फ़ॆंटसी

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
11 Jan 2016 - 9:14 pm

माझी तुझ्यासोबतची फ़ॆंटसी
एकदम  साधी आहे…..

एक पावसाळी दिवस….
एक भिजलेला रस्ता….
एक एकली छत्री…….
त्यात मला बिलगलेली तु
अन तुझ्यासोबत शहारणारा मी………

एक गुलाबी थंडी….
एक धुक्याची चादर….
एक उबदार मिठी….
त्यात मला गवसलेली तु
अन तुझ्यामध्ये हरवलेला मी………

एक उतरणारी संध्याकाळ
एक हवाहवासा एकांत
एक बोलका स्पर्श
त्यात मला उमगलेली तु
अन तुला कळलेला मी…..

एक चमचमणारी आरास
एक मधहोशलेली रातराणी
एक मिलनोस्तुक रात्र
त्यात माझ्यासाठी सजलेली तु
अन फ़क्त तुझ्यासाठी आसुलेला मी……

असचं काहीसं……….

आवडली तर सांग...
नाही आवडली तरी सांग……...

कविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

14 Jan 2016 - 7:35 pm | एक एकटा एकटाच

सर्व १३३ वाचकांचे आभार......

:-)

पुढल्या वेळेस काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करीन

विजय पुरोहित's picture

4 Feb 2016 - 11:13 am | विजय पुरोहित

अप्रतिम अमोल...
अगदी उत्तम....
सुंदर सूचक मादक भावनांनी विणलेली...

अप्रतिम शृंगाररसाने सजलेली असून दुर्लक्षित का राहिली हे कळत नाही...
कदाचित नेहमीप्रमाणे काथ्याकुटी धुरळा चालू असेल...
असो आज परत मेन बोर्डावर आणतो...

पद्मावति's picture

4 Feb 2016 - 12:11 pm | पद्मावति

सुरेख!