[ती]
नवल वाटतय मला ,
इतक्या वर्षानी तूझी हाक आली ,
कदाचीत ,तुला वाटल असेल की ,
'काळाने ' माझी जखम भरली ….
जखम माझी अजूनही ओली ,
पण स्वप्नांनी आपल्या पांघरलेली
आठवते ? जुन्या स्वच्छंदी तारुण्यात,
सर्रकन पायाखालून जमीन सरकलेली .....
अंतर आपल्यात लाखो मैलांच …। मग कसं शक्य मीलन दोघांच ?
[मी ]
हजारदा आवाज दिला तूला ,
पण , साद नाही मिळाली मला
तुटतो मी, तुझ्या जीवासाठी
पण ,तू कुठे तुट्तेस माझ्यासाठी ?
आवडत नाही मला ,
माझ् दुख: तुझ्यापुढ सांडण
माहितेय , वेळ नाहीये दोघाकड
पण सोडवायचय मला हे कोडं ?
आता अंतर आपल्यात लाखो मैलांच …। तरीही शक्य मीलन दोघांच …….
(Apologies for typing error)