गाभा:
दैनिक भास्कर मधील बातमी.
5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे.
अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते......
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 7:06 pm | रुस्तम
जिलबी
27 Nov 2015 - 10:17 pm | अभिजित - १
बहुतेक ४४ वर्ष पूर्वी च्या रद्दी तून यांनी जिलबी च्या पुड्या आणल्या दिसतात.
28 Nov 2015 - 11:49 am | मंदार कात्रे
+१००
27 Nov 2015 - 7:18 pm | पगला गजोधर
शोलेतील सांबा हा मनुष्य नसून, उंचावर बसून येणारे जाणारे ढग पाहून, पावसाचा अंदाज वर्तवणारा हवामान-शास्त्रज्ञ होता. तुम्हाला काय वाटते......
27 Nov 2015 - 7:22 pm | संदीप डांगे
अच्छा म्हणजे हवामान-शास्त्रज्ञ हे मनुष्य नसतात असे म्हणायचंय काय...? बाकी तेही बरोबर म्हणा...
27 Nov 2015 - 10:42 pm | DEADPOOL
@संदीप डांगे
तुम्हाला प्रत्येक धाग्यावर वाद निर्माण करण्याची हौस येते का?
28 Nov 2015 - 8:38 am | भंकस बाबा
डॉट टाकले आहेत यूरेका म्हणुन वाचावेत. ..........................................................
28 Nov 2015 - 9:54 am | संदीप डांगे
तुम्हाला सॅरकाझम समजत नसेल तर तो माझा दोष नाही. बाकी तुम्ही माझ्या हौसे-मौजेची काळजी क्रु ने ही नम्र इनंती.
28 Nov 2015 - 8:41 am | पगला गजोधर
मधल्या काळांत उपसागरात राकु वादळाने निर्माण झालेल्या, कमी दाबाच्या पट्ट्याने, दूर राहिलेले 'लाटलेल्या जिलब्यांचे ढग' पुन्हा मिपा गांवावर जमा झालेत, मधल्या काही काळात उघडीप दिलेल्या जिल्बीवर्षाव पुन्हा कार्यान्वित झालेला दिसतोय.
28 Nov 2015 - 11:55 am | विशाल कुलकर्णी
बाक़ी सांभा बसलाय त्या खालच्या दगडाचा (पिवळ्या रंगाच्या) आकार हनुमानाच्या गदेसारखा दिसतोय. गब्बर रामायणकालीन असावा काय? की रावणच दोन रुपात वावरत होता ?
27 Nov 2015 - 7:21 pm | स्पा
ऑ, अच्च शग्ग जाल्ल्ल तल !!!!
27 Nov 2015 - 7:24 pm | मारवा
धागा फार मोठा आहे.
अयोध्या ते कन्याकुमारी अंतर देखील फारच लांब आहे.
त्यामुळे थोडा दोन भागात वरील धागा टाकला
तर कीमान धाग्याच्या गहन विषयाचा प्राथमिक ढोबळ का होईना अंदाज लावता येतो.
बाकी
इतिहासकार एच. डी. संकलिया एक महत्वपुर्ण नावं.
आपल्या व्यासंगी दिर्घ गंभीर धाग्यांचा
नेहमीचाच यशस्वी चाहता.
27 Nov 2015 - 7:33 pm | तिमा
पास.
27 Nov 2015 - 7:35 pm | अद्द्या
नाग मणी म्हणजे खरं तर avengers मध्ये दाखवलेले mind stones आहेत .
आणि हे सगळं आपल्या कडे पहिल्या पासून होतं . नॉर्स माय्थोलोजी ने हे आपल्याकडून चोरलेलं आहे .
तुम्हाला काय वाटते ?
27 Nov 2015 - 7:46 pm | अजया
जिलबी खाल्ल्यावर दात घासणे आवश्यक आहे.
27 Nov 2015 - 8:22 pm | बॅटमॅन
कुणाला कशाचं नि तुम्हांला दाताचं =))
27 Nov 2015 - 8:36 pm | अजया
वैधानिक इशारा ;)
27 Nov 2015 - 10:07 pm | विशाल कुलकर्णी
क्या आपकी टुथपेस्टमें नमक है ?
28 Nov 2015 - 11:51 am | मंदार कात्रे
क्या आपके टूथपेस्ट मे नमक , लिम्बु , मिरची ,आले ,लसुण आणि बियर भी हय?
;)
28 Nov 2015 - 1:31 pm | बॅटमॅन
क्या आपके कवितामे यमक है?
28 Nov 2015 - 1:44 pm | आदूबाळ
लोल!!
28 Nov 2015 - 2:20 pm | अजया
=))=))
27 Nov 2015 - 7:54 pm | मोगा
इरावती कर्वे का कुणीतरी एका मराटी लेखिकेने एका पुस्तकात हेच लिहिले होते.
27 Nov 2015 - 7:59 pm | बबन ताम्बे
आळंदीला नाही का अलंकापूरी म्हणतात?
:-)
27 Nov 2015 - 8:11 pm | परिकथेतील राजकुमार
त्याने काय फरक पडतो तुमच्या आमच्या आयुष्यात?
27 Nov 2015 - 8:23 pm | अद्द्या
अरे
असं कसं . काय फरक पडतो ? हा प्रश्न तू विचारावस ?
लाटकर काका आहे ते . त्यांना प्रत्येक गोष्टीने फरक पडतो आणि ते प्रत्येक गोष्टीवर विचार करतात ..
काय फरक पडतो . .
मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं
27 Nov 2015 - 8:27 pm | बॅटमॅन
अता यामुळे काहीतरी परत करणे आले. =))
27 Nov 2015 - 8:29 pm | सतिश गावडे
ते लपवलेलं भांडं परत करा ना तेव्हढं.
27 Nov 2015 - 8:32 pm | बॅटमॅन
माजं भांडं कोनी चोरीयलं =))
28 Nov 2015 - 1:10 am | कपिलमुनी
भां*चोर !!
27 Nov 2015 - 8:36 pm | अद्द्या
आणि तो बुलडोजर .
आपलं ते . .पळी ?
27 Nov 2015 - 10:43 pm | DEADPOOL
मला यूटिलिटी बेल्ट द्या ना!
27 Nov 2015 - 8:30 pm | जेपी
असहिष्णु शब्दाचा शोध कोण लावला ??
27 Nov 2015 - 8:35 pm | याॅर्कर
आम्ही नै जा
जिलबी थंड झाल्या आता
27 Nov 2015 - 8:41 pm | प्रसाद गोडबोले
हेमंत लाटकर म्हणजे सातार्यातील लाटकर पेढेवाले तर नव्हे ?
27 Nov 2015 - 8:42 pm | मांत्रिक
हा हा! प्रगो मस्तच प्रश्न!
27 Nov 2015 - 8:48 pm | मांत्रिक
बाकी सातारला कट्टा करायचाय! तू, चिमणराव, टका, नाखु, बॅटॅ यांना भेटायचंय एकदा! ये, मस्त सातारी मटण बनवू!!!
27 Nov 2015 - 8:54 pm | मांत्रिक
आणि आमचा सुडाण्णा पण!!!
27 Nov 2015 - 8:56 pm | सतिश गावडे
तुम्ही सातार्याचे की ठाण्याचे एकदा काय ते ठरवा. :)
27 Nov 2015 - 9:01 pm | मांत्रिक
ओ सगाण्णा मी मूळचा सातारचा! ठाण्यात सर्विसला! तुमी पण या की राव सातारला! मस्त चुलीवरचं मटण आणि भाकर्या बनवू. तुम्ही कोकणातले नं? बहुतेक अस्सल सातारी टेस्ट नसेल केलं. एकदा या राजे. कट्टा करु!!!
हाटेलात सातारी कोलापुरी मिळतं ते फ्राॅड असतं हे माझं मत. एकदा या सातारला राजे. पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!
27 Nov 2015 - 9:11 pm | सतिश गावडे
दीड वर्षांपूर्वी मार्कस ओरेलियसची डायरी वाचली नसती तर आमंत्रणाचा स्वीकार केला असता. :)
कधी काळी सातारला पायपीट करुनही पवई नाक्याच्या आसपास मांसाहारी हॉटेल सापडले नव्हते.
27 Nov 2015 - 9:14 pm | मांत्रिक
ऑ? आहो आमचं हाटेल नाहीये!!! घरी या म्हणतोय राजे!!!
बाकी पवई नाक्यावर मराठा दरबार हे बेस्ट नानव्हेज हाटेल सापडलं नाही?
27 Nov 2015 - 9:40 pm | सतिश गावडे
मराठा दरबार आम्ही उतरलो होतो त्या रजताद्रीच्या डाव्या हाताला* होतं. मात्र "मला सटरफटर खावे लागेल तिथे" असे आमच्या शाकाहारी मित्राचे म्हणने.
*"डाव्या हाताला" हा शब्द समुच्चय वाचला की कोकणातली "डाव्या हाताला तोंड जवळ" ही प्रसिद्ध म्हण आठवते.
27 Nov 2015 - 11:40 pm | अस्वस्थामा
28 Nov 2015 - 12:11 am | pacificready
करु दणका च्यामारी!
28 Nov 2015 - 1:27 am | बोका-ए-आझम
.
27 Nov 2015 - 8:48 pm | बॅटमॅन
बहुत प्याराण्णा लगता हय!!!!
27 Nov 2015 - 10:01 pm | pacificready
कैच्या कै.
मांत्रिक नं चूल विझली तरी मटनाचा रस्सा पातेल्यात घालून चादर पसरून ठेवलीय. काय ते करा एकदा. मांत्रिक भो, तारखा कळवा, आम्ही पण येऊ.
27 Nov 2015 - 8:48 pm | अजया
=))
27 Nov 2015 - 8:43 pm | होबासराव
:)
27 Nov 2015 - 8:43 pm | याॅर्कर
असहिष्णुता!!!!
.
.
.
ज्यांचे डुआयडी आहेत त्यांनी ते या मोक्यावर मिपास परत करावेत.
(माझा आहे/नाही)
27 Nov 2015 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोठा लेख असेल, काही सन्दर्भ असतील आणि काही निष्कर्ष.
धागा उघडला आणि हौस झाली, धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2015 - 9:15 pm | सतिश गावडे
अपेक्षा फार मोठया नसल्या की अपेक्षाभंगाचं दुःख सहन करावं लागत नाही.
मोगरा फुलला - गो नि दांडेकर
27 Nov 2015 - 9:16 pm | अभ्या..
हे काय सरजी? हौस झाली म्हणजे पोपट झाला टाईप का?
फस्टाईम ऐकलो ब्वा.
27 Nov 2015 - 9:33 pm | प्रसाद गोडबोले
हो , त्यांन्ना हंस झाली असे म्हणायचे असेल =))
27 Nov 2015 - 9:41 pm | कंजूस
हौसेने वाडते सगळे हैत का?सातारचा डबा आला की बसू.
27 Nov 2015 - 9:32 pm | १.५ शहाणा
रामायणात रामाने रामेश्वर येथील वाळूचे शिवलिंग स्थापियाले असा उल्लेख आहे रामेश्वर हे कन्याकुमारी जवळ आहे. म्हणजेच आताची श्रीलंका म्हणजेच लंका होय आसे वाटते
27 Nov 2015 - 9:36 pm | कंजूस
अंतर फार असल्याने १९७१ चा धागा आता निघाला.चित्रकुटावर घेतलेले कपडे फाटले मग पिपलीला मस्त रंगीत घेतले पण वाटेत माकडांनी ओरबाडले,शेवटी मदुराइला लुंग्या घेतल्या,डोसे खाऊन धनुष्कोडीला पोहोचलो.होडीतून जाताना फार भीती वाटत होती. हवामान खात्याने पाच नंबरचा बावटा लावलेला.होडी वर खाली होताना सेतू दिसायचा खालचा.बाब्बो काय ते आर्किटेक्चर! तोंडात बोटे घातली पण खारट लागली ,हात लुंगीला पुसले.किनाय्रावर रावणाचा १०००---००वा नातू आला होता स्वागताला. जव्हेरकँडीला हॅाटेलात उतरायची व्वस्था केली होती.बारतातून आलेल्या संसोदकांची इकडेच व्वसथा करतात.हॅाटेलच्या बाहेर पडू देत नाहीत.जाताना एक तयार प्रोजेक्ट रिपोर्ट हातात ठेवला.तो तुमच्यासमोर ठेवला आहे त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे हीविनंती.
27 Nov 2015 - 10:18 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
27 Nov 2015 - 11:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
28 Nov 2015 - 3:34 am | शब्दबम्बाळ
ठकार ताई आठवल्या!! :D
28 Nov 2015 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
-दिलीप बिरुटे
27 Nov 2015 - 9:49 pm | साती
हे बघा, एक्का काका स्वतः श्रीलंकेला जाऊन आलेत.
तिथे अशोकवन आहे की नाही विचारा.
:)
27 Nov 2015 - 9:52 pm | चित्रगुप्त
सग्ळे मिप्पाकर मेल्ले अग्दि दुष्ट्ट आणि असहिष्णु आहेत. 'तुम्हाला काय वाटते ?' असे विचारले तरी त्याबद्दल कुण्णी कुण्णी काही सांगत नाही.
27 Nov 2015 - 9:57 pm | चित्रगुप्त
अशोकवन हे दहिसर येथे आहे. हा दुवा बघा. इथे उत्खननात सीतेची राखण करणार्या राक्षसिणींची हाडे मिळाली होती म्हणे.
27 Nov 2015 - 10:53 pm | दा विन्ची
दुवा पाहिला. अशोकवन दहिसरला होते आणि आहे हे पटले. मग शबरी आरे कॉलोनीत रहायची हे ऐकले हे खरे काय?
अवांतर: अशोकवनात उद्वाहक (उर्ध्वगामिनी ) तेव्हा होता काय? बाकी हा अतिशय अभ्यासपूर्ण धागा आवडला.
27 Nov 2015 - 10:56 pm | हेमंत लाटकर
श्रीरामाची वानरसेना समुद्रावर सेतू बांधत होती तेव्हा रावणाची राक्षससेना सेतू कसा बांधत आहेत हे बघत होती का.
27 Nov 2015 - 11:02 pm | 'पिंक' पॅंथर्न
मी तर आत्ताची ऑस्ट्रेलिया म्हणजे खरी लंका आणि ही जी जावा - सुमात्रा बेटे आहेत तो रामसेतु आहे असं वाचलं होतं ....
दुवा मागू नये !!
27 Nov 2015 - 11:38 pm | रमेश आठवले
लाटकर साहेबांनी सांकलिया यांच्या लेखाचा संदर्भ दिला असता तर बरे झाले असते . सांकलिया यांचा लेख बरेच वर्षा पूर्वी वाचला होता.
तेलुगु आणि कदाचित इतर द्रविडी भाषांमध्ये लंका हा शब्द मोठ्या नद्यांमध्ये आढळणार्या बेटा साठी वापरतात. सांकलिया साहेब यांनी दंडकारण्या मधील अशा एखाद्या बेटांचा उल्लेख रावणाची लंका असा केला असावा. अशा मोठ्या बेटांवर मनुष्यवस्ती असते. उदहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदीत सध्या ४२१ कि. मी . क्षेत्रफळाचे लोकवस्ती व शेती असलेले मजोली नावाचे बेट आहे .
लहानपणी आईच्या तोंडी -लंकेची पार्वती- असा शब्द प्रयोग ऐकला होता. बहुधा तो दागिने अथवा आभूषणे न घालणार्या स्त्री साठी वापरला जात असावा. ही कोणती लंका आणि तिथे रहणारी मंदोदरी अथवा सीता यांच्या शिवायची ही कोणती पार्वती याचा खुलासा कोणी करू शकेल काय ?
अयोध्या ते कन्याकुमारी हे ३००० कि. मी . श्रीराम यांनी कसे पार केले असेल असे श्री लाटकर यांनी विचारले आहे. त्या वरून मथुरा ते द्वारका हे १३०० कि. मी . श्री कृष्णाने साधरणत: त्याच कालखंडात कसे पार केले असा प्रश्न निर्माण होतो. मात्र या बाबतीत दुसरे एक पुरातन शास्त्रातील विद्वान, एस . आर . राव, यांच्या द्वारकेच्या समुद्रात केलेल्या उत्खनन कामाने सकृददर्शनी पुरावा उपलब्ध झालेला आहे
28 Nov 2015 - 1:29 am | बोका-ए-आझम
(उच्चारी लोंका) हा शब्द बंगाली आणि आसामी भाषांमध्ये आहे. त्याचा अर्थ मिरची असा आहे.
28 Nov 2015 - 5:19 am | कंजूस
""मात्र या बाबतीत दुसरे एक पुरातन शास्त्रातील विद्वान, एस . आर . राव, यांच्या द्वारकेच्या समुद्रात केलेल्या उत्खनन कामाने सकृददर्शनी पुरावा उपलब्ध झालेला आहे""-
मोठी नगरी असल्याचा एकही अवशेष नाही केवळ इतर कोणत्याही बंदरालगत सापडतील असे अवशेष आहेत.ते सर्व एका ठिकाणी संग्रहालयात ठेवून उत्खनन थांबवले आहे.
यालेखाच्या चर्चेचे गांभिर्य ओळखून कृष्ण द्वारकेला का गेला मदुराईला का नाही यावर प्रकाश टाकावा.
28 Nov 2015 - 10:18 am | रमेश आठवले
एस आर राव यांनी लिहिलेले आणि १९९९ साली प्रसिद्ध झालेले Lost City of Dvaraka हे ३०० पानी पुस्तक वाचून मगच सध्या समुद्रात असलेली द्वारका ही ख्रिस्त पूर्व काळातील नगरी, तत्कालीन लोकसंख्येच्या मानाने मोठी होती कि छोटी होती, या बाबत कंजूस यांनी आपले मत मांडावे असे त्याना मी सुचवतो . त्याच बरोबर त्यांनी सुचवलेले मदुराई हे स्थान त्यांच्या अभ्यासावर आधारित आहे कि त्यांनी हे विधान केवळ कुत्सित पणाने केले आहे याचाही खुलासा करावा.
बऱ्याच शेकडो वर्षा पूर्वीच्या जुन्या ग्रंथात श्रीकृष्ण यादवाना घेऊन द्वारकेला गेले आणि त्यांनी वसवलेली द्वारका समुद्रात बुडाली असे उल्लेख आहेत. नेमक्या त्याच ठिकाणी १९५० नंतर समुद्रा मध्ये ख्रिस्त पूर्व काळातील नगरीचे अवशेष आज सापडले हा निव्वळ योगायोग आहे असे कंजूस याना वाटत असल्यास त्यांच्या जवळ तसे काही पुरावे असल्यास ते सांगावे.
28 Nov 2015 - 12:24 pm | कंजूस
डी डी भारती या सरकारी चानेलवरचा कार्यक्रम पाहुनच लिहिलं आहे.आतापर्यत रामायण /महाभारतातले काहीही कुठेही सापडले नाही.सापडेपर्यँत खेळू आट्यापाट्या. मदुराइ हा मात्र कल्पनाविलास आहे.वैचारिक मतभेद आणि विनोदाशी झटापट यापलिकडे काही नाही.
27 Nov 2015 - 11:50 pm | sagarpdy
योजन हे अंतराचे एकक असून तज्ञांच्या म्हणण्यानुसार ८ ते १३ किमी एवढे आहे. सोय म्हणून आपण ते १० किमी मानू.
समुद्राच्या किनारी वानरांमध्ये झालेल्या चर्चेत मारुतीराय १०० योजने उडी घेऊ शकत असल्याने, समुद्र ओलांडून जायची जबाबदारी त्यांच्यावर येते. व समुद्र ओलांडताना त्याना एक हॉल्ट ही घ्यावा लागतो.
त्यामुळे समुद्र साधारण पणे १००० किमी असला पाहिजे. ऑस्ट्रेलिया च वाटते.
28 Nov 2015 - 12:05 am | वगिश
दंडवत _/\_
28 Nov 2015 - 11:05 pm | sagarpdy
धन्यवाद.
बाकी, सायमंडस् भज्जी घटनेची आठवण झाली.:P
28 Nov 2015 - 12:03 am | DEADPOOL
वाट अबौट पंचवटी इन नाशिक?
28 Nov 2015 - 12:07 am | वगिश
मी तर आत्ताची अयोध्या हि रामायणातील नसून मूळ अयोध्या वेगळीच आहे असेही वाचले आहे कुठेतरी.
28 Nov 2015 - 12:09 am | pacificready
तुमचं काय ते ठरलं की सांगा. स्टॉल टाकायचा आहे.
28 Nov 2015 - 1:24 am | बोका-ए-आझम
जर ती श्रीलंका नव्हती तर मी काय करु?
28 Nov 2015 - 5:28 am | कंजूस
महानदी पार केली आणि आता तिथे वरच्या अंगाला हिराकूड धरण आहे.चिलिका सरोवरातले एखादे बेट असेल.तिथे उत्खनन करा.या सरोवरात थंडीच्या काळात जटायुसारखे मोठे पक्षी स्थलांतर करतात.त्यातील एकाला रावणाने मारले.त्याला फार भूक लागली होती.जटायुचे बरेच भाऊबंद असले तरी एकाचंच नाव पुढे येतं.(प्रचेतसला माहितीय) प्रवासा दरम्यान अमरकंटकलाही काही काळ वानरसेना थांबली होती.
28 Nov 2015 - 7:53 am | नितिन थत्ते
काही असो....
पण धनुष्कोडीला जे काही आहे तो रामाने बांधवलेला पूलच आहे.
28 Nov 2015 - 8:55 am | मित्रहो
ही श्रीलंकेत असावी असे वाटते. मुरलीधरण तिथेच असतो. अर्जुन पण तिकडे आहे. द्वारका समुद्रात गेल्यावर त्याचा एक भाग वर येऊन श्रीलंका झाला असेही होऊ शकते.
जिलबीला काय हवेय अजून
28 Nov 2015 - 9:08 am | याॅर्कर
आपणास दंडवत
28 Nov 2015 - 9:43 am | आनन्दा
थोडा मठ्ठा पण येउ द्या.
28 Nov 2015 - 8:58 am | अजया
काय ठरलं मग?
28 Nov 2015 - 9:15 am | सस्नेह
जिल्बी खाणार !
पण मठ्ठा हवाच. कुठाय भांडं ?
28 Nov 2015 - 10:36 am | अभ्या..
मथुरेत
28 Nov 2015 - 10:33 am | हेमंत लाटकर
मत विचारले तर अभ्यासपुर्ण असावे.
इतिहासकार एच. डी. संकलिया यांनी केलेल्या संशोधनानुसार रामाचा एकूण प्रवास 450 किमी पेक्षा जास्त झाला नाही. रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नसून ती विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखराच्या आसपास एखाद्या महानदीतील बेटावर छत्तीसगड भागातच वसलेली असावी. या भागातील अनेक आदिवासी जमाती स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेतात.
तसेच
रामेश्वरमपासून श्रीलंकेला जोडणारा तरंगत्या पाषाणांचा रामसेतू वानरसेनेने बांधला. हा वालुकाष्मांनी बनलेला पूल मानवनिर्मित नसून मानारच्या उथळ समुद्रधुनीतून जाणारी ही रांग एके काळी श्रीलंका भारतीय उपखंडाशी जोडला होता असे दर्शवते. नासानेसुद्धा २००२ साली हा पट्टा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही असंच म्हटलं होतं. कार्बन डेटिंगनुसार या सेतूचं वय साडेसतरा लाख वर्षं इतकं जुनं येतं.
28 Nov 2015 - 11:09 am | संदीप डांगे
लाटकरसाहेब,
करायला गेलं तर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद करायला मजबूत पुरावे(?) आहेत. विवेक पटाईत यांचा याच विषयावर काही दिवसांपूर्वी लेख आला होता. पण मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या विचारकलहाचा नक्की उपयोग काय?
रामाला देव मानणारे मानत राहतील, विरोधी मत असणारे भांडत राहतील. लंका, अयोध्या कुठेही असले न काय, नक्की काय फरक पडेल? त्यापेक्षा रामायण, महाभारताला 'जैसे थे' अवस्थेत सोडून, त्यांच्यामधली मूल्ये घेता आली तर घेऊन राष्ट्रसंवर्धनास काही मदत होत असेल तर बघावी. सतत हे पुराणग्रंथावरचे वाद उकरून काढून हेच विषय पुढे पुढे नजरेसमोर राहतील अशी व्यवस्था झाली आहे काय याची शंका येत आहे. लोकांच्या श्रद्धांबद्दल प्रश्न उभे करून भ्रमित करणे वा मनोबल तोडणे हे प्रकार घडवले जातात. आपण यासर्वांपासून दूर राहिलेले बरे. कारण अशाने आपण एक समाज म्हणून पुढे जात नाही, मागेच राहतो.
पुराणग्रंथांचे सत्यासत्य जाणत, शोधत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा काही वेगळे, उत्पादक करता येणार नाही काय असा प्रश्न पुढे करतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या, नोकरीच्या क्षेत्रातल्या नवीन-जुन्या घडामोडींबद्दल लिहा, तरुणांसाठी त्या क्षेत्रात काय करता येईल याचे मार्गदर्श्न करा. तुमच्याच क्षेत्राचा अभ्यास करा, इथे मांडा. प्रत्येक व्यक्तिकडे स्वतःचा एक स्वतंत्र, संपन्न अनुभव असतो, विचार असतो. मिसळपावसारख्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांना एक व्यासपिठ उपलब्ध करून देणार्या संस्थळाचा आपण विधायक गोष्टींसाठी जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याबद्दल विचार करुयात.
एवढे बोलून मी माझे दोन(शे) शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र!
28 Nov 2015 - 12:11 pm | विशाल कुलकर्णी
संदीपभाऊ, या प्रतिसादासाठी आमच्यातर्फे तुम्हाला एक मिसळ किंवा चिकन थाळी लागू !
28 Nov 2015 - 1:40 pm | अभ्या..
संदीप ह्या प्रतिसादासाठी हॅट्स ऑफ.
.
मी तर म्हणतो, अध्यात्म, पुराणे, भविष्ये, इतिहास अन काही अस्मितायुक्त राजकारणांच्या धाग्यावर हा प्रतिसाद पेस्टवून ते लगेच वाचनमात्र करावेत. फार कमी लोक ह्यावर अभ्यासपूर्ण लिहितात अन त्याला प्रतिसाद मिळत नाहीत.
ह्याला तर शतशः अनुमोदन.
28 Nov 2015 - 8:41 pm | चाणक्य
चांगला प्रतिसाद.
28 Nov 2015 - 8:27 pm | रमेश आठवले
लाटकर साहेब,
भारत - श्रीलंका या मधील सामुद्रधुनी ज्या दगडांची बनली आहे त्यांचे वय भूस्तर शास्रातील पद्धती वापरून १७.५ लाख असे ठरवले गेले असेल. या बद्दल काही वाद नाही
रामायणाच्या काळात ही सामुद्रधुनी खूप उथळ होती आणि त्याचा फक्त काही भाग पाण्याखाली होता. या उथळ भागात दगड आणि झाडांचे ओंडके टाकून वानरांनी त्याला चालत जाण्या योग्य बनविला की नाही हे त्या ओंडक्यांचे कार्बन डेटिंग करून तपासता येईल . त्या साठी सध्याच्या उथळ भागात योग्य जागी उत्खनन करावे लागेल.
किरणोत्सर्जक कार्बन १४ या आयसोटोपचे अर्धे आयुष्य ( हाफ लाइफ़ ) ५७३० वर्षे आहे. त्यामुळे या पद्धतीने वस्तूतील कर्ब जन्य अवशेषांचे वय ठरवता येण्याची जास्तत जास्त मर्यादा ५० हजार वर्षाच्या आसपास आहे.
या विषयावर सविस्तर चर्चा विवेक पटाईत यांच्या या लेखात सापडेल.
वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य w.misalpav.com/node/33185
28 Nov 2015 - 10:51 am | टवाळ कार्टा
बोक्यासकट वेगळा बबन पावसकर म्याडमना कावळ्याने जिल्बी खाउन दिलाच पैजे
28 Nov 2015 - 12:06 pm | हेमंत लाटकर
@ संदीप डांगे
मिपावर मला उत्पादक लेख दिसले नाहीत, तुम्ही सांगता का?
28 Nov 2015 - 12:50 pm | पगला गजोधर
28 Nov 2015 - 2:33 pm | याॅर्कर
लोल
लई जोरात हसालोय,आता लोळत लोळत हसालोय!
28 Nov 2015 - 1:58 pm | आर्य
रद्दीतून आणलेल्या जिलबीच्या पुड्या ......
मदुराइला लुंग्या घेतल्या,डोसे खाऊन धनुष्कोडीला पोहोचलो................भारीच
आळंदी-पंढरपुर वारीला लोक २५० कि.मी हे अंतर २० ते २२ दिवसात पार करतात.
३५०० कि.मी जायला २८० दिवस (शनिवार-रविवार वर्कींग होते तेव्हा) एक वर्ष पण नाही.....
राम १ वर्ष चित्रकुटावर होता दशरथाचे वर्ष-श्राद्ध तेथेच धातले त्याने
१२ वर्ष (एक तप) नाशकात होते.
बाकी खेळ १ वर्षात.................
हा.हा.हा
28 Nov 2015 - 2:56 pm | कंजूस
हेमंत लाटकर ,इथे आम्ही किती टिंगल टवाळी करत आहोत म्हणून वाईट वाटून घेऊ नका/राग मानू नका.खरं तर प्रत्येक मिपाकराची आणि सर्वांची मनातून एकच इच्छा आहे की एकनाएक दिवस रामायण / महाभारतकालीन एक सज्जड पुरावा मिळो आणि सर्व वादांवर पडदा पडो.
28 Nov 2015 - 3:02 pm | हेमंत लाटकर
वारकरी वारी रस्त्याने करतात, जंगलातून, दर्याखोर्यातून करत नाहीत आर्य (चाणक्य) भाऊ.
हा लेख वाचा
http://googleweblight.com/?lite_url=http://maharashtratimes.indiatimes.c...
28 Nov 2015 - 8:29 pm | DEADPOOL
जय श्रीराम!
28 Nov 2015 - 8:32 pm | जेपी
शेंच्युरी निमीत्त लाटकर काकांचा सत्कार एक 'वाल्मिकी रामायण' ची प्रत देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक- जेपी आणी तमाम '(हा) राम' कार्यकर्ते