नमस्कार मंडळी...
मी आज तुम्हा सर्वांसोबत माझे सवाई गंधर्व महोत्सवाचे फोटो शेअर करु इच्छीते.....
पंडीत जसराजजी..
मला यांचे फोटो काढायला नेहमीच आवडतं कारण यांचा चेहरा फार फोटोजेनीक आहे...
........................................................
पंडीत शिवकुमार शर्माजी
अतिशय देखणं व्यक्तीमत्व
पंडीत भिमसेन जोशी
( हा फोटो मी काढलेल नाही...माझ्या भावाने काढलेला आहे)
उर्वरीत फोटो नंतर टाकेन.....
आशा आहे तुम्हाला फोटो आवडतील....
धन्यवाद.... :)
प्रतिक्रिया
11 Sep 2008 - 11:23 am | आनंदयात्री
मिंटे काय सुरेख फोटो काढलेत गं.
४ नंबरचा तर फारच छान आलाय !
11 Sep 2008 - 11:27 am | स्वाती दिनेश
मस्त.. यात्रीसारखाच मलाही ४ नंचा फोटो जास्त आवडला.
स्वाती
11 Sep 2008 - 11:29 am | विसोबा खेचर
सुरवातीचेच काही फोटू आमच्या नावडत्या गायकाचे?! :)
सवाईगंधर्व महोत्सवाच्या अन् भारतीय अभिजात संगीताच्या अध्वर्यूंचे काही फोटू बघायला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती!
असो...
चांगला उपक्रम!
तात्या.
11 Sep 2008 - 11:50 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
11 Sep 2008 - 11:31 am | मृगनयनी
सुंदर ! गं मिंटे......
तुला गायनाची आवड आहे काय?
तु सिंगर तर नव्हे? :-?
11 Sep 2008 - 11:33 am | मिंटी
धन्यवाद.....
तात्या तसं बघायला गेलं तर मलाही जसराज जी आवडत नाहीत पण त्यांचे फोटो काढायला मात्र आवडतं कारण त्यांचे फोटो खुप मस्त येतात...
पण तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद... :)
मी पुढचे फोटो लवकरच टाकेन..
11 Sep 2008 - 11:51 am | धमाल मुलगा
क्या बात है|
जियो मिंटी, जियो!!!
मस्त फोटो...
क्लोजअप्सपण सही आलेत :)
पण, च्यामारी, नुसते फोटो पाहुन काय मजा येणार? तिथे हजर असणं हेच खरं सुख :)
(पुढच्या सवाईचे फोटो डब्ल्यू १३० ने काढणार ना? :) )
11 Sep 2008 - 12:43 pm | प्रमोद देव
मिंटे आवडल्या गं भावमुद्रा!
तुझा हात चांगला चालतो....छायाचित्रणात! :)
ह्या छायाचित्रात भीमसेनजी प्रवचन करणारे एखादे बुवा किंवा महाराज वाटताहेत.
त्यांची जुनी एखादी गातानाची प्रसन्न भावमुद्रा असलेली छबी असेल तर चढव इथे.
11 Sep 2008 - 12:33 pm | विसोबा खेचर
हम्म! आता कसं!
आमच्या अण्णांच्या फोटूमुळे आता या लेखाला शोभा आली!
आपला,
(अण्णांचा भक्त) तात्या.
11 Sep 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा
:(
काय थकलेत हो आण्णा आता :(
बाप रे, पाहुन कसंसंच झालं.
11 Sep 2008 - 12:39 pm | मिंटी
तात्या आणखी काही फोटो टाकेनच आण्णांचे लवकरच...
(तुमच्या सारखीच आण्णांची भक्त ) मिंटी
11 Sep 2008 - 4:36 pm | स्वाती राजेश
तुझी फोटोग्राफी वाखाणण्याजोगी आहे...
छान फोटो आलेत..क्लोज-अप तर अप्रतिम....त्यामुळे चेहर्यावरचे भाव दिसतात...किती मस्त आनंद घेत असावेत संगीताचा.....:)
11 Sep 2008 - 4:47 pm | ऋषिकेश
सगळे फोटो सपष्ट आले आहेत. आवडले.
पं शिवकुमार शर्मा यांच्या संबंधीत एक आठवण झाली. दोनेक वर्षांपूर्वी डोंबिवलीमधे चतुरंगच्या रंगसंमेलनात त्यांचे वादन होते. फ्लड लाईट मुळे त्यांच्या भोवती बरेच किडे, पाकोळ्या फिरू लागल्या. म्हणून त्यांनी स्टेजवरचे दिवे मालवायला सांगितले. तरीही हा त्रास थांबेना. शेवटी त्यांनी संतूराच्या दोन्ही काड्या एकाच हातात धरल्या व एका हाताने किडे हाकलत वाजवू लागले. तरीही डोळे बंद करून ऐकले असते तर कळले नसते की काहि व्यत्यय आला आहे. तिथेच मी त्यांच्या वादनाला सलाम ठोकला.
नंतर पूर्ण रात्र झाली तसे किडे गेले आणि मैफल रंगतच गेली.
बाकी थकलेल्या अण्णाना पाहून वाईट वाटले.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
11 Sep 2008 - 5:57 pm | श्रीमंत दामोदर पंत
वा !!!!!!!!!!!!
मस्त आहेत ग फोटो......
आपल्याकडे आण ना याच्या कॉपी...........
11 Sep 2008 - 10:10 pm | संदीप चित्रे
सवाई गंधर्वच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या !
धन्स मिंटी (-- एक खारोटी का ? महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीतली ! ;) )
(अवांतरः आमचे फोटो चांगले काढून दाखव तर मानलं !!!) :)
11 Sep 2008 - 10:15 pm | यशोधरा
छान आहेत गं सगळेच फोटो मिंटी, खूप आवडले.
पं भीमसेन जोशी किती थकलेत.... :(