दिव्य पेर्णा : http://www.misalpav.com/node/33935
अॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात
सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर
सगळ्यात शेवटच्या अॅड डिझाईनच्या
सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर
मी काम करतो.
रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात
डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत
तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर.
एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन
चुका काढतात स्वतःलाच न कळणार्या
स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू.
डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान.
गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी स्कीम एखादी
मोठ्या कॅम्पेनिंगची काल्पनिक कारंजी उसळतात
जाहीरातींचे लेआऊटवर लेआऊट प्रिंटतात
नव्या कन्सेप्टची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो डिझाईनर टेबलावर डोके ठेवून
एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो.
आर्टिस्ट. व्हिज्युअलायझर, मेंटॉर.
प्रतिक्रिया
3 Dec 2015 - 3:10 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला. काम करू करू वैतागलेला अभ्य एकदम डोळ्यांसमोर उभा राहिला.
3 Dec 2015 - 3:10 pm | बिपिन कार्यकर्ते
एजन्सी बदला. ;)
3 Dec 2015 - 3:17 pm | प्रसाद गोडबोले
वाह !
कामसु हुशार होतकरु अभ्या !
3 Dec 2015 - 3:28 pm | वेल्लाभट
अरे रे !
काय डिझाईन बिघडलंय कवीचं... पण कविता मात्र जबर झालीय!
3 Dec 2015 - 3:31 pm | नाखु
नव्याने लिहा "प्रुफे " तपासा, काय जमेल ते तपासा...
सभीक्षक नाखु
स्वगतः जबरी लिहिलयं... ही खरी वास्तववादी कवीता... बाकी सारं जोडकाम उर्फ जुगाड
3 Dec 2015 - 3:31 pm | नीलमोहर
खफवर आत्ताच खरडून आले तेच कॉपी पेस्ट,
Thu, 03/12/2015 - 15:24
ऑफिस लौकरात लौकर सोडलं पाहिजे हे कळतंय पण वळवता येत नाहीये
3 Dec 2015 - 3:58 pm | संदीप डांगे
अप्रतिम कविता
हजारो कॅम्पेननंतर येणारे एखादे ग्रेट डीप्रेशन
या कवितेवरुन सर्वात अगोदर माझाच हा शेर आठवला
इसकी मांकी, मुझे रोके प्रिंट करनेसे कहां है वो प्रुफ
क्लायंट मेरे पीछे है तो डेडलाईन मेरे आगे
ग्रेट डीप्रेशन. खरचं इतक्या वेळा ती क्लायंट ब्रीफं वाचलेली पण त्यातुन असे एखादे डीप्रेशन जन्माला येऊ
शकते असे कधीच वाटले नाही.
डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान
ही ओळ तर विलक्षणच म्हणावी ही ओळ वाचल्यावरच दोन चार घाणेरड्या शिव्या आल्या भळ्ळकन् !
धन्यवाद अभ्या... जी
अनेक धन्यवाद !
3 Dec 2015 - 4:11 pm | pacificready
प्रतिभावंतांच्या कथा आणि व्यथा.
भारी वाटतंय जे काय आहे ते.
3 Dec 2015 - 4:18 pm | एस
हेहेहे!!! ;-)
3 Dec 2015 - 5:10 pm | प्रचेतस
मूळ पेर्णा हुच्च असल्याने अजिबात झेपली नव्हती. पण ह्या कवितेतली साध्या सोप्या शब्दांत व्यक्त केलेली डिझाईनरची व्यथा काळजाला भिडली.
3 Dec 2015 - 5:29 pm | यशोधरा
बॉबौ!! असं कधीपासून व्हायला लागलं अभ्या? =))
3 Dec 2015 - 6:47 pm | अत्रुप्त आत्मा
3 Dec 2015 - 6:54 pm | प्रचेतस
तुम्हाला ही कविता झेपली नै काय? नै एका कलाकाराच्या व्यथेवर अगदी खदखदून हसताय म्हणून विचारलं.
3 Dec 2015 - 7:09 pm | अत्रुप्त आत्मा
मी इ डंबना वर हसलो... असो!
3 Dec 2015 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही ... हसलेल्याला आत्मरंजक वृतीणुसार खदखदून असं आपलं आपणच ठरवून कसं काय घेतल? असो...चालायचेच!
3 Dec 2015 - 8:27 pm | प्रचेतस
खी खी खी. =))
3 Dec 2015 - 7:08 pm | शिव कन्या
मूळ पेर्ने वर आत्ताच डोकं आपटून आले....तर समोर हे!
अभ्या भौ , होतं असं!!! सिद्धेश्वर तळ्याकाठी चक्कर मारून ये.
रच्याकने, कविता चांगली आलीय.
4 Dec 2015 - 5:14 am | नगरीनिरंजन
झकास आहे. विडंबन नाही, याला मी सुडंबन म्हणेन. निओकॉर्टेक्समध्ये अगदीच सन्नाटा असलेल्यांना समजायला सोपे व्हर्जन.
शिवाय या निमित्ताने मूळ दिव्य पेर्णा डोळ्याखालून घालण्याचे कष्ट आणखी काही लोकांनी घेतले असतील; त्याबद्दल धन्यवाद!
4 Dec 2015 - 10:56 am | चांदणे संदीप
आमेन!
4 Dec 2015 - 11:06 am | अभ्या..
धन्यवाद वाचकहो. त्रिवार धन्यवाद.
खुद्द निरंजनरावांना आवडली म्हणजे आम्ही हवेतच हो भौ. धन्यवाद
4 Dec 2015 - 11:11 am | सस्नेह
खरं तर हे विडंबन वाटत नाही, तर स्वतंत्र अभिव्यक्ती वाटते.
पण 'अभ्या..' टच नसलेली.....
6 Dec 2015 - 12:14 am | एक एकटा एकटाच
जबरा
6 Dec 2015 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृदयस्पर्शक !
6 Dec 2015 - 7:36 pm | तिमा
डोंबिवली फास्ट, सारखी एक बॅट हाताशी ठेवा.