मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.

हेमंत लाटकर · · काथ्याकूट
दैनिक भास्कर मधील बातमी. 5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे. अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही. तुम्हाला काय वाटते......

वाचने 24425 वाचनखूण प्रतिक्रिया 103

पगला गजोधर Fri, 11/27/2015 - 19:18
शोलेतील सांबा हा मनुष्य नसून, उंचावर बसून येणारे जाणारे ढग पाहून, पावसाचा अंदाज वर्तवणारा हवामान-शास्त्रज्ञ होता. तुम्हाला काय वाटते......

In reply to by DEADPOOL

संदीप डांगे Sat, 11/28/2015 - 09:54
तुम्हाला सॅरकाझम समजत नसेल तर तो माझा दोष नाही. बाकी तुम्ही माझ्या हौसे-मौजेची काळजी क्रु ने ही नम्र इनंती.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Sat, 11/28/2015 - 08:41
s मधल्या काळांत उपसागरात राकु वादळाने निर्माण झालेल्या, कमी दाबाच्या पट्ट्याने, दूर राहिलेले 'लाटलेल्या जिलब्यांचे ढग' पुन्हा मिपा गांवावर जमा झालेत, मधल्या काही काळात उघडीप दिलेल्या जिल्बीवर्षाव पुन्हा कार्यान्वित झालेला दिसतोय.

In reply to by पगला गजोधर

बाक़ी सांभा बसलाय त्या खालच्या दगडाचा (पिवळ्या रंगाच्या) आकार हनुमानाच्या गदेसारखा दिसतोय. गब्बर रामायणकालीन असावा काय? की रावणच दोन रुपात वावरत होता ?

मारवा Fri, 11/27/2015 - 19:24
धागा फार मोठा आहे. अयोध्या ते कन्याकुमारी अंतर देखील फारच लांब आहे. त्यामुळे थोडा दोन भागात वरील धागा टाकला तर कीमान धाग्याच्या गहन विषयाचा प्राथमिक ढोबळ का होईना अंदाज लावता येतो. बाकी इतिहासकार एच. डी. संकलिया एक महत्वपुर्ण नावं. आपल्या व्यासंगी दिर्घ गंभीर धाग्यांचा नेहमीचाच यशस्वी चाहता.

अद्द्या Fri, 11/27/2015 - 19:35
नाग मणी म्हणजे खरं तर avengers मध्ये दाखवलेले mind stones आहेत . आणि हे सगळं आपल्या कडे पहिल्या पासून होतं . नॉर्स माय्थोलोजी ने हे आपल्याकडून चोरलेलं आहे . तुम्हाला काय वाटते ?

मोगा Fri, 11/27/2015 - 19:54
इरावती कर्वे का कुणीतरी एका मराटी लेखिकेने एका पुस्तकात हेच लिहिले होते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अद्द्या Fri, 11/27/2015 - 20:23
अरे असं कसं . काय फरक पडतो ? हा प्रश्न तू विचारावस ? लाटकर काका आहे ते . त्यांना प्रत्येक गोष्टीने फरक पडतो आणि ते प्रत्येक गोष्टीवर विचार करतात .. काय फरक पडतो . . मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Fri, 11/27/2015 - 20:48
बाकी सातारला कट्टा करायचाय! तू, चिमणराव, टका, नाखु, बॅटॅ यांना भेटायचंय एकदा! ये, मस्त सातारी मटण बनवू!!!

In reply to by सतिश गावडे

मांत्रिक Fri, 11/27/2015 - 21:01
ओ सगाण्णा मी मूळचा सातारचा! ठाण्यात सर्विसला! तुमी पण या की राव सातारला! मस्त चुलीवरचं मटण आणि भाकर्या बनवू. तुम्ही कोकणातले नं? बहुतेक अस्सल सातारी टेस्ट नसेल केलं. एकदा या राजे. कट्टा करु!!! हाटेलात सातारी कोलापुरी मिळतं ते फ्राॅड असतं हे माझं मत. एकदा या सातारला राजे. पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!

In reply to by मांत्रिक

सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 21:11
दीड वर्षांपूर्वी मार्कस ओरेलियसची डायरी वाचली नसती तर आमंत्रणाचा स्वीकार केला असता. :) कधी काळी सातारला पायपीट करुनही पवई नाक्याच्या आसपास मांसाहारी हॉटेल सापडले नव्हते.

In reply to by सतिश गावडे

मांत्रिक Fri, 11/27/2015 - 21:14
ऑ? आहो आमचं हाटेल नाहीये!!! घरी या म्हणतोय राजे!!! बाकी पवई नाक्यावर मराठा दरबार हे बेस्ट नानव्हेज हाटेल सापडलं नाही?

In reply to by मांत्रिक

सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 21:40
मराठा दरबार आम्ही उतरलो होतो त्या रजताद्रीच्या डाव्या हाताला* होतं. मात्र "मला सटरफटर खावे लागेल तिथे" असे आमच्या शाकाहारी मित्राचे म्हणने. *"डाव्या हाताला" हा शब्द समुच्चय वाचला की कोकणातली "डाव्या हाताला तोंड जवळ" ही प्रसिद्ध म्हण आठवते.

In reply to by मांत्रिक

अस्वस्थामा Fri, 11/27/2015 - 23:40
पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!
अरे वा.. आम्हाला विसरु नका राव. आम्हीपण आहोत डिसेंबरमध्ये सातार्‍यात तेव्हा. काय ठरलं तर सांगा .. किमान भेटू तरी नक्की. (प्यारे चचा.. सातार्‍यात असला तर बोला तुम्ही पण भेटूयात. )

In reply to by बॅटमॅन

pacificready Fri, 11/27/2015 - 22:01
कैच्या कै. मांत्रिक नं चूल विझली तरी मटनाचा रस्सा पातेल्यात घालून चादर पसरून ठेवलीय. काय ते करा एकदा. मांत्रिक भो, तारखा कळवा, आम्ही पण येऊ.

याॅर्कर Fri, 11/27/2015 - 20:43
असहिष्णुता!!!! . . . ज्यांचे डुआयडी आहेत त्यांनी ते या मोक्यावर मिपास परत करावेत. (माझा आहे/नाही)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 21:15
अपेक्षा फार मोठया नसल्या की अपेक्षाभंगाचं दुःख सहन करावं लागत नाही. मोगरा फुलला - गो नि दांडेकर

१.५ शहाणा Fri, 11/27/2015 - 21:32
रामायणात रामाने रामेश्वर येथील वाळूचे शिवलिंग स्थापियाले असा उल्लेख आहे रामेश्वर हे कन्याकुमारी जवळ आहे. म्हणजेच आताची श्रीलंका म्हणजेच लंका होय आसे वाटते

कंजूस Fri, 11/27/2015 - 21:36
अंतर फार असल्याने १९७१ चा धागा आता निघाला.चित्रकुटावर घेतलेले कपडे फाटले मग पिपलीला मस्त रंगीत घेतले पण वाटेत माकडांनी ओरबाडले,शेवटी मदुराइला लुंग्या घेतल्या,डोसे खाऊन धनुष्कोडीला पोहोचलो.होडीतून जाताना फार भीती वाटत होती. हवामान खात्याने पाच नंबरचा बावटा लावलेला.होडी वर खाली होताना सेतू दिसायचा खालचा.बाब्बो काय ते आर्किटेक्चर! तोंडात बोटे घातली पण खारट लागली ,हात लुंगीला पुसले.किनाय्रावर रावणाचा १०००---००वा नातू आला होता स्वागताला. जव्हेरकँडीला हॅाटेलात उतरायची व्वस्था केली होती.बारतातून आलेल्या संसोदकांची इकडेच व्वसथा करतात.हॅाटेलच्या बाहेर पडू देत नाहीत.जाताना एक तयार प्रोजेक्ट रिपोर्ट हातात ठेवला.तो तुमच्यासमोर ठेवला आहे त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे हीविनंती.

साती Fri, 11/27/2015 - 21:49
हे बघा, एक्का काका स्वतः श्रीलंकेला जाऊन आलेत. तिथे अशोकवन आहे की नाही विचारा. :)

चित्रगुप्त Fri, 11/27/2015 - 21:52
सग्ळे मिप्पाकर मेल्ले अग्दि दुष्ट्ट आणि असहिष्णु आहेत. 'तुम्हाला काय वाटते ?' असे विचारले तरी त्याबद्दल कुण्णी कुण्णी काही सांगत नाही.

दा विन्ची Fri, 11/27/2015 - 22:53
दुवा पाहिला. अशोकवन दहिसरला होते आणि आहे हे पटले. मग शबरी आरे कॉलोनीत रहायची हे ऐकले हे खरे काय? अवांतर: अशोकवनात उद्वाहक (उर्ध्वगामिनी ) तेव्हा होता काय? बाकी हा अतिशय अभ्यासपूर्ण धागा आवडला.

रमेश आठवले Fri, 11/27/2015 - 23:38
लाटकर साहेबांनी सांकलिया यांच्या लेखाचा संदर्भ दिला असता तर बरे झाले असते . सांकलिया यांचा लेख बरेच वर्षा पूर्वी वाचला होता. तेलुगु आणि कदाचित इतर द्रविडी भाषांमध्ये लंका हा शब्द मोठ्या नद्यांमध्ये आढळणार्या बेटा साठी वापरतात. सांकलिया साहेब यांनी दंडकारण्या मधील अशा एखाद्या बेटांचा उल्लेख रावणाची लंका असा केला असावा. अशा मोठ्या बेटांवर मनुष्यवस्ती असते. उदहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदीत सध्या ४२१ कि. मी . क्षेत्रफळाचे लोकवस्ती व शेती असलेले मजोली नावाचे बेट आहे . लहानपणी आईच्या तोंडी -लंकेची पार्वती- असा शब्द प्रयोग ऐकला होता. बहुधा तो दागिने अथवा आभूषणे न घालणार्या स्त्री साठी वापरला जात असावा. ही कोणती लंका आणि तिथे रहणारी मंदोदरी अथवा सीता यांच्या शिवायची ही कोणती पार्वती याचा खुलासा कोणी करू शकेल काय ? अयोध्या ते कन्याकुमारी हे ३००० कि. मी . श्रीराम यांनी कसे पार केले असेल असे श्री लाटकर यांनी विचारले आहे. त्या वरून मथुरा ते द्वारका हे १३०० कि. मी . श्री कृष्णाने साधरणत: त्याच कालखंडात कसे पार केले असा प्रश्न निर्माण होतो. मात्र या बाबतीत दुसरे एक पुरातन शास्त्रातील विद्वान, एस . आर . राव, यांच्या द्वारकेच्या समुद्रात केलेल्या उत्खनन कामाने सकृददर्शनी पुरावा उपलब्ध झालेला आहे

In reply to by रमेश आठवले

कंजूस Sat, 11/28/2015 - 05:19
""मात्र या बाबतीत दुसरे एक पुरातन शास्त्रातील विद्वान, एस . आर . राव, यांच्या द्वारकेच्या समुद्रात केलेल्या उत्खनन कामाने सकृददर्शनी पुरावा उपलब्ध झालेला आहे""- मोठी नगरी असल्याचा एकही अवशेष नाही केवळ इतर कोणत्याही बंदरालगत सापडतील असे अवशेष आहेत.ते सर्व एका ठिकाणी संग्रहालयात ठेवून उत्खनन थांबवले आहे. यालेखाच्या चर्चेचे गांभिर्य ओळखून कृष्ण द्वारकेला का गेला मदुराईला का नाही यावर प्रकाश टाकावा.

In reply to by कंजूस

रमेश आठवले Sat, 11/28/2015 - 10:18
एस आर राव यांनी लिहिलेले आणि १९९९ साली प्रसिद्ध झालेले Lost City of Dvaraka हे ३०० पानी पुस्तक वाचून मगच सध्या समुद्रात असलेली द्वारका ही ख्रिस्त पूर्व काळातील नगरी, तत्कालीन लोकसंख्येच्या मानाने मोठी होती कि छोटी होती, या बाबत कंजूस यांनी आपले मत मांडावे असे त्याना मी सुचवतो . त्याच बरोबर त्यांनी सुचवलेले मदुराई हे स्थान त्यांच्या अभ्यासावर आधारित आहे कि त्यांनी हे विधान केवळ कुत्सित पणाने केले आहे याचाही खुलासा करावा. बऱ्याच शेकडो वर्षा पूर्वीच्या जुन्या ग्रंथात श्रीकृष्ण यादवाना घेऊन द्वारकेला गेले आणि त्यांनी वसवलेली द्वारका समुद्रात बुडाली असे उल्लेख आहेत. नेमक्या त्याच ठिकाणी १९५० नंतर समुद्रा मध्ये ख्रिस्त पूर्व काळातील नगरीचे अवशेष आज सापडले हा निव्वळ योगायोग आहे असे कंजूस याना वाटत असल्यास त्यांच्या जवळ तसे काही पुरावे असल्यास ते सांगावे.

In reply to by रमेश आठवले

कंजूस Sat, 11/28/2015 - 12:24
डी डी भारती या सरकारी चानेलवरचा कार्यक्रम पाहुनच लिहिलं आहे.आतापर्यत रामायण /महाभारतातले काहीही कुठेही सापडले नाही.सापडेपर्यँत खेळू आट्यापाट्या. मदुराइ हा मात्र कल्पनाविलास आहे.वैचारिक मतभेद आणि विनोदाशी झटापट यापलिकडे काही नाही.

sagarpdy Fri, 11/27/2015 - 23:50
योजन हे अंतराचे एकक असून तज्ञांच्या म्हणण्यानुसार ८ ते १३ किमी एवढे आहे. सोय म्हणून आपण ते १० किमी मानू. समुद्राच्या किनारी वानरांमध्ये झालेल्या चर्चेत मारुतीराय १०० योजने उडी घेऊ शकत असल्याने, समुद्र ओलांडून जायची जबाबदारी त्यांच्यावर येते. व समुद्र ओलांडताना त्याना एक हॉल्ट ही घ्यावा लागतो. त्यामुळे समुद्र साधारण पणे १००० किमी असला पाहिजे. ऑस्ट्रेलिया च वाटते.

कंजूस Sat, 11/28/2015 - 05:28
महानदी पार केली आणि आता तिथे वरच्या अंगाला हिराकूड धरण आहे.चिलिका सरोवरातले एखादे बेट असेल.तिथे उत्खनन करा.या सरोवरात थंडीच्या काळात जटायुसारखे मोठे पक्षी स्थलांतर करतात.त्यातील एकाला रावणाने मारले.त्याला फार भूक लागली होती.जटायुचे बरेच भाऊबंद असले तरी एकाचंच नाव पुढे येतं.(प्रचेतसला माहितीय) प्रवासा दरम्यान अमरकंटकलाही काही काळ वानरसेना थांबली होती.

मित्रहो Sat, 11/28/2015 - 08:55
ही श्रीलंकेत असावी असे वाटते. मुरलीधरण तिथेच असतो. अर्जुन पण तिकडे आहे. द्वारका समुद्रात गेल्यावर त्याचा एक भाग वर येऊन श्रीलंका झाला असेही होऊ शकते. जिलबीला काय हवेय अजून

हेमंत लाटकर Sat, 11/28/2015 - 10:33
मत विचारले तर अभ्यासपुर्ण असावे. इतिहासकार एच. डी. संकलिया यांनी केलेल्या संशोधनानुसार रामाचा एकूण प्रवास 450 किमी पेक्षा जास्त झाला नाही. रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नसून ती विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखराच्या आसपास एखाद्या महानदीतील बेटावर छत्तीसगड भागातच वसलेली असावी. या भागातील अनेक आदिवासी जमाती स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेतात. तसेच रामेश्वरमपासून श्रीलंकेला जोडणारा तरंगत्या पाषाणांचा रामसेतू वानरसेनेने बांधला. हा वालुकाष्मांनी बनलेला पूल मानवनिर्मित नसून मानारच्या उथळ समुद्रधुनीतून जाणारी ही रांग एके काळी श्रीलंका भारतीय उपखंडाशी जोडला होता असे दर्शवते. नासानेसुद्धा २००२ साली हा पट्टा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही असंच म्हटलं होतं. कार्बन डेटिंगनुसार या सेतूचं वय साडेसतरा लाख वर्षं इतकं जुनं येतं.

In reply to by हेमंत लाटकर

संदीप डांगे Sat, 11/28/2015 - 11:09
लाटकरसाहेब, करायला गेलं तर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद करायला मजबूत पुरावे(?) आहेत. विवेक पटाईत यांचा याच विषयावर काही दिवसांपूर्वी लेख आला होता. पण मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या विचारकलहाचा नक्की उपयोग काय? रामाला देव मानणारे मानत राहतील, विरोधी मत असणारे भांडत राहतील. लंका, अयोध्या कुठेही असले न काय, नक्की काय फरक पडेल? त्यापेक्षा रामायण, महाभारताला 'जैसे थे' अवस्थेत सोडून, त्यांच्यामधली मूल्ये घेता आली तर घेऊन राष्ट्रसंवर्धनास काही मदत होत असेल तर बघावी. सतत हे पुराणग्रंथावरचे वाद उकरून काढून हेच विषय पुढे पुढे नजरेसमोर राहतील अशी व्यवस्था झाली आहे काय याची शंका येत आहे. लोकांच्या श्रद्धांबद्दल प्रश्न उभे करून भ्रमित करणे वा मनोबल तोडणे हे प्रकार घडवले जातात. आपण यासर्वांपासून दूर राहिलेले बरे. कारण अशाने आपण एक समाज म्हणून पुढे जात नाही, मागेच राहतो. पुराणग्रंथांचे सत्यासत्य जाणत, शोधत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा काही वेगळे, उत्पादक करता येणार नाही काय असा प्रश्न पुढे करतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या, नोकरीच्या क्षेत्रातल्या नवीन-जुन्या घडामोडींबद्दल लिहा, तरुणांसाठी त्या क्षेत्रात काय करता येईल याचे मार्गदर्श्न करा. तुमच्याच क्षेत्राचा अभ्यास करा, इथे मांडा. प्रत्येक व्यक्तिकडे स्वतःचा एक स्वतंत्र, संपन्न अनुभव असतो, विचार असतो. मिसळपावसारख्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांना एक व्यासपिठ उपलब्ध करून देणार्‍या संस्थळाचा आपण विधायक गोष्टींसाठी जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याबद्दल विचार करुयात. एवढे बोलून मी माझे दोन(शे) शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र!

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. Sat, 11/28/2015 - 13:40
संदीप ह्या प्रतिसादासाठी हॅट्स ऑफ. . मी तर म्हणतो, अध्यात्म, पुराणे, भविष्ये, इतिहास अन काही अस्मितायुक्त राजकारणांच्या धाग्यावर हा प्रतिसाद पेस्टवून ते लगेच वाचनमात्र करावेत. फार कमी लोक ह्यावर अभ्यासपूर्ण लिहितात अन त्याला प्रतिसाद मिळत नाहीत.
तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या, नोकरीच्या क्षेत्रातल्या नवीन-जुन्या घडामोडींबद्दल लिहा, तरुणांसाठी त्या क्षेत्रात काय करता येईल याचे मार्गदर्श्न करा. तुमच्याच क्षेत्राचा अभ्यास करा, इथे मांडा. प्रत्येक व्यक्तिकडे स्वतःचा एक स्वतंत्र, संपन्न अनुभव असतो, विचार असतो. मिसळपावसारख्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांना एक व्यासपिठ उपलब्ध करून देणार्‍या संस्थळाचा आपण विधायक गोष्टींसाठी जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याबद्दल विचार करुयात.
ह्याला तर शतशः अनुमोदन.

In reply to by हेमंत लाटकर

रमेश आठवले Sat, 11/28/2015 - 20:27
लाटकर साहेब, भारत - श्रीलंका या मधील सामुद्रधुनी ज्या दगडांची बनली आहे त्यांचे वय भूस्तर शास्रातील पद्धती वापरून १७.५ लाख असे ठरवले गेले असेल. या बद्दल काही वाद नाही रामायणाच्या काळात ही सामुद्रधुनी खूप उथळ होती आणि त्याचा फक्त काही भाग पाण्याखाली होता. या उथळ भागात दगड आणि झाडांचे ओंडके टाकून वानरांनी त्याला चालत जाण्या योग्य बनविला की नाही हे त्या ओंडक्यांचे कार्बन डेटिंग करून तपासता येईल . त्या साठी सध्याच्या उथळ भागात योग्य जागी उत्खनन करावे लागेल. किरणोत्सर्जक कार्बन १४ या आयसोटोपचे अर्धे आयुष्य ( हाफ लाइफ़ ) ५७३० वर्षे आहे. त्यामुळे या पद्धतीने वस्तूतील कर्ब जन्य अवशेषांचे वय ठरवता येण्याची जास्तत जास्त मर्यादा ५० हजार वर्षाच्या आसपास आहे. या विषयावर सविस्तर चर्चा विवेक पटाईत यांच्या या लेखात सापडेल. वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य w.misalpav.com/node/33185

आर्य Sat, 11/28/2015 - 13:58
रद्दीतून आणलेल्या जिलबीच्या पुड्या ...... मदुराइला लुंग्या घेतल्या,डोसे खाऊन धनुष्कोडीला पोहोचलो................भारीच आळंदी-पंढरपुर वारीला लोक २५० कि.मी हे अंतर २० ते २२ दिवसात पार करतात. ३५०० कि.मी जायला २८० दिवस (शनिवार-रविवार वर्कींग होते तेव्हा) एक वर्ष पण नाही..... राम १ वर्ष चित्रकुटावर होता दशरथाचे वर्ष-श्राद्ध तेथेच धातले त्याने १२ वर्ष (एक तप) नाशकात होते. बाकी खेळ १ वर्षात................. हा.हा.हा

कंजूस Sat, 11/28/2015 - 14:56
हेमंत लाटकर ,इथे आम्ही किती टिंगल टवाळी करत आहोत म्हणून वाईट वाटून घेऊ नका/राग मानू नका.खरं तर प्रत्येक मिपाकराची आणि सर्वांची मनातून एकच इच्छा आहे की एकनाएक दिवस रामायण / महाभारतकालीन एक सज्जड पुरावा मिळो आणि सर्व वादांवर पडदा पडो.

हेमंत लाटकर Sat, 11/28/2015 - 15:02
वारकरी वारी रस्त्याने करतात, जंगलातून, दर्याखोर्यातून करत नाहीत आर्य (चाणक्य) भाऊ. हा लेख वाचा http://googleweblight.com/?lite_url=http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/ram/articleshow/49119849.cms&ei=DV8fq5MW&lc=en-IN&s=1&m=643&ts=1448703029&sig=ALL1Aj5OdeIwzkY2slJB05HsSZ-BZg24Gw

जेपी Sat, 11/28/2015 - 20:32
शेंच्युरी निमीत्त लाटकर काकांचा सत्कार एक 'वाल्मिकी रामायण' ची प्रत देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम '(हा) राम' कार्यकर्ते