निकरवरी मैनाराणी

सुरवंट's picture
सुरवंट in जे न देखे रवी...
25 Dec 2015 - 7:33 pm

वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या,
माहित नाही खास, काय घडले विशेष!
पण हाय!! निकर कड्यावरून घसरले,
अन मैना सगळ्या फांद्यांवर दिसल्या.

जितकी विद्वत्ता जास्त, तितक्या त्यांच्या मैना सप्तरंगी!
त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला.
‘निकरवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’
हाती लेखण्या घेतल्या, आणि निकर उडवणाऱ्या वादळामागे मैना सावरत मूढ सगळ्या अमाप धावल्या.
वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले,
‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’
......... ..............
काही वीरांगणा कृतिशील! फार चळवळ्या! गाल केवळ नाजूक!
म्हणाल्या, ‘आपल्या निकरच्या इतक्या विसविशीत गाठी कोणी बांधल्या?
शोधबिध काही नाही!! आम्हाला सगळे माहित आहे!
लढा गं लढा गं! कठीण समय आला!
घात त्यांनी इतका केला, घात त्यांचा करू चला!’
विवेकहीन हल्ले करता करता त्यांच्या मैना दमून गेल्या.
त्यांचा निकरचा शोध, मग हवेत विरून गेला.
............... ......................
शुक्रतारा मंदवारा, कसल्या कसल्य फुलांच्या बागा, त्यातल्या सुन्द्र्या बाळगणाऱ्या बिनकाम्या!
न पेलणाऱ्या वासनांचे बडबडगीत गाणाऱ्या गुलछबू मैनांना निकर उडालेली हवीच होती!
त्यांनी निवांत तंगड्या पसरल्या. म्हणाल्या,
‘बरे झाले देवा, उडाल्या त्या निकरा
राहिल्या त्या मैना, नव्या पाखरांची जरा, होईल नीट दैना!’
.................. .......................
ज्यांचे पोट हातावर, त्यांना कष्टाशिवाय दुसरे काय ठावूक?
त्यांच्या मैना उघड्या काय, झाकल्या काय,
कुठले वादळ आले काय, गेले काय,
त्यांना कशाचा पत्ताच नव्हता!
मैना सलामत तो निकर पचास,
या अनुभवसिद्ध समूहस्मरणावर त्यांची भिस्त!
गाठीबिठी राहू द्या! साधे फटकूर मिळाले तरी
त्यांचे चालण्यासारखे होते, त्यांच्या मैना अगदी साध्या होत्या
तेवढ्यावरती त्यांचे भागण्यासारखे होते!
......................... ..........................
गावाबाहेर दूर एक साध्वी रहात असे.
सगळ्या निकर तिला नीट माहित होत्या.
मैनांच्या नाना परी ती अचूक ओळखून होती.
तिने स्वतः कधी कोणती निकर वापरली नव्हती,
कि कधी कोणती मैना पाळली नव्हती!
तिच्या वाटेस कुणी कधी गेलेच तर ती
हसून कलंदर उत्तर देई,
‘उखाड ले जो उखाडना है,
मेरी मैना तो निकर से परे हैं!’
गाव तिला बिचकून असे, मनातल्या मनात तिला सलाम करे!
.............. .....................
बरेच दिवस ती सगळी गंमत पहात राहिली.
शेवटी एकदा गावात गेली.
निकर हरवून बसलेल्या सगळ्यांनाच ती
बिननिकरची साध्वी त्यादिवशी एकदम त्यांच्यातली वाटू लागली.
सगळे जमले. समस्या मांडली.
‘आमच्या मैना उघड्या बाई!
हरवलेली निकर शोधायची कशी?
नवीन निकर विणायची कशी?’
‘हो! हो! उतावळ्या मैनांनो शांत व्हा!’
एका भल्यामोठ्या पाषाणावर साध्वी शांतपणे बसली.
जवळची भलीमोठी पर्स उघडली.
त्यातनं एकेक निकर बाहेर काढून पाषाणावर अंथरू लागली. सगळ्याजणी डोळे फाडफाडून पाहू लागल्या.
‘इथे निकरा हरवल्या म्हणून, आम्ही कवाचे शोधतोय! आणि हिच्याकडे पहा थप्प्या .....!’
‘इतक्या निकरा हिच्याकडे कशा पण?’
‘चोर आहे ही साध्वी साली! आमच्या निकरा आम्हालाच दाखवते!’
पण तसं स्पष्ट तोंडावर बोलायची हिम्मत कुणातच नव्हती!
मिळाली तर त्यातली एकतरी निकर, प्रत्येकीलाच हवी होती!
दीर्घश्वास घेऊन, बायकांवर एक बाsssssरीक नजर टाकून साध्वी म्हणाली,
‘यातली, आपापली निकर ओळखून, जिची तिनं घेऊन जावी!
पण अट एकच - जर चुकीची निकर उचलाल, तर त्याक्षणी तुमच्या मैना गायब होतील!’
हे ऐकताच प्रत्येकीने घाबरून आपापल्या मैनेवर हात ठेवले.
प्रत्येकीचे मन धक्का लागून मागे सरकले.
मी मी म्हणणारऱ्या चतुरा, मैना हरवण्याच्या भितीने कासावीस झाल्या.
सगळ्या निकर एकसारख्या दिसत होत्या! ओळखायच्या कश्या?
बराच वेळ सन्नाटा पसरला.
मैना कि निकर या विचारात प्रत्येकजण हरवली.
साध्वीने आरामात सरबताचा ग्लास ऊचलला. म्हणाली,
‘विचार करा. घाई नाही. उद्या सगळ्या निकरा घेऊन मी परत इथे येईन!’
बायका आपापल्या मैनेसह घरोघरी परतल्या.
............. ............. ...................
तेव्हापासून आजपर्यंत दररोज ती साध्वी नित्यनेमाने सगळ्या निकर घेऊन त्या गावात जाते,
पाषाणावर एकएक निकर अंथरते.
बायकाही आपापल्या मैनेसह तिथे जातात.
पण, अजूनही स्वतःच्या निकरची ओळख न पटल्याने
दिशाहीन होऊन अंधारात सैरभैर गावभर भटकत राहतात......

_________

फवारा येथून उडाला : www.misalpav.com/node/33896

जिलबीकविता

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

25 Dec 2015 - 8:37 pm | DEADPOOL

मस्त जिलबी पाडलिय!
तीही नाही उमजली आणि हीही नाही!

राइटट बॉस. मलाबी नव्हती कळलं. हे बी न्हाई कळणार.

असो.

चांदणे संदीप's picture

25 Dec 2015 - 10:59 pm | चांदणे संदीप

काव्य सुरेख जमूनी ते आले
आधी पोपट आता मैना दावियेले
लंगोटातूनही उरून राहता, कसे
'निकरा'ने तत्वज्ञान पाजळून गेले!

श्री श्री श्री आदूबाळ यांच्या 'गोली-मार' पंथाची दीक्षाप्राप्त!
Sandy

पगला गजोधर's picture

26 Dec 2015 - 8:20 am | पगला गजोधर

n

अविनाशकुलकर्णी's picture

26 Dec 2015 - 12:14 am | अविनाशकुलकर्णी

निकर "विक्टोरियाज सिक्रेट" चा होति का???

संदीप डांगे's picture

26 Dec 2015 - 1:07 am | संदीप डांगे

ढूस्स्स्स....

तिमा's picture

26 Dec 2015 - 1:16 pm | तिमा

विडंबन जमले नाही. साध्वी वा कोणीही स्त्री, केवळ अज्ञानापोटीच, 'उखाड ले' असं म्हणू शकेल.

शिव कन्या's picture

26 Dec 2015 - 2:16 pm | शिव कन्या

सहमत! लंगोटच्या जागी निकर म्हणल्याने विडंबन नाय होत.
मूळ फवारा झेपाया फायजे त्यासाठी!