मिपा नगरीची कहाणी!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
19 Jan 2016 - 7:11 pm

एक आटपाट नगर होतं,
मिपा नावाचं!
अत्यंत सुखी,समाधानी!
व्यक्तिस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य या मूल्यांचा आदर करणारं!
त्या मूल्यांना जपणारं!
इथे लोक राजालाही विरोध करायचे, खड़े बोल सुनवायचे!
पण राजा दयाळू होता. तो सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्यायचा.
मात्र एके दिवशी या नगरीत एक 'राकु'स आला.
धडाधड पक्क्या धाग्यानी तो लोकांचे गळे आवळत होता.
राजाने त्याचा संहार केला मात्र त्यात नगरीतल्या अनेक जणांची आहुति पडली!
प्रधान,सेनापती व राजगुरु यांची!
पुढचे काही दिवस नगर सुखाने नांदत होतं!
जुनं मिपा पुन्हा पहात होतं!
आता मात्र तीन शत्रू चालून आले!
'मोग'ल!
'महिषासुर'!
आणि 'पिनू पिवळी'!
तिघांच्या तीन तर्हा!
मोगल लोकांच्या धार्मिक भावना भडकवत असे, आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले तर राजाकडून त्यांचा तांडव करून अंत करत असे!
महिषासुर त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला सांगे आणि कोणी नाही म्हटलं तर त्यावर गरळ ओके!
पिनूची तर तर्हाच नवी!

तो असं काही लिहायचा की त्याचं लिखाण वाचुनच लोक आत्महत्या करायचे!
वर यांचा कांगावा इतका मोठा की राजाने अनेक चांगले लोक मीपाबाहेर तडिपार केले!
सर्वत्र नुसती घाण झाली होती!
मात्र लोकांना लवकरच चूक उमगली.
त्यानी असल्या उपद्व्यापाकडे लक्ष न देण्यास सुरुवात केली!
या तिघांचा जळून कोळसा झाला!
त्यानी अत्यंत तांडव केले!
आता मात्र राजाला चूक उमगली!
आणि त्याने या तिघांचा अवतार समाप्त केला!

गोष्ट सम्पली!
थोडी काल्पनिक पण बरीचशी खरी!
आता राजा,प्रधान,सेनापती,राजगुरु यांनी विचार करावा!
आणि मिपाकरांनी सुद्धा!

वावर

प्रतिक्रिया

होबासराव's picture

19 Jan 2016 - 8:56 pm | होबासराव

Moral Of The Story :- त्यानी असल्या उपद्व्यापाकडे लक्ष न देण्यास सुरुवात केली!
पटेश ! अमलात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेन !

अहो प्रयत्न या शब्दापाशी सगळं घोडं अडतय!
एवढी अक्कल शिकवून मीसुद्धा चार पाच गोळ्या मारून आलो ;)

उगा काहितरीच's picture

19 Jan 2016 - 9:49 pm | उगा काहितरीच

थोssssssssडं जास्त होतय असं नाही का वाटत ? एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने लगेच वासरू मारू नये. असं वाटते. तुमच्या भावना पोचल्या बऱ्याच अंशी सहमत पण आहे. पण अजाणतेपणे आपण आपल्याच मिपावरचे वातावरण खराब करतोय असं नाही वाटत का ? अर्थात हे माझे वैयक्तिक

अजाणतेपणे आपण आपल्याच मिपावरचे
वातावरण खराब करतोय असं नाही का वाटत?>>>>>>>>>
साहेब तुमचं म्हणणं पटतं, पण अहो या लोकाना कुणीतरी आवर घालायला हवा ना!
यांचा एकच नारा!
you hate me but you cant ignore me!

नीलमोहर's picture

20 Jan 2016 - 5:27 pm | नीलमोहर

प्रधान, सेनापती व राजगुरु - हे नीट कळलं नाही,
तुमचा तो हिंदूवाला धागा वाचला होता, तोही छान जमला होता, पण प्रतिक्रिया देण्याआधीच गायबला.

सम्पादक मंडळात किती जण आहेत?
;)
तो धागा आठ तासातच गायब झाला!

मितभाषी's picture

20 Jan 2016 - 10:15 pm | मितभाषी

डोक्यावरून गेली. =))
परधान काय नि राजगुरू काय हाहाहा.

अहो सम्पादक मंडळातिल तीन जण म्हणजेच प्रधान, सेनापती व राजगुरु -

मितभाषी's picture

20 Jan 2016 - 11:10 pm | मितभाषी

ते तिघे समर्थ आहेत.
अभ्यास वाढवा. मोठे व्हा. :)

DEADPOOL's picture

21 Jan 2016 - 6:27 am | DEADPOOL

ओके!

बोका-ए-आझम's picture

21 Jan 2016 - 6:57 am | बोका-ए-आझम

डेडपूलसाहेब, आवडेश. दुर्लक्ष करा हा सल्ला निदान तुम्ही उल्लेख केलेल्या लोकांच्या बाबतीत चुकीचा आहे. गटार फुटल्यावर दुर्लक्ष कसं करणार? ते साफ करायचं तर त्यात उतरायलाच लागतं. तरी अजून मिपावरची अनेक प्रस्थापित गटारं अजूनही अत्तराचे कारखाने म्हणून मिरवताहेत. पण ती मूळची गटारंच आहेत हे समजतंच. असो. जेव्हा ती फुटतील, तेव्हा किमान रुम फ्रेशनर तर मारावाच लागेल.

अहो पण ही गटारेच गंगा म्हणून पहिल्या पानावर वाहतात.
आता तुमचा मोसादचाच धागा इतका चांगला असूनही गटारामुळे पहिल्या पानावर नाही.

तुम्हासनी जायाचं कुटं ? मिपा बुद्रुक का खुर्दं? टिंपोत बशिवतो आन सुडतो.

अहो त्यापेक्षा लाट्कर काकांना सोडा ना मिपाबाहेर!

हेमंत लाटकर's picture

21 Jan 2016 - 7:08 pm | हेमंत लाटकर

लाट्कर काकांना सोडा ना मिपाबाहेर!

डेडजी, माझ्यावर फारच खार दिसतोय तुमचा. तुम्ही खरे कोण आहात.

पियुशा's picture

21 Jan 2016 - 1:30 pm | पियुशा

ओ ह्म्म अच्च जाल तल ;)

DEADPOOL's picture

21 Jan 2016 - 6:50 pm | DEADPOOL

अच्च्च झालं lll

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2016 - 6:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वतःच्या प्रतिक्रिया कधी लिहिणार?

तुमच्यासाठी लिवू ना क्यप्टन

सूड's picture

21 Jan 2016 - 7:40 pm | सूड

ओह आय सी!!