पाहीलं मी तुला

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
18 Jan 2016 - 6:14 pm

पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना
ते नाते अनामिक तु अनावर जपताना  ।।

पाहीलं मी तुला
तु एकांतात असताना, माझ्यासाठी झुरताना,
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुला माझं चित्र पाहताना
ओढ्याकिनारी फुलपाखरांशी गप्पा मारताना
माझे प्रतिबिंब समजून तूला स्वतःशीच बोलताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना  ।।

पाहीलं मी तुला
खळखळून हसताना, भरभरून जगताना
माझ्या दुःखाला कवटाळून तुला मुसमुसून रडताना,
तू नशिबाशी लढताना प्रत्येक वेळी जिंकताना, 
प्रेमासाठी माझ्या मात्र तुला वेळोवेळी हरताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना  ।।

कविता माझीकविता