एका (पेक्षा एक) कवीं चे मनोगत----!

(ही कविता (मनोगत) वाचणा-या सर्व कवी /कवयित्रीं नी --- स्वतःस 'सन्माननीय अपवाद' समजावे )

घेउनी ताव अन लेखणीला
ठरवले करु कविता एकदा
शब्द शब्द चोहीकडे पण..
हाती काही येत नाही

काय करु ? कसे करु ?
मला काहीच सूचत नाही |

अक्षरांपुढे ठेउनी अक्षर
शब्द सांडले मी पसाभर
जोडूनी त्या शब्दांना पण ...
कविता काही जमत नाही

काय करु ? कसे करु ?
मला काहीच सूचत नाही |

कल्पनेचे अश्व दौडले
पण प्रतिभेने तर वैर मांडले
निळ्या काळ्या शाई मधूनी
निरर्थकच ओळी येती

काय करु ? कसे करु ?
मला काहीच सूचत नाही |

वृत्त अलंकार अन यमकांनी
सजवली मी शब्दावली
चमकदार त्या शब्दांमध्ये
भाव काही 'तो' येत नाही

काय करु ? कसे करु ?
मला काहीच सूचत नाही |

पाने, फुले, वारा पाणी
सर्वांचीच बांधली मोळी
सोबतीला काही गाणी
पण दाद काही येत नाही

काय करु ? कसे करु ?
मला काहीच सूचत नाही |
मला काहीच सूचत नाही ||

मस्तच

मस्तच कविता आहे! Smile

तात्या.

चांगली जमलीये

हे फार चांगल जमलंय

अक्षरांपुढे ठेउनी अक्षर
शब्द सांडले मी पसाभर
जोडूनी त्या शब्दांना पण ...
कविता काही जमत नाही

तरीही कविता जमत नाही म्हणण म्हणजे किती विनम्रता आहे
तुम्ही मोठ्ठे कवी/कवियत्री व्हालं

हा हा हा

मस्त जमलिये कविता.

मस्त कविता

मला काहीच सूचत नाही असे म्हणतांना, कवितेची सर्व सुत्र नमोगताच्या निमित्ताने हाताळली
आणि एक चांगली कविता आकाराला आली. लिखते रहो !!!