नमस्कार मंडळी,
शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाला अशा यशस्वी उपक्रमांनंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेखमाला. आधीच्या दोन उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरून आज आम्ही ही घोषणा करत आहोत. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटीपेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमतीजंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे. लेखमालेचा पहिला लेख २६ जानेवारीला प्रकाशित होईल आणि लेख येण्याची शेवटची मुदत असेल १५ जानेवारी.
आलेल्या प्रवेशिकांमधून लेख निवडण्याचं काम सासं मंडळ करेल. जे लेख निवडले जाणार नाहीत, त्यांना नेहमीप्रमाणेच मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं असेल. जास्तीत जास्त लेख घ्यायचा आमचा प्रयत्न राहील. प्रवेशिका आल्यावर त्याची पोच म्हणून आम्ही लेखकाला एक व्यनि करू. तुम्हाला व्यनि न आल्यास सासंमंला विचारणा करावी, म्हणजे प्रवेशिका पोहोचली नाही असं होणार नाही.
या वेळी आम्ही एक गुगल फॉर्म बनवला आहे. इच्छुकांनी या प्रवेशिका आधी भरून द्याव्यात, जेणेकरून आम्हाला फॉलो अप घेणं, लेखमालेच्या आवाक्याचा अंदाज येणं, त्यासाठी अनुक्रमणिका बनवणं इत्यादी कामांना सुरुवात करता येईल. या प्रवेशिकांची अंतिम मुदत आहे २७ डिसेंबर.
लेख पाठवताना ते साहित्य संपादक या आयडीवर व्यनि करून पाठवावेत.
गुगल फॉर्म या दुव्यावर बघता येईल.
Loading...
विषयांची यादी फॉर्ममध्येदेखील बघता येईल, शिवाय इथेही डकवली आहे.
१. प्राचीन आणि अर्वाचीन ऋषी (वैज्ञानिक आणि त्यांच्या सुरस कथा)
२. आर्यभट्टाचे वारस (भारतीय विज्ञान परंपरा - आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित, सर्व प्रकारचे संशोधक)
३. विज्ञान सूक्त (मूलभूत विज्ञान संशोधनावरील (Pure science researchवरील) लेख प्रामुख्याने यावेत. astrophysics, chemistry, geology, maths, material sciences, oceanography, operations research, physics, statistics, agricultural science, biochemistry, bioinformatics, biomedical science / engineering, biophysics, biotechnology, botany and environmental science)
४. विज्ञानस्य कथा : (खुसखुशीत माहिती, विज्ञानातील गमतीजमती - उदा. चार्ल्स गुडइयरला लागलेला व्हल्कनाइज्ड रबरचा शोध, केक्युलेला स्वप्नामध्ये सापांची रिंग दिसल्यामुळे लागलेला बेन्झीन रिंगचा शोध इ. असे, पण काहीसे अप्रसिद्ध. सेरेंडिपिटीने लागलेले शोध वगैरे.)
५. हे माहीत आहे का? (सर्वसामान्यांना फारसे माहीत नसलेले विषय - उदा. 'इथॉलॉजी' (Ethology - प्राण्यांचं स्वभावशास्त्र)
६. समांतर वैज्ञानिक (विज्ञानप्रसार करणार्या व्यक्ती-संस्थांबद्दल - उदा. अरविंद गुप्ता, मराठी विज्ञान परिषद, TIFRचा 'Chai & Why' उपक्रम इ,)
७. राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान
८. विज्ञानाचा भस्मासूर (वैज्ञानिक शोधांचे विध्वंसक उपयोग, उदा: अणुबाँब)
९. अद्भुत विज्ञान (पिरॅमिड्स, आश्चर्यचकित करणारी काही वास्तुशिल्पं, काही घटना, काही शोध इ.)
१०. इतर
चला तर मंडळी, कामाला लागू या. एकाहून एक सरस आणि सकस लेखमाला आजवर आपल्यातल्या गुणी लेखकांच्या जिवावर मिपाने सादर केल्या. ही लेखमालादेखील त्याला अपवाद नाही.
तुमच्या भरघोस प्रतिसादांच्या प्रतीक्षेत,
- साहित्य संपादक मंडळ
प्रतिक्रिया
15 Dec 2015 - 8:56 am | रातराणी
वा! शुभेच्छा. नवीन मेजवानीच्या प्रतिक्षेत :)
15 Dec 2015 - 9:39 am | मार्मिक गोडसे
चांगला उपक्रम. शुभेच्छा.
15 Dec 2015 - 12:37 pm | जातवेद
+१
15 Dec 2015 - 10:18 am | उगा काहितरीच
शुभेच्छा ! नवीन मेजवानी मिळणार तर...
15 Dec 2015 - 10:37 am | आतिवास
उत्तम कल्पना आहे.
समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र .... या देखील शास्त्रशाखाच आहेत, त्यावरही कोणीतरी लिहील अशा अपेक्षेत.
15 Dec 2015 - 7:19 pm | स्रुजा
नक्कीच त्या शाखांमधलं शास्त्रिय वैशिष्ट्य उठुन दिसेल अशा लेखांचं स्वागत च आहे. आम्ही म्हणुन च " इतर" हा पर्याय ठेवला आहे.
16 Dec 2015 - 3:31 am | प्रभाकर पेठकर
त्यात पाकशास्त्रालाही जागा आहे का?
16 Dec 2015 - 3:32 am | स्रुजा
स्वयंपाक घरातल्या विज्ञानाला आहे.
16 Dec 2015 - 11:37 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद. प्रयत्न करतो.
15 Dec 2015 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा
अतिशय उत्तम उपक्रम..धन्यवाद.
15 Dec 2015 - 11:44 am | एस
एकाच विषयावर दोन लेख यायला नकोत यासाठी वरील प्रवेशिकांमध्ये ज्या नोंदी झाल्या आहेत त्या सर्वांना दिसाव्यात अशी सूचना करतो. अर्थात, सासंमंचा निर्णय अंतिम हे मान्य.
15 Dec 2015 - 11:52 am | सस्नेह
एकाच विषयावर दोन लेख जरी आले तरी हरकत नाही. कारण प्रत्येक लेखकाचे ज्ञान आणि माहिती कक्षा वेगळीच असेल.
15 Dec 2015 - 1:00 pm | जव्हेरगंज
15 Dec 2015 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम उपक्रम ! हार्दीक शुभेच्छा !
15 Dec 2015 - 1:24 pm | वॉल्टर व्हाईट
स्पर्धा आयोजित करतांना प्रोजेक्ट मेनेजमेण्ट विशेष लक्ष दिले आहे असे दिसतेय, हे विशेष आवडले. माहितीपूर्ण निवेदनाची ओघावती भाषा, येणार्या लेखनाची पोच देण्याची दाखवेलॆ तयारी हेही कौतुकास्पद. साहित्य संपादक मंडळास शुभेच्छा.
15 Dec 2015 - 8:09 pm | स्रुजा
धन्यवाद. फक्त एक च छोटीशी सूचना: ही स्पर्धा अशी नाहीये. पुढे येणार्या काही उपक्रमांचा विचार करता लेखमाला वेळेत संपायला हवी. म्हणजे सगळ्यांना आस्वाद घेता येईल. शिवाय लेखमालेच्या नियमांत अथवा स्वभावात न बसणारे लेख घेता येणार नाहीत इतकंच. म्हणुन निवड केली जाईल.
15 Dec 2015 - 2:11 pm | पिलीयन रायडर
हे निवेदन आवडले. सुटसुटीत आणि छान लिहीले आहे.
गुगल फॉर्म वगैरे आयडीया मस्तच.
बिल्ला क्रमांक कसा पहायचा हे माहिती आहे का सगळ्यांना? मला नाही माहिती!
15 Dec 2015 - 3:13 pm | सस्नेह
तुझा बिल्ला क्र. 14092 आहे. तुझ्या आयडीवर क्लिकव, म्हणजे दिसेल.
15 Dec 2015 - 3:27 pm | पिलीयन रायडर
अगं मला असं दिसतं क्लिकवलं की:- http://www.misalpav.com/user/me
म्हणुनच विचारलं की कसा पहावा? तुझा कसा पहायचा ते मला माहितीये.. स्वतःचा कसा पहाय्चा ते माहित नाही..
15 Dec 2015 - 3:31 pm | सस्नेह
या वरच्या प्रतिसादातल्या तुझ्या नावावर क्लिकव पाहू.
15 Dec 2015 - 3:35 pm | पिलीयन रायडर
हां!!! समजलं समजलं!!
15 Dec 2015 - 7:30 pm | स्रुजा
इतर ही कुणाला हा प्रश्न असला तर या इमेज मध्ये दाखवलं आहे तसं सदस्य यादीतून अथवा प्रतिसादातील स्वतःच्या सदस्यनामावरुन बिल्ला क्रमांक शोधता येतो:
15 Dec 2015 - 2:34 pm | विजुभाऊ
विज्ञान कथा = सायन्स फिक्शन चालतील का?
15 Dec 2015 - 3:16 pm | आदूबाळ
मराठी आणि इंग्रजीतल्या सायन्स फिक्शनचा आढावा घेणारा लेख जास्त आवडेल. (लई नाही मागणं?)
फेब्रुवारी महिन्यात मराठी दिनानिमित्त कथा स्पर्धा आयोजित करायचा विचार आहे - त्यात विज्ञान कथा जास्त शोभून दिसेल.
18 Dec 2015 - 3:53 pm | गुलाम
सॉरी, पण सायन्स फिक्शन चालेल की नाही कळलं नाही.
18 Dec 2015 - 4:33 pm | आदूबाळ
कथा स्पर्धेत चालेल. विज्ञान लेखमालेत विज्ञानाची ओळख करून देणारे लेख अपेक्षित आहेत.
15 Dec 2015 - 2:42 pm | मितान
उत्तम कल्पना !!
15 Dec 2015 - 2:47 pm | जेपी
+11
15 Dec 2015 - 2:53 pm | जागु
छान.
15 Dec 2015 - 3:22 pm | आनंदराव
छान
15 Dec 2015 - 4:41 pm | सुमीत भातखंडे
उतम कल्पना.
अनेक शुभेच्छा! लेखमाला मस्त होणार यात शंकाच नाही.
15 Dec 2015 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रमासाठी शुभेच्छा.सहभागी होऊच.
-दिलीप बिरुटे
15 Dec 2015 - 7:26 pm | मुक्त विहारि
मेजवानीच्या प्रतिक्षेत.
15 Dec 2015 - 8:28 pm | वगिश
लेखमालेस शुभेच्छा. प्रतीक्षेत.
15 Dec 2015 - 9:30 pm | कंजूस
काल्पनिक आणि नवीनच्या प्रतिक्षेत.
तिकडून काढलं( गुगल,विकि इत्यादी) आणि इकडं चिकटवलं असं नकोय.उदा- फोटोग्राफी तंत्रावर इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे ती देण्यापेक्षा माझी वाटचाल आणि गमती जमती अपेक्षित.
16 Dec 2015 - 9:49 am | कैलासवासी सोन्याबापु
मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर येतो, मला टोकन क्रमांक पहायला साधत नाहिये, कोणी मदत करू शकेल का? धन्यवाद
बाप्या
16 Dec 2015 - 9:50 am | प्रचेतस
२३८३५ )
16 Dec 2015 - 9:55 am | यशोधरा
२३८३५
16 Dec 2015 - 10:37 am | कंजूस
मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर येतो-----
फोनवरून "राइट क्लिक " वगैरे करता येत नाही त्या ऐवजी नावावर क्लिक करून ते पेज 'बुकमार्क' करायचं की सापडतं.
अगदी छोटुकला फोन असला तर "opera mini 8.1" download करा ( ४०० kb ) त्यात आहे कॅापी पेस्ट पर्याय.
16 Dec 2015 - 10:12 am | कैलासवासी सोन्याबापु
आभारी आहे वल्ली जी अन यशोधरा तै :)
16 Dec 2015 - 10:25 am | पिवळा डांबिस
पण एक शंका आहे...
ज्याला काही विज्ञानविषयक लिहायचं असेल त्याला एरवीही मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं आहेच की.
मग हा आधी प्रवेशिका पाठवा, त्याबर सासं मंडळ (हे कोण/काय आहे ते देवच जाणे!) त्याच्याकडून नियुक्त करून घ्या, हा सगळा उपद्व्याप कशाला?
फक्त लेखापुढे 'विज्ञान लेखमाला' हे टायटल लावून घ्यायला?
आणि जर ते टायटल मिळालं नाही तर तो लेख विज्ञानविषयक म्हणून गणला जाणार नाही का?
:)
16 Dec 2015 - 11:15 am | जातवेद
मला वाटते, निवडलेले लेख वाचनीय असतील अशी हमी मिळेल आणि त्यांची थोडीफार प्रसिद्धी असेल. शिवाय थोडेफार संपादन साहाय्य पण मिळण्याची आशा आहे. आणि स्पर्धात्मक अंगाने जाणारा उपक्रम असल्यामुळे लिहिणारे योग्य ती काळजी घेतील.
16 Dec 2015 - 12:01 pm | पिलीयन रायडर
तसं तर कुठल्याच लेखमालेला किंवा अंकाला काय अर्थ आहे मग काका!! मेन बोर्ड सदैव खुला आहेच की!
16 Dec 2015 - 1:41 pm | वॉल्टर व्हाईट
विज्ञानविषयक म्हणून गणला जाईल पण लेखमालेतला म्हणुन नाही. तुमच्या व्यवसायात टिम बिल्डिंग साठी काही करतच असतील ना, त्यासारखा एक्सर्साईज समजून द्या तुम्ही पण तुमचा लेख.
16 Dec 2015 - 12:13 pm | कंजूस
बुफे/ पंगत कसंही येऊ द्या, न्याय देऊ भरपूर.
16 Dec 2015 - 1:52 pm | अभ्या..
एखाद्या तंत्रज्ञानावर/तंत्रावर (मंत्रवाले नव्हे) लेख लिहिला तर चालल काय?
तंत्रज्ञान अन विज्ञान संगतीनेच चालतात म्हणून विचारतोय?
17 Dec 2015 - 5:20 am | स्रुजा
तंत्रज्ञान आणि विज्ञान मध्ये हलकासा फरक आहे. तुम्ही प्रवेशिका भरुन त्यात स्पष्ट करु शकाल का तुमच्या लेखाचा विषय? म्हणजे मग आम्हाला ही नीट अंदाज येईल.
17 Dec 2015 - 8:31 am | चतुरंग
शुभेच्छा! :)
23 Dec 2015 - 5:55 pm | एस
27 December is close. Hurry!
(Marathi ka umatat naahiye?)
23 Dec 2015 - 5:58 pm | मोदक
चांगला उपक्रम. शुभेच्छा.
23 Dec 2015 - 6:00 pm | मोगा
वैद्यकीय , आजार , उपचार हेही येईल का?
24 Dec 2015 - 10:59 am | साहित्य संपादक
२७ डिसेंबर ही प्रवेशिकांसाठी अंतिम मुदत आहे, लेख १५ जानेवारी पर्यंत दिला तरी चालेल. वैद्यकिय शास्त्राबद्दल लेख चालेल. प्रवेशिका पाठवुन तपशील पाठवल्यास बरं होईल.
23 Dec 2015 - 11:56 pm | palambar
वा छान विशय
9 Jan 2016 - 10:51 pm | साहित्य संपादक
मंडळी, प्रवेशिका येऊन पोहोचल्या आहेत. त्याची पोच पावती देखील गेली आहे. लेखन कुठपर्यंत आलं? लेखनास शुभेच्छा आणि १५ जानेवारी पर्यंत आपले लेख येतील अशी शुभेच्छा.
कुणाला प्रवेशिका पाठवण्यात अडचण आली अथवा धागा पाहिला नाही म्हणुन प्रवेशिका पाठवता आली नसेल तर आज किंवा उद्या प्रवेशिका स्विकारल्या जातील.
15 Jan 2016 - 1:16 am | Jack_Bauer
अतिशय चांगला उपक्रम परंतु काही कारणास्तव मला मीपा वर येण जमलं नाही. मी उद्या पर्यंत लेख पाठवू शकतो का ? कि आता खूप उशीर झाला आहे ?
15 Jan 2016 - 2:08 am | साहित्य संपादक
पाठवा, हरकत नाही. साहित्य संपादक या आयडीला लेख व्यनि करा.
17 Jan 2016 - 4:16 am | Jack_Bauer
आपल्याला लेख साहित्य संपादक या आयडीला व्यनि केला आहे. US मधल्या रात्री बर्याचदा मिपा ऑफ लाईन असल्याने उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.
18 Jan 2016 - 7:56 pm | Jack_Bauer
लेख आपल्याला २ दिवसांपूर्वी व्यनि केला आहे. आपल्याला मिळाला असेल तर कृपया पोच द्यावी. काही कारणास्तव आपल्याला लेख मिळाला नसेल तर आपल्याला इतर कोणत्या मार्गाने लेख पाठवू या बाबतीत मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
18 Jan 2016 - 8:23 pm | साहित्य संपादक
लेख मिळाला आहे. उशिराबद्दल क्षमस्व.
15 Jan 2016 - 9:31 am | कैलासवासी सोन्याबापु
माननीय साहित्य संपादक महोदय,
लेखात आकस्मिक काही एक अनालॉजी चुकल्याचा अविषकर झाल्यामुळे आता ती दुरुस्त करायच्या मागे लागलो आहे तरीही जर लेख आज सायंकाळ किंवा उद्या पर्यंत द्यायची परवानगी द्यावी अशी नम्र विनंती अन पुन्हा प्रूफ रीडिंग मधे मोठ्या चुका कमीत कमी निघतील असे लेखन करायचा मी वादा करतो
(ओशाळलेला) बाप्या
15 Jan 2016 - 10:13 am | साहित्य संपादक
हरकत नाही बापु , उद्यापर्यंत लेख द्या. नूलकर काका आपले प्रूफ रीडिंग करतीलच. तुम्हाला समाधानकारक वाटला की लेख पाठवुन द्या.
15 Jan 2016 - 11:56 am | कैलासवासी सोन्याबापु
खुप खुप आभार :) ___/\___
15 Jan 2016 - 11:59 am | शान्तिप्रिय
मी माझा लेख काल पाठवला आहे. क्रुपया मिळाल्याचा व्यनि करावा.
15 Jan 2016 - 5:41 pm | साहित्य संपादक
लेख मिळाला आहे, धन्यवाद.
15 Jan 2016 - 8:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
साहित्य संपादक महोदय,
गूगल फॉर्म मधे नोंदवलेल्या विषयावर लेख लिहुन नुकताच पाठवला आहे, कृपया पोच व्यनि अथवा इथे कॉमेंट रुपात दिल्यास आभारी राहु
(बालके) बाप्या
17 Jan 2016 - 7:43 am | कंजूस
विज्ञान/गणित आपण कॅालेजात इंग्रजीत शिकतो.वैद्यकीय/गणित यातले लेख खूप विस्तृत समीकरणे शास्त्रिय नावे ( इंग्रजी /मराठी) देऊन लिहिले तर त्या शाखेतले लोक समजतील आणि यात काय नवीन म्हणतील.सामान्य लोकांसाठी लिहिले तर असे किती वाचक उत्सुकता दाखवतील हा मोठा प्रश्न पडतो.निरुपयोगी साहित्य न वाचण्याकडे फार कल असतो.तारेवरची कसरतच आहे.
20 Jan 2016 - 6:50 am | चौकटराजा
एक नक्की की जे काही इथे येणार आहे ते कुणाचेही स्वत :चे नसणार आहे.रहाता राहिली मांडणी !ती उत्तम पणे आज देखील एस ,अभ्या,घासकडवी करत आहेतच की !बाकी पाकशास्त्र,वास्तूशास्त्र,मूर्तीशास्त्र ,समाजशास्त्र अर्थशास्त्र ही विद्न्याने असतील तर चालू दया मग !
20 Jan 2016 - 6:23 pm | आदूबाळ
हैय्य... अर्थशास्त्र विज्ञान का नाही म्हणे?
21 Jan 2016 - 5:27 pm | चौकटराजा
अर्थशास्त्र हे शास्त्र आहेच 1कारण त्यात पद्धतशीर अभ्यास आहे पण त्या अभ्यासाचा आवाका मानवी जगताइतपतच .पण जगात वनस्पती आहेत ,प्राणी आहेत.त्यान्च्य्याही वर्तणु कीला स्पर्श करणारे ते विज्ञ्यान. उदा सैबेरियातून थंडीत बाहेर पडणारे पक्षी व आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वेटर शिवून तिथेच रहाणारा मानव हे विद्न्यानाचा आपापल्या परीने स्वीकार करताना दिसतात. पण सैबेरियातील अर्थशास्त्र फ़क्त तेथील मानवच जवळ करताना दिसेल. अशा रितीने गणित हे देखील विद्न्यान नव्हे ती मापनाची मानवी भाषा आहे.
20 Jan 2016 - 5:23 pm | मयुरMK
फोटो - अंतरजालावरून वरून साभार