गौरी-गणपतीचे दिवस आहेत, बाप्पांच्या भक्तित महाराष्ट्र रंगलाय, सर्वत्र गणेशोस्तवाचे वातावरण आहे त्यानिमित्त गणपतीबाप्पाला प्रिय अशा जास्वंदीची ही काही प्रकाशचित्रे.
पहील्या चित्रातील जास्वंदीचा जणू काही ताटवा हा प्रकार प्रथमच पहात आहे. सातव्या चित्रातील जास्वंद आमच्याकडे भारतात पण होती आणि आत्ता येथे अमेरिकेत पण आहे. (भारतात अर्थातच लाल जास्वंद पण होती).
मस्त चित्रे..झक्कास!!
यातील लाल,गुलाबी,डबल जास्वंद आमच्या अंगणात होती पूर्वी..आणि एक फिका लाल रंग आणि कातरलेल्या पाकळ्या- कात्रीची जास्वंदच म्हणतात त्याला..ती ही होती.त्याची आठवण करून दिलीत.
स्वाती
ही सर्व चित्रे कर्नाटकातील कबिनी व कूर्ग येथील आहेत. कर्नाटकात भटकताना असे लक्षात आले की इथे जास्वंद फार लोकप्रिय आहे. म्हैसूर हून निघाल्यानंतर कबिनी नदीकाठी पोचताना सुमारे १५-२० किलोमिटर अंतर मुख्य रस्ता सोडुन छोट्या रस्त्याने जावे लागते. खुद्द कबिनी धामाच्या अलिकडे ३-४ किलोमिटर अंतरात अगदी छोट्या १०-१२ घरांच्या वस्त्या लागतात. प्रत्येक घराचे आवार जास्वंदीने बहरले होते. थेट कूर्ग मध्ये देखिल अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही गेलो होतो त्या कॉफी मळ्यातदेखिल नाना प्रकारची जास्वंद दिसली. तीच ही चित्रे.
सुंदर स्वच्छंद जास्वंद! :) सर्वच चित्रे मनमोहक आणि ताजीतवानी आहेत.
मला स्वतःला लालभडक रंगाचा, पाच पाकळ्याचा जास्वंद फार आवडतो, एकदम शुचिर्भूत फूल, ते पाहिलं की हे फूल फक्त गणपतीसाठी निर्माण झालं आहे असं वाटतं!
अबोलीच्या फुलासारख्या रंगाचा सुद्धा मला आवडतो. पांढरा आणि शेवटच्या चित्रातला गुलाबी पांढरा मात्र मी प्रथमच बघितला तो ही ह्या चित्रात.
सुंदर चित्रमय भेटीबद्दल धन्यवाद!
प्रतिक्रिया
8 Sep 2008 - 10:00 am | देवदत्त
सुंदर प्रकाशचित्रे आहेत.
(शीर्षकाबद्दलचा प्रकाटाआ)
8 Sep 2008 - 12:29 am | विसोबा खेचर
अत्यंत म्हणजे अत्यंत मनमोहक प्रकाशचित्रे!
वा साक्षीदेवा! कमाल आहे तुझ्या कॅमेरागिरीची! :)
पहिल्या चित्रातील फुलांचा ताटवा तर केवळ लाजवाब!
उद्या मिपाच्या डाव्या समासात लक्ष ठेव! :)
बोला, लालबागच्या राजाचा विजय असो......!
तात्या.
8 Sep 2008 - 2:36 am | प्राजु
सुंदर आहेत सगळीच फुले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2008 - 3:44 am | मदनबाण
सर्वच फोटो छान आहेत्,,मला सगळ्यात जास्त शेवटचं आवडलं.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
8 Sep 2008 - 3:50 am | प्रियाली
यांतील नं.३ चे गुलाबी जास्वंद आणि लाल भडक जास्वंद माझ्या दारात आहे. गणपती पूजेच्या दिवशी अगदी टपोरी फुलली होती. बाप्पांची आयती सोय झाली. ;)
हे फोटो कुठले? इतकी सुरेख जास्वंद कोणत्या बागेतील आहेत का घरातील?
8 Sep 2008 - 4:22 am | विकास
पहील्या चित्रातील जास्वंदीचा जणू काही ताटवा हा प्रकार प्रथमच पहात आहे. सातव्या चित्रातील जास्वंद आमच्याकडे भारतात पण होती आणि आत्ता येथे अमेरिकेत पण आहे. (भारतात अर्थातच लाल जास्वंद पण होती).
या मस्त छायाचित्रांबद्दल धन्यवाद!
8 Sep 2008 - 6:54 am | धनंजय
जास्वंदीच्या किती जाती!
सर्वांमध्ये मला लालभडक पाचे-पाकळ्यांची जास्वंद सर्वाधिक आवडते.
8 Sep 2008 - 7:00 am | मीनल
एकाच जातीच्या फुलांच्या किती या रंगछटा ?
मीनल.
8 Sep 2008 - 7:42 am | सहज
मिपावर अजुन थोडी इथे देखील पहाता येतील.
अजुन येथे देखील पहाता येतील.
सर्वसाक्षीजी सही फोटो!
8 Sep 2008 - 7:33 pm | सर्वसाक्षी
फारच सुंदर!
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद
8 Sep 2008 - 8:37 am | अनिल हटेला
वाह !!
लाजवाब !!!
मन प्रसन्न झाल !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
8 Sep 2008 - 8:55 am | शितल
सुंदर फोटो.
मला शेवटच्या जास्वंदाचा कलर आवडला.
:)
8 Sep 2008 - 10:01 am | यशोधरा
सुंदर फोटो!!
8 Sep 2008 - 1:14 pm | स्वाती दिनेश
मस्त चित्रे..झक्कास!!
यातील लाल,गुलाबी,डबल जास्वंद आमच्या अंगणात होती पूर्वी..आणि एक फिका लाल रंग आणि कातरलेल्या पाकळ्या- कात्रीची जास्वंदच म्हणतात त्याला..ती ही होती.त्याची आठवण करून दिलीत.
स्वाती
8 Sep 2008 - 2:36 pm | राघव
सगळी प्रकाशचित्रे खूप सुंदर! कुठली आहेत ही सगळी? तुमच्या घरी आहेत काय?
आमच्याकडे नागपूरला आहे लाल अन् पांढरा जास्वंद. धन्यवाद!
मुमुक्षू
8 Sep 2008 - 3:00 pm | नंदन
सगळीच प्रकाशचित्रे सुरेख!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Sep 2008 - 7:39 pm | सर्वसाक्षी
धन्यवाद मंडळी.
ही सर्व चित्रे कर्नाटकातील कबिनी व कूर्ग येथील आहेत. कर्नाटकात भटकताना असे लक्षात आले की इथे जास्वंद फार लोकप्रिय आहे. म्हैसूर हून निघाल्यानंतर कबिनी नदीकाठी पोचताना सुमारे १५-२० किलोमिटर अंतर मुख्य रस्ता सोडुन छोट्या रस्त्याने जावे लागते. खुद्द कबिनी धामाच्या अलिकडे ३-४ किलोमिटर अंतरात अगदी छोट्या १०-१२ घरांच्या वस्त्या लागतात. प्रत्येक घराचे आवार जास्वंदीने बहरले होते. थेट कूर्ग मध्ये देखिल अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही गेलो होतो त्या कॉफी मळ्यातदेखिल नाना प्रकारची जास्वंद दिसली. तीच ही चित्रे.
8 Sep 2008 - 8:49 pm | चतुरंग

चतुरंग