पहिलाच प्रयत्न आहे .....
ती येणार म्हणून
मी फुलांचा गुच्छ केला
नवा पोशाख केला
अत्तराचा वास केला
नजरेचे करून बाण
तिच्या रस्त्यावर लावले
कल्पनाचे तन मनात वाढले"१"
दुसरं काहीच सुचत नव्हतं
माझं प्रेम फक्त तिच्यावर होतं
डोळ्यासमोर चेहरा
मनातले विचार फक्त तिचे होते "२"
चातका परी वाट पाहीली
पहिली घटका निघून गेली
पाण्याविना मासा
तळमळला जीव तसा"३"
वादळाने पाने गळावी
तशी स्वप्ने गळाली
तरी राहावत नव्हतं
तिथून जावत नव्हतं "४"
दिवस झुकाय लागला
फुलं सुकायं लागली
भास होत होता
मागे पुढे पहाता
फुले फेकली
रस्त्यावर जाता जाता "५"
शेवटी ती आली
फुले तुडवून गेली
तरी ही मी तिथंच उभायं
पुन्हा ती येणार म्हणून "६"
प्रतिक्रिया
6 Nov 2015 - 4:37 pm | चांदणे संदीप
पहिला प्रयत्न चांगला आहे.
6 Nov 2015 - 5:12 pm | दत्ताभाऊ गोंदीकर
धन्यवाद
6 Nov 2015 - 5:12 pm | दत्ताभाऊ गोंदीकर
धन्यवाद
6 Nov 2015 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा
@पाण्याविना मासा![http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-032.gif](http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-032.gif)
तळमळला जीव तसा >>