वि. सू. :- ICU-१ कुठे आहे विचारू नये.
"पेशंट हळूहळू माणसात येतोय, डॉक्टर क्षीरसागर!
सुधारणा आहे, डॉक्टर!"
" माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड
करत असतो सतत
येडझवा आहे!!"
(आज सारखे सारखे
आपलेच शब्द
मागे घ्यावे लागताहेत राव. )
"सॉरी.... नो सुधारणा ! "
"त्यांची मुलाखत
पुन्हा वाचून काढली...
एक मुद्दा कळाला फ़क्त!
सोप्या भाषेत-
ज्या कवितेत इंटरनेट वगैरे रेफरेन्स येतात
ती 'चौथ्या नवतेची कविता'
( आता पहिल्या 3 कोणत्या आणि नवता काय हे मला विचारू नये)
त्या शितावरून इतर शितांची परीक्षा झाली आहे."
"बायको वाढेल ते जेव की भाड्या गरगरीत...
कशाला नव्वदोत्तर आणि शंभरदक्षिण पो घालतोयस?"
"तिळवेपापड झालाय अंगाचा!"
"ती भाषा मी simplify करून दिली.
त्याने जो मुद्दा मांडला
तो मी एवढाच सोपा करू शकलो. "
"शेजारच्या पोरी बघ काय करत आहेत...
काहीतरी प्रोडक्टिव्ह कर बे.... "
"केस क्रिटिकल आहे, डॉ कुळकर्णी
टोटल रिकवरी वर्चुअली इम्पॉसिबल!"
प्रतिक्रिया
13 Nov 2015 - 8:15 pm | पैसा
केस क्रिटिकल आहे.
13 Nov 2015 - 9:14 pm | संदीप डांगे
तुमचा सोर्स कुठे आहे...
13 Nov 2015 - 9:16 pm | संदीप डांगे
ह्या तिरळ्यांनी चौथी नवता, चौथी नवता करकरून वैताग आणलाय बॉ...
सारखं सारखं मी संकल्पना मांडली, मी संकल्पना मांडली हे स्वरचित जयघोष करून यांना काय नोबेल मिळणारंय...
कोणी सांगेल काय ही नवता काय प्रकरण आहे ते किती महत्त्वाचं आहे...?
14 Nov 2015 - 7:51 am | विशाल कुलकर्णी
पुन्हा वाचून काढली...पुन्हा पुन्हा पुन्हा
किती ते पुन्हा पुन्हा चिंतन
त्या विचारगंगेच्या काळ्याशार...
कि काळ्यानिळ्या...?
कदाचित हिरव्यागार
.... डोहात बुडी घेतल्यावर,
अखेर....
हाती लागलाच काळा एक मोती
हो , कळालाय मला...
मित्रहो, एक का होईना
पण, एक मुद्दा कळाला फ़क्त
"तो म्हणजे या स्वाम्याचं लक्षण काही खरं दिसत नाही"
13 Nov 2015 - 9:21 pm | संदीप डांगे
त्यामुळे स्वामीजींची कविता भया-प्रचं-अति-कल्ला आवडली आहे. एकदम कोथळाच बाहेर...
(आमच्या मते पाचवी नवता म्हणजे - 'भाऊंनी घेतलं मनावर तर राज्य करतील जगावर' यासम सर्व फ्लेक्सवरचे काव्य)
14 Nov 2015 - 10:40 pm | बोका-ए-आझम
पृथ्वी गोल आहे कारण भाऊंचा विषय खोल आहे!
13 Nov 2015 - 9:21 pm | जव्हेरगंज
'गचाळ' विसरलात काय?