हमारी... अधुरी...... नव्वदोत्तरी..............................

मारवा's picture
मारवा in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 2:21 pm

समुहगान

आमचा कळप, आमचा झुंड ,आमचा गण अन आमचीच शिरगणती.
अगणीत आम्ही तुझी गणना नाही कशात, तु नाहीच आमच्या खिजगणती.
आमचा झेंडा , आमचाच अजेंडा, आमची चळवळ आमची तळमळ,अन आमचीच मळमळ.
आमची कुलीन घराणी, आमच्या बांधलेल्या बंदिशी, अन आमच्याच तालावर नाचणारे ताल.
आमच्याच समेवर आमचेच आदिम अभेद्य अविनाशी आवर्तन
सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यम करवावहै !

आमच्या नाजुक भावना, आमच्या घाऊक संवेदना, अन आमच्याच भावुक संघटना.
साथी हाथ बढाना एक अकेला थक जाये तो..... ..वा वा वा वा वा वा रे वा
चल अकेला चल अकेला चल अकेला................ ना ना ना ना ना ना रे ना
आमचे ऎक्टर्स चॉकलेटी आमचे रायटर्स सेंटी आमचे सिंगर्स रॅन्टी
आमचे फ़िलॉसॉफ़र फ़्रेंडली आमचे लीडर लव्हली आमचे गुरु गॉडली
आमची भुक लिमीटॆड आमची चुक लिमीटेड आमची पापं चोरटी आमचा न्याय कोरटी
सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यमकरवावहै !!

आमचा आहार लिमीटेड आमचा विहार लिमीटेड आमची माणुसकी लिमीटेड.
आमचे राजे अन आमच्या राण्या, आमचे गुलाम अन आमचेच हुकुमी एक्के.
आमचा दुश्मन जोकर आमचा दुश्मन जोकर .
आम्ही लिलीपुटीयन्स आम्ही लिलीपुटीयन्स बांधता गलीव्हर आम्हा नाही गहीवर
याची इतकी हिम्मत आम्हास हसतो हा जोकर ?
विना सहकार नाही .... विना सहकार नाही...... विना सहकार नाही.............
सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यमकरवावहै !!

जळो तो हॉवर्ड रॉर्क आणि मरो तो स्टॉकमन डॉक्टर आणि मरो तो ऑस्कर शिंडलर
गप्प गुमान ऎ विदुर आणि बिभीषण तु पण गद्द्दार बिभिषणा यु टु ?
का कान किटतोय रे हा डिफ़्रंट ड्रमर ? हा गप्प का नाही बसत रे हा गंधर्वांचा कुमार ?
मानवतेच्या शत्रु संगे युद्ध आमुचे सुरु जिंकु की हरु अहो आपण जिंकु की हरु ?
काया वाचा मना हुसकावुन लावतो इव्हन जाळतो याचा कोवळा अंकुर.
तरीही का निनादतो आमच्या नेणीवेत हा गणशत्रु चा सुर बेसुर ? सुर भेसुर ?
I

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

9 Nov 2015 - 2:30 pm | अनुप ढेरे

जमलिये नव्वदोत्तरी कविता!

पैसा's picture

9 Nov 2015 - 2:39 pm | पैसा

आवडली.

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 4:28 pm | उगा काहितरीच

हंssssssss ! आपलं असच असते !
हहहहह ! (इथे शाहरूख चा खिंकाळण्याचा आवाज कल्पावा .....धन्यवाद . )

शिव कन्या's picture

9 Nov 2015 - 5:23 pm | शिव कन्या

शब्दशब्द खराय!

आमचे येथे माफक दरात उत्तम दर्जाच्या जाहीराती करुन मिळतील.
तत्वे तुमची जाहीरात आमची
अत्याधुनिक नेणीव वेधी तंत्राने जाहीरातींचा मारा केला जाईल.
एकबार जरुर आजमाईयेगा
आपका अपना
मारवा अ‍ॅडव्हर्टायजर्स
मुलांच्या वाढदिवसानिमीत्त जाहीरातीत स्पेशल सुट १५.३२ %
मुलगा तुमचा जाहीरात आमची
एकवेळ सेवेची संधी द्यावी