(माझा पहिला लेख) जर आपले वाचक मुंबईत रहात असतील तर एक नवी म्हण त्यांना माहित असेल "रोज म.रे. (मध्य रेल्वे) त्याला कौण रडे.तर हा अनुभव साधारण जुन-जुलै मधिल आहे. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ७-११ अंबरनाथ ठाण्याहुन पकडली.पण ती कल्याणला रद्द केली गेली.कारण उल्हासनगरला रेल्वे रुळ खचला होता. मग बुडात्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे मी केडिएमटीची मिनी बस पकडली. तिने कल्याण दर्शन करुन पत्री पुलावरुन नेतिवली वरुन अंबरनाथला निघालो. बस विठ्ठलवाडीपर्यंत एकदम मस्त गेली पण नंतर दुर्दैव आड आलं.आमच्या ड्राईव्हर साहेबांना पुढचा रस्ताच माहित नव्हता.मग काय बसला मासळीबाजाराचं स्वरुप आल. जो तो सुचना करु लागला. मग मी गुगल मँपला शरण गेलो. ह्या भानगडीत १-१/२ तास उडला होता आणी उल्हासनगर दर्शनपण झाले.शेवटी एकदाची बस अंबरनाथ स्टेशनला आली. आता काय म्हणावे या प्रकाराला??
प्रतिक्रिया
7 Nov 2015 - 1:15 am | एस
काय म्हणावे या प्रकाराला हे तुम्ही शब्द मोजून सांगितल्याशिवाय सांगू शकणार नाही. सामान्यपणे शंभर शब्द असतील तर शतशब्दकथा असे म्हणतात.
7 Nov 2015 - 2:16 am | संदीप डांगे
सुज्ञ पर्तिसाद...!
7 Nov 2015 - 1:20 am | श्रीरंग_जोशी
आपण वर जे लिहिलं आहे त्याला लेख म्हणता येणार नाही.
अशा गोष्टी लिहिण्यासाठी मिपावर खरडफळ्याची सोय आहे.
अगोदर केले नसल्यास खाली मिपा बद्दल व सदस्य मदत केंद्र या शीर्षकांच्या खाली प्रत्येकी चार दुवे आहेत. त्यावर जाऊन त्याचे अध्ययन करुन घ्यावे.
पुढील मिपावाटचालीसाठी शुभेच्छा!!
7 Nov 2015 - 10:18 am | टवाळ कार्टा
ऑफिशीयल नियम आहे की नाही ते बघून घ्या हो आधी =))
7 Nov 2015 - 7:41 am | प्रणवजोशी
वाचकांनो हा माझा मिसळपाववरचा पहिलाच लेख आहे.
7 Nov 2015 - 8:34 am | एस
मिपावर स्वागत आहे.
7 Nov 2015 - 10:43 am | संजय पाटिल
मिपावर स्वागत
श्रीरंग_जोशी - Sat, 07/11/2015 - 01:20 नवीन
आपण वर जे लिहिलं आहे त्याला लेख म्हणता येणार नाही.
अशा गोष्टी लिहिण्यासाठी मिपावर खरडफळ्याची सोय आहे.
अगोदर केले नसल्यास खाली मिपा बद्दल व सदस्य मदत केंद्र या शीर्षकांच्या खाली प्रत्येकी चार दुवे आहेत. त्यावर जाऊन त्याचे अध्ययन करुन घ्यावे.
पुढील मिपावाटचालीसाठी शुभेच्छा!!
प्रतिसाद द्या
7 Nov 2015 - 8:58 am | असंका
इतके बचावात्मक का म्हणे? किती वेळा सांगताय पहिला लेख आहे म्हणून?
लेख जमलेला नाही हे तुमचं तुम्हाला कळलेलं आहे एवढाच त्याचा अर्थ.
7 Nov 2015 - 3:14 pm | प्रणवजोशी
ती कॉमेंट चुकुन दोनवेळा पोस्ट झाली आहे
7 Nov 2015 - 3:28 pm | असंका
नै, लेखाच्या सुरुवातीला पण सांगितलंयत एकदा. एवढे घाबरू नका.
एखादा लेख फसतो. पुढचा लेख लिहिताल तेव्हा स्वतः एकदा दोन्दा तपासून बघा. मनाचं समाधान झाल्यावर मगच प्रसिद्ध करा.
लिहून झाल्या झाल्या काय लिहिलंयत ते वाचलंत तर चुका नीट लक्षात येत नाहीत कधी कधी. थोड्या वेळाने तटस्थपणे वाचताना ते लक्षात येतं, की काहीतरी कमी जास्त करायला हवंय. तेवढा थोडा वेळ दिलात तर मामुली चुका तरी नक्कीच रहाणार नाहीत लेखात.
7 Nov 2015 - 9:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
इट'स ओके प्रणव. पुढचा धागा चांगला टाका. हाकानाका. जमेल हळु हळु. मदत लागली तर सांगा.
7 Nov 2015 - 9:56 am | जेपी
हो जरुर सांगा.
"मदतीसी तत्पर,कॅप्टन चिंचवडकर".=))
7 Nov 2015 - 9:33 am | स्पा
ओह, प्रणव असा सगळा प्रकार झाला तर! !!
7 Nov 2015 - 10:50 am | सतिश गावडे
ऑ?? तुम्हीही परत आलात तर.
मिपावर पुनाओकवार स्वागत !!!
7 Nov 2015 - 11:06 am | नाखु
हे बरोबर नाही तुम्ही बुवांची जागा पकडली. आता त्यांनी कुठे बसावे प्रतिसादावे बरे.
स्वगत : सोबत बॅट्या वल्लींना बोलवावे काय?
7 Nov 2015 - 10:39 am | उगा काहितरीच
तुम्हाला मिपावर "लेख" टाकता यावा म्हणूनच तुमच्या जीवनात हा प्रसंग आला .
7 Nov 2015 - 11:07 am | सतिश गावडे
मलाही असेच वाटते. जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होते.
7 Nov 2015 - 11:13 am | नाखु
बाडीस
7 Nov 2015 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार
पहिला प्रयत्न चांगला आहे. सरावाने जमेल हळूहळू.
7 Nov 2015 - 4:24 pm | सिरुसेरि
चांगली सुरुवात . मला या कथेची आठवण आली .
प्रवास (कथा)
7 Nov 2015 - 5:52 pm | हेमंत लाटकर
धाग्यातील चुका दुरूस्त करण्यासाठी संपादन ही सुविधा असावी.
7 Nov 2015 - 7:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वी बिलीव्ह इन वन शॉट परफेक्शन लट्टुकाका.
7 Nov 2015 - 7:21 pm | टवाळ कार्टा
डायरेक्ट धागाच उडवतात??? =))
9 Nov 2015 - 9:12 am | मुक्त विहारि
खरे तर हा धागा म्हणजे एक कूट आहे.
लेख जर नीट वाचला तर बर्याच प्रश्र्नांची उत्तरे मिळतील...
"(माझा पहिला लेख) ====> इथे लेखक पहिल्याच वाक्याला वाचकांना एकाच वेळी संभ्रमात पण पाडतो आणि लेखाची दिशा पण दाखवतो.
बर्याच वेळा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट आचरणात आणतांना सगळेच गोंधळतात.संघात सर्वोत्तम खेळाडू असले तरी फार क्वचित एखादा कप्तान पहिल्याच सामन्यात विजय मिळवू शकतो.
"जर आपले वाचक मुंबईत रहात असतील तर एक नवी म्हण त्यांना माहित असेल "रोज म.रे. (मध्य रेल्वे) त्याला कौण रडे.तर हा अनुभव साधारण जुन-जुलै मधिल आहे."
लेखकाने इथे मुद्दाम मुंबईचे नांव घेतले आहे.पुण्याचे नाही.थोडक्यात,पुणे ह्या शहराला लेखक अनूल्लेखाने बाजूला सरकवतो.शिवाय मुंबई ही आर्थिक नगरी आहे.त्यामुळे लेख आता "आर्थिक केंद्र बिंदूभोवती फिरणार." असे पण लेखक सुचवतो.
शिवाय ह्या वाक्यात लेखकाने. रेल्वेचा पण उल्लेख केला आहे.
"जून-जुलै" हा पण उल्लेख विसरू नका.
जून-जुलै म्हणजे पावसाळा.आता हा पाऊस पैशांचा पण असू शकतो किंवा मतांचा किंवा धावांचा.
"त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ७-११ अंबरनाथ ठाण्याहुन पकडली.पण ती कल्याणला रद्द केली गेली.कारण उल्हासनगरला रेल्वे रुळ खचला होता."
आता, इथे लेखक सकाळी गाडीत चढला की संध्याकाळी? असा प्रश्र्न वाचकांच्या मनांत येतो...आणि वाचकांना असेच संभ्रमात ठेवून, लेखक ठाणे-अंबरनाथ-कल्याण आणि उल्हासनगर अशा चार नगरांची नावे घेवून लेखाला एका चौरस आयाम देतो.
"मग बुडात्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे मी केडिएमटीची मिनी बस पकडली."
आता गोष्ट जरी जून-जुलै मधली असली, तरी त्याच सुमारास केडीएमसीच्या निवडणूकांचे वारे सुरु झाले होते.
इथे कुठल्या तरी पक्षाला ह्या निवडणूकीत रस आहे, असे सुतोवाच करायला, लेखक यशस्वी झाला आहे.
थोडक्यात आता ह्या लेखाची गाडी आर्थिक घडामोडीच्या रुळावरून केडीएमसीच्या निवडणूकांकडे धावू लागली, हे सुज्ञ मिपाकरांच्या लक्षांत आलेच असेल.
(इथे परत पुण्यातील निवडणूकांना लक्षांत घेतलेले नाही, हे पण लक्षांत ठेवलेले बरे....)
"तिने कल्याण दर्शन करुन पत्री पुलावरुन नेतिवली वरुन अंबरनाथला निघालो. बस विठ्ठलवाडीपर्यंत एकदम मस्त गेली पण नंतर दुर्दैव आड आलं."
आता लेखकाने, आधीच्या आयताच्या ४ बिंदूंपैकी कल्याण आणि अंबरनाथ हे २ बिंदू घेतले आणि त्याला नेतीवली आणि विठ्ठलवाडी हे दुसरे बिंदू जोडले आणि त्याला पत्री-पुलाच्या कर्णाचा छेद दिला.इथे मुद्दाम लेखकाने तो कर्ण नक्की किती अंशात छेद देवून गेला, ते सांगीतले नाही.
वाचकांना असे थोडे-फार संभ्रमात ठेवून, लेखाला हळूच पुढच्या योग्य दिशेने ढकलायची लेखकाची हातोटी विलक्षण आहे.असे माझे मत.....
"आमच्या ड्राईव्हर साहेबांना पुढचा रस्ताच माहित नव्हता.मग काय बसला मासळीबाजाराचं स्वरुप आल. जो तो सुचना करु लागला."
आता इथे लेख एका विशिष्ट दिशेला आला.
आपण शक्यतो ड्रायव्हर किंवा कंडक्टर, असा उल्लेख करतो.पण ड्रायव्हरला "साहेब" अशी उपाधी लेखकाने दिली आहे.
मुळात केडीएमसी आणि पर्यायाने केडीएमटीवर सत्ता भाजप आणि शिवसेना ह्या २ पक्षांची.आता बदल म्हणून ही बस हाकण्याचे कार्य मला देण्यात यावे असे ड्रायव्हर साहेबांचे म्हणणे.
तशी मग त्यांना संधी देण्यात आली.पण एका ठराविक परीघाच्या पुढे जग माहीत असल्याने ड्रारव्हरला मार्ग सुचेना आणि ड्रायव्हरच्या ह्या गोंधळलेल्या मनस्थितीचा फायदा, बसमधील किंवा पक्षा मधील इतर सभासदांनी घेतला आणि एक मस्त सावळा-गोंधळ सुरु झाला.
"मग मी गुगल मँपला शरण गेलो. ह्या भानगडीत १-१/२ तास उडला होता आणी उल्हासनगर दर्शनपण झाले.शेवटी एकदाची बस अंबरनाथ स्टेशनला आली."
आता इथे लेखकाने आखीव-रेखीव चौकट सोडून अवकाशी आणि कालरहित मार्गाकडे लेखाचा कोन वळवला.त्यात लेखक १००% यशस्वी पण झाला.
मुळात लेखक हा त्रयस्त घटना-विश्लेषक आहे, हे आता वाचकांच्या धान्यात येते.तो घटना विश्लेषक असल्याने, तो ह्या घटनेचा फक्त साक्षीदार आहे.ड्रायव्हर चुकत असला तरी तो ड्रायव्हरला योग्य तो सल्ला किंवा मार्ग दाखवत नाही.स्वतः मात्र गूगल-मॅप बघत, म्हणजेच हातात उपलब्ध असलेल्या ताज्या माहितीचा आढावा, तत्कालिक प्रगत ज्ञान वापरून घेत असतोच. शिवाय हे ज्ञान तो स्वतःपुरतेच ठेवतो.इतर प्रवाशांना पण सांगत नाही.इथे घटना-विश्लेषक स्वार्थी वाटतो आणि तो तसा वाटलाच पाहिजे, अशी वाचकांना सुचना द्यायला लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे.
ह्या भानगडीत नक्की किती वेळ गेला हे लेखक अंदाजपंचे सांगतो.म्हणजे अशा घटना ह्या कालरहित किंवा कालाचे बंधन न पाळणार्या असतात, हे त्रिकालाबाधित सत्य, लेखक सांगून जातो.
लेखक शेवटी मुक्कामाला पोचोचतो.इथे अंबरनाथचा म्हणजे देवाचा उल्लेख आहे आणि वाटेतल्या "उल्हासनगर" उर्फ आनंदाचा पण उल्लेख आहे.
आता तुम्हाला पण प्रश्र्न पडला असेल की......
"आता काय म्हणावे या प्रकाराला??"
आमच्या दृष्टीने, हा लेख जीवनाचे ३ पैलू उलगडतो. पहिला, आध्यात्मिक आणि दुसरा वास्तविक आहे आणि तिसरा राजकीय.
आता आपण आधी आध्यात्मिक पैलू बघू.
आपले जीवन हे खडतर असून, त्याचा मार्ग कधीच आखीव रेखीव नसतो.जग नियंता (उर्फ ड्रायव्हर साहेब) ते नियंत्रित करत असतो.ह्या मार्गात कितीही अडथळे आले तरी आनंदाने मार्गक्रमणा करा.प्रत्येकाचे ध्येय वेगळे-वेगळे असले तरी, शेवटी प्रत्येकालाच देव-दर्शन मिळणार आहेच.
आता आपण वास्तविक पैलू बघू.
एखाद्या सुरळीत चालणार्या मोहिमेला खीळ बसली किंवा अनाहूत संकटात ती मोहीम फसली तर, नवख्या कप्तानाकडे, त्या मोहीमेची सुत्रे देवू नका.(बर्याच वेळा असा कप्तान वरिष्ठ अधिकार्यां कडून, लोकशाही मार्गाने, लादला पण जावू शकतो.) कारण असा नवखा कप्तान वेळेत ती मोहीम पुर्ण करत नाही आणि ह्या अयशस्वी मोहिमेचे साक्षीदार होण्याचे दु:भाग्य तुमच्या नशिबी येते.फक्त देवच तुमच्या ह्या बिघडलेल्या मोहिमेतून तुमचे रक्षण करू शकतो.
आता आपण राजकीय पैलू बघू या.
नुकत्याच झालेल्या केडीएमसीच्या निवडणुकांत मनसेचे इंजिन घसरले.ह्याची योग्य ती कारण-मीमांसा लेखकाने कुणाचेही नांव न घेता आणि वैयक्तिक शेरेबाजी टाळून केलेली आहे.
इत्यलम....
9 Nov 2015 - 5:20 pm | जातवेद
वा वा. ही तर गद्य धुसरिका! अगदी बिरूटे सरांच्या ह्या प्रतिसादाची आठवण काढून दिलीत.
3 Feb 2016 - 1:48 am | प्रणवजोशी
आपण पुण्याचे आहात वाटते. :-)
3 Feb 2016 - 1:52 am | श्रीरंग_जोशी
मुवि डोंबिवलीकर आहेत.
मुविंमुळेच सांप्रतच्या काळात मिपाकट्ट्यांची वारंवारिता डोंबिवली येथे सर्वाधिक झाली होती.