वाढदिवस म्हणजे

दिप्ती's picture
दिप्ती in जे न देखे रवी...
5 Sep 2008 - 3:49 pm

वाढदिवस म्हणजे ;;)

वाढदिवस म्हणजे -
नाही फक्त्त वाढत्या वयाची जाणीव देणारा दिवस
आनंदाने , उमेदीने
नवे दिवस स्विकारण्याचा हा दिवस

वाढदिवस म्हणजे -
नाही फक्त भूतकाळाचा जमाख्रर्च मांडण्याचा दिवस
गमावलं ते गमावलं म्हणून
नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस

वाढदिवस म्हणजे-
नाहि फक्त जगण्याची पाटी कोरी करण्याचा दिवस
जुन्या आठवणींचे दिवे लावून
नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस

कविता

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

5 Sep 2008 - 4:10 pm | स्वाती राजेश

गमावलं ते गमावलं म्हणून
नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस
मस्त ओळी..:)

श्रावणी's picture

7 Sep 2008 - 11:34 pm | श्रावणी

फार सुंदर
जुन्या आठवणींचे दिवे लावून
नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस
खरच!!!!!!!!!!!!!!!!