द अवेळी येणा-या
पक्षांप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय!
मी एवढेच सांगीन
जे दु:ख मी भोगतोय!
त्या वेदना इथे उमटतायेत!
ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वांझपणाच्या खुणा,
ह्याला लेणी म्हणु नका! फ़क्त दगड!
उन,वारा, पाऊस झेलणारा!
एवढेच फ़क्त!
विजयकुमार.................
प्रतिक्रिया
27 Jan 2016 - 10:36 pm | पैसा
कविता आवडली