नववर्षाभिनंदन

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
1 Jan 2016 - 4:27 pm

आज माझ्या मनाच्या कोपरयात एक पुस्तक सापडल. बरीच धूळ साठली होती त्यावर. जरा झटकल्यावर कळालं की मागच्या वर्षाच्या आठवणींच पुस्तक होतं ते..
गेल्या वर्षापासुन माझ्याही नकळत मी हे लिहित होतो. कोणतेही शब्द नाहीत.स्थळकाळाचे ,भाषेचे बंधंन नाही .आहेत त्या फक्त आठवणी.आता निवांत बसुन त्या फक्त वाचायच्या आहेत. अलकद ते पुस्तक अनुभवायला लागलो. अशी पुस्तक वाचायची थोडी असतात ती अनुभवयाची असतात.

पुस्तकाची काही पान पुसट झाली होती..काहीं अर्धवट .काही चक्क फाटलेली.काही माझ्याच डोळ्यांनी भिजलेली. काही वेळासाठी ते आघात करुन गेलेले क्षण समोर आले. तेंव्हा आघात वाटले ते आता फक्त मजा वाटती आहे.
पुढची काही पाने एकदम आखीव रेखीव.नव्या पुस्तकांना जसा एक वेगळाच वास येतो तसा या पानातुन आजही येतोय.

किती फाटकी किती चांगली याचा हिशोब करत बसलो नाही मी. मनाशी ठरवल की ही हिशोबवही नाही. त्यामुळे कितीही वाटल तरी एकही पान फाडायच नाही. मला फक्त मजकुराशी मतलब असायला हवा , पानांच्या स्थितीबाबत नव्हे.

या पुस्तकाची काय गंमत असते बघा. यांच्या मालिकेला शेवट कधीच नसतो. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण लिहित राहणार हा विश्वास आहे. आणि याची किंमत ? आपल्याच पुस्तकाची काय किंमत लावणार .भलेही काही अध्याय 'त्याने' लिहिले तर काही नशीबाने. त्यांनींही कधीही त्याची फी नाही मागितली.

आता नवे कोरे पुस्तक लिहायला घ्यायचयं. नवी माणसे येतील. जुन्यांचे नवे पैलू कळतील. इथे जरा गडबड होते. बरयाचवेळा आपण दुसरयांचे पुस्तक बळजाबरीने वाचायला घेतो. मधूनच वाचायला चालू करतो. आधीचे संदर्भ न कळल्याने मग दोन्ही पुस्तकांची पाने खराब होतात. शेवटी फाटतात ती कायमची.

जाता जाता एक शेवटची गोष्ट..सगळं जग हॅप्पी न्यु इयरचे मेसेज पाठवतयं ..मला वाटतय न्यु इयर कसे का असेना आपण हॅप्पी असलं की झालं...
So be happy in new year

मिपा परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

मुक्तक

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jan 2016 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

मला वाटतय न्यु इयर कसे का असेना आपण हॅप्पी असलं की झालं...

या दृष्टीकोनाला +१०००

मुक्त विहारि's picture

1 Jan 2016 - 5:05 pm | मुक्त विहारि

नूतन वर्षाभिनंदन...