बंडुमामाची बंडुमामी
जगावेगळ बोलायची
भविष्यातल्या सोनेरी
स्वप्नांची दारे
अलगद खोलायाची
लाळ गाळत हसताना
नको तिथे
दाबायची !
सावलीसारखा इल्या
तसचं वागायचा
भिरभिरणा-या भोव-यासारखा
मागे मागे लागायचा
पंखवाला स्वप्नातला घोडा
हळूच जमीनीवर
आणून सोडायचा !
बंडुमामाची सवयच
निराळी
चिलमीचा बार भारताच
रंगायची स्वारी,
घरामागच्या छपरात
बंडुमामी कबुतरं उडवायची
अन्
बंडुमामाची गाडी
रुळावरनं घसरायची !
कुणी अक्करमाश्या
म्हटलं कि इल्या
फिदीफिदी हसायचा
तेवढ्यापुरता बंडुमामाचा
चेहरा धुरात बुडायचा
अन्
बंडुमामी परसात जाताच
जादूचा दरवाजा
बंद व्हायचा !
चिलमीच्या धुरात
बंडुमामा जळून गेला
इल्या आता ओसरीवर
एकटाच राहिला,
तोपर्यंत स्वप्नातल्या
कळ्यांची फुली झाली
अन्
बंडुमामीची रयाच गेली !
अक्करमाश्या इल्या
आता चिलमीच्या धुरात
बुडतो
कोवळ्या वयात करपलेल्या
नजरेला घेवून
मी
इल्याकडे बघत असतो !
विजयकुमार.........
०९.०९.२००९
प्रतिक्रिया
7 Dec 2015 - 1:57 pm | अभ्या..
गविराजांचा 'टोलनाक्यावरचा बामन' आठवला.
7 Dec 2015 - 2:04 pm | दमामि
जब्बरदस्त!
7 Dec 2015 - 2:11 pm | मारवा
सिम्पली सुपर्ब !
7 Dec 2015 - 10:32 pm | पालीचा खंडोबा १
हा हा
7 Dec 2015 - 10:39 pm | जव्हेरगंज
वंटास!!!
8 Dec 2015 - 8:46 am | नाखु
असलं आणि अस्सल वाचलंकी ८-१० पकावू धागे वाचण्याचा राग्/क्षोभ शांत होतो म्हणून !!!
खंडुराया कृपा असू दे म्हाराजा....
येळ्येळ्कोट जय मल्हार !!!
8 Dec 2015 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा
+१ अशेच म्हनीतो!
8 Dec 2015 - 9:12 am | बोका-ए-आझम
मस्तच! गारंबीचा बापू मधले प्रसंग आठवले!
8 Dec 2015 - 12:36 pm | पालीचा खंडोबा १
तुम्ही पण चं लिव्ह्ता कि राव १ द्या टोले अश्या प्रकारातले. विनोदी चांगले लिहू शकाल तुम्ही प्रयत्न करा. बहुतेक तुम्ही पण लिहित असाल पण आमि काय ते वाचला नाय बगा
8 Dec 2015 - 10:07 am | नगरीनिरंजन
छान!
8 Dec 2015 - 12:34 pm | पालीचा खंडोबा १
धन्यवाद मित्रानो ! नाही तर काही लोक म्हणायचे हि पण कुठलीतरी कॉपी आहे. हा! हा! हा !