तळ्याकाठच्या झोपडीतील
म्हातारीचे विहळणे
तळ्यावरच्या धुक्याच्या
शालीला कापत
टिटवीच्या घरट्यात
तरंग निर्माण करत होते.
भररात्री टिटवीचा
भयाण भेसूर सूर
अशुभाचे सूर आळवायला
लागला.
अशुभाच्या सावटाने चंद्र
ढगाआड लपला,
टिटवीची पिल्ले खाणारा
भुजंग अस्वस्थ झाला,
टिटवीच्या आकांताने,
टिटवीच्या पिल्लांच्या
स्पर्शाने विटाळलेली
त्याची जीभ,
जास्तच वळवळायला लागली.
कातडीखालच्या सळसळीने
भर थंडीतही भुजंगाचा विस्तव
केला,
विस्ताळलेला भुजंग,
वा-याला चिरत,
धुक्याला ग्रासत
झोपडीच्या दिशेने सरसावला.
टिटवीचा आक्रोश,
म्हातारीचे विहळणे थांबले
तरच थांबाणार होता.
एकाच फुत्कारी दंशाने
विहळ्णे कायमचे विरून गेले
धूक्यात......
झोपडीचे दार सताड उघडे,
टिटवी निपचित पडलेली
भुजंग
धुरकट तळ्याशेजारी
सोलवटुन पडलेला
अन्
तळ्यावरचे अभ्रपटल
सूर्यकिरणांनी दूर सारले.....................
विजयकुमार...........
21 / 11 / 2008
प्रतिक्रिया
3 Dec 2015 - 7:10 pm | शिव कन्या
भय इथले संपत नाही.
तुमची प्रतिमांची दुनिया ग्रेस, खानोलकर, जी ए कुळातील आहे.
लिहित रहा .
3 Dec 2015 - 7:19 pm | दमामि
अगदी हेच म्हणायचे होते.
3 Dec 2015 - 7:25 pm | जव्हेरगंज
+१
4 Dec 2015 - 1:21 am | बोका-ए-आझम
कोंडुरा आणि अजगर यांचीच आठवण झाली!+१११११
4 Dec 2015 - 11:04 am | पालीचा खंडोबा १
ग्रेस, खानोलकर, जी ए ह्यान्चा माझ्यावर प्रभाव आहे हे खरे. त्यांचि शैलि भव्ते मल