http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/9634...
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 3:17 pm | बॅटमॅन
अगदी अगदी.
4 Dec 2015 - 1:32 pm | पिवळा डांबिस
गोव्यात 'ती' पोलिटिकल पॉवर आजवर अनेक वर्षे पर्रीकरांच्या रूपात होती. त्यांनी हे उद्योगधंदे केले नाहीत. ते खरे गोवेकर आहेत.
आता ते दिल्लीत गेल्यावर हे बाहेरचे लोकं हे उद्योग करताहेत.
उद्या जर कानडी लोकांनी पुण्यातल्या कॅम्पाचं 'चामुंडरायनगर' म्हणून नामकरण करा अशी मागणी केली तर दैनिक सकाळ मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराची काय अवस्था होईल?
=))
4 Dec 2015 - 2:05 pm | बॅटमॅन
बेळगाव परिसरार यळ्ळूर नामक एक गाव आहे. कर्नाटकात असूनही ग्रामस्थ "महाराष्ट्र राज्य" अशीच पाटी लावतात कायम. =)) तितके चिवट असतील तर म्हणतीलही, नैतर काय? =))
बाकी मिरजेचे नामांतरण मूर्तजाबाद असे केले जात नाही तोवर आम्हांला नामांतराची तादृश चिन्ता नाही हे खरेच. ;)
तरी एक कल्चरल सिंबॉल म्हणून हे केले जाते आणि त्यात वाईट काही नाही असे माझे मत आहे. असो.
11 Dec 2015 - 11:23 am | पिवळा डांबिस
तो वेगळा विषय आहे.
सीमाभागातल्या जनतेने त्यांचं कर्नाटकात घातलं जाणं अजूनही मान्य केलेलं नाहिये.
ते स्वतःला अजूनही महाराष्ट्राचाच भाग मानतात.
त्या लोकांविषयी अतीव म्हणजे अतीव आदर आहे.
गोव्याचं तसं नाहिये. गोवेकरांनी बहुसंख्येने महाराष्ट्रात सामील न होता त्यांचं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखायाचा मतदानातर्फे निर्णय घेतलाय.
तेंव्हा आता गोव्याच्या बाहेरच्यांनी त्या मतदानाचा आदर राखून गोवेकरांना जे काही हवंय ते केलं पाहिजे.
11 Dec 2015 - 12:32 pm | मोगा
त्याना रेशन , शाळा , वीज , पाणी कोण पुरवतं ? महाराष्ञ्र की कर्नाटक ?
जर त्यांच्या गरजा कर्नाटक पुरवत असेल तर पोसणारा नवरा एक आणि बाई नवरा बोलते दुसर्यालाच , असं त्या संत मीराबैसारखं का करायचं म्हणे ?
11 Dec 2015 - 7:20 pm | सुबोध खरे
है शाबास
आम्हाला वाटलं तुमचा आय डी उडाला काय?
बाकी -- त्यांना महाराष्ट्रात घ्या त्यांचं रेशन पाणी वीज शाळा कॉलेज महाराष्ट्र बघेलच हो. म्हशीची शिंगं म्हशीला जड नसतात.
काळजी नसावी. आपलीच माणसं आहेत.
12 Dec 2015 - 10:27 am | मोगा
आधी महाराष्ट्रात घ्या . मग बोर्ड लावा की.
अपली शिंगं दुसर्याच्या डोक्यावर बसवुन शिंगाने व म्हशीने एकमेकांवर कसं प्रेम करायचं बुवा ?
12 Dec 2015 - 11:07 am | सुबोध खरे
आम्ही त्यांना घ्यायला आतुर आहोत. कानडी लोकांनी फांदी मारली आहे.
11 Dec 2015 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
विनोदाचा प्रयत्न इतकासा बरा नव्हता !
"रेशन , शाळा , वीज , पाणी, हे दान म्हणून मिळते की विकत घेतले जाते ?" हा प्रश्न बहुदा तुम्हाला गैरवाजवी वाटला असेलच नाही का ??? =))
12 Dec 2015 - 12:02 pm | मोगा
मीही माझ्या घरावर सल्तनत सौदी किंवा किंग्डम होनोलुलुचा बोर्ड लावावा म्हणतो.
12 Dec 2015 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझा प्रतिसाद ध्यानात आला नाही की ध्यानात आणून घ्यायचा नाही ?! बहुदा दुसरेच ! त्यामुळे चालुद्या तुमचं आत्मकुंथन ! असे विनोद फार कमी लोकांना करता येतात =))
12 Dec 2015 - 12:59 pm | होबासराव
क्या मिया कितना खयाली पुलाव पकाते! दस सालासे तो दस अल्लग अल्लग आयडी से दस अल्लग अल्लग धागे डाले कि नयी मुंबई मे इधर फ्लॅट लेउ कि उधर लेउ....और कहा तुम सल्तनक कि बाता करते...वैसे वो फोटो डाला था ना लास्ट टाईम खुदका वो देखके बहोत बुरा लगा मेरे को, मिया जहा रोज खुद कि बेईज्ज्ती करा लेते हो वहा पर अॅट्लीस्ट अपने फॅमिलि का फोटो नहि देना चाहिये, तुम्हारे तरफ देखते हि पता चल्ता है मिया एक नंबर के चींधी चोरा है तुम्..
12 Dec 2015 - 8:36 pm | रमेश आठवले
उन्हे हैदराबादी है ये मालुमच नही था मेरेको!
12 Dec 2015 - 1:16 pm | नाव आडनाव
जे काश्मिरी लोक इथलं खातात आणि नापाकिस्तान, इसिस चे झेंडे फडकवतात त्यामगचा त्यांचा आणि तुमचा विचार सारखाच वाटतो सर.
12 Dec 2015 - 2:48 pm | सुबोध खरे
पाकिस्तानचाच लावा की. नको कोण म्हणतंय
नाहीतर ISIS चा लावा. आणि आर्थर रोडची सर्व खर्चासहै सहल मोफत मिळवा
12 Dec 2015 - 10:35 pm | मोगा
एका घरावर पाकिस्तान लिहुन काय होणार ?
आमचा नथुराम म्हणायचा तीन्ही मिळून अखंड हिंदुस्तान व्हावा !
...
अखंड हिंदुस्तानवादी ब्यारिस्टर मोगा
13 Dec 2015 - 9:06 pm | भंकस बाबा
एकडाव तुमची मते काय ती सपस्ट मांडा , एक धागा च् टाका.
तेव्हा मग जब तक सूरज चाँद रहेगा तबतक तुम्हारा ये धागा रहेगा।
तुमचे महणने न कल्लेला. योक अडाणी.
4 Dec 2015 - 2:09 pm | प्रचेतस
खडकी नावाची व्युत्पत्ती मोठी मजेदार आहे. हे नाव 'कटक' ह्या शब्दावरुन आले आहे. कटक म्हणजे सैन्याचा तळ.
वेरूळच्या दशावतार लेण्यातील राष्ट्रकूट सम्प्राट दंतिदुर्गाच्या शिलालेखात कटकाचा उल्लेख आहे.
तदनंतर लीळाचरित्रात कटकाचे कित्येक उल्लेख आहेत.
कण्हदेवो कटकी आला
संगे महादेव धाकुटा होता.
ह्यातील कण्हदेव म्हणजे महापराक्रमी सिंघण (दुसरा) ह्याचा पुत्र आणि रामदेवरायाचा पिता कृष्णदेव. तर महादेव म्हणजे ह्या कृष्णाचा धाकटा भाउ.
कटकचे कटकी आणि कटकीचे खडकी.
4 Dec 2015 - 2:12 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला. ही माहिती नवीनच आहे मजसाठी. एकच नंबर!
4 Dec 2015 - 2:31 pm | sagarpdy
कुठल्याशा कादंबरीत 'खिडकी' असेही वाचल्यासारखे वाटते.
5 Dec 2015 - 1:24 am | भीमराव
आणि मग पुण्याची खडकी? तिच्या नावाची उत्पत्ती आणि तिथला मिल्ट्री एरिया यांचा काही संबंध आहे का? खडकी या नावाने आजुन बक्कळ गावे आहेत महाराष्ट्रात त्या प्रत्येक ठिकाणी सैनिकी तळ असावा का?
गावांची नावे हा खुप माहीतीदायक विषय होईल, कारण प्रत्येक नावामागे थोडा का होईना इतिहास लपलेला असेल.
5 Dec 2015 - 2:36 am | अर्धवटराव
जय हो वल्लीशेठ
4 Dec 2015 - 2:03 pm | प्रसाद१९७१
मी अजुनही व्हीटीच म्हणतो आणि मद्रास पण.
4 Dec 2015 - 1:35 pm | प्रसाद गोडबोले
गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा ह्यांचे मत जाणुन घ्यायला आवडेल !
https://en.wikipedia.org/wiki/Goa_Inquisition
बाकी आम्ही नामांतर चळवळीचे कट्टर समर्थक आहोत ! वास्को दा गामा ह्यांचे खरेच काही भव्य दिव्य योगदान असले तर त्यांच्घे नाव जरुर ठेवावे , (पण किमान आमच्या माहीतीत तरी तसे काही नाही), तस्मात नामांतर जरुर व्हावे ! संभाजी नगरच असा हट्ट नाही , अगदीच जुने नाव माहीत असल्यास जुने नाव द्या अन्यथा कोणत्याही सुप्रसिध्द गोवेकर्याचे नाव द्या :)
आणि कृपया ह्या नामांतरला हिंदु विरुध्द खिर्श्चन असा रंग देवु नये, मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे !
काही लोकांना वाटते की नावे बदलुन काय होणार आहे ? पण नावाचा इम्पॅक्ट खुप खोलवर असतो , एखादी गोष्ट सतत बिंबवत गेल्याने तीच मनावर ठासली जाते साधे सोप्पे मानसशात्रीय अनुमान आहे हे !
4 Dec 2015 - 1:43 pm | संदीप डांगे
केवळ नामांतरामुळे इम्पॅक्ट झालेली अशी काही उदाहरणे देऊ शकाल काय?
4 Dec 2015 - 2:00 pm | पिवळा डांबिस
इन्क्विझिशनबद्दल मी काय मत देणार? ते झालं होतं हे खरं आहे. खुद्द माझ्या पूर्वजांना त्याची झळ बसलेली आहे.
पण ते इन्क्विझिशन करणारे पाद्री/ राज्यकर्ते आता गोव्यात हजर नाहियेत की त्यांचे डायरेक्ट वंशजही.
हे आहेत ते आपलेच भारतीय रक्ताचे लोक आहेत. त्यांचा धर्म वेगळा असला तरी संस्कृती भारतीयच आहे. सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला असेल पण बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे. ते दिवाळी साजरी करत नसतील पण ख्रिसमसला करंज्या, कडबोळी आणि चकल्याच करतात! त्यांच्याशी प्रेमानं वागायचं की वाद का उकरून काढायचा?
तो रंग मनात ठेवूनच तर हा वाद् उकरला जातोय. नाहीतर गोव्यातल्या एखाद्या गावाला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याचे नांव सुचवायची गरजच काय? लोकं काय दुधखुळी आहेत काय?
बाय द वे, हापुस (अल्फान्सो) आंब्याचंसुद्धा आता राघोबाआंबा असं नामकरण करा!!! :)
कारण ते ही नांव अल्फान्सो द अल्बुकर्क ह्या गोव्याच्या गव्हर्नराच्या नांवावरून ठेवलं गेलेलं आहे!!
4 Dec 2015 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले
ओके . ही खरेच वस्तुस्थिती आहे की नाही , त्या संबंधी काही पुरावे आहेत की नाही हे मला माहीत नाही , ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही पण आधी महाराष्ट्र विरुध्द गोवा => हिंदु विरुध्द खिर्श्चन => सवर्ण विरुध्द इतरेजन ( आता आणि ह्या नंतर = > ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर ) हा चर्चेचा लॉजिकल प्रवाह मी ओळखुन आहे :)
सर्वप्रथम अल्फान्सो चे हापुस केले इतके पुरेसे आहे , शिवाय अल्फान्सो द अल्बुकर्क च्या आधी हा आंबा नव्हताच काय ? ह्या माणसाचे काय योगदान ? त्याने विकसीत केली का ही आंब्याची प्रजाती ?
तुम्ही आज जे नांमांतर होते त्याला आक्षेप नोंदवता मग इतिहासात जे नामांतर झाले त्याला आक्षेप का बरे नोंदवत नाही ?
बाकी संदीपजींनी विचारले की नामांतराने असा काय फरक पडतो उदाहरणे द्या : मला एक उदाहरण आठवते की १९५५ साली बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यावर कित्येकांन्नी नामांतरही केले आणि त्याचा बहुतेक चांगला परिणाम झाला . सातार्यातही कित्येक मुलींची नावे "नकोशी" असे होते , अत्ता नुकतेच त्या मुलींची नावे बदलली गेली . शिवाजी महाराजांनी भाषाशुध्दी करता राज्यव्यवहारकोष बनवला त्यातही अनेक फारसी नामे बदलुन पर्यायी मराठी नावे सुचवली गेली , असे का बरे केले असेल महाराजांन्नी ?
असो , आमच्या मते आपण मानसिक गुलामगिरीतुन बाहेर पडणे गरजेचे आहे आणि ह्याची सुरुवात नामांतराने होवु शकते ! वास्कोला हिंदु मराठी सवर्णाचे नाव द्यायचे नसेल तर ज्या कोणी ख्रिश्चन माणसाने लोकांच्या भल्याचे काम केले असेल त्याचे नाव द्या , वाटल्यास ख्रिस्तपुर नाव द्या ... काही हरकत नाही :)
असो ह्या विषयावर आपला जास्त अभ्यास नाही म्हणुन तुर्तास थांबतो ... पुढील चर्चेला शुभेच्छा !
अवांतर : बाकी कंपुबाज लोकहो , ते सनबर्न फेस्टीव्हल ला जायचे काय झाले राव ?
11 Dec 2015 - 11:34 am | पिवळा डांबिस
एकीकडे अभ्यास नाही म्हणता आणि दुसरीकडे ओळखून आहे म्हणता.
तुमचं खरं काय ते तुम्हालाच माहिती!!!
:)
तुमच्या माहितीसाठी...
पोर्तुगीजांच्या पूर्वी हा आंबा भारतात नव्हता अशी माहिती आहे.
पोर्तुगीजांनी हे कलम ब्राझीलमधून (जी सुद्धा पोर्तुगीजांचीच वसाहत होती) भारतात आणलं आणि भारतातल्या स्थानिक (बहुदा रायवळ) आंब्यावर त्याचं कलम केलं. ज्या काळात ही गोष्ट घडली त्या काळात अल्फान्सो द अल्बुकर्क हा गोव्याचा गव्हर्नर होता. म्हणून बहुदा त्याचं नांव ह्या नव्या कलमाला दिलं गेलं असावं.
आजही ब्राझिलमधून ही जात एक्सपोर्ट होते, अमेरिकेत तिला केन्ट मॅन्गो हे नांव आहे. आपल्या हापुससारखाच पण आकाराने हापुसच्या जवळजवळ तिप्पट असा आंबा असतो.
चव तीच पण त्याला हापुससारखा वास नसतो. तो वासाचा गुणधर्म बहुदा आपल्या स्थानिक रायवळ आंब्याकडून आला असावा....
12 Dec 2015 - 8:23 am | भंकस बाबा
हा आंबा भलेही पोर्तुगिजानि आणला असेल पण त्याची उत्तम जात कोकणात देवगड भागात जोपासलि गेली. इथे जात म्हटले तर परत आक्षेप येतील कारण कलम तेच पण चवित पुष्कळ फ़रक. कोकणात पार अलीबाग पासून बाँदया पर्यन्त हापुसचि लागवड होते. मात्र देवगड़ हापुस सर्वश्रेष्ठ मानला जातो. देवगड़ भागात असलेल्या खाडिच्या आसपासच्या डोंगरावर कातळात लावलेला हापुस चवित उत्तम असतो. चवीबद्दल कोणाला वाद घालयचा असेल तर त्यांनी ह्या भागात फिरून खरा आंबा खावा. कारण या देवगड़ भागातील हापुस मुंबई पुण्यात अपवादाने मिळतो. सर्व माल गल्फ , यूरोपला जातो. पुणेकर ,मुंबईकर खातात ते रत्नागिरी ,चिपळून चा हापुस. जो जास्त गोड असतो पण ज्याला मधुरपणा म्हणतात (देवगड़ हपुससारखा) तो नसतो.
असो हे अवांतर झाले. बाकी चर्चा छान जमुन राहिली आहे. बैटमन ,पिंडा, ट्रूमैन. च्या मारी कोणत्या बोटित बसु तेच कळेना झालय
16 Dec 2015 - 10:01 am | पिवळा डांबिस
सहमत.
'देवगडचा हापुस, सगळ्या हापुसचा बापुस!' :)
ह्याच्याशीही सहमत. ज्यांच्या कडे 'घरची' टोपली/पेटी येते त्यांनाच हा आस्वाद माहिती.
आणि घमघमाट कसला! घरात पेटी आली की सगळ्या बिल्डींगला पत्ता लागे की, 'ह्यांच्याकडे आंबे आले!'
मग पुढील काही दिवस शेजार्यांची काहीना काही निमित्त काढून घरी रीघ लागे!!!
(कशाला जुन्या आठवणी काढायला लावता?)
:(
4 Dec 2015 - 4:11 pm | सूड
सहमत!! नुसती नामांतरं करुन परिस्थिती बदलणार आहे का?
आणि तसं बघायला झालं तर इन्क्विझिशन्स करणारे गेले निघून, आता ऊर बडवून काय उपयोग? आणि त्याला कारणही आपलेच लोक होते की! गोर्यांनी शिवलं, बाटला!! गोर्यांच्या हातचं काही खाल्लं, बाटला!! आणि अशा सो कॉल्ड बाटग्याला आपलेच लोक गावाबाहेर काढत असत.
इन्क्विझिशन्स सोपे करुन दिले आपल्याच लोकांनी, अरे एवढीच चाड होती तर एखाद्या पादर्याला जानवं घालून आता तू हिंदू झालास असं का नाही ठणकावलं च्यायला!!
4 Dec 2015 - 4:25 pm | माहितगार
बाकी मांडोवी आणि झुआरी नद्यांमध्ये गंगेचे पाणि आणि गोमुत्र शिंपडल्याने हे काम अधिक सहज होईल का :) ? ((ह.घ्या.)
4 Dec 2015 - 4:39 pm | सूड
आता कशाला? आता आहे तसं स्वीकारा की!! काय फरक पडतो? =))
4 Dec 2015 - 4:55 pm | माहितगार
आम्ही स्विकारतोच हो तुम्ही जानव्याचा विषय काढला म्हणून त्या पेक्षा सोपा उपाय सांगितला, पण जसे आहे तसे स्विकारणे सर्वाधिक चांगले आणि सोपे य बद्दल सहमत. भारतात राहता म्हणून तुम्ही आमचे, विवीध गोष्टी मनोभावे करता म्हणुन तुम्ही आमचे. हे सोपे आणि चांगलेच
4 Dec 2015 - 5:57 pm | सूड
ते मी ते लोक इन्क्विझिशन्स करत होते तेव्हाचं म्हणतोय. तेव्हा आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना बाटगे म्हणून बाहेर काढलं त्याबद्दल बोलतोय.
आताचं म्हणाल तर कोणाचा धर्म काय आहे त्याच्याशी मला शष्प देणं घेणं नाही.
4 Dec 2015 - 6:03 pm | माहितगार
सहमत आहे. भारतीय भाषांसाठी भारतीय लिपी शिवाय इतर लिपी वापरण्यासारखे जाणीवपुर्वक उद्योग जरा खूपतात बाकी काही देणे घेणे नाही.
5 Dec 2015 - 12:38 pm | सुबोध खरे
इन्क्विझिशन्स च्या काळात ज्यांनी धर्मांतराला नकार दिला त्यांना फाशी दिले जात असे या फाशी देण्याचा हुक आमच्या वास्कोच्या नौदलाच्या जीवन्ति रुग्णालयाच्या एका वडाच्या झाडाला अजून दिसतो. (हि जागा अगोदर पोर्तुगीजांच्या तळा ची होती). झाड रुंद झाल्याने हुक लावलेली लोखंडी साखळी झाडात रुतून बसलेली हि दिसते. प्रत्येक वेळेस ते पाहताना माझ्या हृदयात कालवा कालव होत असे. या कारणांसाठीच तेथील गुलामगिरी आणी अत्याचाराच्या आठवणी पुसल्या पाहिजेत.यात त्यांची नावे हि येतात.
5 Dec 2015 - 5:26 pm | माहितगार
त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे ?
5 Dec 2015 - 12:06 pm | पिशी अबोली
नाही हो.. असली काही आमिषं दाखवायचं शहाणपण पोर्तुगीजांनी दाखवलं असेल असं काही वाटत नाही. त्यांच्या एकूणच पॉलिसीमधे 'सवर्णांचं धर्मान्तरण' यालाच जास्त महत्व दिल्याचं दिसतं. दुसरं, गोव्यातील ख्रिश्चन लोक अगदी नीट जाती पाळतात. धर्म बदलला म्हणून जात हा फॅक्टर संपला असं कधी झालंच नाही. अगदी पोर्तुगिजाळलेले लोकसुद्धा जातीच्या बाबतीत कट्टर असतात हे कायम दिसणारं चित्र आहे.
5 Dec 2015 - 12:30 pm | सुबोध खरे
अगदी अगदी
नव हिंद टाईम्स च्या वधू / वर संशोधनाच्या जाहिरातीत RCB (ROMAN CATHOLIC BRAMHIN) पाहिजे हे सर्रास दिसते.
4 Dec 2015 - 2:08 pm | सुनील
हे शहरच मुदलात पोर्तुगिजांनी १६ व्या शतकात वसवले आणि त्याला वास्को द गामाचे नाव दिले (हे त्यांच्या दृष्टीने ठीकच). तेव्हा त्याला जुने नाव काहीही नाही.
तसे वसवा एखादे (स्मार्ट) शहर आणि द्या त्याला हवे ते नाव. काऽऽऽही हरकत नाही!!! नामांतराचा उपद्व्याप नको.
बाकी संभाजी महाराजांचे गोव्यात यथोचित स्मारक फोंड्याजवळील फर्मागुढी येथे आहेच.
11 Dec 2015 - 7:35 pm | सुबोध खरे
मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे !
१९१० साली सेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या नावाने त्यांच्या वारसांनी रुपये बारा लाख (फक्त) हे वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी दिले. तेंव्हा सोन्याचा भाव ७ रुपये तोळा (१२ग्राम) होता.आजच्या भावाने हि रक्कम जवळ जवळ ५०० कोटी इतकी होईल
त्याला कोणत्या तरी नतद्रष्ट राजकारण्याचे( ज्याचा वैद्यकीय क्षेत्राशी काडीचाही संबंध नव्हता) नाव देण्याचे घाट घातले जात होते. त्याला तेथील आजी आणी माजी विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला आणी म्हणून ते नामांतर टळले.
4 Dec 2015 - 2:06 pm | पिवळा डांबिस
मी दमलो, रात्रीचे साडेबारा वाजून गेले. आता मी झोपतो.
तुम्ही तुमचं चालू द्या....
श्री. उडन खटोला, तुमच्यावर आमचा वैयक्तिक रागलोभ वगैरे नाही. तुमच्या धाग्यातलं जे खटकलं ते तुमच्या नजरेसमोर आणायचा प्रयत्न केला.
आणि मग हे रामायण घडलं!!!! :)
तरी चूभूद्या घ्या...
4 Dec 2015 - 2:46 pm | प्रीत-मोहर
अग्रीड पिडांकाका. आणि नामकरण करायचच तर , कुणा कर्तृत्ववान गोवेकराच नाव द्या हे माझ मत.
11 Dec 2015 - 11:38 am | पिवळा डांबिस
अगदी दीपाजी रांण्यांपासून सोयरोबा आंबियांपर्यंत नांवं काय कमी आहेत?
4 Dec 2015 - 2:59 pm | मृत्युन्जय
एकुण धाग्याचा सूर असा आहे की संभाजी सारख्या बाहेरच्या माणसाचे नाव द्यायच्या ऐवजी गोव्याच्य भूमीतील सुपुत्राचे नाव द्यायला हवे. त्यामुळे वास्को शहराचे नाव बदलुन ते "मनोहरनगर" करावे असा प्रस्ताव मी मिपामंडळासमोर मांडतो. आपण मोठ्या संख्येने अनुमोदन करुन हा प्रस्ताव तडीस न्यावा आणि सरकारवर दबाव टाकावा अशी सर्व मिपाकरांना आणी नीलकांतला णम्र विणंती.
4 Dec 2015 - 2:59 pm | विजुभाऊ
नामांतरामुळे नक्की काय साधणार आहे.
औ बाद चे संभाजीनगर करणे वगैरे मुळे लोकाम्च्या पुढे चघळायला कडबा याशिवाय काहीच पदरात पडत नाही.
बाँबे चे मुंबै झाल्यामुळे असा काय फरक पडला आहे?
4 Dec 2015 - 3:01 pm | प्रदीप
पोर्तुगीजांच्या जुलूमी राजवटीच्या संदर्भात कै. तांबे ह्यांनी इथे वसईबद्दल एक लेख लिहीलेला होता. त्याचा दुवा कुणी कृपया देईल काय?
4 Dec 2015 - 3:02 pm | मालोजीराव
गोवन संकृतीमधली हि छत्रपती संभाजीमहाराज विरुद्ध सेंट झेवियर अशी सरळ फाईट म्हणायची काय ?
4 Dec 2015 - 3:24 pm | प्रीत-मोहर
अस काही नाहीये. मुळात नामांतर झाल नाही तरी काहीही फरक पडत नाही. पण ज्या संभाजीराजांनी इथे राज्य नाही केल त्यांच नाव द्यायचा अट्टाहास का?
4 Dec 2015 - 3:47 pm | बॅटमॅन
बायदवे वास्को द गामाने तरी गोव्यावर राज्य केलं का कधी? त्याला मानणार्या पोर्तुगीजांनी त्याच्या स्मरणार्थ शहराचे नाव ठेवले. सध्याची मागणीही तीच आहे. संभाजीराजांना मानणारे लोक त्यांचे नाव ठेवा अशी मागणी करताहेत.
4 Dec 2015 - 4:45 pm | मालोजीराव
इथले प्रतिसाद वाच, संभाजीराजांना काय काय नावाने हिणवलंय बघ.एकंदर नामांतर झालं तर "काहीही फरक पडणार नाही " अस म्हणता येणार नाही
Backdoor move to rename Vasco after Maratha king?
4 Dec 2015 - 4:55 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये अशी कीडही कार्यरत आहे हे पाहून रोचक वाटले. फक्त छत्रपतीच नव्हे तर एकुणात मराठी माणसाचाही द्वेष कसा मस्त ठासून भरलाय.
4 Dec 2015 - 5:03 pm | माहितगार
वास्कोत प्रॉपर्टी रेट चा रेंज काय असतो ?
4 Dec 2015 - 5:29 pm | बॅटमॅन
नो आयड्या, पण त्याचा इथे संबंध काय?
4 Dec 2015 - 5:58 pm | माहितगार
तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे रोचक प्रकार असेल. त्या शिवाय डेमोग्राफीक बदलात फुलं न फुलाची पाकळी बदल करणे हाच कोणत्याही घेटोवर उपाय असू शकतो असे वाटते.
4 Dec 2015 - 6:10 pm | बॅटमॅन
अच्छा तसं होय...
4 Dec 2015 - 6:13 pm | माहितगार
नुसतंच तक्रार करत बसण्यात काय हशील.
4 Dec 2015 - 6:01 pm | कपिलमुनी
फक्त मराठी नाही तर तिथे भारतीय लोकांबद्दल द्वेष आहे.
अजूनही तिथले काही लोक मनाने पोर्तुगीज आहेत. आणि कित्येक हॉटेल्समधे फक्त परदेशी लोकानाच प्रवेश असतो.
4 Dec 2015 - 6:05 pm | बॅटमॅन
हे नक्की का?
बाकी मनाने पोर्तुगीज असलेले लोक असणे यात कै आश्चर्य नाही. अजूनही भारतात जन्मल्याची लाज वाटणारे लोक अनेक आहेत आपल्याकडे. खरे मेकॉलेपुत्र.
4 Dec 2015 - 6:09 pm | माहितगार
पुर्तुगीज लोकही तसेच इंग्रजी विकिपीडियावर पोर्तुगाल विषयक लेखात त्यांच्या कॉलोनीला पास्टटेन्स एवजी प्रेझेंट टेन्स मध्ये अट्टाहासाने वापरला जात होता. (सध्याची स्थिती माहित नाही)
4 Dec 2015 - 6:10 pm | मालोजीराव
मला अनुभव आहे, रेड डोअर होस्टेल अंजुना …तिथे राहण्यासाठी पासपोर्ट ची कॉपी ठेवावी लागली…भारतातल्या भारतात
4 Dec 2015 - 6:14 pm | संदीप डांगे
हे चिंताजनक आहे.
4 Dec 2015 - 6:18 pm | बॅटमॅन
च्यायला....
4 Dec 2015 - 6:30 pm | यशोधरा
पोलीस स्टेशनला तक्रार केली?
7 Dec 2015 - 4:27 pm | मालोजीराव
रेशनकार्ड वर बदलेले नाव दिसत आहे, संभाजी आणि कंसात वास्को
4 Dec 2015 - 3:47 pm | मालोजीराव
अगदी बरोबर,झेवियर ने संभाजीराजांपासून गोवा वाचवला अशी धारणा होती , लोकगीते सुद्धा होती … अजूनही असावीत म्हणून गमतीने म्हणालो . छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याचं राज्य पादाक्रांत केलं नव्हतं, फक्त मोठ्या प्रमाणावर आक्रमण केलं होतं. स्थानिक कर्तुत्ववान व्यक्तीचं नाव देणं जास्त योग्य ठरेल . 'मारियो मिरांडा' सुद्धा चालू शकेल
4 Dec 2015 - 3:18 pm | कपिलमुनी
पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले त्याने काय फरक पडला कोण जाणे ?
बाकी नामांतर करायचे झाले की शाहू , फुले , आंबेडकर , शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि खपलेले राजकारणी एवढेच आठवतात.
उद्योजक, खेळाडू यांची नावे आठवत नाहीत हे दुर्दैव!
4 Dec 2015 - 3:24 pm | बॅटमॅन
हे बाकी खरेच आहे.
4 Dec 2015 - 4:25 pm | मास्टरमाईन्ड
आणि एक शंका,
वरील थोर व्य्क्तींची नावं दिल्यानं काय होणारै?
ज्या त्या ठिकाणाला आपण भौगोलिक नावं का नाही ठेवत आपल्याकडं?
जसं की
पुणे विद्यापीठ, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे (याला दोन नावं आहेत म्हणे.. एक पु.ल. देशपांडे आणि एक यशवंतराव चव्हाण)
4 Dec 2015 - 3:31 pm | पिशी अबोली
http://www.rediff.com/news/dec/26goa.htm
वर प्रदीपजींनी जे सांगितलंय त्या संदर्भातला दुवा. हा वाद आजचा नाहीये. या बातमीतील संघाचे प्रतिनिधी म्हणून उल्लेख केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर कुणाही मागणी करणार्याचा संघाशी/भाजपाशी संबंध नाही. शशिकलाताईंच्या काळातपण ही मागणी होतीच, पण तिला केंद्राने मान्यता दिली नाही असे दिसते. मगोपने 'कदंबनगर' वगैरेच्या ऐवजी 'संभाजी नगर' करायची मागणी करणे समजू शकतेच.
बाकी त्यातल्यात्यात मागच्या काही वर्षांत झालेला बदल म्हणजे 'वास्को-दि-गामा' ऐवजी 'वास्को' एवढाच उल्लेख केला जातो, रेल्वे स्टेशनांवर वगैरे. (हजरत निजामुद्दिन-वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस म्हणेपर्यंत ट्रेन सुटायची वेळ यायची ;)) औरंगाबाद असा जनरल उल्लेख केल्यावर कुणाच्या डोक्यात औरंगजेब आणि गुलामीच्या खुणा काही लगेच येत नाहीत (नसाव्यात), तसंच वास्को म्हटल्यावर एक गोमंतकीय म्हणून मलातरी वास्को-दि-गामा आठवत नाही. पण त्याचे नाव बदलायचेच असल्यास त्याला एखाद्या गोवा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचे नाव द्यावे असे वाटते. 'संभाजीनगर' उगाच आपलं!
बरं.
-शुद्ध भारतीय पुणेरी सोवळ्या नवीन पिढीला रोज पाहणारी,
पिशी
4 Dec 2015 - 6:48 pm | प्रदीप
दुव्याबद्दल. आता ह्यात भाजपाचा हात आहे, म्हणणार्या मंडळीचा आवाज थोडा कमी होईल.
4 Dec 2015 - 3:33 pm | माहितगार
आमेरीकेत पुर्वी कोलंबस डे साजरा होत असे तोच आजकाल नेटीव्ह आमेरीकन दिवस म्हणुन साजरा केला जाऊ लागला आहे असे वृत्तांवरून दिसते.
बाकी चालु द्या.
4 Dec 2015 - 3:44 pm | मृत्युन्जय
बरोबर आहे कारण या कोलंबसाने अमेरिका शोधुन काढण्यापुर्वी तिथे केवळ आदिवासी राहत होते. त्यामुळे अमेरिका आज ज्या स्थानावर पोचली आहे त्याचे श्रेय कोलंबस आणि त्यानंतर त्याच्यापाठोपाठ तिथे पोचलेल्या गोर्यांना जाते. त्यांना कोलंबसाचे कौतुक वाटणे साहजिक आहे. तो त्यांचा माणूस होता. वास्को डि गामा आणि गोवा यांच्याबद्दल दुर्दैवाने असे म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे कोलंबस डे वेगळा आणि नेटिव्ह अमेरिकन डे वेगळा. नेटिव्ह अमेरिकन डे काही ठराविक राज्यात साजरा करतात आणि तो देखील वेगवेगळ्या दिवशी. नेटिव्ह अमेरिकन डे ची तारीख ठरलेली नसते तर दिवस ठरलेला असतो. कोलंबस डे बाय डिफॉल्ट १२ ऑक्टोबरलाच असतो आणि तो मला वाटते फेडरल हॉलिडे आहे. कर्मधर्म संयोगाने कधीकधी हे दोन्ही दिवस कधीतरी एकाच दिवशी येत असतील तर माहिती नाही.
बाकी चालु द्या.
4 Dec 2015 - 3:44 pm | बॅटमॅन
जसा विण्टर सॉल्स्टिसच्या प्रसंगी साजरा केला जाणारा पेगन सण पुढे ख्रिसमस म्हणून साजरा केला जाऊ लागला तसेच...
बाञदवे ते ख्रिसमस ट्री वगैरे मूळ ख्रिश्चॅनिटीत कुठे आहे? हे सगळे जर्मानिक-नॉर्डिक लोकांचे घुसलेले प्रक्षिप्त प्रकार आहेत. येशू ख्रिस्त जन्मला आणि मरणही पावला इस्राएलमध्ये, तिथे बर्फ कुठून पडायला (एक्काकाका अता सौदीतले बर्फाचे फटू दाखवू नका बरे)? मूळ व्हर्जन साजरी करायची तर खजुराचे झाड पाहिजे होते तिथे.
4 Dec 2015 - 4:34 pm | माहितगार
बरोबर, ख्रिसमस ट्री इझ्रायलात नव्हताच शिवाय त्यांच्या तत्वज्ञातही त्याला वस्तुतः स्थान असू शकत नाही.
4 Dec 2015 - 4:37 pm | माहितगार
वृक्षपुजेला अथवा प्रतिकांना त्यांच्या तत्वज्ञानात स्थान असू शकत नाही. (सेलिब्रेशन मध्ये ख्रिसमस ट्री मनोभावे वापरणारे -भाव असेल तर- आपोआपच हिंदू होतात :) ह. घ्या.)
4 Dec 2015 - 4:44 pm | बॅटमॅन
हिंदू धर्म प्राचीन काळी जगभर पसरलेला होताच की. ;)
4 Dec 2015 - 4:49 pm | माहितगार
झालं तरं मग प्रश्नच मिटला ! =))
4 Dec 2015 - 4:54 pm | बॅटमॅन
;)
4 Dec 2015 - 4:39 pm | मितान
रोचक चर्चा !
4 Dec 2015 - 5:06 pm | जेपी
एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर होता.
शारुक ची ईगल गॅंग आणी शरद ची बिच्छु गॅंग..
त्यात शरद शारुकला "ये वास्को शहर तेरे बाप का है क्या?"
अस विचारतो.
लेखातील वास्को शहर तेच आहे का ?
4 Dec 2015 - 5:12 pm | टवाळ कार्टा
=))
4 Dec 2015 - 6:03 pm | कपिलमुनी
शारुखाबाद असे सहिष्णू नामकरण करावे .
4 Dec 2015 - 6:23 pm | कानडाऊ योगेशु
अजुन एक पर्याय.
शर्दकपूर (जसे पंढरपूर नागपूर ). तसे हे नाव संस्क्रुत म्हणुन ही खपून जाईल.
4 Dec 2015 - 6:25 pm | बॅटमॅन
हा हा हा, एकच नंबर. लय अवडले.
बाकी शर्दक या संस्कृत शब्दातून (अर्थ? ते काय असतं?) शाहरुख हा यावनी शब्द आला अशीही मलमपट्टी करता येईल ते वेगळेच. =))
4 Dec 2015 - 5:14 pm | अजया
वाचतेय.
4 Dec 2015 - 6:22 pm | मंदार कात्रे
आणखी एका शतकी धाग्याबद्दल उ.ख. याना शुभेच्छा !
4 Dec 2015 - 6:56 pm | मोगा
महाराजांचे वारस सगळ्या प्रॉपर्टींचा उपभोग घेत मजेत असतील.
आण इते बाकीचे लोक डोस्की फोडत आहेत.
.....
डोस्को दि गामा
4 Dec 2015 - 8:49 pm | जेपी
जसे तुमचे काका ओंरंग्या आणी निजामाचे वारस मज्या करत आहेत..
आणी तुमी वारंवारडु आयडी घेऊन स्वत:चे हसे करत आहात..
भोस्कु दे आता-जेपी
4 Dec 2015 - 11:19 pm | मोगा
भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! युद्धात तू जिंकलास तर इथले राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाचे राज्य भोगशील ! "
हे सगळं राजाला बरं का ! सामान्य तानाजी युद्धात जिंकला तर तो कुठलं सुख भोगणार आणि तो मेला तर तो कुठल्या स्वर्गात जाणार , त्याच्या घरचा रायबा तूरडाळ कशी विकत घेणार ? हे गीताच काय कोणत्याच पुस्तकात नाही.. ( तानाजीऐवजी कसाब लिवलं तरी चालेल ! )
.....
त्यामुळे कोण कुठला राजा बायकोला सोडवायला कसा लढला आणि कोण कुठल्या धर्मासाठी मेला , आम्हाला कोणत्याच गोष्टीत स्वारस्य नाही... सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती.
मग त्यांचं इतकं कौतुक कशाला ?
......
जेंव्हा मोघल सत्ता होती तेंव्हा आमचा खापरपणजोबा मोघलाना कर देत होता आणि जेंव्हा स्वराज्य आले तेंव्हा हिंदू महाराजाना देत होता.
आमचा खापरपणजोबाही गेला आणि तेही गेले !
आता आमच्या डोस्क्याला नस्ता ताप कशाला ?
गावाचे नाव संभाजीनगर / महमदापूर / वास्कोपूर / अशोकनगर / बाहुबलीनगर .... काइ का ठेवेना !
5 Dec 2015 - 3:09 am | अगम्य
"सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती"
काय म्हणता? औरंगजेबाचे मांडलिकत्व न पत्करता संभाजीराजे त्याचाशी लढत राहिले, त्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर राजांचे जे हाल झाले ते विन विन होते? राजांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू औरंगजेबाच्या कैदेत पडले, ते ही विन विन?
5 Dec 2015 - 4:25 am | कानडाऊ योगेशु
माझ्यामते असे संबोधन भगवद्गीतेत कुठेही आले नसावे. तसाही अर्जुन हा राजा नव्हताच. युधिष्ठीर हा राजा होता.
गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या विविध नावांनी संबोधले आहे.(जसे पार्थ,धनंजय,गुडाकेश,सव्यसाची वगैरे.)
ह्या तर्कानुसार अर्जुन सुध्दा राजाऐवजी एक सैनिकच वाटतो.
5 Dec 2015 - 10:01 am | अनुप ढेरे
हा हा हा. प्रतिसाद आवडला!
5 Dec 2015 - 4:20 pm | गामा पैलवान
मोगा,
तुमच्याशी सहमत. नेमक्या याच कारणासाठी तुम्ही या धाग्यावर येऊ नये ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.
6 Dec 2015 - 8:42 am | असंका
याबद्दल बोलताय ना भाउ? -
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम|
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः||
गीता २,३७
यात कुठे "हे राजा" असं म्हणलंय? हा श्लोक कौन्तेय म्हणजे अर्जुनाला उद्देशून म्हणलाय. आणि राजा तर कुठेच असल्याचं आठवत नाही मला. क्षत्रिय असं मात्र म्हणलंय. त्यात राजा येतो तसे सैनिक पण येतात.
6 Dec 2015 - 7:49 pm | मोगा
सैनिक जिंकला तरी तो राजसुख घेऊ शकत नाही.
7 Dec 2015 - 1:00 pm | असंका
श्लोकात राजसुख नाय हो भाउ...पृथ्वी आहे फक्त. - भोक्ष्यसे महीम्.
5 Dec 2015 - 5:43 pm | माहितगार
शिवाजी महाराज सबंध रयतेचे राजे होते, त्यांनी राज्य रयतेच्या हितासाठी चालवले आपल्या वारसदारांसाठी चालवले नाही, वतनदारी बंद करण्यासाठी त्यांनी आप्तस्वकीयांशीही वैर घेतले, शिवाजी महाराज आणि हिंदूत्व हा वाद थोड्या वेळासाठी बाजूस ठेवला ते जे काही होते परधर्मीयांवर अन्याय केले नाहीत, त्यांच्याशी धर्माच्या कारणावरून दुजाभाव ठेवला नाह परधर्मीयांना सौजन्याने वागवले. शिवाजी महाराजांनी राज्य स्वतःच्या वारसदारांसाठी नव्हे रयतेसाठीच चालवले हे त्यांच्या इतिहासाच्या प्रत्येक कृतीतून अक्षरातून शब्दातून सिद्ध होते. शिवाजी महाराजांचे खरे वारस भारतीय जनता आहे. शिवाजी महाराजांची तुलना धार्मीक भेदभाव बाळगणार्या तत्कालीन पोर्तुगीज किंवा औरंगजेबाशी मुळीच होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे. हे आमचे मत. असो.
6 Dec 2015 - 9:13 am | अगम्य
लाख बोललात!
6 Dec 2015 - 9:36 am | नाव आडनाव
शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे.
क्या बात! मोगा साहेबांना उत्तर मिळालं असेल.
4 Dec 2015 - 7:43 pm | होबासराव
हाssssड
4 Dec 2015 - 8:39 pm | कंजूस
अशा वैचारिक जनतेच्या क ल्याणाच्या धाग्याचा रोजचा आढावा ( अधिवेशनातल्या कामकाजाचा करतात तसा ) इथे आणि खरडफळ्यावर प्रकाशित करणयात यावा.
4 Dec 2015 - 9:21 pm | कविता१९७८
प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील सन्माननीय व्यक्तींच्या नावाचा वापर करणेच योग्य आहे. उद्या कुणी छञपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलुन एखाद्या कानडी सन्माननीय व्यक्तीचं नाव ठेवलं तर ते आपल्या महाराष्र्टीयन्सना कीतपत पटेल?? आंदोलनं आणि तोडफोड होण्याची शक्यताच जास्त.
4 Dec 2015 - 10:44 pm | माहितगार
एकदम बरोबर कविता तै, धागा लेखास आलेल्या बहुतेक प्रतिसादकांना वास्को द गामाच्या नावा बाबत हेच म्हणायच असाव बहुतेक प्रतिसादकांचा संभाजी महाराजांचे नाव असावा असा आग्रह नाही पण 'वास्को द गामा' भारतीय नव्हता भारतासाठी एक आक्रमक होता स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही एवढ्या वर्षांनी त्याचे नाव गळ्यात बांधून फिरण्याचेही फारसे प्रयोजन दिसत नाही.
6 Dec 2015 - 9:23 am | अगम्य
संभाजी राजांचा गोव्याशी खूप मोठा संबंध आहे. त्यांनी गोव्यावर स्वारी करून जवळ जवळ सर्व गोवा पोर्तुगीझांकडून मुक्त केला होत. पोर्तुगीज केवळ तीस गावांच्या समूहावरच्या जागेवर राहिले होते. त्यानंतर राजांना स्वारी पूर्ण करून पोर्तुगीझांना पूर्णपणे हाकलणे जमले नाही. तरी, गोव्याच्या पोर्तुगीझानविरुद्धच्या संग्रामातील एक महत्त्वपूर्ण सेनानी म्हणून संभाजी राजांचे योगदान acknowledge केले तर ती चांगलीच गोष्ट आहे.
7 Dec 2015 - 6:46 pm | उडन खटोला
+१
4 Dec 2015 - 9:46 pm | संदीप डांगे
गोवामुक्तीसंग्राम परत करायला लागेल असे वाटते काही प्रतिसाद वाचून.
4 Dec 2015 - 10:02 pm | चित्रगुप्त
म्हात्माजी, न्हेरू, इंद्राजी, रजीव... या सर्वांच्या नावानं खूप काही झालंय, त्या बिच्च्चार्या राहुलबाळाच्या नावानं मात्र काही नाही. तस्मात वास्को गावाला राहुल नगर हे नाव अगोदरच देऊन टाकायला हवे होते, आता (सध्यातरी) उशीर झालाय म्हणायचा. कदाचित त्याचेही अच्छे दिन येतील, कुणी सांगावे ?
असे केले, की गोवेकरांमधे भारतीयत्व रुजलेच समाजा.
4 Dec 2015 - 10:56 pm | पगला गजोधर
अच्छे दिन येतील तेव्हा सोनिया नगर
1. राहुलबाबा पेक्षा शिनेर, वहिवाटे नुसार
2. नवीन नाव ख्रिश्चन असल्याने, धार्मिक रंग देता येणार नाही.
(halu ghene)
4 Dec 2015 - 10:15 pm | पैसा
मी मोबाईल वरून काही लिंक देऊ शकत नाहीये. आमच्या टीम गोवाच्या "आमचे गोंय" मालिकेचे इंक्विझिशन वास्को आणि मराठी साम्राज्याचे भाग वाचा बघू. गोव्याशी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा काय संबंध होता याची निदान कल्पना येईल. २ दिवसांनी धागा वर राहिला तर येते परत.
बाकी फोरमवर वाकडे तिकडे बोलणारे लोक सगळीकडेच असतात. इथेही सापडतील. त्यावरून बहुसंख्य गोवेकर किंवा एखाद्या particular धर्माचे लोक तसे असतील असे मत बनवू नका. गोव्यात सरकारतर्फे शिवजयंती साजरी होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच हजर असतात. ते उगीच नव्हे. त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.
4 Dec 2015 - 11:06 pm | माहितगार
पै तै आल्या नंतर नेमका दुवा देतील तो पर्यंत जिज्ञासूंसाठी टिम गोवाचे दोन दुवे देतो
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
टिम गोवा यांचे सर्व लेखन
त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.
हा मुद्दा आणि शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचे गोवा परकीय सत्तेपासून स्वतंत्र करण्यासाठीचे योगदान सुस्पष्ट दिसत असताना ते नाकारणे म्हणजे गोव्याच्या प्रथम स्वांतत्र्य सेनानींचा शुद्ध अपमान आहे. इतरांच्या नियमाने शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र कोकण असा असता विदर्भ आणि मराठवाड्याने नाकारावयास हवे पण विदर्भ किंवा मराठवाड्यातील लोकांच्या मनी मानसी ही असे कदापी येत नाही मग गोव्याच्या जनतेने असे मनात का आणावे ? लोकमान्य टिळक म्हणतात तसे खरेतर शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतेही बंदीस्त करता येत नाही शिवाजी महाराज सर्व अर्थाने आदर्श राष्ट्रपुरुष होते. नेहरुंच्या आणि इंदिरागांधिंच्या नावाच्या गोष्टी राष्ट्रीय नेते म्हणून गोव्यात असू शकतील तसे तत्कालीन स्वांतत्र्यासाठी झगडणारे राष्ट्रीय नेते याच नात्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे ही गोव्यावर तेवढाच आधीकार बनत असावा असे वाटते. असो.
5 Dec 2015 - 2:51 am | निनाद मुक्काम प...
+१११११११११११
5 Dec 2015 - 3:30 am | निनाद मुक्काम प...
गोव्यात राहणाऱ्या प्रतिसाद वाचला आता त्यामुळे प्रतिवाद घालत नाही.
गोवा टीम मुळे मिपाकरांना गोव्याचा इतिहास मराठेशाहीचा संबंध लक्षात आला.
अवांतर मद्रास चे चेन्नई नामांतर लोकांच्या जिभेवर रुळले मात्र बॉंबे चे मुंबई का नाही रुळत.
5 Dec 2015 - 9:53 am | सुबोध खरे
मुंबईतील मराठी आणी गुजराती लोक आधीपासूनच मुंबई म्हणत आले आहेत.कोकणातही लोक मुंबईच म्हणतात. मुंबई बाहेरचे लोकच (यात पुणेकरही आले) आपण "सॉफिस्टीकेटेड" आहोत हे दाखविण्यासाठी "बॉम्बे" म्हणतात. यात मुम्बईतील अर्धआंग्ल आणि RNI( RESIDENT NONINDIANS निवासी अभारतीय) सुद्धा समाविष्ट आहेत.
सर्व शासकीय पत्रके आणी अधिकृत भाषा यात उल्लेख मुंबईच आहे. एस ती वर सुद्धा पाट्या मुंबई - रत्नागिरी मुंबई कोल्हापूर अशाच असतात.
5 Dec 2015 - 11:53 am | बोका-ए-आझम
फुटलो!
5 Dec 2015 - 2:56 pm | मृत्युन्जय
पुण्याचा उल्लेख आला म्हणुन सांगतो, पुणेकर मुंबईला मुंबईच म्हणतो. बॉम्बे म्हणुन मुंबईला अजुन तुच्छ लेखता आले असते तर कदाचित पुणेकरांनी विचार केला असता पण त्यामुळे काही फरक पडणार नसल्याने मूळ नावाने संबोधणे पुणेकरांना योग्य वाटते. माझे ठाण्यात राहणारे काही मित्र मात अजुन बॉम्बे म्हणतात ब्वॉ.
5 Dec 2015 - 4:52 pm | निनाद मुक्काम प...
अहो एवन पाकिस्तानी प्रसार माध्यमे भारताच्या विरुद्ध गरळ ओकातांना मुंबई असा उल्लेख करतात.
आंतराष्ट्रीय स्तरावर मुंबई असा उल्लेख असतो बर काही अमराठी दीडशहाणे मात्र बॉंबे म्हणतात त्यात तो आयुष्मान खुराणा सारखे अग्रेसर आहेत.
5 Dec 2015 - 6:33 pm | सायकलस्वार
मुंबईला बॉम्बे म्हणणे हे कुठल्या गावाची मक्तेदारी नसून मराठी माणसाच्या कणाहीन पुचाटपणाचे प्रतीक आहे. असे लोक सगळ्याच ठिकाणी आढळतात. दादरमध्ये राहणार्या आणि ठाकरे-बिकरेंना देवासमान मानणार्या मराठी माणसाला 'बॉम्बे' म्हणताना ऐकले आहे. सहसा या लोकांना 'मुंबई' म्हणणे हे काहीतरी बावळटासारखे वाटते. 'मराठी' हा शब्द तरी किती मराठी लोक वापरतात? त्याऐवजी ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतील. कारण महारष्ट्रियन म्हणजे काहीतरी कूल वाटते. मला तर हा शब्द ऐकल्यावर हसू आवरत नाही. अरे गाढवांनो कूल व्हायचंय तर निदान योग्य शब्द तरी वापरा ना!!!... 'महाराष्ट्रिया' नावाचा कुठलाही प्रांत नाही. म्हणायचंच झालं तर 'महाराष्ट्रन्स' म्हणवून घ्या.
'आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई' असे म्हणणारे मद्रासडे पण ऐकले आहेत. अरे XXXनो चेन्नईच्या आधी मुंबई झाले होते हे तुम्हाला माहीत नाही का? असे म्हणावेसे वाटते पण आपलंच नाणं खोटं तर काय बोलणार. खुन्नस म्हणून मी यापुढे 'मद्रास' आणि प्रत्येक साऊथवाल्याला मद्रासीच म्हणायच ठरवलं आहे.
या प्रकाराला कंटाळून अलिकडेच एका अमेरिकन माणसाशी बोलताना I am from Bombay म्हणालो (याने 'मुंबई' नाव कधी ऐकलं नसेल म्हणून) तर 'You mean Mumbai?' असं म्हणून त्यानेच मला सुधारलं.
7 Dec 2015 - 6:07 am | बॅटमॅन
हा शब्द माझ्याही डोक्यात जातो. अनेक नॉर्थ इंड्यन्स ऐतिहासिक पेपर्समध्येही हाच शब्द अट्टाहासाने वापरतात. लै **** आहेत साले.
7 Dec 2015 - 12:10 pm | गॅरी ट्रुमन
ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्राच्या राजधानीला 'बॉम्बे' आणि तामिळनाडूच्या राजधानीला 'चेन्नई' म्हणणारे मराठी लोकही आहेतच की. तसे असेल तर "आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई" असे म्हणणार्या दाक्षिणात्यांना कोणत्या तोंडाने शिव्या घालायच्या?
4 Dec 2015 - 11:08 pm | मालोजीराव
वाचून आनंद वाटला, मुख्यमंत्र्यांवरून आठवले गोव्याचे ६ वेळचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे छत्रपती घराण्याचे जवळचे नातेवाईक आहेत.
गोव्यातील अनेक मोठी मंदिरे छत्रपतींनी बांधून घेतली आहेत उदा. शांतादुर्गा मंदिर - शिवरायांचे नातू आणि संभाजीपुत्र शाहूंनी हे मंदिर उभारले आणि या मंदिराला ५ गावांचा सरंजाम तसेच सोन्याची पालखी दिलेली.
बांदोडे येथील नागेशी मंदिराची पुनर्बांधणी हि त्यांनी करून घेतली. इतर अनेक लहानसहान मंदिरांचे जीर्णोद्धार शिवराय,संभाजी,शाहू यांच्या काळात झाल्या
4 Dec 2015 - 11:39 pm | सतिश गावडे
पुण्यात शिवाजीनगरला कुठेतरी न. ता. वाडी आहे.
पीएमटीच्या पाटयांवरील ते न. ता. वाडी वाचून बरेच दिवस मला काही उलगडा झाला नव्हता.
5 Dec 2015 - 12:26 am | एस
वाकडेवाडीच्या भुयारी मार्गातून कृषी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आहे, त्या भागाला न.ता.वाडी म्हणतात. तिथे पीएमटी (पीएमपीएमएल) चे आगार (डेपो) आहे, म्हणून तिथे जाणार्या बशींच्या पाट्यांवर न.ता. वाडी असे लिहिलेले असते.
4 Dec 2015 - 11:41 pm | होबासराव
:)
5 Dec 2015 - 9:18 am | मोगा
तुमच्या नावाने एक न हो वाडी काढा.
5 Dec 2015 - 9:17 am | उडन खटोला
पैसा ताईनी सविस्तर उत्तर दिल्यास अनेकान्च्या शन्का दूर होतील अशी आशा आहे
5 Dec 2015 - 9:20 am | उडन खटोला
गोव्याच्या इतिहासात व हिन्दु संस्क्रुतिरक्षणात छत्रपति सम्भाजीराजान्चे फार मोठे योगदान असून मला वाटते त्याबद्दल गोवा सरकारने व्यापक जनप्रबोधन करणे गरजेचे आहे .
5 Dec 2015 - 5:43 pm | उडन खटोला
https://www.facebook.com/groups/bettergoa/?fref=nf
5 Dec 2015 - 5:47 pm | राही
एक सर्वसाधारण निरीक्षण असे की आजची गोव्यातली तरुण पिढी (महाराष्ट्रातल्या शहरांप्रमाणेच) इंग्लिश माध्यमातून शिकते. मराठी संस्कृतीशी त्यांना फारसे देणेघेणे नाही. गोवामुक्तीनंतर स्वतंत्र राज्य की महाराष्ट्रात विलीनीकरण असा पर्याय होता, आणि स्वतंत्र राहाणे कुणालाही आवडण्याजोगे असल्याने तोच पर्याय मान्य झाला. त्यावेळचे गोमंतकीय हे महाराष्ट्राकडे थोरल्या भावासारखे पाहात. धार्मिक आरत्या, पूजाअर्चा, जुनी आख्याने (आणि गोवामुक्तीसाठी महाराष्ट्राचे भरीव योगदान) वगैरे मराठीतून असल्याने हा भ्रातृभाव काही काळ टिकला. पण हळू हळू महाराष्ट्र हा हात पिरगळणार्या मोठ्या भावाच्या दादागिरीने वागत असल्याचा समज वाढू लागला. मराठी सांस्कृतिक विस्तारवाद भयप्रद किंवा नकोसा वाटू लागला आणि एक सूक्ष्म तिरस्कार निर्माण होऊ लागला. त्यात भाषावादाची भर पडली. बा. भ. बोरकरांना मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद ते कोंकणी आहेत यास्तव नाकारले गेले. त्या आधीच शणै गोंयबाब (वामनराव वर्दे वालावलीकर) यांनी 'कोंकणी भाशेचें जैत' या पुस्तकात कोंकणी ही मराठीहून वेगळी कशी याचा आवेशपूर्ण उहापोह केला होता.
सांस्कृतिक दृष्ट्या गोव्याचे नाते महाराष्ट्रातल्या फक्त छोटासा सिंधुदुर्ग आणि किंचितसे अतिदक्षिण रत्नागिरी या इवल्याश्या प्रदेशाशी आहे. उर्वरित महाराष्ट्राशी फारसे नाही. त्याउलट कर्नाटकातल्या कारवार- (उत्तर कन्नड आणि थोडे दक्षिण कन्नड)-या भागाशी जवळपास सारख्या भाषेमुळे अधिक जवळिकीचे आहे. कदंबांचे राज्य कारवार आणि गोव्यावर एकत्रितपणे साधारण पावणेदोनशे वर्षे होते. गोव्याची स्वतंत्र अस्मिता वाढती आहे आणि महाराष्ट्रातली प्रतीके, मानचिह्ने यासंबंधी फारसा आपलेपणा राहिलेला नाही. आता सध्या ज्यांना शक्य आहे ते गोव्याचे लोक पुण्यामुंबईत स्थायिक होण्यापेक्षा परदेशी जाणे अधिक पसंत करतील. हेही इतर भारतीय/महाराष्ट्रीयांसारखेच.
मला वाटते बांदोडकरांनी (ते कट्टर महाराष्ट्रवादी गोमंतकीय) होते प्रथम panjim (उच्चार पोण्ज्यें) चे स्पेलिंग panaji केले. त्याचा उच्चार बाहेरच्यांकडून काही काळ पण्जी असा न होता पानाजी असा होऊ लागला. त्यानंतर वास्कोच्या एका भागाच्या संभाजी या नामकरणाचा प्रस्ताव ठेवला गेला होता किंवा ते केले होते. पण हे नागरिकांना अजिबात पसंत पडले नव्हते. पानाजी सारखेच संभाजी असे गोव्याचे 'जीजी' होणार काय असा प्रश्न गमतीने तेव्हाच्या छापील माध्यमांतून उपस्थित झाला होता.
या बाबतीत अट्टाहास करण्यात अर्थ नाही आणि महाराष्ट्राने त्यात पडू नये असे मला वाटते.
शिवाय राजकीय पक्षदेखील कुरघोडीच्या राजकारणात वन अप्मनशिप दाखवताना प्रतिस्पर्ध्याला शह म्हणून असे सवंग निर्णय घेतात. कारण हे त्यांनी नाही केले तर त्यांचा प्रतिस्पर्धी ते अंमलात आणून श्रेय घेणार असतो.
5 Dec 2015 - 5:56 pm | माहितगार
असे परत परत का सांगितले जात आहे. मी वर एका प्रतिसादात स्पष्टीकरण दिले आहेच ते पुन्हा देतो. महाराष्ट्रीय लोक आधी भारतीय आहेत. गोवा भारतातच आहे आणि भारतीयेतरांचे खासकरून जुलमी राजवटीचे प्रतिक असलेले नाव नको म्हणण्याचा इतर भारतीयांनाही पूर्ण नैतीक अधिकार असावा असे वाटते.
बदललेले नवे नाव काय असावे हे ठरवण्याचा गोयंकरांचे मत जरुर विचारात घ्यावे.
अर्थात त्याच वेळी पै तैंनी दिलेल्या माहितीनुसार परकीय राजवटीपासून गोवा मुक्ततेचा पहिले प्रयत्न शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर ऐतिहासीक दस्तएवजांनुसार जात असतील तर त्याचे सुयोग्य क्रेडीट गोव्याच्या जनतेने त्यांना स्वतःहून बहाल करावयास हवे असे वाटते.
5 Dec 2015 - 6:13 pm | विकास
महाराष्ट्राने त्यात पडू नये
या संदर्भात अजून एक म्हणावेसे वाटते: व्यक्तीने म्हणणे म्हणजे ती व्यक्ती ज्या राज्यातली आहे त्या राज्याने अधिकृतपणे म्हणणे असे होते का? म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो. माझे गोव्या बद्दलच कशाला गुजरात बद्दलचे अमुक-तमुक मत मी व्यक्त केले, तर ते काय महाराष्ट्राचे मत होते का? हे म्हणजे, एकाने अतिरेकी हल्ला केला म्हणून त्या अतिरेक्याच्या धर्मालाच अतिरेकी म्हणण्यासारखे झाले, नाही का? ;)
मुंबईबद्दल उचलली जीभ करत उठसूठ कोणी काही बोलत असतो. मग हा नियम तेथे पण लागू करायचा का?
महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारने कधी काय म्हणले आहे? जे बोरकरांबरोबर झाले ते (नुसते चूकच नाही तर) अक्षम्यच होते. पण ते परत त्यावेळच्या बुद्धीवाद्यांमुळे झाले असे म्हणावे लागेल. (अनलेस तो निर्णय सरकारने घेतलेला असला तर. मला त्याची कल्पना नाही).
बर गोवामुक्तीनंतर जर गोवा कर्नाटकाच्या जवळ होते तर १९६१ साली, नेहरूंनी गोव्याला कर्नाटकाच्या ऐवजी महाराष्ट्राच्या जवळ प्रशासकीय कारणांवरून का नेले? उदा. गोवा इंजिनिअरींग कॉलेज हे मुंबई विद्यापिठाचा भाग होते, मुंबई हायकोर्टांतर्गत गोवा येत होते (अजून आहे का माहीत नाही). वास्तवीक १९६० च्या राजकीय पराभवानंतर, पक्षी: मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागल्यानंतर नेहरूंना तसे करणे अधिक आवडू शकले असते असे वाटते... शेवटी हा निर्णय केंद्राचाच होता, यशवंतरावांनी मुख्यमंत्री म्हणून घेतला नव्हता.
असो.
6 Dec 2015 - 12:38 am | राही
महाराष्ट्र ऐवजी महाराष्ट्रीय लोक असा शब्द हवा होता. महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते. मते तर असतातच आणि व्यक्तही होतात. पण अन्य राज्याच्या अंतर्गत प्रश्नाविषयी अशा प्रचारमोहीम टाइप माध्यम मोहिमा निघू नयेत असे वाटते. संकटकाळ असेल, पूर वादळ अशी आपत्ती असेल तर ठीक आहे. पण नामांतरासारख्या प्रश्नावर असे होऊ नये. अशाने त्या राज्याविषयी (राज्यातील लोकांविषयी) तिरस्कार वाढीला लागतो आणि दुरावा वाढतो. आधीच बिग ब्रदर वृत्तीचे बीज रोवले गेलेय, आणखी नको असे वाटते. त्यांचे त्यांना ठरवू दे कोणते नाव ठेवायचे ते.
हा सल्ला नाही, वैयक्तिक मत आहे. आणि तेसुद्धा दोन राज्यांत सलोखा असावा ह्या हेतूने आहे. महाराष्ट्राविषयी शेजारच्या किमान दोन राज्यांत दबक्या किंवा उघड शत्रूत्वाची भावना दिसते तशी दिसू नये असे वाटते.
6 Dec 2015 - 3:43 am | विकास
महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते.
अंशतः सहमत. (तरी देखील "असहमत" अजिबातच नाही). अंशतः अशा साठी करण आदर्श समाजात तसे होईल. पण व्यावहारीक जगात तसे होईलच असे नाही... नाहीतर बाँबेचे मुंबई करण्यावरून किती महाराष्ट्रीय नसलेल्यांनी आवाज केला? आजही करतात? तेच इतर अनेक ठिकाणी म्हणता येईल.
7 Dec 2015 - 10:57 am | राही
प्रशासकीय मुद्द्यांविषयी अगदी अचूक माहिती सध्या मला सहज उपलब्ध दिसत नाही. पण एक सांगता येईल. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कोंकण विभागाचे शैक्षणिक आणि न्यायविषयक अॅफिलिएशन मुंबई विद्यापीठ आणि मुंबई उच्चन्यायालय यांच्याशी होते. (काही काळ पुणे विद्यापीठाशीही संलग्नता होती असे वाटते.) गोव्याला मैसूर, धारवाड आणि बंगळुरु ही ठिकाणे प्रशासकीय दृष्ट्या दूर पडली असती. आजही बीएसएनएल टेलिफोन्सचे गोवा सर्कल हे महाराष्ट्राशी जोडलेले आहे. ह्या काही अॅड्मिनिस्ट्रेटिव कम्पल्शन्स असू शकतात. माहीतगारांनी याविषयी अचूक माहिती इथे लिहावी अशी आग्रहाची विनंती. आणखी म्हणजे भाषावार राज्यनिर्मिती होण्यापूर्वी सध्याच्या कर्नाटकातले बेळगाव, कारवार (ह्याचे आता विभाजन आणि जोड-मोड झाली आहे.) विजापूर, धारवाड हे जिल्हे जुन्या बाँबे प्रेसिडेन्सीमध्ये होते. त्यामुळे हा सर्व टापू प्रशासकीय दृष्ट्या मुंबईवर अवलंबून होता. अर्थात १९४९ साली धारवाड-कर्नाटक युनिवर्सिटी झाल्यानंतर चारपाच वर्षांत हे जिल्हे शैक्षणिक बाबतीत धारवाडशी जोडले गेले. पण बाकी कारभार मुंबईशी जोडलेला होता. हळूहळू इतर ठिकाणी हायकोर्टे, विद्यापीठे स्थापन झाली आणि मुंबईवरचे अवलंबित्व संपले.
7 Dec 2015 - 11:19 am | सुनील
खेरीज, गोवा मुक्त झाल्यानंतर तेथिल प्रशासन सांभाळण्यासाठी अधिकार्यांची पहिली फळी महाराष्ट्रातूनच डेप्यूट झाली होती (मधु मंगेश कर्णिक हे एक नाव चटकन आठवले).
पुढे ८० च्या दशकात गोवा हे राज्य बनल्यानंतरही बरीच वर्षे गोव्यासाठी IAS अधिकार्यांचे वेगळे केडर नव्हते. महाराष्ट्र केडरचेच अधिकारी तिथे नेमले जात.
7 Dec 2015 - 12:13 pm | राही
गोवा हा दीव, दमण, दादरा आणि नगरहवेलीसह केंद्रशासित प्रदेश असताना केंद्रातून बरेच महाराष्ट्रीय अधिकारी तिकडे पाठवले गेले. श्री. ज्यूलिओ रिबेरो यांनाही गोव्याचे पोलिसप्रमुख म्हणून नेमणुकीबद्दल विचारणा झाली होती (हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेले ऐकले आहे.) ती त्यांनी नाकारली. १९८७मध्ये स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर प्रशासकीय बाबीत केंद्राचा हस्तक्षेप कमी झाला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रभाव उतरणीस लागला. गोव्याची स्वतंत्र अस्मिता फुलू लागली. गोवा कलाअकादमीचीही स्थापना झाली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रभाव ओसरू लागला. माधव गडकरी यांनीदेखील एके काळी गोव्यातली पत्रकारिता गाजवली होती. धन्यवाद
5 Dec 2015 - 9:18 pm | प्रदीप
वरील माहिती व उहापोह दोन्ही चांगली आहेत. पण त्यातून ह्या धाग्याच्या संदर्भातील सर्वात महत्वाची बाब सुटली आहे, ती म्हणजे गोवन कॅथॉलिकांचा (विशेष करून, आणि खरे तर, सर्वच भारतीय कॅथॉलिकांचा) स्वतःस, इतर नेटिव्हांपेक्षा आपण काहीतरी खास आहोत, ही सर्व इतर भारतीय जनता uncouth आहे असा स्वतःविषयीचा गैरसमज, व त्यातून येणारे त्यांचे उद्द्दाम वागणे. धागालेखकाने त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि सदर नामांकरणाला होणारा तीव्र विरोध त्यांच्या ह्याच अॅटिट्यूडमधून आलेला आहे.
6 Dec 2015 - 4:05 am | निनाद मुक्काम प...
हॉटेल व्यवस्थापनाचे धडे मुंबईत गिरवले असल्याने गोवानीज खिस्ती लोकांशी परिचय आला.
माझे अनेक चांगले मित्र आहेत मात्र चुकूनही हिंदू देवळात येत नाहीत मात्र अनेक हिंदू मुंबईकर माहिमचा चर्च व वांद्र्याच्या माउंट मेरी च्या जत्रेत भक्तिभावाने सहभागी होतात.
आपला असलेला नसलेला पोर्तुगीज वारसा मिरवायचा प्रयत्न करतात,
6 Dec 2015 - 10:18 am | मोगा
तुम्हाला चर्चमध्ये नसेल जायचे तर जाऊ नका. इतरांच्या जाण्यावर तुमचा आक्षेप का ?
( आमची बायकू प्रेग्नंट असताना रोज कृष्णाच्या फोटोपुढ मागत होती ... मुलगा पाहिजे !
मला हवी होती .. मुलगी.
मी निराश मनाने सर्व हिंदु देवांकडे बghat होतो.
अचानक चमत्कार झाला. एका मित्राने माउंट्मेरी चर्चजवळ सहज भेटायला बोलावलं ....
...... आता मी व माझी पाच वर्षाची मुलगी अधुनमधुन चर्चमध्ये जातो.)
6 Dec 2015 - 10:20 am | मोगा
गर्व से कहो हम जिहादी है !
गर्व से कहो हमारी बेटी पोर्तुगीज है !
6 Dec 2015 - 10:28 am | संदीप डांगे
काय पकवता हो! इथे सांगितला ते सांगितलंत, तुमच्या मुलीला सांगू नका!
6 Dec 2015 - 10:40 am | अर्धवटराव
=))
=))
6 Dec 2015 - 10:43 am | मोगा
तिचा अब्बू मुसलमान होणार आहे.
तिला आम्ही गंमतीने ख्रिस्चन म्हणतो.
6 Dec 2015 - 10:50 am | संदीप डांगे
हे आकाशातल्या बापा! ह्यांना माफ कर, हे काय करत आहेत ह्यांना खरंच कळत नाही.
6 Dec 2015 - 4:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे लांडगा आला, लांडगा आला, खूप वेळा झाले. काय ते करून टाका एकदाचं. ;)
6 Dec 2015 - 4:56 pm | संदीप डांगे
अजून होणार आहेत असंच ऐकतोय. बहुतेक घाबरत असतील. न जाणो चुकीचे दिशेने वाकून नमाज पढायला गेलो आणि समजलं अल्लाहच्या अपमानात मान गमावली आहे ते....
6 Dec 2015 - 10:25 am | राही
बहुजनसमाजातले हिंदू हे निदान मंबईतल्या जुन्या चर्चेसमध्ये अजूनही जातात हे खरेच आहे. त्याची दोन तीन कारणे आहेत. एक तर हिंदूंना त्यात काही वावगे वाटत नाही आणि आता त्यामुळे त्यांना बाटगेपणा येत नाही. २) चर्च अथॉरिटी अन्य धर्मीयांच्या येण्यास प्रोत्साहन देते आणि चर्च कड्याकुलुपात, सोवळ्या-ओवळ्यात ठेवीत नाही. (हे अन्य धर्मीयांना धर्मबदलासाठी प्रलोभनही होते.) तिसरे म्हणजे ज्या कोळी-आगरी-भंडारी यांच्यातल्या धर्मांतरितांसाठी ही चर्चेस बांधली गेली (हे अर्थात मुंबईच्या संदर्भात,) त्यांच्या धर्म न बदललेल्या जातभाईंसाठी ही नवी सुघटित स्वच्छ देवळेच बनली. त्यांनी मालपादेवी-भाटलादेवी-घोल्पादेवी-जाखाई-मरीआई यासोबतीने मेरी हीसुद्धा आणखी एक देवी मानून या देवळांत जाणे सुरू केले. ही हिंदू बहुजनांची आश्चर्यकारक समावेशकता. यावरून मला अमीबा या एकपेशीयाचे उदाहरण आठवते. हा जीव आपल्या छद्मपादांद्वारे भक्ष्यकणाला विळखा घालतो, आपलेसे करतो आणि आत्मसात करतो. भक्ष्याच्या पोषणावर स्वतः वाढतो. ४) काही केसेसमध्ये या चर्चेसच्या ठिकाणी किंवा परिसरात हिंदू बहुजनांची गावदेवळे होती आणि तिथे पूजा करण्याची प्रथा नव्या पूजापद्ध्तीने चालू राहिली.
पण गंमत अशी की या सर्व खटाटोपात चर्चचे देखील मराठीकरण, हिंदवीकरण झाले. या अन्यधर्मीय भक्तगणांच्या सोयीसाठी त्यांच्या सर्विसेस मराठी, कोंकणी, गुजरातीत होऊ लागल्या. मराठीतल्या बायबलची भाषा हिंदवी झाली. हिंदू थव्यामुळे चर्चबाहेरील उत्सवातल्या यात्रांचे स्वरूप बदलले. तिथेही आपल्याकडच्या देवीच्या देवळाबाहेर दिसणारे चणे-फुटाणे, फुले हार अशी दुकाने दिसू लागली.
चांगली गोष्ट अशी की आता खूपश्या हिंदूंना स्वतःच्या धर्मबदलाचे भय वाटत नाही. ते मोकळेपणाने कुठेही (पर्मिटेड ठिकाणी) जाऊन तिथे आपल्या संस्कृतीची छाप पाडू शकतात, पाडतात. भारतात क्रिस्टिअन धर्माधिकार्यांना त्यांच्या अनुयायांबद्दल असा विश्वास वाटत नाही. ते लोक हिंदू स्थानांवर गेले तर न जाणो पुन्हा हिंदू धर्माच्या प्रभावाखाली येतील अशी असुरक्षितता त्यांना वाटते म्हणून हिंदू मंदिरांत जाण्याविषयीचे त्यांचे नियम काहीसे कडक आहेत.
6 Dec 2015 - 10:34 am | संदीप डांगे
काहीसे अशीच धारणा राजीव मल्होत्रांनी डायजेशन ऑफ रीलीजन ह्या संकल्पनेत मांडली आहे.
6 Dec 2015 - 10:35 am | प्रदीप
माझ्या लहानपणी आम्ही सर्व कुटुंबिय तसेच आसपासचे नातेवाईकही, नित्यनेमाने मोतमाऊलीच्या जत्रेस जात असूं. (आणि आम्ही बहुजनसमाजातील नाही आहोत). असेच आम्ही कधीही जवळच्याच डॉनबॉस्कोच्या चर्चमधेही जात असूं. आता मी रहातो तेथेही अशी भव्य चर्चेस आहेत. अशाच एका चर्चमधे आमच्या ओळखीची एक हिंदू स्त्री अधूनमधून नित्यनेमाने जायची. अर्थात काही दिवस असे तिला तेथे पाहिल्यावर धर्मबदलाबदल रीतसर विचारणा तेथे झालीच.
गोव्यात मात्र देवळांतून अनेक क्रिस्टियन्सनाही येतांना व देवाला कौल लावतांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तिथे हे सरमिसळ बर्यापैकी होत असावी.